या नात्याला म्हणायचे तरी काय?


मानवी आयुष्यात प्रत्येकालाच प्रेम हवं असतं आयुष्य जगण्यासाठी दुःखे वाटण्यासाठी  आनंदाचे क्षण लुटण्यासाठी जीवनसाथी प्रत्येकाच्या जीवनात सिंहाचा वाटा उचलत असतो. प्रेमाची अनेक रूपे व्यक्तिगणिक भिन्न भिन्न स्वरूपाची असतात काही आपल्या प्रेमातून जगाला नवा आदर्श देतात .तर काही प्रेम या संकल्पनेवर विचार करायला भाग पाडतात गेल्या १-२ दिवसापासून एका लोकप्रिय जोडप्याची सर्वत्र चर्चा आहे. 

    शिल्पा शेट्टी आणि त्यांचे पती राज कुंदारी यांचे आयुष्य कायम वादाच्या अव? 

    तीभवती फिरत राहिले. राज यांच्यावर अश्लिल चित्रफिती तयार करणे त्या व्यवसायाला चालना देणे इत्यादी आरोप जरी आता असले तरी यापूर्वी आयपीएल क्रिकेट स्पर्धेत अनेक सट्टेबाजीचे आरोप त्यांच्यावर झाले, त्यांच्या राजस्थान रॉयल या संघाला २ वर्ष स्पर्धेतून निलंबित करण्यात आलं होतं, हे सगळे एकीकडे असताना त्यांची प्रेमी आयुष्य एका वेगळ्या स्तरावरून विचारात घ्यावे लागेल. 

    राज मूळचे ब्रिटिश नागरिक कारण त्यांचे वडील ब्रिटनमध्ये स्थायिक झाले होते 2004  साली त्यांचे कविता नावाच्या एका महिलेशी लग्न झाले आणि त्यांना एक मुलगी देखील झाली 2007 साली राज आणि शिल्पा यांची भेट झाली. भेटीचं रूपांतर व्यवसायिक सहकार्यात झालं आणि त्या व्यवसायिक जोडीदाराने एकमेकांच्या आयुष्याचा साथीदार होण्याचा निर्णय घेतला .22 नोव्हेंबर 2009 रोजी त्यांनी विवाह केला पण त्यापूर्वी शिल्पा शेट्टी  आणि  राज यांच्यातील  जवळीक   वाढत  असल्यामुळे कविता यांनी शिल्पावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि शेवटी व्हायचं तेच झालं मुलगी अवघ्या दोन महिन्याचे असतानाच ,रविंद्र यांनी आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आणि ते वेगळे झाले. मुळात एका स्त्रीच्या प्रेमात पडून आपल्या अर्धांगिनीला  सोडून देणे, हे निषेधआर्य आहे. कारण प्रेम हे केव्हाच पद प्रतिष्ठा आणि पैसा या त्रिकुटाचा अवतीभवती नसते तर नाते हे निस्वार्थी भाव निष्कलंक वृत्ती आणि परस्परांचा विश्वास या खांबांवर आधारलेले असावे. संसार रथाची 2 चाके समांतर रेषेत असतील तर हा संसार सुखाच्या मार्गाने समाधानाच्या ठिकाणी पोहचतो पण यात एकीकडे निस्वार्थ भाव असेल आणि दुसरीकडे स्वार्थी वृत्ती असेल तर निश्चित आयुष्य रस्त्याच्या कदेळा  दरीत कोसळते. अथवा येणाऱ्या आव्हानांना  भिडताना हतबल होऊन संपते या उभयतांच्या बाबतीत  असेच घडताना दिसते आहे. शिल्पा यांनी पहिल्यांदाच लग्न केलं तर राज यांचा हा दुसरा विवाह होता. मुळतः यांच्यात जर प्रेम असेल तर शिल्पा यांनी एका स्त्रीच्या भूमिकेतून त्यांच्या पहिल्या पत्नीच्या प्रेमाचा विचार  का      केला नसावा ? 

    राज यांनी आपल्यावर प्रेम करणाऱ्या पत्नीला दूर का सारले असावं या दोन्ही प्रश्नांची उत्तरे लोभी वृत्ती आणि व्यक्तिवादी दृष्टिकोण  यात दडलेली आहेत. शेवटी प्रत्येकाच्या आयुष्य हे ज्याचे त्याने आपल्या मर्जीने जगायचे असते पण आयुष्यात जगत असताना इतरांच्या आयुष्याचा चुराडा आपल्या कडून होत नाही ना याचाही विचार गांभीर्याने करायला हवा प्रेम हे व्यक्तीवर करायचे नसते तर त्या व्यक्तीला द्यायचे असते. आयुष्यात अशाच प्रेमाचं  दातरुत्वाचे वरदान लाभलेल्या श्रीमंत जोडप्याची कहाणी नक्की वाचा आणि किरण अमीर या उभयताकडून  आदर्श  घ्यावा आणि आपल्या आयुष्याचे प्रयोजन ठरवावे.  https://www.premsparsh.com/2021/07/blog-post_4.html 

    प्रत्येकाचे आयुष्य हे वेगळे असते आशा आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा आणि भरलेली असते .ते असावे कारण  त्याशिवी यशस्वी होता येणे अशक्य आहे. त्याचबरोबर प्रत्येकाच्या आयुष्यातील आपला जोडीदार हा वैचारिक सहचारी किंवा सहचारिणी असायला पाहिजे कारण त्याच्या किंवा तिच्या शिवाय आयुष्य हे अपूर्ण असते.त्यात परिपूर्णता आणायचे असेल तर विश्वास विनम्रता आणि विवेक या तिन्ही बाबी अपल्या  स्वतंत्र  प्रज्ञेला चिकित्सेच्या चौकटीवर घासून घ्यावे द्वेषावर वाढलेला मनुष्य हा आकाशाला स्पर्श करत असला तरी त्याचे पाय जमिनीत रुतलेले नसतात  जमिनीत पाय ऋतूंवून आकाशाला कवेत घ्यायचे असेल तर प्रेमाचा आधार तुम्हाला हवा असतो. 

    शेवटी  भिन्न लिंगी व्यक्तीचे केवळ आकर्षण स्वार्थी भाव या माणुसकीला कलंक लावणाऱ्या गुणांवर भुलून कधीच असा निर्णय न घेता प्रत्येकाने मानवतेच्या आधारित निर्णय घेऊन जगाला प्रेम अर्पावे या उदात्त हेतूने स्वतःवर प्रेम करत असताना इतरांना सुद्धा प्रेम द्या आणि आपल्या साथीदाराच्या सहवासात राहताना लपून काही न ठेवता उघडपणे व्यक्त करा संवाद प्रस्थापित करा कारण वादाने माणसं तुटतात आणि संवादाने माणसं जोडतात माणसं जोडण्यासाठी स्नेहाचा धागा प्रत्येकाकडे असावा हीच आशा 

    फोटो - साभार गूगल

     

    टिप्पण्या

    या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

    पुरुषांचा महिला दिन

    जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

    एक होते गाडगे बाबा