संघर्षाचे दुसरे नाव-स्टॅन स्वामी

सूर्य नेहमी सर्वाना प्रकाश देत असतो;  जिथे अंधकार आहे तिथे प्राधान्याने पोहचतो. शेवटी आपण मानव आहोत म्हणून मानवी समाजाद्वारे दुर्लक्षित झालेल्या लोकांसाठी जगले पाहिजे त्यांच्या दुखत सहभागी होणे खरा पुरुषार्थ आहे. 

आदिवासी, गरीब, पिढीत लोकांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटणाऱ्या “फादर स्टॅन स्वामी” या तेजस्वी सूर्याच्या आत्म्याला शांती लाभो हि ईशवर चरणी प्रार्थना. त्यांनी जमिनीवर काट्यांवर चालून प्रवास केला किमान स्वर्गात त्यांना त्याचे फळ मिळेल हि अपेक्षा.  

दक्षिणेतील तामिळनाडू राज्यात स्वातंत्र्यापूर्वी जन्माला आलेल्या स्टॅन स्वामी यांनी गरिबी जवळून अनुभवली. ते लहानपणापासून धार्मिक होते; पण त्यांनी धर्माचा दंभ होऊ दिला नाही. मानवतेला सर्व श्रेष्ठ धर्म समजून सामान्य  माणसात  त्यांनी परमेशवर शोधला. 

दिनांक  ०५-०७-२०२१ त्यांचे वयाच्या ८४ वर्षाचे असताना मुंबईतील खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. त्या नंतर समाजाच्या सर्व क्षेत्रातून तीव्र तसेच भावुक प्रतिक्रिया आल्या; सर्वच प्रतिक्रिया बोलक्या होत्या.  त्यातून स्वामींवरचे लोकांचे प्रेम दिसत होते तसेच त्यांच्यावर केलेल्या आरोपांबद्दलचा संताप देखील स्पष्ट होत होता. खेड याचाच वाटतो ज्याने आयुष्यभर सेवा धर्माचे पालन केले त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात अडकून शेवटचा श्वास घ्यावा लागला. 

त्यांनी भारत आणि फिलिपिन्स या देशातून शिक्षण घेतले. फिलिपिन्स मध्ये असताना त्यांना आंदोलनाची प्रेरणा मिळाली; त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला तिथूनच सुरुवात केली. १९७८ पासून  सुरु असलेले त्यांचे सार्वजनिक जीवन आज सम्पले. 

काही काळ त्यांनी ख्रिश्चन धर्म गुरु म्हणून काम केले. त्यानंतर माणसांसाठी त्यांनी धार्मिक काम सोडले; आणि समाज सेवेला पूर्ण वेळ द्यायचे ठरवले. सुरुवातीपासून त्यांनी आदिवासी लोकांना त्यांच्या न्यायी  व मूलभूत हक्कांसाठी जागृत केले.  ते १९९१  साली झारखंड राज्यात स्थायिक झाले. झारखंड हे नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण राज्य असले तरी स्थानिकांचा विकास झाला नाही. कारण इथल्या साधन संपत्तीची बाहेरचे  लोक लूट करतात स्थानिकांच्या हाताला काही लागत नाही.  म्हणून त्यांनी भूमी पुत्रांना म्हणजेच आदिवासी लोकांना जागृत केले आणि त्यांच्या हक्कासाठी लढा दिला.  नक्षलवादी शिक्का लावलेल्या  ३००० कैद्यांच्या सुटकेसाठी त्यांनी  उच्च  न्यायालयात प्रयत्न केले. दिवसागणिक त्यांची तब्यत खालावत 

गेली. त्यांना अटक करण्या आधी ते थकले होते  त्यांना चहा घेणे जेवण करणे देखील झड जायचे. त्यांचे हात थरथर कापत होते; तरि देखील त्यांचा आंदोलनातील सहभाग कमी झाला नाही; त्या थरथरत्या हातात फलक घेऊन ते तरुणांचा उत्साह वाढवत असायचे. पण त्यांच्या आवाजाला दाबण्यासाठी ज्या संघटनेशी दूर दूर पर्यंत सम्बन्ध नव्हता अशा प्रतिबंधित संघटनेशी संबंध असल्याचा कट रचून त्यांना अटक केली आणि एल्गार परिषदेत सहभागी नसताना त्या परिषदेत त्यांचा सहभाग असल्याचा बनाव केला; व राष्ट्रे तपास यंत्रणेने राष्ट्रीय सुरक्षा कायद्यासह IPC चे अनेक कलमे त्यांच्यावर लावली.  स्टॅन स्वामी यांनी अटके आधी प्रकाशित केलेल्या ध्वनिफितीतून “ माझ्या संगणकात आधी असे बनावट कागदपत्र टाकली आणि नंतर त्यांचा पुरावा म्हणून वापर केला” असा दावा केला.  त्यांच्या ढासळत्या आरोग्याचा विचार न करता त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल न घेता त्यांच्याशी झालेला व्यवहार अमानवीय होता . 

त्यांचा स्वभाव डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर पण  आपल्या मूल्यांवर  ते एकनिष्ठ होते. 

आयुष्यभर ते अविवाहित होते. त्यांचे कुटुंब समस्थ आदिवासी समाज होते. त्यांनी कृतीतून आणि लेखणीतून विचारांचे बीज पेरले; त्यांच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असली तरी त्यांच्या वैचारिक बीजातून निर्माण होणाऱ्या वटवृक्षातून उद्याचे अनेक फादर स्टॅन स्वामी घडतील.  मानवतेचा झेंडा हाती घेऊन प्रत्येकाला माणूस म्हणून जगता यावे हे त्यांचे स्वप्न आपल्या आयुष्याचे ध्येय समजून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर जाऊ. 

काही लोकांचे जीवन मृत्तिव नंतर सुरु होते. कारण ते हयात असताना समाजाला तसेच शासनाला त्यांची किंमत कळत नाही. पण पुढच्या पिढ्याना त्यांचे विचार मार्गदर्शक ठरतील आणि आपल्याला त्यांचे महत्व कळेल पूर्णपणे समाजाला प्रकाशमान करण्यासाठी जीवनभर वाती  सारखे जळणाऱ्या आणि त्याद्वारे अनेकांना जीवनप्रकाश देणाऱ्या दिव्याला मानाचा मुजरा. 

 फोटो - साभार गूगल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा