गुरु म्हणावे तरी कोनाला?

 काळ सर्वत्र गुरु पौर्णिमा साजरी झाली सर्व गुरूंवर शुभेच्छांच्या वर्षाव झाला असणारच त्यामुळे त्यांना देखील धन्य वाटले असेल. 

पण गुरु शिशाचे नाते कसे असावे? 

गुरु कुणाला म्हणावे? 

यावर आपण आजच्या लेखात चर्चा करू गुरु म्हणजे सत्य , गुरु म्हणजे सेवा, गुरू म्हणजे ध्येय, गुरु म्हणजे न्याय हे सर्व गुण माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर जाण्यासाठी ज्या सर्व थोरांनी प्रयत्न केले. त्या सर्वांचे गुरु पौर्णिमेच्या दिवशी मी मनापासून आभार मानतो. साने गुरुजींच्या शब्दात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही साने गुरुजींनी दिलेली शिकवण आणि आपण सर्वांनी दिलेला आदेश समजून मी आयुष्यात जगाला प्रेम अर्पावे या उदात्त हेतुने माणसं जोडण्यासाठी अविरत प्रयत्न करत राहील .कारण इतिहासातील चुका पुसण्यासाठी रूढी परंपरा मोडण्यासाठी आणि कार्यकारण भावाने विचार करण्यासाठीच ही ऊर्जा मला प्रेरणा देत असते.गुरु नेहमीच  मार्गदर्शन करीत असतात सेवाभाव ज्ञान मार्गदर्शन सत्य न्याय या सर्व गुणधर्मांची रुजवण आपल्या शिष्यांमध्ये करण्याचं महत्कार्य गुरु पार पाडतात. जगाच्या इतिहासात गुरु-शिष्य परंपरा प्राचीन आहे.सॉक्रेटिसचा शिष्य  प्लेटो प्लेटोचा शिष्य अॅरिस्टॉटल  यापासून राजमाता जिजाऊ आणि शिवाजी राजे यांचं नातं राम कृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्यातील संबंध गोखले आणि गांधीजी यांच्यातील गुरु शिष्य मी जपलेलं नातं

आपण सर्वांनी जपलेले नाते आई-वडिलांचे मित्रांसोबत शहरातील  गावातील नातलग शाळा महाविद्यालयातील शिक्षकांच्या नाते प्रशिक्षण घेताना निर्माण होणारे  नाते ते अचानक जाणीवपूर्वक किंवा अजाणीवपूर्वक भेटलेल्या आणि आयुष्यभर मार्गदर्शकाच्या भूमिकेत असलेल्या मार्गदर्शकाचे नाते मित्र-मैत्रिणींचे नाते त्या प्रत्येक नात्यातून आपण या माध्यमातून एक गुरू-शिष्याचं नातं एका समांतर पातळीला पोहोचून त्यातील निर्मळ भाव जपला जातो.

 गुरु नेहमी अज्ञानाची झापड काढून संस्काराची वात करून आयुष्यभर प्रकाश देणारा दिवा लावतात. त्याद्वारे जगाचे तत्व समजतें माणसातील माणूसपणाची जाण होते. 

गुरु शिष्य या नात्यातील निर्मल भावाला काळिमा फासण्याचे काही कृत्य केले जातात आणि त्यातून या सुंदर नात्यात विघ्न पडते. गुरु परंपरा चालत आली असताना अनेकदा गुरुना  नाना प्रश्न विचारले कि,  राग येतो गुरूंना  शिष्यानी प्रतिप्रश्न करणं आवडत नाही .साने गुरूजी म्हणतात अशा व्यक्तींना गुरु म्हणावे नाही.जे गुरु आपलं सर्वस्व विद्यार्थ्यांना देत नाहीत आणि आपला विद्यार्थी आपल्या पेक्षा मोठा होतोय. याचा त्यांना आनंद वाटत नाहीत अशा या गुरूंना गुरु म्हणण्यात अर्थ नाही गुरू एक इतिहास आहे इतिहासातील सदोष परंपरा रूढी चालीरीती या सर्व बदलत्या युगानुसार आपण टाकून द्यायला पाहिजे आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्वीकार केला पाहिजे. गुरु जर कुठे चुकत  असतील  तर त्यांनी केलेली चूक  विनम्रपणे लक्षात आणून द्यायला पाहिजे. अशा विद्यार्थ्यांच्या त्यांनी दाखवलेल्या चुकांचा सन्मानपूर्वक विचार करून त्यांचे आभार मानतात .त्यातच गुरु पण शोधायला हवे त्याप्रमाणे सानेगुरुजी या त्यांच्या विधानाला पुष्टी देताना उदाहरण देतात. ज्याप्रमाणे आपले जन्मदाते आपल्यासाठी प्रिय असतात परंतु ते गेल्यानंतर त्यांचा मृतदेह  कुजत ठेवत नाही तर त्याला अग्नी देतो. त्याच प्रमाणे आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार करून अंधश्रद्धा नाहीशा कराव्यात संत एकनाथ यांचे गुरू जनार्दन ज्ञानेश्व्राचे गुरु निवृत्ती नाथ या सर्व गुरु पेक्षा शिष्य नेहमीच पुढे गेले लौकिक मिळवला.पण त्यातच गुरुंनी आनंद शोधला म्हणून सर्व गुरुंनी आपल्या शिष्यांप्रती सहिष्णू भाव जोपासत असताना सर्व  शिष्यानी कृतद्न्यता भाव जोपासावा आणि साने गुरुजींच्या शब्दात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. या नात्यातून आपण जगाला प्रेम अर्पण करून जग जिंकण्याचा प्रयत्न करू हीच अपेक्षा 


फोटो - pixabay aap


    •  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा