पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेवटि तिचे ही लग्न झालेच

इमेज
हे जीवन सुंदर आहे असे आपण कायम म्हणत असतो पण सौंदर्याचा शोध कोठे घ्यायचा हे मात्र ज्याने-त्याने ठरवायचं असते. कुणाला ते गोऱ्यागोमट्या चेहऱ्यात सापडते तर कुणाला संघर्षाच्या वाटेवरून प्रवास करणाऱ्या वाटसरूच्या कर्तृत्वात घावते काही मात्र व्यक्तीचा गुण     स्वभावात / वर्तवणुकीत सौंदर्य शोधतात त्यामुळेच कदाचित असे प्रेमी जगावेगळे ठरतात.  स्त्री-पुरुषांमध्ये विवाह होणे सामान्य बाब आहे. एखाद्या सर्वसामान्य मुलाने / मुलीने दिव्यांग व्यक्तीबरोबर रेशीमगाठ बांधली तर समाजाचे तिकडे लक्ष वेधले जाते. पण धडधाकट असणाऱ्या व्यक्तीने तृतीयपंथी जोडीदार निवडला तर मात्र समाज परिवर्तनाची मशाल पेटवली जाते. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड शहरात किन्नर सपना आणि बाळू या प्रेमी जोडप्याने अनेक प्रतिष्ठित व्यक्तीच्या साक्षीने पुढील कित्त्येक पिढयांना प्रकाश देणारी मशाल पेटवली.  या विवाहाची तेव्हापासून राज्यभर जोरदार चर्चा सुरु आहे या आधी गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यात असाच एक ऐतिहासिक विवाह संपन्न झाला होता त्याबद्दल वाचण्यासाठी– ऐतिहासिक विवाह   सपना आणि ब

पुरुषांचा महिला दिन

इमेज
सृष्टीची जननी तू मायेचा सागर आहेस,  रत्नांची खान तू संघर्षाची तलवार आहेस,  सोशीत वृत्ती असली जरी तुझी तरी तू प्रतिकाराची प्रेरणा आहेस.  स्त्री मनाच्या, स्त्री जीवनाच्या, स्त्रीवादी दृष्टिकोनाच्या अंगातून तुझ्याकडे अनेकांनी पाहिले आहे तसेच तू पुरुष प्रधान व्यवस्थेला आपल्या समृद्ध जाणिवेतून प्रश्न विचारून तुझे हक्क नाकारणाऱ्या विकृतीचा अंत करण्याचा निर्धार केला आहेस. तुला मी नवीन विचार देण्या एवढा प्रिपकव नाही तसेच वैचारिक दृष्ट्या स्वतःच्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव झाल्यामुळे तशी तुला प्रबोधनाची तातडीची गरज नसावी असे मला वाटते. कदाचित त्यामुळेच मला आज तुझ्या वेदनेवर बोलायचे नाही आणि तुझ्या उपजत असणाऱ्या सामर्थ्याचे गुणगान देखील करायचे नाही तर फक्त पुरुषाच्या आयुष्यात तुझे असणारे स्थान मांडायचे आहे.  आज महिला दिन म्हणून सर्वप्रथम सर्वाना या दिवसाच्या शुभेच्छा अगदी पुरुषांना देखील कारण माझ्यामते महिला दिन पुरुषांनी पुढाकार घेऊन साजरा करायला हवा.  कुटुंब व्यवस्थेच्या आरंभापासून तू कायम स्वतः चंदनासारखी झिजून नात्यांचे बंधने गुंफत आलीस त्याची कधी हि तक्रार तू केली नाही तुझ्या घामाच्या