ऐतिहासिक विवाह

प्रेमाची एखादी मर्यादित चौकट नाही. त्यामुळे त्याची व्याप्ती अथांग आहे.  प्रेमामुळेच २ जातीत २ धर्मात तसेच २ देशात लग्न होऊ शकते. कोणाचे कुणावर प्रेम आहे  सांगणें अवघड आहे. 

  • पण जाती धर्माच्या गरीब श्रीमंतीच्या भिंती पाडण्याचे कार्य प्रेमाच्या हातोडीने पारपडते. 

    अशा अनेक प्रेम कथा आपण आजवर ऐकल्या / वाचल्या असतील, पण ह्या सर भिन्न लिंगी व्यक्तीच्या  आयुष्याच्या अवती-भवती घडणाऱ्या होत्या. 

    आजवर तृतीयपंथी लोकांचा आपण किती विचार केला?  

    हा प्रश्न स्वतःला विचारा कारण याना लग्न करायला परवानगी देणे त्याचबरोबर एका सर्व सामान्य मुलाने तिचा स्वीकार करणे; काळाच्या पुढे टाकलेली पाउले आहेत. अशा  मानवतेच्या स्तंबाना  नमन 


    समाज माध्यमावर जास्त काळ सक्रिय राहणे म्हणजे वडीलधाऱ्या माणसांचा रोष पत्करण्यासारखे आहे. 

    याच समाजमाध्यमवर झालेल्या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले; व त्याची परिणीती विवाहात झाली; आणि इतिहास   घडला. संजय झाल्टे आणि शिवलक्ष्मी या जोडप्याने आपल्या प्रेमातून जिवंत ताजमहल साकारला. 

    त्यांची प्रेम कहाणी इतरांपेक्षा फार वेगळी आहे. त्यात एकमेकांची काळजी, प्रचंड संयम , 

    समाजाच्या प्रवाहाविरुधात जाण्याची मानसिक तयारी, सम दुखियांच्या वेदना, त्याच बरोबर निस्वार्थी प्रेमभाव.  हे सर्व असताना एक प्रकारची भीती त्यांच्या मनात होती. अंतर धर्मी विवाह केला म्हणून दिल्लीत दंगल पेटली  सविस्तर वाचण्यासाठी-- https://www.premsparsh.com/2021/03/blog-post_22.html 

    यांनी तर एका तृतीयपंथी व्यक्तीशी विवाह करण्याचे ठरवले मग विचार करा त्यांच्या मनात किती भीती असेल. 


    संजय हे लक्ष्मीच्या प्रेमात जवळ-जवळ डिड ते २ वर्षांपासून होते. ते नेहमी त्यांना msg करून त्यांची विचारपूस करायचे पण गर्दीतील अनेक msg प्रमाणे त्यांनी संजयकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांनी प्रतिसाद दिला; दोघांनी बोलायला सुरुवात केली. संवादाला घड्याळ आपल्या गुलामीत ठेऊ शकला नाही; आणि काळ देखील या घटनेला थांबवू शकला नाही. दोघांमध्ये वैचारिक  धागा जुडला मन एकमेकांना शिवले गेले. 

    सुरुवातीला टिकटॉक नंतर इंस्टाग्राम पुढे युट्युब  आणि आता कुटुंब हे सर्व त्यांच्या आयुष्यातील टप्पे  नजरे खालून गेल्यावर नात्यासाठी झिझून प्रेम मिळवावे लागते. कारण दोघांच्या कुटूंबीयांकडून विवाहासाठी अनुमती मिळवणे वाटते तेवढे सोपे नव्हते.  शिवलक्ष्मी  हि किन्नर आणि संजय हे सामान्य म्हटल्यावर यांच्या विवाहाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली; म्हणून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दिनांक १-०६-२०२१ रोजी वैदिक पद्धतीने  विवाह उरकला; प्रसार माध्यमांना नंतर याची माहिती देण्यात आली . तृतीयपणती व्यक्तीचे जीवन कशे असते हे वाचण्यासाठी--  https://www.premsparsh.com/2021/02/blog-post_20.html 


    त्यांच्या विवाहाने प्रेमातील जिवंतपणा टिकवला; त्याचबरोबर समाजातील दुर्लक्षित घटकाला देखील माणूस म्हणून जगता येते हे ठणकावून सांगितले. त्या दोघांच्या आयुष्यात प्रेमाचा इंचू चावल्यामुळे दंश पसरला होता . त्यातून ते बाहेर आले आणि एकमेकांचा हातात हात घेऊन संसाराचे गाडे ओढायला सुरुवात केली आणि ते त्यात आनंदी आहेत. 

    विवाह हा प्रजननासाठी केवळ नसतो; तर त्याद्वारे आयुष्यात सदैव आनंदी ठेवणारा वैचारिक सहचारी  शोधायचा असतो. आनंदात जमिनीवर ठेवणारा तसेच दुःखाच्या दरीतून अवकाश झेप घेण्याचे बळ देणारा आधार हवा असतो. म्हणून यासाठी रंग रूप त्याचबरोबर गडगंज संपत्ती शोधण्यापेक्षा प्रेमाचा गंध येतो का? 

    याचा विचार करावा आणि जोडीदाराची निवड करावी. 

    प्रेम कायम जातीच्या धर्माच्या भिंतींना तोडून विजयी झाले आहे. त्याने कुटुंबाचा समाजाचा विरोध नेहमी झुगारून दिला आहे. पण यांच्या प्रेमाने आपल्यातील वासनेवर विजय मिळवला. लैंगिक सम्बन्ध ठेवणे आपली नैसर्गिक गरज आहे त्यासाठी आपण विवाहच केला पाहिजे असे नाही. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्या / तिच्या आनंदात आनंद शोधत असताना जोडीदाराच्या संमतीने दुसऱ्या प्रकारे हि गरज पूर्ण करणे शक्य आहे. याचा अर्थ आपण वेबिचारी जीवन जगावे असे नाही. तर आपल्या जोडीदाराच्या त्या इच्छेचा मान राखावा. ती / तो लैंगिक दृष्ट्या असामान्य असेल तर हा मार्ग निवडू शकतो. शेवटी या एका इच्छेसाठी त्या व्यक्तीच्या प्रेमाला धोका देऊ नये. 

    आपल्या देशात तृतीयपंथी लोक हलाकीचे जीवन जगतात त्यांना समाजाच्या मुख प्रवाहापासून दूर ठेवले जाते. आणि यातून सामाजिक तसेच राष्ट्रीय हानी होते. हे टाळण्यासाठी आता अशी परम्परा सुरु झाली पाहिजे. अशा विवाहांसाठी शासनाने उत्तेजन द्यावे या पुढे जाऊन दोन तृतीयपंथी लोकांना देखील  लग्नाचा अधिकार द्यावा आणि मूळ दत्तक घेण्याची परवानगी द्यावी. जनेकरून त्यांना भावनिक आधार मिळेल आणि सामाजिक स्वरक्षण देखील मिळेल. यासाठी समाजाने आपले पूर्वग्रह  टाकून देणे गरजेचे आहे. 

    हे सर्व करत असताना तृतीयपंथी लोकांवर होणारे अत्याचार तसेच त्यांचे सर्व प्रकारचे शोषण थांबवणे आवश्यक आहे. 

    आपण सर्व माणसे असलो तरी आपल्यातील विविधता आपण समजून सर्वाना माणूस म्हणून जगता

    यावे अशे सामाजिक वातावरण निर्माण करणे हि आपली जवाबदारी आहे त्यासाठी आपण प्रयत्न करू. 


  • फोटो - साभार गूगल

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा