पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खरच अंतर जातीय विवाहामुळे आई-वडिलांच्या भावनांना ठेच पोहचते का?

इमेज
महाविद्यालयात गेल्यापासून अभय आणि अविनाश एकमेकांशिवाय राहत नसत त्यांची मैत्री एवढी घट्ट होती कि, दोघे एकमेकांपासून जरा लांब असले तर त्यांच्यात  काही भिन्स्ले असावे अशी शंका घेण्यास जागा होती; कारण त्यांनी मैत्री जीवापाड जपली.  पदवीचे पहिले २ वर्षे त्यांनी आपल्या मैत्रीने महाविद्यालयात वेगळी ओळख  निर्माण केली पण फक्त त्यांची घट्ट मैत्री एवढीच मर्यादित ओळख नव्हती तर अभय सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर होता त्याने स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले.  त्याला नाटकात अधिक रस असल्यामुळे तो रंग मंचावर जास्त वेळ रमत असायचा त्याच रंग मंचावर त्याच ताकदीची नटी होती तिचे नाव राणी.   अभय आणि राणी दोघे आपल्या भूमिकेत शिरले कि त्या भूमिकेशी एकरूप होऊन काम करायचे आणि त्यांची हि पात्राच्या भूमिकेशी तादात्म्य पावण्याची वृत्ती सर्व सहयोगी कलाकारांना प्रेरणा देत असे.  रंग मंचावर नाटकातून ३ तास प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या या युगुलाने कधीच एकमेकांची मने जिंकली होती; त्यांच्या वागण्यातील बदल अविनाशने अचूक हेरला आणि औपचारिकता त्याने पूर्ण केली.  ते जेवढे जीव ओतून कामात मग्न व्हायचे त्यापेक्षा जास्त

हरवलेल्या बालपणाला जवाबदार कोण?

इमेज
जागतिकीकरणानंतर आपल्या देशात प्रचंड आर्थिक दरी निर्माण झाली त्याचा परिणाम समाजातील सर्व घटकांवर दिसतो.  एकीकडे कुपोषणाने बाळ मृत्तिव होतात तर दुसरीकडे लठ्ठपणा, अभ्यासाचा ताण, वाढता स्क्रीन टाइम  या समस्यांनी सम्पन्न कुटुंबातील बालके ग्रसित आहेत.  महामारी सुरु झाल्यापासून ऑनलाईन शिक्षण प्रणाली सर्वानी स्वीकारली त्यामुळे मुलांच्या आयुष्यावर अनेकदुर्गामी परिणाम झाले त्यांचा भावनिक विकास खुंटला,  समाजिकरण मंदावले, चिडचिडेपणा वाढला, अनेक आजार सुरु झाले यावर भरीसभर पालकांचा दबाव आणि अवास्तव अपेक्षांचे ओझे याने बालकांचे क्मर्डे मोडले आहे.  आता अनेक आई-वडिलांना असे वाटते त्यांच्या मुलाने-मुलीने अगदी आईच्या उदरातूनच सर्व ज्ञान घेऊन यावे आणि जन्म झाल्याबरोबर आपल्या नावावर रेकॉर्ड नोंदवावे पण काय करतील बिचारे त्यांना देखील माहिती आहे कि हे अशक्य आहे.    या त्यांच्या अपेक्षा मुलांवर लादून त्यांच्यातील स्पर्धेला अगदी काही महिन्याच्या आयुष्यात सुरुवात होते आणि निरागसतेचे बालपण दुर्दैवाने या मुलांच्या वाट्याला येत नाही.  वयाचे ३ वर्ष पूर्ण होण्याआधी या मुलांना दप्तराचे ओझे सांभाळावे लागते

