पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एक होते गाडगे बाबा

अध्यात्म आणि  विज्ञान हाताथात घेऊन वाटचाल करतात तेव्हा आपल्या समाज मनावर संस्कार आणि वैज्ञानिक अविष्कार रुजवणे शक्य होते. विज्ञान भौतिक प्रगतीचा  तर वैज्ञानिक दृष्टिकोन मानवी आयुष्याचा आलेख उंचावतो; आणि हा आलेख अधिकाधिक  उंचावत जावा;  त्यातूनच   व्यक्ती केंद्रित असणारे जीवन व्यापक सामाजिक हित जोपासण्यासाठी खर्ची पडावे म्हणून ४ भिंतींच्या शाळेपासून दूर राहून पुस्तकातील प्रश्नांची परीक्षेत उत्तरे न देता आयुष्याच्या विद्यापीठात ‘phd’ करणाऱ्या   कर्मयोगी संत गाडगे बाबा याना जयंती दिनी विनम्र अभिवादनजन्मलो .   माणूस म्हणून जन्मलो म्हणून माणूस होऊनच मरणार    आहे,  श्रम  करत-करत एक दिवस झिजणार  आहे,  स्वर्ग मी पाहिला नाही असेल असा विश्वास नाही देवा   शोधलय तुला अनेक देवळात पण तू   कुठेच  घावला नाही शेवटी भोळया माणसातच तुझे अस्तित्व मानणार आहे,  म्हणून माझ्या देवाला गंडवणार्यांना मी नागला करणार  आहे,  नको मला तुझे पुष्पक विमान अन   हिमालयात मठ देखील नको,  गाडगे आणि खराटा घेऊन मी माझा संसार थाटलआय,  हातात  चिपळ्या घेऊन देवकी नंदन गोपाळाने जगण्याचा मार्ग दाखवलाय,   विद्येचा भक्त मी ज्ञानाचा भुके

संत व्हॅलेंटाईन यास पत्र

इमेज
प्रिय संत व्हॅलेंटाईन,  प्रेम स्पर्शचा साष्टांग नमस्कार.  आपण प्रेमासाठी शहीद झालात म्हणून तुमच्या स्मृत्यर्थ सुमारे १७०० वर्षांपासून सुरु झालेला प्रेम दिवस आज सम्पूर्ण जगात आनंदाने साजरा केला जातोय. हे पत्र तुमच्यासाठी लिहीत  असलो तरी गोपनीय नाही म्हणून इतर वाचकांना तुमची थोडक्यात ओळख करून देणे आवश्यक वाटते.  सर्व  प्रेमात न्हाऊन जाणाऱ्या मानवांसाठी आपल्या आदर्शाचा परिचय- रोमन राज्यातील एक राजा फार निर्दयी होता; त्याच्यामते भौतिक सुख मिळवणे एक मात्र आयुष्याचे उदात्त ध्येय असावे प्रेम वैगेरे त्याच्या मते शुल्लक गोष्टी आहेत. म्हणून त्याने आपल्या सैनिकांना प्रेम तसेच विवाह करायला मनाई केली. त्या विरोधात आपण राजाला आव्हान देण्यासाठी एकटे उभे ठाकला कारण तुम्ही अनेक सैनिकांचे विवाह लावून दिले होते. परिणामी तुम्हाला फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली; तुरुंगात असताना  राजकुमारी तुमच्या प्रेमात पडली आपल्या फाशीच्या एक दिवस आधी प्रेयसीला पत्र लिहिताना शेवटचे वाक्य सर्वानाच भावुक करणारे होते ‘तुझाच व्हॅलेंटाईन’  आजच्याच दिवशी आपण फासावर चदलात  जगाला प्रेमाचे महत्व पटवून देण्यासाठी.  कोणी हि, कोणावर हि