पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अजित डोवाल व्यक्ती की, वृत्ती

इमेज
   राष्ट्र भक्ती माणसाच्या धमन्यांमधून वाहत असेल तर देशासाठी ती व्यक्ती बलिदान देण्यास सदैव तत्पर असते. अशा व्यक्तीसाठी देश हेच आपले कुटुंब असते. आणि आपल्या कुटुंबाची प्रगती हि जेवढी महत्वाची आहे. तेवढीच सुरक्षा आवश्यक आहे. देशाच्या सीमांवर रक्षण करण्यासाठी डोळ्यात तेल घालून पहारा देणारे सैनिक भारत मातेच्या सर्व लेकरांची संरक्षक असतात.  पण देशांतर्गत हिंसक प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी,  कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी,  प्रत्येक नागरिकाला सुरक्षिततेची हमी देण्यासाठी पोलीस नावाची यंत्रणा तैनात असते. अशाच एका पोलीस अधिकाऱ्याने या देशाच्या इतिहासात आपल्या कर्तव्य निष्ठेची मुहूर्तमेढ रोवून सैनिकांना मिळणारे कीर्ती चक्र हे पदक पटकावले.  या शस्त्र हातात न घेता लढणाऱ्या योध्याने सिक्कीमला भारतात सामील करण्यासाठी सिंहाचा वाट उचलला. मिझोरम राज्यात एक प्रकारची हुकूमशाही उधळून लोकशाही राज्यात रूपांतरित केले. काश्मीर काश्मीर मध्ये निवडणुका घेण्यासाठी वातावरण तयार

पहिले मुलींची हत्या; नंतर आत्महत्या हा बाप नेमका आहे तरी कोण?

इमेज
सजीव सृष्टीतील प्रत्येक प्राण्याकडे भय निद्रा प्रजनन क्षमता इत्यादी गुणधर्म निसर्गतः प्राप्त झाले असतात . पण माणूस नावाचा प्राणी या गुणांसोबतच विवेक बुदधी लाभलेला प्राणी आहे आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जाणिवेतून तो योग्य अयोग्य बरेवाईट नैतिक-अनैतिक या सर्व गोष्टींची निवड करू शकतो समाजात राहत असताना त्यांनी सामाजिक स्वास्थ्य टिकून ठेवण्यासाठी नैतिकतेच्या आधारावर एक आचारसहिता आखली आहे; सर्वांचा सन्मान करणे कौटुंबिक व्येवस्थेत आपल्या कुटुंबातील लोकांना आधार देणे, सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील दुर्बल घटकांना सोबत घेऊन चालणे इत्यादी मुले त्यांनी स्वीकारले आहेत मानवी मनाने विणलेले हे सामाजिक जाळे प्रेमाच्या धाग्याने गुंफले आहे इथे प्रत्येक व्यक्तीला आप्तेष्ठांबद्दल स्नेह इतर लोकांबद्दल प्रेमभाव असतोच.   बीबीसी मराठी या संकेत स्थळावर आज हृदय पिळवटून टाकणारी आणि वैचारिक दृष्ट्या कित्येक शतके स्वताला मागे नेणारी विदारक बातमी प्रकाशित झाली; बीबीसी मराठी ह्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या बातमीचा मजकूर थोडक्यात अशा प्रकारे होता; ‘पुणे शहरानजीक एका चाळीस वर्षे ट्रक ड्रायव्हरने स

