प्रेमाची हत्या

आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर आपण प्रेमात पडू सांगता येत नाही. 

    पण प्रेम करत असताना त्यासाठी मनाची तयारी लागते; एखाद्या नोकरी सारखे जास्त पगाराची नोकरी मिळाली कि, जुनी सोडून नवीन नोकरी धरायची नसते. 

    लग्नापूर्वी बरेच प्रेमात पडतात; आणि असे बरेचशे प्रेमी दुसऱ्या व्यक्ती बरोबर लग्न गाठ बांधतात आणि जुन्या नात्याला पूर्णविराम देतात. 

    पण काहींचे मात्र या उलटे असते त्यांच्या वैवाहिक आयुष्यात त्यांना आपल्या जोडीदाराशिवाय दुसरी व्यक्ती फार आवडू लागते; आणि त्यांच्यात प्रेम संबंध प्रस्तापित होतात. यातूनच त्या जोडप्यांचे आयुष्य अस्थिर हुन संसार उद्वस्त होतो. 


    पुण्यात एक जोडपे आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी होते. त्या सुखी संसाराला एका मठाधीश महाराजांची दुष्ट नजर लागली. त्या महाराजांच्या प्रेमात एक वैवाहिक महिला पडली; आणि तिने पती पेक्षा महाराजांशी जास्त वेळ घालवू लागली. मग या जोडप्यात खटके उडू लागले आणि वाद विकोपाला गेला. दोघे मग सोक्षमोक्ष करायला मठात गेले तिथे त्या गृहस्थावर प्राण घातक हल्ला केला; त्यात त्यांचा मृत्तिव झाला. अपघाती मृत्तिव दाखवण्यासाठी मृत देह कात्रजच्या घाटात फेकून त्या बाजूला मृत व्यक्तीची दु चाकी लावली. पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून मृत्तिवचे गुड उकळले; आणि महाराज तसेच पत्नी आणि आणखी २ आरोपी अटक केले. हि बातमी लोकसत्ता वर्तमान पत्राने दिली. 


    अशा प्रकारे आपले अनैतिक नाते टिकवण्यासाठी विश्वासू जोडीदाराचा खून करणे निंदनीय आहे. त्याचबरोबर अध्यात्माचे लेबल लावून स्त्रियांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्या मदतीने असे अक्षम्य कृत्य करणाऱ्या सोघोषीत महाराजाला कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. प्रेमाने माणसे जोडायचे असतात; जिथे आपल्यावर प्रेम करणाऱ्या जोडीदाराला मारण्याचे क्रूर कृत्य केले जाते तिथे प्रेमाचा औंष देखील नसतो. फक्त  प्रेमाचे नाटक  करून मलाई खाण्यासाठी असे कृत्य केले जाते. हि काही पहिली घटना नाही या आधी अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. नागपूर शहरात देखील एका पत्नीने पतीचा गळा कापून खून केला होता. सविस्तर वाचण्यासाठी-- https://www.premsparsh.com/2021/03/blog-post_12.html 


    अशा घटना का घडतात? अध्यात्मापासून मानसिक सुख मिळते; त्याचबरोबर भरकटलेल्या वाटसरूंना  आध्यात्मामुळे योग्य  मार्गदर्शन मिळते. यासाठी भक्तांची ईशवर श्रद्धा त्यांना या मार्गाला  लावते. पण याच भोळेपणाचा गैरफायदा घेऊन अनेक भोंदू स्त्रियांचे शोषण करतात. आणि त्यांचे सम्मोहन करून त्यांच्याच मदतीने पतीची हत्या करायला देखील तयार करतात. अनेक पुरुष आपल्या पत्नीच्या रक्ताचा घोट घेतात त्यावेळी केवळ सुंदर स्त्रीच्या प्रेमात पडून अथवा गडगंज संपत्तीच्या मोहात फसून हे टोक गाठतात. अनेक महिला देखील अशेच स्वार्था पोटी घृणास्पद कृत्य करतात. 

    अशा घटना थोड्याफार फरकाने नेहमी घडत असतात. काही तरुणांचे तसेच तरुणींचे विवाहाआधी प्रेम प्रकरणे सुरु असतात तरी देखील त्यांची बाजू न समजून घेता त्यांचे लग्न दुसर्याशी लावून दिले जाते. मग या बंधनातून मुक्त होण्यासाठी ते अशाप्रकारचे कट रचतात. 


    वैवाहिक आयुष्यात त्रयस्थ व्यक्तीशी प्रेम सम्बन्ध निर्माण झाल्यावर काय करावे. 

    भिन्न लिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच दोन भिन्न लिंगी व्यक्ती प्रेमात पडतात. असा आपला सर्व मान्य समज आहे; परंतु नेहमीच ते प्रेम नसते तर बहुतांश वेळा केवळ आकर्षणालाच आपण प्रेम म्हणतो. 

    आणि हा सुक्ष्म फरक ज्यांना समजत नाही त्यांच्या हातून असे कृत्य घडते.  त्यामुळे प्रेम आणि आकर्षण यातील फरक समजून घ्यावा. 

    केवळ आकर्षणातून आपण दुसऱ्या व्यक्तीकडे खेचले जात असू तर वेळीच सावध होणे गरजेचे आहे. आपण त्या व्यक्तीकडे आकर्षित का होत आहोत ? 

    स्वतःला विचारा.  जर आपल्या साथीदाराकडून सर्व इच्छा पूर्ण होत नसतील तर त्याला / तिला तसे सांगा. दोघांमध्ये  खाजगी बाबींवर मनमोकडेपणाने चर्चा करा. तरी देखील फरक पडत नसेल तुमच्यातील सर्व प्रकारचे सम्बन्ध व्यवस्थित असताना तुम्ही चुकीच्या मार्गाने जात असाल तर वेळीच आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवायला शिका. 

    आपल्या आयुष्यात मनमिळाऊ माणसे कोणत्या टप्प्यावर भेटतील हे निश्चित नसते त्यांच्याशी आपले विचार जुडले कि मन जुडतात; आणि निर्मळ प्रेम भाव निर्माण होतो. अशी व्यक्ती तुम्हाला आपलीशी वाटत असेल तर आपल्या जोडीदाराशी त्यांची ओळख करून द्या. बऱ्याचदा संशयावरून द चा मा होतो आणि सुखी संसाराला गाल बोट लागते. त्याचबरोबर दोघे सोबत त्यांना भेटा तसेच त्या व्यक्तीला आपल्या घरी बोलवा. आणि माणसांवर प्रेम करायला शिका. त्याचबरोबर नैतिकता मानवी मूल्ये याचे भान ठेवत असताना. आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहा. 

    शेवटी समृद्ध आयुष्याची गुरु किल्ली आपल्या हातीच असते; त्या किल्लीचा वापर करून नशिबाचे कुलूप उघडा . आणि श्रमाच्या घरात सुखाच्या बिछान्यावर आनंदाने वेळ घाला. 

    प्रेम मिळवायचे असेल तर द्यायला सुरुवात करा. 


    फोटो - pixabay aap

     

    टिप्पण्या

    या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

    पुरुषांचा महिला दिन

    जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

    एक होते गाडगे बाबा