हुंडा बली

समाज अद्याप पूर्णपणे २१-व्य शतकात पोहचला नाही कारणआपली मानसिकता १८-व्य शतकातील आहे.  

  • स्त्री-पुरुष समानता केवळ कागदावरच आहे; ती जमिनीवर केव्हा उतरणार? 

    शिक्षण हे व्यक्तीच्या वर्तनात परिवर्तन घडवून आणते असे म्हणतात. पण उच्चशिक्षित लोकांनी महिलांवर अत्याचार करणे थांबवले नसून त्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. 

    बिहार राज्यातील नालन्दा परिसरात एका गर्भवती स्त्रीची सासरच्या लोकांनी हत्या करून तिच्या मृत देहाचे तुकडे-तुकडे करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.काजवल यांचा गेल्या वर्षी रेल्वेत चतुरट श्रेणी कर्मचारी  असणाऱ्या संजीव कुमार यांच्याबरोबर विवाह संपन्न झाला. 

    त्यावेळी रूढीनुसार १२००००० रुपये तसेच दागीने आणि दुचाकी  हुंडा म्हणून दिल्याचा दावा तीच्या आई-बाबानी केला. त्यानंतर संजीव यांची बढती होऊन ते तिकीट तपासक झाले म्हणून ६००००० रुपये आणखी हुंडा मागितला ते काजलच्या आई-बाबाना शक्य नव्हते आपल्या मुलीच्या सुखी संसारासाठी त्यांनी काही खटपट केली असती.  पण तिच्या मनातील घालमेल बरेच दिवस त्यांना माहिती नव्हती १ दिवस तिने आपले मन मोकडे केले त्यामुळे सासरी होणारा छळ अत्याचार त्या सर्व गोष्टी

    नातेवाईकांना माहिती झाल्या. त्यामुळे तिला अधिक त्रास दिल्या जाऊ  लागला. तिचा मोबाईल काढून घेण्यात आला.  

    जगाशी संपर्क तुटल्यावर त्यांनी कट रचून हत्या करण्याचे नियोजन केले. 

    आणि आपल्या स्वार्थासाठी तसेच तथाकथित पुरुषार्थसाठी एका निष्पाप मुलीचा जीव गेला. त्यांनी ठरवले तसेच उपाय देखील योजले गेले. 

    काजवलची हत्या करून ते फरार झाले त्यांच्या ठिकाणाविषयी माहिती देण्यास शेजाऱ्यांनी नकार दिला. 

    पोलिसांची वागणूक योग्य नव्हती वास्तविक पाहता त्या मृत देहाचे सर्व तुकडे जमा करण्याची जवाबदारी पोलिसांची असताना त्यांनी मात्र हात देखील लावला नाही. गुन्हा दाखल करायला फार विलंब केला. 

    आपल्या देशात कायदेशीर दृष्ट्या हुंडा देणे घेणे गुन्हा आहे तरी देखील अनेक विवाहांमध्ये असे व्यवहार चालतच असतात. त्याचबरोबर आपल्यातील पुरुषप्रधान संस्कृती स्त्रियांच्या विकासाच्या आड येते. या मानसिकतेत वाढलेल्या लोकांच्यामते स्त्री नेहमी पुरुषांपेक्षा दुय्य्म दर्जाची असते; तिने त्याचा शब्द प्रमाण मानून जगावे. 

    ज्या संस्कृतीचा अनेक लोक अभिमान बाळगतात ती संस्कृती या पेक्षा वेगळी आहे का? 

    आपल्या देशातील सर्व राज्यांमध्ये हुंडा पद्धत उघडपणे सुरु आहे कायदा फक्त नाम मात्र आहे. असे नसेल तर आता पर्यंत किती लोकांवर या कायद्यानुसार कार्यवाही झाली? 

    वास्तविक पती-पत्नी हे नाते व्यवहाराच्या सूत्रात बसू शकत नाही पण आपल्याकडे स्वघोषित सामाजिक प्रतिष्ठेसाठी हुंडा घेण्याची / देण्याची अघोरी प्रथा अस्तित्वात आहे. ज्यामुळे लक्षावधी मुलींनी हे जग सोडले दुर्दैवाने अद्याप देखील आम्ही जागी झालो नाही याची खंत वाटते. पती-पत्नी यांच्या नात्याचे आदर्श उदाहरण समजून घेण्यासाठी https://www.premsparsh.com/2021/01/blog-post_22.html 

    आजवर अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी शिक्षा फार थोड्या लोकांना झाली आहे. त्या संपूर्ण कार्यवाहीसाठी लागणार वेळ मनस्ताप वाढवणारा असतो म्हणून अशा घटना निकालात काढण्यासाठी जलदगती न्यायालयात सर्व प्रकरणे चालवावे तसेच पोलिसांना निश्चित वेळेत चौकशी पूर्ण करण्याचे बंधनकारक करायला हवे. 

    गेलेली व्यक्ती परत येऊ शकत नाही हे जेवढे सत्य आहे तेवढेच पोटच्या गोळ्याला अनैसर्गिक रित्या आलेल्या मृत्तिवची जखम कोणत्याच न्यायाने भरून निघू शकत नाहीहे देखील उघड सत्य आहे. 

    अशा वेळी कायद्याची दहशद प्रस्तापित करून गुन्हेगारांना शिक्षा देत असताना भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घ्यावी. 

    विवाह प्रसंगी व्यवहार करू नये तसेच मुलं-मुलींना प्रेम विवाह करण्यास समाजाने प्रोत्साहित करावे. जर ठरवून विवाह करायचा  असेल तर नोकरी व्यवसाय पाहत असताना त्या कुटुंबाचे संस्कार नवऱ्या मुलाचे चारित्र्य याकडे अधिक भर द्यावा या छोट्याशा काळजीने मोठे संकटे टाळता येऊ शकतात. 

    शेवटी समाजात आमूलागरी बदल घडवून आणायचे असतील तर सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे एकट्या-दुकट्याने काही हि होणार नाही.  तरी देखील एका क्रांतीची ठिणगी पाडण्यासाठी हा बदल घडवून आणण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे. 

  • फोटो - साभार गूगल

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा