पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सापाने केली पत्नीची हत्या

इमेज
सर्व वैवाहिक माणसे एवढी धडपड कशासाठी करतात?  २  वेळचे जेवण करण्याची सोय असताना, डोक्यावर सुरक्षित छप्पर असताना, आरोग्यासाठी तरतूद केली असताना, समाजात प्रतिष्ठा असताना संपत्तीचे संग्रहण का करतात?  थोडक्यात  आई-वडील आपल्या लेकरासाठी कष्ट का उपसतात?  याचे सर्व मान्य उत्तर मुलांच्या आनंदी आयुष्यासाठी.  याचं फलित काय होईल?  अशी चिंता न करता ते अहोरात्र झटत असतात.  पण हेच जन्मदाते आपल्या मुलीची लग्न गाठ एका हत्यारांबरोबर बांधून देतील यावर तुम्ही विश्वास तरी कसे ठेवणार !  म्हणून तुमच्या समोर सविस्तर घटना ठेवणे उचित ठरेल.    दक्षिणेतील छोटेसे पण सर्वार्थाने संपन्न राज्य अशी केरळ राज्याची ओळख आहे.  या राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी एका हत्यारा असणाऱ्या पतीला दुहेरी जन्म ठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली कारण त्याने सापाच्या मदतीने पत्नीची हत्या केली.  पण हे प्रकरण एवढे सरळ असते तर दुर्मिळ अशी दुहेरी जन्म ठेपेची शिक्षा थोटवण्याचे कारणच काय?  म्हणून प्रकरणाच्या मुळाशी जाऊन समजून घेऊ-  ३ वर्षांपूर्वी सूरज आणि उत्तराची विवाह जोडणाऱ्या एका संकेतस्थळावर ओळख झाली म्हटल्यापेक्षा तिथूनच त्

तो ती होते तेव्हा

इमेज
लक्षावधी वर्षाचा प्रवास करून विविध अवस्थांतून बदल घडत मनुष्याने विज्ञान युगात प्रवेश केला असून काळाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याने आपल्या प्रगतीचे ठसे उमटवले आहेत.  भौतिक-अभौतिक विचारातून त्याचे हे वर्तमान स्वरूप अद्याप देखील बिनभरोशाचे आहे.  स्त्रीच्या गर्भातून जन्माला येणाऱ्या अभर्काला स्त्री अथवा पुरुष या लिंग भावावर आधारित सामाजिक मान्यता मिळते.  पण जे या लैंगिक साच्यात  बसत नाही त्यांचे काय?  स्त्री-पुरुष खेरीज मानवी अभर्काला माणूस म्हणून जन्माला येता येईल का?  सहिष्णुतेचे किती हि फलक झडकवले किव्हा सामाजिक स्वीकृतीची किती हि जाहिरात केली तरी अशा आभासी प्रचारातून कठोर वास्तव बदलत नसते कारण ते सत्य परिस्थितीचे दर्शन घडवते.  आज नोकरीसाठी तथा शाळा/महाविद्यालयात प्रवेश घेणयासाठी प्रतिज्ञापत्रात तृतीयपणती व्यक्तीसाठी रकाना असतो; पण आपल्या काळजात त्यांच्या करीता प्रेमाचा कोपरा आहे का?    या सामाजिक जडण-घडणीत वाढलेल्या आई-वडिलांना आपल्या लेकराचा तृतीयपंथी म्हणून स्वीकार करणे किती आव्हानात्मक असेल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो.  पण समाजात फक्त तृतीयपंथी व्यक्तीचीच अवहेलना होते

आझादी के रत्न सुभाषचंद्र बोस

इमेज
  काही  माणसांच्या ठायी प्रचंड बुद्धिमत्ता असते पण बळ आणि बुद्धी एकत्र फार थोड्यांच्या  नशिबात असते ते माणसे चिरकाल अमर राहील असा दैदिप्य्मन इतिहास रचतात.  दैदिप्य्मन इतिहासाचे सुभाष चंद्र बोस नायक आहेत.  भारतीय स्वांतत्र्य आंदोलनात लक्षावधी लोकांनी स्वतःला झोकून दिले प्रत्येकाने आपल्या विचारधारेला मान्य असणारे मार्ग निवडले काही सशस्त्र लढाईचे पुरस्कर्ते होते तर काही अहिंसेचे पुजारी होते; नेताजींचा मार्ग यापेक्षा वेगळा आणि सर्वानुमते वेवहार्य होता.  त्यांचा संपूर्ण जीवनपट विलक्षण आणि गुंतागुंतीचा आहे.  २३/०१/१८९७ ते १८/०८/१९४५ या अल्प आयुष्यात त्यांनी ज्यांच्या साम्राज्याचा सूर्य कडी हि मावळत नसे त्यांना सदो कि पडो करून सोडले.  या बंगालच्या सुपुत्राने अगदी किशोर वयातच राष्ट्रासाठी समर्पित केले याची प्रचिती देणारा कलकत्याच्या प्रसिन्दिन्सी महाविद्यालयातील प्रसंग बोलका आहे; तिथे एक गोरे प्राध्यापक भारतीय मुलांना विना कारण शिक्षा करायचे त्यांचा हा दिन कर्म होता याला कंटाळून सुभाष बाबूंनी आंदोलन केले त्यांची बातमी सर्व वर्तमानपत्रात प्रकाशित झाली त्यामुळे प्रशासन जागे झाले आणि