उपेक्षित महिला डॉक्टर

इमेज
          जगाच्या पाठीवर भारतीय समाज

बाबा साहेबांचा पराभव

इमेज
शतकांनो शतके जुनी जिना नसणारी इमारत इथल्या समाज व्यवस्थेने उभारलेली असताना या शोषक आणि सोशीत दोन घटकांच्या रहिवाशी इमारतीला बदलण्यासाठी एका युगंधराने वैचारिक अधिष्ठानाच्या जोरावर कर्तृत्वाच्या बळावर यशस्वी प्रयत्न केला. आणि घडून आली युग क्रांती आज सर्वत्र जगभर  या महामानवाच्या स्मृतींना अभिवादन केले जात असताना, आपण सर्व त्यांच्या विचारधारेनुसार स्वाभिमानी जीवन जगण्याचा संकल्प करू.  सर्व प्रथम बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी त्यांना विनम्र अभिवादन. इंटरनेटच्या युगात सर्व प्रकारची माहिती क्षणभरात मिळते. त्याला बाबासाहेब      अपवाद नाहीत. त्यांचा जन्म कुठे झाला?  त्यांचे शिक्षण कुठे झाले? त्यांच्या आई वडिलांचे नाव काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला ज्ञात असणार हे गृहीत धरून मी हा लेक लिहीत आहे.  मानवी सृष्टीच्या अलिखित नियमानुसार नियमितपणे क्रांती प्रति क्रांती घडून येत असते. एकेकाळी हा समाज तत्कालीन बुद्धिमत्तेनुसार सुसंस्कृत असावा. त्याने वैज्ञानिक दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवून जगणे पसंत केले होते. अगदी वेड काळाचा विचार केला तर महिलांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता.

कर्तृत्वाचा वटवृक्ष महात्मा फुले

इमेज
अनेक नेत्यांच्या मागे समाज उभा राहिला; पण त्यांना वैचारिक बैठक ड्एता आली नाही. ज्यांच्याकडे वैचारिक अधिष्ठान होते त्यांच्या मागे समाज उभा राहिला नाही. पण समाजावर चिकित्सक बुद्धीने ताशेरे वोढणाऱ्य जोतिबा फुले याला अपवाद होते.  समाज परिवर्तक शैक्षणिक क्रांतीचे जनक           स्त्री सुधारणा चळवळीचे प्रवर्तक  स्वातंत्र्य प्रज्ञेचे साहित्यकार शेतकऱ्यांचे नेते  असे असंख्य उपमा देऊन त्यांचे कार्य शब्दात पकडता येत नाही अशा कर्तृत्वाच्या वटवृक्षाला अर्थात महात्मा जोतिबा फुले याना जयंती दिनी त्रिवार वंदन  त्यांनी इथल्या स्त्रीला शिकवून बुरसटलेल्या समाजिक विचारधारेला चिरडून टाकले. आणि विद्वा विवाहाला चालना देऊन अनेकीनच्या सुखी संसाराच्या आड येणारी भिंत पाडली . केसोपं करणाऱ्या न्हावयांचा संप घडवून तिला देखील केस वाढवण्याचा अधिकार आहे. हे रूढी वाद्यांना ठणकावून सांगीतले ज्यांनां पानी पिण्यापासून रोखले जायचे त्यांच्यासाठी घरचा हौद खुला करुन दिला. आणि संकुचित हृदयाच्या माणसांना खुल्या मनाने कृतीतून उत्तर दिले. आणि विखुरलेल्या घटकाणा एकत्र गुंफून ठेवले. विद्वा महिलेच्या मुलाला दत्तक घेऊन न

महाराणीच्या स्वप्नातील महाराजा

इमेज
 मानवी समाजात स्वतःला श्रेष्ठ ठरवण्यासाठी इतरांपेक्षा आपल्यात काही तरी विलक्षण गुण आहेत असा आभास निर्माण करण्याच्या हेतूने माणसाने माणुसकीपासून फारकत घेतली असताना या कृत्रिम विषमतेच्या माणसाला एकमेकांशी कोणत्या हि स्वार्थाशिवाय जोडण्याची ताकद प्रेमात आहे.  जिथे प्रेम असते तिथे शुद्ध  अंतकरणाने नाते जोडले जाते.  दुर्दैवानं या प्रेमाचे बाजारीकरण झाले आहे आता प्रेमाचा करार केला जातो हुद्द्यांचे एकमेकांशी लग्न ठरतात संपत्तीचे हार गळ्यात टाकून बेरीज वजाबाकीचे संसार थाटून तथाकथित आधुनिक जोडपे चेहऱ्यावर समाधानाचे उसने अवसान आणून जगासाठी जगतात.   पण याला काही अपवाद आहेत त्यांनी पवित्र प्रेमाला व्यवसायिक वृत्ती पासून दूर ठेवले आहे.  वैश्विक स्तरावर ५०च्या दशकात एका प्रेम विवाहाची चांगलीच चर्चा रंगली; तो विवाह होता इंग्लंडची वर्तमान राणी इलिझाबेद आणि दिवंगत राजकुमार फिलिप ड्यूक याचा.  तसा हा विवाह वाटतो तेवढा सोपा नव्हता राणीला त्यासाठी आपली सर्व  शक्ती पणाला लावावी लागली तेव्हा कुठे वडिलांनी संमती दिली.  या राणीच्या आईचा स्वभाव देखील फार प्रेमळ होता त्यांनी एका भारतीय सेवकाला राजवाड

