पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

इमेज
संविधान लागू झाले असले तरी लोक माणसात काही फरक पडला नाही; मनुसृतीचे दहन केले तरी तिचा जण माणसांवरचा प्रभाव कमी झाला नाही. आई धरती दुभंगली तरी लेकराची हेडसह होऊ देत नाही वडील आभाळ फाटले तरी लेकराला पोरके होऊ देत नाहीत हे जर दिप्तीला सांगितले तर तिचा विश्वास बसणार नाही. कारण तिच्या आई-बाबानी तिचा संसार उद्वस्त केला. “ तिला जन्म देऊन सगळ्यात मोठी चूक केली म्हणून अशा मुलींना शिकवायला नको कारण तिने कुटुंबाचे नाव खराब केले “ हे उद्गार आहेत दीप्ती मेश्राच्या आईचे. दीप्ती आणि अनिश दोघे हि मध्यम वर्गीय कुटुंबाचे घटक आहेत फक्त दीप्ती ब्राम्हण आणि अनिश दलित जातीत जन्माला आले. दोघांनी चांगले शिक्षण घेतले M A करताना त्यांची ओळख झाली त्याचे मैत्रीत आणि नंतर प्रेमात रूपांतर झाले. दोघे हि ग्राम सेवक म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले आणि नंतर त्यांनी लग्न केले. यात वरवर सर्व सामान्य दिसत असले तरी खरी प्रेम कथा लग्नानंतर सुरु होते. लग्न झाल्यावर तिला बरेच दिवस सासरी नांदायला जाऊ दिले नाही तिच्या वडिलांनी अनिशवर बलात्कारा

हुंडा बली

इमेज
समाज अद्याप पूर्णपणे २१-व्य शतकात पोहचला नाही कारण आपली मानसिकता १८-व्य शतकातील आहे.    स्त्री-पुरुष समानता केवळ कागदावरच आहे; ती जमिनीवर केव्हा उतरणार?  शिक्षण हे व्यक्तीच्या वर्तनात परिवर्तन घडवून आणते असे म्हणतात. पण उच्चशिक्षित लोकांनी महिलांवर अत्याचार करणे थांबवले नसून त्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.  बिहार राज्यातील नालन्दा परिसरात एका गर्भवती स्त्रीची सासरच्या लोकांनी हत्या करून तिच्या मृत देहाचे तुकडे-तुकडे करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.काजवल यांचा गेल्या वर्षी रेल्वेत चतुरट श्रेणी कर्मचारी  असणाऱ्या संजीव कुमार यांच्याबरोबर विवाह संपन्न झाला.  त्यावेळी रूढीनुसार १२००००० रुपये तसेच दागीने आणि दुचाकी  हुंडा म्हणून दिल्याचा दावा तीच्या आई-बाबानी केला. त्यानंतर संजीव यांची बढती होऊन ते तिकीट तपासक झाले म्हणून ६००००० रुपये आणखी हुंडा मागितला ते काजलच्या आई-बाबाना शक्य नव्हते आपल्या मुलीच्या सुखी संसारासाठी त्यांनी काही खटपट केली असती.  पण तिच्या मनातील घालमेल बरेच दिवस त्यांना माहिती नव्हती १ दिवस तिने आपले मन मोकडे केले त्यामुळे सासरी होणारा छळ अत्याचार त्या

सफाई कामगार ते उपजिल्हाधिकारी एका घटसपोटीत महिलेचा प्रवास

इमेज
हे जीवन सुंदर आहे असे आपण नेहमी म्हणतो; पण त्यातील सौंदर्य आपल्याला शोधता येते का?   स्त्री शिकून सक्षम झाली असली तरी ती सामाजिक रूढींच्या झखडातून बाहेर पडू शकली नाही. त्यांच्या वाट्याला अत्याचार नेहमीचेच आहेत त्या काही प्रमाणात विरोध करतात पण त्यांना दाबले जाते. काही मात्र अशा आव्हानांनी भरलेल्या जीवनात संघर्ष करायचे ठरवतात आणि अशा असंख्य पिढीतांना आशेचा किरण दाखवतात.  आशा कंडारा  यातीलच एक त्यांचा जन्म मध्यम वर्गीय कुटुंबात झाला ; त्यांचे वडील नोकरी करत होते. त्यांचे १२-वि पर्यंत शिक्षण झाले आणि त्यानंतर लग्न झाले. त्या वर्गातील हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणल्या जात असल्या तरी सामाजिक दबावामुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले. आपल्या समाजात स्त्रियांवर अनेक बंधने लादली जातात एका युवतीने जीन्स परिधान  केला  म्हणून तिच्या  नातलगांनी तिची हत्या केली. सविस्तर वाचण्यासाठी  https://www.premsparsh.com/2021/07/blog-post_25.html   त्यांचे वैवाहिक जीवन अत्यंत कष्टी असावे कारण त्यांना पत्रकारांनी याविषयी विचारल्यावर त्यांनी बोलायला नकार दिला. त्यांना २ अपत्ये झाली त्यानंतर ३२ वर्षाच्या अस

जीन्स पॅन्टची हत्या

इमेज
जगाच्या इतिहासात नारी शक्ती ने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.  सर्वत्र कित्येक शतकापासून तिला दुय्यम दर्जा दिला होता त्यावर  मात करून तिने आपल्या हक्काचे मिळवले आणि आपली नवीन ओळख सृष्टीच्या सर्वांगात सर्व क्षेत्रात निर्माण केली. भारतीय नारी यात कुठ ही मागे नाही. आज पुरोगामी म्हणवणाऱ्या विकासाचा शिक्का स्वता: वर मारणाऱ्या पाश्चिमात्य देशांनी तिला समानतेचा अधिकार नाकारला होता तो अधिकार तिला पहिल्या दिवसापासूनच  भारतीय संविधानाने बहाल केला. आपल्या देशात कागदपत्रे अथवा कायदेशीर दृष्ट्या स्त्री पुरुष समानता आहे. पण वास्तविकता पूर्णपणे उलट आहे आजही भारतीय समाज हा पुरुषप्रधान  आहे त्याच्या मते स्त्री ही खाजगी संपत्ती आहे आणि तिने पुरुषाच्या वर्चस्वाखाली राहणे हे तिचे स्त्रीत्वाचे रक्षण आहे. शिक्षणाच्या प्रचारामुळे स्त्री ही चौकटीबाहेर जाऊन आपल्या क्षमता नुसार जगाशी स्पर्धा करण्यास  सज्ज  झाली आहे. तिने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर जगाला पेलण्याची शक्ती दाखवून दिली आहे .तरीदेखील तिचं हे वैभव तिचं हे परिघाबाहेर पाऊल टाकणे अनेक समाजकंटकांना पचनी पडत नाही. त्यांच्या मते हा त्यांच्या

गुरु म्हणावे तरी कोनाला?

इमेज
  काळ सर्वत्र गुरु पौर्णिमा साजरी झाली सर्व गुरूंवर शुभेच्छांच्या वर्षाव झाला असणारच त्यामुळे त्यांना देखील धन्य वाटले असेल.  पण गुरु शिशाचे नाते कसे असावे?  गुरु कुणाला म्हणावे?  यावर आपण आजच्या लेखात चर्चा करू गुरु म्हणजे सत्य , गुरु म्हणजे सेवा, गुरू म्हणजे ध्येय, गुरु म्हणजे न्याय हे सर्व गुण माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर जाण्यासाठी ज्या सर्व थोरांनी प्रयत्न केले. त्या सर्वांचे गुरु पौर्णिमेच्या दिवशी मी मनापासून आभार मानतो. साने गुरुजींच्या शब्दात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही साने गुरुजींनी दिलेली शिकवण आणि आपण सर्वांनी दिलेला आदेश समजून मी आयुष्यात जगाला प्रेम अर्पावे या उदात्त हेतुने माणसं जोडण्यासाठी अविरत प्रयत्न करत राहील .कारण इतिहासातील चुका पुसण्यासाठी रूढी परंपरा मोडण्यासाठी आणि कार्यकारण भावाने विचार करण्यासाठीच ही ऊर्जा मला प्रेरणा देत असते.गुरु नेहमीच  मार्गदर्शन करीत असतात सेवाभाव ज्ञान मार्गदर्शन सत्य न्याय या सर्व गुणधर्मांची रुजवण आपल्या शिष्यांमध्ये करण्याचं महत्कार्य गुरु पार पाडतात. जगाच्या इतिहासात गुरु-शिष्य परंपरा प्राचीन आहे.सॉक

