खरं कोण?

जागतिकीकरणानंतर समाज ३६० अंशी बदलला सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात हे सर्व बदल जाणवतात. 

  • प्रत्येक व्यक्तीचा स्वार्थ अनेकांचे जीवन उद्वस्त करू लागला आहे.  

    आज मुंबई उंचन्यायालयाने बलात्काराच्या आरोपीला अटक पूर्व  जामीन मंजूर केला. त्या दोघांचे लग्न जानेवारी २०२० साली ठरले होते; त्यानंतर टाळेबंदी झाली आणि लग्न पुढे ढकलले गेले. आणि डिसेम्बर २०२० साली काही कारणास्तव रद्द करण्यात आले.  तरी देखील मुलगी मुलाच्या कुटूंबियांच्या सम्पर्कात होती गेल्या मार्च महिन्यात त्याने तिला घरी बोलावले त्यावेळी घरी कोणी नव्हते म्हणून त्यांनी शारिरीक सम्बन्ध ठेवले; त्यानंतर त्यांनी सोबत वेळ घालवला. त्यावेळी दोघांची संमती होती असा मुलाच्या वकिलांनी युक्तिवाद केला; तर मुलीच्या वकिलांनी लग्नाचे आश्वासन देऊन फसवले असा प्रतिवाद केला. न्यायाधीशांनी प्राथमिक दृष्ट्या दोघांची संमती असल्याचे दिसते असे म्हणून अटकपूर्व जामिन मंजूर केला.  पुढील तपास सुरु आहे. 

    हि बातमी सकाळ वर्तमानपत्राने दिली. 


    विवाह जुडने आणि काही कारणांनी मोडणे. हे नेहमी घडत असते पण विवाह पूर्व शारिरीक सम्बन्ध ठेवणे योग्य आहे का? 

    भारतीय संस्कृतीत अनेक गोष्टी पूर्वीपासून चालत आल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे लग्न  होण्या पूर्वी दोघांनी सोबत वेळ घालवू  नये पण आधुनिक युगात यात खूप बदल झाला आहे. आता तुमचे मन जुडतात का? 

     याची चाचपणी करण्यासाठी तुम्ही सोबत वेळ घालवावा असा सल्ला दिला जातो. त्याचबरोबर अनेकांचे प्रेम विवाह होत असल्यामुळे त्यांच्यात बऱ्याच आधीपासून जवळीक वाढली असते. तसेच ज्यांचे ठरवून विवाह होतात ते देखील साखरपुडा झाल्यापासून एकत्र वेळ घालवतात त्याची परिणीती त्यांच्यातील सर्वप्रकारच्या संबंधात होते. हे नटाळण्यासारखे आहे. याचा अर्थ हे असेच चालत राहणार असे नाही यावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. त्यासाठी लग्न जुडल्यावर सर्व काही ठरल्याप्रमाणेच होणार या भ्रमात राहू नये; आणि त्या व्यक्तीची पूर्ण खात्री पटल्याशिवाय असा निर्णय घेण्यास धजावू नका. शेवटी तुमच्या अब्रूचे रक्षण करणे हि स्वतःची जवाबदारी आहे. 

    संमतीने ठेवलेल्या शारिरीक संबंधाना बलात्कार म्हणणे कितपत योग्य आहे? 

    एखाद्या व्यक्तीने लग्नाचे आश्वासन देऊन सम्बन्ध ठेवणे आणि नंतर घुमजाव करणे कायद्यानुसार अपराध आहे. त्याचबरोबर २ प्रौढ व्यक्तींना लग्नाशिवाय संमतीने सोबत राहता येते तसेच ते लैंगिक सम्बन्ध देखील प्रस्तापित करू शकतात. पण सुरुवातीला संमतीने असे संबंध ठेवल्यावर नंतर याद्वारे पैसे उकळण्यासाठी अथवा संपत्ती लाटण्यासाठी या संबंधांचा आधार घेऊन दुसऱ्या व्यक्तीला त्रास देणे चुकीचे आहे. 

    वरील नमूद  केलेल्या  घटनेचा विचार केल्यास त्यांचे लग्न रद्द झाल्यावर ती त्या मुलाशी नाते का टिकवत होती? 

    मग या मागे तिचा हेतू कोणता? 

    त्यांच्यात जर खरोखर मैत्री निर्माण झाली असेल तर त्यांनी अशा प्रकारे सम्बन्ध ठेवणे नैसर्गिक आहे. पण सदर प्रकरणात प्राथमिक दृष्ट्या तिचे हे सर्व आरोप हेतुपुरःसर वाटतात. म्हणून असे आरोप करून त्या व्यक्तीचा छळ करणे अनैतिक आहे. सत्य चौकशी अंती बाहेर येईल पण खोटे आरोप करणे मानहानी करण्यासारखे आहे.  

    समाजाचा अशा घटनांकडे  बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा? 

    आपल्या समाजात नेहमी महिला अत्याचार झाल्यास अनेक लोक त्या महिलेला दोष देतात तर दुसरीकडे बहुतांशी लोक त्या नराधमाला थेट सर्वांसमोर गोळ्या घाला अशी मागणी करतात. तात्विक दृष्ट्या दोनीही बाजू चुकीच्या आहेत कोणत्या हि आरोपीला केवळ संशयावरून गुन्हेगार ठरवून शिक्षा देता येत नाही तसेच गोळी घालून ठार करणे आपल्या न्याय व्यवस्थेला अभिप्रेत नाही. 

    सर्व घटनांना महिलांना जवाबदार धरणे संकुचित विचारसरणीचे लक्षण आहे. पिढीत व्यक्ती गुन्हेगार कशी असू शकतए? 

    त्यांउळे समाजाने सत्य शोधण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी घटनेच्या मुळाशी जावे. आणि संपूर्ण पार्शवभूमी समजून घ्यावी. अनेक वेळी पुरुष महिलांवर अत्याचार करतात काही प्रमाणात महिला कट रचून पुरुषांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात.  

    म्हणून प्प्रत्येक घटना वेगवेगळी असते.  

    त्यामुळे तपशील जाणून घेण्यापूर्वी आपले मत तयार करणे घाईचे ठरते. 

    सर्व प्रकारचे अत्याचार निंदनीय आहेत त्यामुळे समाजाने पिढीत व्यक्तीच्या मागे  उभे राहणे गरजेचे  आहे. 

    आपल्या न्यायालयात खटले वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात त्यामुळे पिढीत व्यक्तीबरोबर कोरडी सहानुभूती व्यक्त करण्यापेक्षा मदतीचा हात पुढे करावा. 

    तसेच समाजाने पिढितेला आणि तिच्या कुटूंबियांना स्वरक्षण द्यावे. 

    बलात्कार  पिढीता न्यायालयात न्याय मिळेल या अपेक्षेने गेलेल्या मुलीच्या हाती काय लागले हे वाचण्यासाठी-- https://www.premsparsh.com/2021/03/blog-post_1.html 


    सर्व महिलांचा सन्मान करत असताना त्यांना न्याय मिळवून देणे हे  आपले आद्य कर्तव्य आहे; त्याचबरोबर नीरप्रद पुरुषावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. आणि अशा प्रकरणात संयम ठेवून अंतिम सत्याचा शोध घ्यावा.

  • फोटो - pixabay aap


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा