जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

संविधान लागू झाले असले तरी लोक माणसात काही फरक पडला नाही; मनुसृतीचे दहन केले तरी तिचा जण माणसांवरचा प्रभाव कमी झाला नाही. आई धरती दुभंगली तरी लेकराची हेडसह होऊ देत नाही वडील आभाळ फाटले तरी लेकराला पोरके होऊ देत नाहीत हे जर दिप्तीला सांगितले तर तिचा विश्वास बसणार नाही. कारण तिच्या आई-बाबानी तिचा संसार उद्वस्त केला. “ तिला जन्म देऊन सगळ्यात मोठी चूक केली म्हणून अशा मुलींना शिकवायला नको कारण तिने कुटुंबाचे नाव खराब केले “ हे उद्गार आहेत दीप्ती मेश्राच्या आईचे. दीप्ती आणि अनिश दोघे हि मध्यम वर्गीय कुटुंबाचे घटक आहेत फक्त दीप्ती ब्राम्हण आणि अनिश दलित जातीत जन्माला आले. दोघांनी चांगले शिक्षण घेतले M A करताना त्यांची ओळख झाली त्याचे मैत्रीत आणि नंतर प्रेमात रूपांतर झाले. दोघे हि ग्राम सेवक म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले आणि नंतर त्यांनी लग्न केले. यात वरवर सर्व सामान्य दिसत असले तरी खरी प्रेम कथा लग्नानंतर सुरु होते. लग्न झाल्यावर तिला बरेच दिवस सासरी नांदायला जाऊ दिले नाही तिच्या वडिलांनी अनिशवर बलात्काराचे आरोप केले मुलीला ब्लॅकमेल करून त्याच्या विरुद्ध साक्ष्य द्यायला भाग पडले जर तू हे ऐकणार नसणार तर मी आत्महत्या करणार अशी धमकी दिली ती आपल्या वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी हतबल होती शेवटी तिने त्यांच्या मनासारखे साक्ष्य दिले ज्यावेळी अनिश तुरुंगात जाणार हे स्पष्ट झाले तेव्हा तिने आपले बयान मागे घेऊन ती त्याच्या बरोबर नांदायला गेली. नंतर दीप्तीच्या वडिलांनी अनिशवर दुसरा खटला दाखल करून अपहरणाचा आरोप केला त्यावेळी दीप्ती त्याच्या बाजूने ठाम उभी राहिली आणि आमचे लग्न झाले आहे हे तिने कागद पत्रांसह दाखवले. या उभयतांना कोणत्या हि कायदेशीर मार्गाने संपवता येत नाही हे लक्षात आल्यावर शेवटी या मनुवादी लोकांनी अनिशचा खून करायचे ठरवले आणि त्यांनी तसे केले. हि घटना घडल्या नंतर १७ व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील कार्यवाही करतील . “दीप्तीच्या मते सर्वाना फाशी व्हायला हवी जर कायदा शिक्षा देऊ शकणार नसेल तर मी माझ्या पद्धतीनं शिक्षा देईल अनिश नंतर मी सर्व कुटुंबाचा सांभाळ करणार आहे. “ आपल्या देशात हजारो वर्षांचा प्रेम विवाहाचा इतिहास असताना अद्याप प्रेम विवाह होऊ शकत नाही हे सर्वांचे सार्वत्रिक अपयश आहे. घटनेने २ प्रौढ व्यक्तीला विवाह करण्याचा अधिकार दिला असताना केवळ जातीच्या प्रतिष्ठेसाठी स्वतःच्या मुलीचा संसार उद्वस्त करणे किती योग्य? अंतर जातीय अथवा अंतर धर्मीय विवाह नेहमी समाजाच्या रूढींना छेद देतात आणि मानवतेचा विचार करतात पण हे कर्मठ समाजाला रुचत नाही. अशीच एका प्रेम विवाहामुळे दिल्लीत दंगल झाली होती सविस्तर वाचण्यासाठीसर्वत्र आपल्याला थोड्याफार फरकाने सारखीच कारणे दिसतात प्रत्येक धर्माच्या / जातीच्या लोकांना आपल्या मुलींनी इतर धर्मीयांशी लग्न करू नये पण आपल्या जातीच्या अथवा धर्माच्या मुलांनी कोणत्या हि जातीच्या / धर्माच्या मुलीशी लग्न केले तरी चालेल. आता २ पिढ्यांमधील अंतर स्पष्ट जाणवते जुनी पिढी पुराणवाडी विचाराची असून नवीन पिढी पुरोगामी आहे. म्हणून तरुणांनी आपल्या विचारणा मुरड घालणे योग्य होणार नाही कारण या पिढीच्या हाती देशाचे भविष्य आहे. तसेच हि तरुणाई राष्ट्राचे त्याचबरोबर मानवी सृष्टीचे उज्वल भवीष्य घडवणार आहे. म्हणून ज्येष्ठ पिढीने आपल्या डोक्यातील कालबाह्य रूढी काढून टाकाव्या आणि नवीन विचारणा प्रवेश करण्यासाठी वाट मोकडी करून द्यावी याचे उत्तम उदाहरण नाशिक शहरात आहे त्यांनी अंतर धर्मीय विवाहाला केवळ मान्यता दिलीच नाही तर त्यात ते आनंदाने सहभागी झाले. सविस्तर वाचण्यासाठी-- prem vivahane petavali dangal शेवटी सर्व पालकांना आपल्या लेकरांनी जीवनात आनंदी असावे असे वाटते त्याच बरोबबर त्यांना वैवाहिक जोडीदार निवडण्याचे स्वतंत्र द्या आणि त्यांचा तो आनंद हिरावू नका अन्यता त्यांना आयुष्यभर दुखत खितपत पडावे लागणार. द्वेषाने माणसे तुटतात आणि प्रेमाने दुरावलेली माणसे एकत्र येतात म्हणून प्रेम द्यायला शिका माणसे जोडण्यासाठी तुम्ही जर तथाकथित जातीसाठी पोटच्या गोळ्याचा संसार उद्वस्त करत असाल तर तुम्हाला आई-बाबा म्हणावे तरी कसे? प्रेम विवाह करताना वास्तव जाणून घेणे आवश्यक आहे विद्यमान परिस्थितीत प्रेम विवाह वास्तव कि आभास? हा प्रश्न सर्वाना पडला यावरचे माझे विवेचन वाचण्यासाठी-- https://www.premsparsh.com/2021/03/blog-post_31.html व्यवस्था त्यांनी बदलली ज्यांनी आपल्या कृतीतून तिला प्रश्न विचारले. त्यासाठी जीवाची पर्वा करून चालणार नाही कारण आपण जर हे बंद पुकारले नाही तर पुढच्या कित्त्येक पिढ्यान अशाच समस्यांना तोंड द्यावे लागणार म्हणून समसेचे मूळ उखडून टाका. आपल्या आई-बाबांचा प्रेम विवाहाला विरोध असेल तर त्यांची समजूत काढा नाही तर कायदेशीर नोंदणी विवाह करा आणि वेगळे बिऱ्हाड मांडा पण हे करत असताना जन्मदात्यांना पारखे होऊ नका त्यांची काळजी घ्या त्यांना अधिक जीव लावा एक दिवस ते नक्की तुमचा स्वीकार करतील. प्रेमासाठी प्रेमाचा बळी द्यायचा नसतो तर प्रेमाने प्रेम मिळवायचे असते.
फोटो - साभार गूगल

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

एक होते गाडगे बाबा