पितृ सत्ताक व्यवस्थेला सुरुंग लावणारी महिला कमला बसीम

इमेज
हजारो वर्षांपासून रुजलेल्या पितृ सत्ताक समाज व्यवस्थेतील सर्व घटकांनी तिला मनापासून स्वीकारले आहे अगदी ज्या महिलांना त्यांचे या व्यवस्थेमुळे शोषण होत आहे याची जाणीव असताना त्यांनी या विरोधात बँड पुकारला नाही.  असं म्हणणे चुकीचे ठरेल कारण या व्यवस्थेला केवळ लैंगिक भेद जवाबदार असला तरी तिने स्त्री-पुरुष अशी मानसिकता तयार केली त्यामुळे या  वास्तवाला बदलवण्यासाठी आता मन परिवर्तन करणे हा एकमेव रामबाण उपाय आहे हे हेरून एका स्त्रीने सम्पूर्ण समाजात मानवतावादी मूल्यांची पेरणी करण्याचा ध्यास घेतला होता.    कारण त्यांनी २५/०९/२०२१ रोजी ७५ वर्षाच्या असताना जगाचा निरोप घेतला त्या कर्क रोगाचा सामना करीत होत्या. आता पर्यंत कमला बसीम यांच्या निधनाची बातमी आपण वाचली असेलच त्याचबरोबर त्यांच्या कार्याची जाणकारी मिळवली असणारच हे गृहीत धरून त्या माघे दडलेला अर्थ शोधण्याचा प्रयत्न आजच्या लेखात करू.  त्या पूर्वी सामाजिक क्रांतीच्या जनक,  स्त्रीवादी साहित्यिक तसेच सक्रिय कार्यकर्त्या कमला बसीम यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन  स्वातंत्र्याच्या १ वर्ष आधी कमला आजीचा जन्म झाला त्यांच्या नशिबी सुदैवान

नारी शक्तीहीन झाली आहे का

इमेज
देशातील पहिली मुलींची शाळा महाराष्ट्रात सुरु झाली, या महाराष्ट्रातील मुलगी पहिली महिला dr. झाली, याच मराठी मातीची लेक पहिली महिला राष्ट्रपती झाली असे कितीतरी मैलाचे दगड मराठी मुलींनी आपल्या स्पर्शाने पावन केले.  पण आज तिच्या माहेरच्या हक्काच्या जन्म भूमीत तिचे लचके तोडले जातात, प्रेमाच्या जाळ्यात फसवून मदमाशयानी तोडावे तसं तिच्या शरीराची चाळणी होत आहे तरी देखील हा शिवरायांचा मावळा गप्प बसतो याचंच आश्चर्य वाटते.    गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या बातम्या सातत्याने येत आहेत एक प्रकरण शांत झाले कि दुसरे त्याची जागा घेते मनात एवढाच प्रश्न आहे हे असं किती दिवस चालणार?  पुण्यापासून सुरु झालेल्या या सत्राणें आज कळस गाठलाय डोंबवलीतील १५ वर्षाच्या मुलीवर ३० विकृतांनी नियमित केलेला अत्याचार;  त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात एका महिलेचा झालेला विनयभंग संताप आणणारे आहे.  एवढ्या घटना घडत असताना आपण हे सर्व का थांबवू शकत  नाही?  या नराधमांना कोण अभय देतो?   या प्रश्नांचे उत्तरे शोधून सापडणार नाहीत.  एकंदरीत महिला सुरक्षेसाठी उठणारा आवाज आणि सोईस्कर केले जाणारे दुर

महिला अत्याचारास मुभा

इमेज
स्त्री-पुरुष भिन्न लिंगी आहेत एवढा नैसर्गिक फरक सर्वच जाणतात पण त्यांच्यातील एक शोषक आणि दुसरा सोशीत आहे हे तुम्हाला माहिती आहे का?  तुम्ही म्हणाल आजच्या युगात तक्रार करणाऱ्या महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न शासन करीत असताना जर कोणी आवाज उठवत नसेल अथवा पोलिसात धाव घेत नसेल तर त्याला ती व्यक्ती स्वतः जवाबदार आहे दुसऱ्याला दोष देता येणार नाही.  तुम्ही विचार करा जर अत्याचार करणाऱ्याला सर्व गुन्हे माप केले तर?  हे सर्व स्वप्न रंजन तुमच्यासमोर मांडत नाही तर आपल्या देशात खर्च काही लोकांना महिलांवर अत्याचार करण्याचे स्वतंत्र इथल्या व्यवस्थेने दिले आहे. कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही म्हणून पुढील काही प्रश्नांची उत्तरे द्या.  तशी हि यादी फार  मोठी करता आली असती पण वास्तव तुमच्या ध्यानात आणून देण्यासाठी काही मोजके प्रश्न विचारतो.  हे आज विचारण्याचे कारण पंजाबचे नवनीयुक्त मुख्यमंत्री चरणजित सिंह चानी  यांच्यावर एका I A S दर्जाच्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्याने me-to अंतर्गत आरोप केले हि घटना घडून ३ वर्षे उलटले असली तरी त्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यामुळे विरोधी पक्षाने आरोप