मुलाने केली वडिलांची हत्या

इमेज
आईचे प्रेम जाणवते ते क्षणोक्षणी सर्वाना अनुभवता येते. पण वडिलांचे प्रेम ते नसताना समजते.  वडील आणि मुलाचे नाते प्रचंड गुंता-गुंतीचे असते; त्यातील अर्थ हा कधीच शब्दात व्यक्त करता येणे शक्य नाही केवळ अनुभवता येते. पण बदलत्या युगात माणसातील माणूसपण हरवत चालले आहे. इथे केवळ स्वतःपुरता इचार करणारे तरुण व्यक्तिवादाने प्रवृत्त झाले आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी वडिलांचे महत्व ० आहे.  मन हेलावून टाकणारी घटना अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली एका २२ वर्षाच्या मुलाने वडिलांची हत्या केली. एका शुल्लक कारणावरून दोघं बाप लेखात वाद सुरु झाला; त्याच्यी परिमिती वडिलांच्या हत्येत झाली. मग नेमके आज चे तरुण जन्मदात्यांवर हात उगारण्याचे धाडस का करत असावे; कारण त्यांच्यात असणारा ओलावा कधीचाच संपलाय त्यांच्यासाठी आपला अहंकार जपणे हे पुरुषार्थाचे लक्षण झाले आहे. तर दुसरीकडे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली; याच पोलीस स्टेशनच्या क्षेत्रात पोलिसांनी मुलावर हात उगारला हे दृश्य पाहून एक स्वाभिमानी बाप कोसळला आणि त्यांची प्राण जोत मालवली. दोन तरुणांमध्ये छोटासा वाद झाला एक तरुण

मानवतावादी गुन्हेगार

इमेज
रक्ताचा घोट पिणारा मी आज रक्त दान करतो,  दारूच्या नशेत  जगणारा मी आज दारूला लाट मारतो,  नजर माझी मेली माणसांना मारताना,  आज समाजाला माणूस जोडतोय.   काही माणसांचे आयुष्य मानवी समजुतीला फाटा देणारे आणि समस्त मानव जातीला माणुसकीची  शिकवण  देणारे असते.   गुन्हेगारीच्या दलदलीत फसून  वेसनांच्या विडाख्यात अडकून बाहेर येतात आणि नंतर अशा सर्व लोकांसाठी ते बाहेर पडण्यासाठी प्रेरणा देतात.  राहुल  जाधव  या  तरुणाची काही अशीच  कहाणी आहे. मध्यम वर्गीय घरातील  मुलगा  शाळेत जायला लागला.  सर्व मित्रात रमणारा हा मुलगा सर्वांचा चाहता होता पण शेवटी वाढत्या स्पर्धेत तो टिकू  शकला  नाही.  बाकी मित्र अभ्यासात हुशार हे  कसब यांच्याकडे नव्हते त्याला सर्वांपेक्षा अधिक गुण मिळवता येत नाहीत म्हटल्यावर काही  करायचे. त्याला मग आकर्षण होऊ लागले तथाकथित दादांचे आणि तो त्या जाळ्यात फसला.  इतर मित्र डॉकटर इंजिनियर होणार आपण देखील श्रीमंत प्रतिष्ठित असावे असे त्याला देखील वाटू लागले. हे अडाणी लोक आपल्या दहशदीच्या भरोशावर लोकांना घाबरवत आणि त्यांना लोक सन्मान देत पण याला देखील हा शॉर्टकट फार भावला. आणि याची ए

लक्षाधीश शेतकरी महिला

इमेज
तिला चूल आणि मूळ एवढेच बांधून ठेवले. नंतर तिने लढा उभारून स्वतःचे हक्क मिळवले. ती शिकली नोकरी व्यवसाय करू लागली घराचा डोलारा सांभाळता सांभाळता तिने समाजाला दिशा दाखवली.  आज सर्वत्र शेतकरी आत्महत्या होत आहेत कारण नापिकीला दुष्काळाला शेतीकरणारा पुरुष कंटाळला तो हतबल झाला. त्याने शस्त्र खाली टाकले आणि स्वतःला संपवले. अशावेळी अनेक महिलांनी यशस्वी रित्या शेती करून स्वतःला साबीत केले.  चिपळूण शहरानजीकच्या एका गावात अनेक वर्षांपासून पडित असणाऱ्या २५ एक्कर क्षेत्रफळावर गावातील १५ महिला एकत्र आल्या आणि या पडित जमिनीला कसायला सुरुवात केली आणि त्या लखोपती झाल्या.  त्यांनी काही अत्यन्त वेगळे केले  नाही.  फक्त सहकार्य आणि विश्वास या दोन तत्वांवर त्यांच्या यशाची इमारत उभी आहे. दिशांतर या संस्थेने या महिलांना दिशा दाखवली त्यांनी याना नेहमी योग्य मार्गदर्शन केले.  गावांतील [ भागेश्री आणि प्रगती ] या दोन महिला बचत गटांनी  हे सहकारी शेती कसायला सुरुवात केली आणि दिवसातील ८ तास काम करून त्यांनी या वाळवंटात हिरवळ फुलवली आज त्यांचे वार्षिक उत्पन्न २५००००० रुपय आहे.  त्यांनी शेंद्रीय शेती करायला

प्रेम विवाह वास्तव की आभास

इमेज
अडीच अक्षरांची दुनिया भलतीच न्यारी, एकमेकांचा जीव घेण्यासाठी आणि एकमेकांना जीव देण्यासाठी सदैव तत्पर असतात नर नारी  ज्याला ते प्रेम म्हणतात,  आयुष्यभर सोबत जगण्यासाठी यालाच ते प्रेम म्हणतात एकमेकांचे तोंड न पाहण्यासाठी.   महामारी  सुरु झाल्या नंतर अनेक वेळा आमचे बोलणे झाले. पण नेहमी इकडच्या-तिकडच्या  गप्पा मारून फोन ठेवला जात  असे;  असा त्याने काळ फोन केला आणि बोलता बोलता त्याच्या मनातील गुप्त दडून राहिलेल्या भावनांना व्यक्त करावं असं त्याला वाटले.  आणि हा माझा मित्र त्याने अनुभवलेले दुःख,  त्याने केलेला संघर्ष सर्व काही मोकड्या मनाने सांगू लागला. महामारी सुरु होण्याच्या आधी त्याचे महाविद्यालयीन जीवन आनंदी होते. त्याच्या स्वप्नातील परी त्याच्या सोबत होती. त्यांनी देखील अनेकांसारखे कधी हि पूर्ण न होणारे अनेक स्वप्ने रंगवली होती. आणि महामारी सुरु झाली महाविद्यालय बंद झाले त्यांच्यातील संवाद दिवस गणिक कमी कमी होऊ लागला;  त्याची परिमिती म्हणजे त्यांच्यातले सर्व प्रकारचे सम्बन्ध संपले.  पण असे का घडले?  याचे उत्तर त्याच्यापाशी नव्हते.  हि कहाणी त्या एका मित्राचीच नाही तर थोड्याफ