आजचे लोकमान्य

इमेज
भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही मानवतेच्या स्वातंत्र्याची चळवळ होती. या आंदोलनात राजकीय स्वतंत्र बरोबरच सामाजिक स्वातंत्र्य प्रस्थापित करणे हा उदात्त हेतू होता. त्यामुळेच जगातील अनेक देशांनी आपल्या स्वातंत्र्य पासुनच प्रेरणा घेऊन त्यांच्या देशात लढा उभा केला. यासाठी अनेक महापुरुषांनी आपल्या कर्तृत्वातून चळवळ उभी केली आणि विचारांचे बीज पेरले त्याची वटवृक्ष आज आक्राळ-विक्राळ रूप घेऊन आमच्या जीवनातील प्रत्येक घटनेत मार्गदर्शन करीत आहे काही हेतू निर्णय हे तात्कालिक होते तर काही त्रिकालबाधित प्रेरणा देणारी ठरले त्यातीलच भारतीयांच्या मनातील खडखड  व्यक्त करणारा असंतोष ब्रिटिशांसमोर मांडणारे बाल गंगाधर टिळक अर्थात लोकमान्य टिळक आज यांची जयंती त्यानिमित्ताने सर्वप्रथम त्यांच्या अफाट कर्तुत्वाला त्रिवार वंदन.  लोकमान्यांची ओळख आम्हाला राजकीय नेता, ज्वलंत प्रश्न उठवणारा पत्रकार, गीतारहस्य सारखा ग्रंथ लिहिणारा ग्रंथकार,  होमरूल सारखी चळवळ डॉक्टर यांनी बेझंट यांच्या सोबतीने सुरू करणारा चळवळीतील कार्यकर्ता एवढेच नाही तर त्या पलीकडे स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण स्वदेशी आणि बहिष्कार ही चतुःसूत्री

या नात्याला म्हणायचे तरी काय?

इमेज
मानवी आयुष्यात प्रत्येकालाच प्रेम हवं असतं आयुष्य जगण्यासाठी दुःखे वाटण्यासाठी  आनंदाचे क्षण लुटण्यासाठी जीवनसाथी प्रत्येकाच्या जीवनात सिंहाचा वाटा उचलत असतो. प्रेमाची अनेक रूपे व्यक्तिगणिक भिन्न भिन्न स्वरूपाची असतात काही आपल्या प्रेमातून जगाला नवा आदर्श देतात .तर काही प्रेम या संकल्पनेवर विचार करायला भाग पाडतात गेल्या १-२ दिवसापासून एका लोकप्रिय जोडप्याची सर्वत्र चर्चा आहे. 

धर्माच्या भिंती मोडतात तेव्हा

इमेज
भारतीय संस्कृतीची इमारत सहिष्णुतेचा पायावर उभारली असून सविधान नावाच्या कळसावर धर्मनिरपेक्षतेची ध्वजा दिमाखात फडकते आहे . विविधतेत एकता हे ब्रिज जपून वैश्विक स्तरावर आपल्या देशाची प्रतिमा निर्माण झाली आहे. भारतीय सहिष्णुतेचा विचार केल्यास चंद्रगुप्त मोर्य पासून थेट आजपर्यंत अनेक आंतरधर्मीय  विवाह यशस्वीरित्या संपन्न झाले आहेत ; 'सारे सुखेन संतु' या तत्त्वाने इथे अनेक संसार आनंदाने नांदत आहेत.        आज आधुनिक युगात प्रत्येकाने तंत्रज्ञान स्वीकारलं खरं; पण त्याचबरोबर हा ' पुरोगामी'  म्हणवणारा मानव अज्ञानाच्या गटारीत फसला आहे ,आज धर्मा धर्मा मध्ये द्वेष पसरवला जातोय,यातूनच प्रेमाचे घट्ट बंधने कट्टर पंथीयांच्या दबावाखाली  कमकुवत होत चालली आहेत .अशीच एक घटना घडली महाराष्ट्रातील नाशिक शहरात रसिका नावाची  दिव्यांग असणारी हिंदू तरूणी आणि आसिफ खान नावाचा सर्वसामान्य तरुण यांच्यात गेल्या आठ वर्षांपासून प्रेम संबंध होते दिवसा गणित हे नाते गट  होत होते एक रूप पावत होते योगायोगाने उभयतांच्या भावनांचा आदर करून दोन्ही पक्षातील वडीलधार्‍या माणसांनी त्यांच्या विवाहाला मान्यत

खरं कोण?

इमेज
जागतिकीकरणानंतर समाज ३६० अंशी बदलला सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात हे सर्व बदल जाणवतात.  प्रत्येक व्यक्तीचा स्वार्थ अनेकांचे जीवन उद्वस्त करू लागला आहे.   आज मुंबई उंचन्यायालयाने बलात्काराच्या आरोपीला अटक पूर्व  जामीन मंजूर केला. त्या दोघांचे लग्न जानेवारी २०२० साली ठरले होते; त्यानंतर टाळेबंदी झाली आणि लग्न पुढे ढकलले गेले. आणि डिसेम्बर २०२० साली काही कारणास्तव रद्द करण्यात आले.  तरी देखील मुलगी मुलाच्या कुटूंबियांच्या सम्पर्कात होती गेल्या मार्च महिन्यात त्याने तिला घरी बोलावले त्यावेळी घरी कोणी नव्हते म्हणून त्यांनी शारिरीक सम्बन्ध ठेवले; त्यानंतर त्यांनी सोबत वेळ घालवला. त्यावेळी दोघांची संमती होती असा मुलाच्या वकिलांनी युक्तिवाद केला; तर मुलीच्या वकिलांनी लग्नाचे आश्वासन देऊन फसवले असा प्रतिवाद केला. न्यायाधीशांनी प्राथमिक दृष्ट्या दोघांची संमती असल्याचे दिसते असे म्हणून अटकपूर्व जामिन मंजूर केला.  पुढील तपास सुरु आहे.  हि बातमी सकाळ वर्तमानपत्राने दिली.  विवाह जुडने आणि काही कारणांनी मोडणे. हे नेहमी घडत असते पण विवाह पूर्व शारिरीक सम्बन्ध ठेवणे योग्य आह

चाललंय तरी काय?

इमेज
“जो समाज महिलांचा सन्मान करतो; तो समाज प्रगती करतो” मानवी सृष्टीच्या इतिहासापासून ज्या ठिकाणी महिलांना संधी मिळाली त्या ठिकाणी त्यांनी आपला ठसा उमटवला. पण पुरुष प्रधान समाजाने तिचे शौर्य कधी समजून घेतलेच नाही. तिला कायम दुय्यम दर्जा देऊन तिचे कार्य क्षेत्र ४ बिंतींत मर्यादित ठेवले. . नंतर शिक्षण मिळाल्यावर तिने काळबाह्य रुढींचे वर्तुळ मोडून मुक्त झेब घ्यायला सुरुवात केली; पण तिच्या समोर नवीन संकटे उभी ठाकली.  कामावर जाणाऱ्या महिलांवर  अत्याचार  वाढले, नोकरी करणाऱ्या महिलांना स्वतःच्या कष्टाचा पैसा खर्च करण्याचा अधिकार कुटुंबाने काढून घेतला, समाज माध्यमावर तिची बदनामी सुरु झाली,  तिच्या जवाबदाऱ्या वाढत असताना तिच्यावर अधिकार गाजवण्याची  कुटुंबातील पुरुषांची वृत्ती बळावली.   इत्यादी अशा सर्व संकटाना तोंड देत ती जीवनाच्या नव्या वाटा शोधत आहे.  समाज माध्यमावर तिचे जीवन जगणे फार कठीण आहे तिला नेहमी अश्लील  शब्दात उपदेश केले जातात; तिच्यावर अत्याचार करण्याचा धमक्या दिल्या जातात  काही लोक तिची नाहक बदनामी करतात.  आता या विकृतीने कळस गाठून चक्क   तिचा लिलाव सुरु केला आहे.   गेल्या

ऐतिहासिक विवाह

इमेज
प्रेमाची एखादी मर्यादित चौकट नाही. त्यामुळे त्याची व्याप्ती अथांग आहे.  प्रेमामुळेच २ जातीत २ धर्मात तसेच २ देशात लग्न होऊ शकते. कोणाचे कुणावर प्रेम आहे  सांगणें अवघड आहे.  पण जाती धर्माच्या गरीब श्रीमंतीच्या भिंती पाडण्याचे कार्य प्रेमाच्या हातोडीने पारपडते.  अशा अनेक प्रेम कथा आपण आजवर ऐकल्या / वाचल्या असतील, पण ह्या सर भिन्न लिंगी व्यक्तीच्या  आयुष्याच्या अवती-भवती घडणाऱ्या होत्या.  आजवर तृतीयपंथी लोकांचा आपण किती विचार केला?   हा प्रश्न स्वतःला विचारा कारण याना लग्न करायला परवानगी देणे त्याचबरोबर एका सर्व सामान्य मुलाने तिचा स्वीकार करणे; काळाच्या पुढे टाकलेली पाउले आहेत. अशा  मानवतेच्या स्तंबाना  नमन  समाज माध्यमावर जास्त काळ सक्रिय राहणे म्हणजे वडीलधाऱ्या माणसांचा रोष पत्करण्यासारखे आहे.  याच समाजमाध्यमवर झालेल्या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले; व त्याची परिणीती विवाहात झाली; आणि इतिहास   घडला. संजय झाल्टे आणि शिवलक्ष्मी या जोडप्याने आपल्या प्रेमातून जिवंत ताजमहल साकारला.  त्यांची प्रेम कहाणी इतरांपेक्षा फार वेगळी आहे. त्यात एकमेकांची काळजी, प्रचंड संयम ,  समाजाच्या प्रव

संघर्षाचे दुसरे नाव-स्टॅन स्वामी

इमेज
सूर्य नेहमी सर्वाना प्रकाश देत असतो;  जिथे अंधकार आहे तिथे प्राधान्याने पोहचतो. शेवटी आपण मानव आहोत म्हणून मानवी समाजाद्वारे दुर्लक्षित झालेल्या लोकांसाठी जगले पाहिजे त्यांच्या दुखत सहभागी होणे खरा पुरुषार्थ आहे.  आदिवासी, गरीब, पिढीत लोकांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटणाऱ्या “फादर स्टॅन स्वामी” या तेजस्वी सूर्याच्या आत्म्याला शांती लाभो हि ईशवर चरणी प्रार्थना. त्यांनी जमिनीवर काट्यांवर चालून प्रवास केला किमान स्वर्गात त्यांना त्याचे फळ मिळेल हि अपेक्षा.   दक्षिणेतील तामिळनाडू राज्यात स्वातंत्र्यापूर्वी जन्माला आलेल्या स्टॅन स्वामी यांनी गरिबी जवळून अनुभवली. ते लहानपणापासून धार्मिक होते; पण त्यांनी धर्माचा दंभ होऊ दिला नाही. मानवतेला सर्व श्रेष्ठ धर्म समजून सामान्य  माणसात  त्यांनी परमेशवर शोधला.  दिनांक  ०५-०७-२०२१ त्यांचे वयाच्या ८४ वर्षाचे असताना मुंबईतील खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. त्या नंतर समाजाच्या सर्व क्षेत्रातून तीव्र तसेच भावुक प्रतिक्रिया आल्या; सर्वच प्रतिक्रिया बोलक्या होत्या.  त्यातून स्वामींवरचे लोकांचे प्रेम दिसत होते तसेच त्यांच्यावर केलेल्या आरोपांबद

प्रेमाची हत्या

इमेज
आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर आपण प्रेमात पडू सांगता येत नाही.  पण प्रेम करत असताना त्यासाठी मनाची तयारी लागते; एखाद्या नोकरी सारखे जास्त पगाराची नोकरी मिळाली कि, जुनी सोडून नवीन नोकरी धरायची नसते.  लग्नापूर्वी बरेच प्रेमात पडतात; आणि असे बरेचशे प्रेमी दुसऱ्या व्यक्ती बरोबर लग्न गाठ बांधतात आणि जुन्या नात्याला पूर्णविराम देतात.  पण काहींचे मात्र या उलटे असते त्यांच्या वैवाहिक आयुष्यात त्यांना आपल्या जोडीदाराशिवाय दुसरी व्यक्ती फार आवडू लागते; आणि त्यांच्यात प्रेम संबंध प्रस्तापित होतात. यातूनच त्या जोडप्यांचे आयुष्य अस्थिर हुन संसार उद्वस्त होतो.  पुण्यात एक जोडपे आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी होते. त्या सुखी संसाराला एका मठाधीश महाराजांची दुष्ट नजर लागली. त्या महाराजांच्या प्रेमात एक वैवाहिक महिला पडली; आणि तिने पती पेक्षा महाराजांशी जास्त वेळ घालवू लागली. मग या जोडप्यात खटके उडू लागले आणि वाद विकोपाला गेला. दोघे मग सोक्षमोक्ष करायला मठात गेले तिथे त्या गृहस्थावर प्राण घातक हल्ला केला; त्यात त्यांचा मृत्तिव झाला. अपघाती मृत्तिव दाखवण्यासाठी मृत देह कात्रजच्या घाटात फेकून त