तो माझा प्रियकर नाही तर मित्र आहे हे आईला कसे सांगाल

इमेज
महामारीमुळे सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम झाला; त्यांच्या आयुष्यातील हा उमेदीचा वेळ व्यर्थ गेला.  एकूण सर्व क्षेत्राचा विचार केल्यास झालेले नुकसान भरून काढणे शक्य आहे पण विद्यार्थ्यांचे वाया गेलेले  वर्ष परत कसे आणणार?  त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या जिवाभावाच्या मित्रांपासून त्यांना फार दूर राहावे लागते आहे त्यामुळे त्यांचा मानसिक आधार दुरावतो या दुरीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढले आहे.  त्यांना घराबाहेर पडण्याच्या फार थोड्या संधी मिळतात याचा हे विद्यार्थी पुरेपूर उपयोग घेण्याचा प्रयत्न करतात पण क्काही गैर समजुतीमुळे त्यांच्या या भेटीला वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जातो.  मुलींच्या बाबतीत तर फारच कठीण आहे त्यांना मैत्रिणीला भेटता येत असले तरी मित्रांना मात्र  भेटणे खूप अवघडल्यासारखे असते.    १ मुलगा व १ मुलगी जर भेटत असतील तर सर्व त्यांच्यात प्रेम सम्बन्ध आहेत असे जाहीर करतात आणि मग त्यांना कुटुंबाचे तसेच समाजाचे टोनमें ऐकावे लागतात.  अशीच एक दिवस प्रतीक्षा नाव बदललेलं आहे. एका छोट्याशा कामानिमित्य दुकानात गेली रस्त्यात तिला महाविद्

द्वेष कि प्रेम काय म्हणावे याला?

इमेज
हे जीवन सुंदर आहे अशे आपण सर्वत्र ऐकत आले आहोत पण हि सुंदरता कशात शोधावी हे जाच्या त्याच्या विवेकावर अवलंबून असते.   मानवी आयुष्याच्या ययशाचे गमक शोधायचे झाल्यास त्यासाठी तुमच्या जीवनाचा स्तर कोणता आहे हे सुरुवातीला ठरवले पाहिजे.  हे सर्व तत्वज्ञान एकीकडे ठेऊन आपण काही गृहीतके स्वीकारली आहेत त्यापैकी एक आई-वडिलांचे प्रेम.  पण तुम्हाला जर विचारले जन्म दात्या आई-वडीलानी आपल्या मुलीची हत्या केली याच्यावर तुमचा विश्वास बसणार का?  याचे उत्तर काही असो आज आपण ज्या घटने संदर्भात चर्चा करणार आहोत हि सत्य घटना आहे.  आयुष्यात प्रेम करणे हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे त्याला अपवाद नाहीत फक्त दृश्य-अदृश्य हा नाम मात्र फरक दिसतो.    काही उघड रित्या प्रेम व्यक्त करतात तर काही आपल्या भावना दाबून ठेवतात कारण आपल्यावर झालेले सामाजिक संस्कार हे सर्व ठरवत असतात.   मग प्रेमावर कविता करणारे कवी समाजात लोक प्रियतेच्या शिखरावर चढतात आणि प्रत्येक्ष प्रेम भाव जगणारे द्वेषाच्या टोकावर असतात.  याची प्रचीती देणारी घटना घडली देशाच्या राजधानीत ज्याने पोलीस देखील चक्रावले कदाचित चित्रपट निर्मात्याला नस