गांधीजींचा पाचवा पुत्र माहिती आहे का?

इमेज
शस्त्र हाती न घेता सशस्त्र शत्रूंचा युद्धात पराभव करणे सहज शक्य आहे हे आपण आज सांगू शकतो; कारण ७५ वर्षांपूर्वी एका सेनापतीने याच भूमीत हा पराक्रम  घडवला.  त्यांच्या या युद्धनीतीला आज समस्त जग सलाम करत आहे म्हणून ‘राष्ट्रपिता महात्मा गांधीजी ‘ यांचा जन्म दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.  [आज हिंसाचार टोकाला पोहचला असताना जागतिक अहिंसा दिन याला विराम लावेल हि भाबली अपेक्षा]  बापुना राजकीय संत म्हणतात,  कोणी अहिंसेचे दूत म्हणून गौरवतात,  तर अनेक लोक त्यांच्या तत्वज्ञानावर तोंडसुख घेतात काही हि असो या सर्वाना गान्धी पुरून उरतात.  जातीवादी समाजाने सर्व महापुरुषांना जातीच्या चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न केला असला तरी राष्ट्रपित्याने या संकुचित मानसिकतेला आपल्या जवळपास फिरकण्याची संधीच दिली नाही.    त्यामुळे गांधी हा एक व्यापक विचार सिंधू आहे यात सर्वाना प्रवेशास मुभा असली तरी त्याच्या खोलीचा अंदाज मात्र कुणालाच घेणे जमले नाही.  जगात ज्यांना आदर्श ठेवून युगप्रवर्तक क्रांतिकारकांनी प्रेरणा घेतली; त्या गांधींच्या  माय भूमीत मात्र आज देखील त्यांची चिकित्सा करताना बाधा येत नाही गांध

दिव्यांग मुलांचे संगोपन कसे करावे?

इमेज
    भयंकराच्या वाटेवरून प्रवास करत असताना आपल्या मनात भीती दाटून येणे स्वाभाविक आहे पण ज्यांना निसर्गाने शारिरीक दृष्ट्या इतरांपेक्षा वेगळे घडवले अर्थात समाजातील अपंग [दिव्यांग] लोकांचं काय?  आज अनेक कुटुंबांची दुर्दशा झाली आहे बहुतेकांना २ वेळच्या जेवणासाठी कामाच्या शोधात वणवण भटकावे लागते पण दिव्यांगांच्या रोजगाराची हमी कोण देणार?  हे सर्व प्रश्न समाज म्हणून सर्वाना अंतर्मनात डोकावण्यास भाग पाडतात.  आपल्या समाजात  अगदी बोटावर मोजण्या एवढे दिव्यांग बंधू-भगिनी स्वतःच्या पायावर उभे राहून सन्मान पूर्वक जीवन जगत आहेत; मात्र अनेकांना इतरांवर अवलंबून राहावे लागते.    याचा अर्थ दिव्यांगांना जर संधी मिळाली तर ते देखील स्वतःला सिद्ध करू शकतात कारण ज्यांना कुटुंबातून समाजातून पाठिंबा मिळाला त्यांनी यशोशिखर  गाठले मात्र जे या सह्कार्यापासून वंचित राहिले त्यांच्या जगण्याची आपण कल्पनाच करू शकतो.  जशी सामान्य व्यक्तीच्या जडण-घडणीत आई-वडिलांची भूमिका महत्वाची असते त्या तुलनेत एका अपंग पाल्याचे संगोपन करण्यात त्यांना अधिक दक्ष राहावे लागते.  आजच्या धकाधकीच्या जीवनात स्पर्धेच्या ओझ्या खाली दबून सामा