धर्माच्या भिंती मोडतात तेव्हा

भारतीय संस्कृतीची इमारत सहिष्णुतेचा पायावर उभारली असून सविधान नावाच्या कळसावर धर्मनिरपेक्षतेची ध्वजा दिमाखात फडकते आहे . विविधतेत एकता हे ब्रिज जपून वैश्विक स्तरावर आपल्या देशाची प्रतिमा निर्माण झाली आहे. भारतीय सहिष्णुतेचा विचार केल्यास चंद्रगुप्त मोर्य पासून थेट आजपर्यंत अनेक आंतरधर्मीय  विवाह यशस्वीरित्या संपन्न झाले आहेत ; 'सारे सुखेन संतु' या तत्त्वाने इथे अनेक संसार आनंदाने नांदत आहेत.        आज आधुनिक युगात प्रत्येकाने तंत्रज्ञान स्वीकारलं खरं; पण त्याचबरोबर हा ' पुरोगामी'  म्हणवणारा मानव अज्ञानाच्या गटारीत फसला आहे ,आज धर्मा धर्मा मध्ये द्वेष पसरवला जातोय,यातूनच प्रेमाचे घट्ट बंधने कट्टर पंथीयांच्या दबावाखाली  कमकुवत होत चालली आहेत .अशीच एक घटना घडली महाराष्ट्रातील नाशिक शहरात रसिका नावाची  दिव्यांग असणारी हिंदू तरूणी आणि आसिफ खान नावाचा सर्वसामान्य तरुण यांच्यात गेल्या आठ वर्षांपासून प्रेम संबंध होते दिवसा गणित हे नाते गट  होत होते एक रूप पावत होते योगायोगाने उभयतांच्या भावनांचा आदर करून दोन्ही पक्षातील वडीलधार्‍या माणसांनी त्यांच्या विवाहाला मान्यता दिली आणि गेल्या महिन्यात  त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात करावी आणि दोन्ही धर्माच्या पद्धतीने सार्वजनिक समारंभात द्वारे विवाह करावा ही त्यांची सुप्त इच्छा होती त्यासाठी पत्रिका छापल्या  त्यांच्या या पुरोगामी प्रेम विवाहाला कलुषित करण्यासाठी काही समाज कंटकांनी नंतर लव्ह जिहादच शिक्का मारून समाज माध्यमांवर  त्यांची बदनामी सुरू केली. रसिकाने धर्म बदलला नाही आसिफ यांनी देखील धर्मांतर केले नाही .1954 च्या स्पेशल मॅरेज ॲक्ट नुसार त्यांचा हा विवाह कायदेशीर आहे त्यानंतर समाज  मान्यतेसाठी सार्वजनिक समारंभात द्वारे विवाह करण्याचा त्यांचा निर्णय कायद्याला धरूनच आहे , तरी देखील अशाप्रकारे कट्टर पण त्यांचं वागणं हे निषेधार्य  आहे. ही  आंतरधर्मीय विवाहाची पहिली  घटना नाही कारण याआधी अनेकदा धर्मांतराच्या भीतीने आंतरधर्मीय विवाह उधळून लावण्यात आले.अशाप्रकारे विवाह उधळून लावणार्‍या दोन्ही धर्मातील कट्टर पंथीय लोकांमध्ये काही साम्य आढळतात.त्यातील हा काही पहिलावहिला आंतरधर्मीय विवाह नाही, याआधी अनेक आंतरधर्मीय विवाह झाले आहेत पण सर्वसामान्य व्यक्तींचा आंतरधर्मीय विवाह ही चर्चा सर्वत्र रंगत असते आणि मनस्ताप या सर्वांच्याच नशिबी असतो .दोन्ही धर्मीय कट्टरपंथी लोकांचे काही पूर्वग्रह आहेत आपल्या धर्मातील मुलीने दुसऱ्या धर्माच्या मुलाशी लग्न करू नये अशी त्यांची एकीकडे धर्म रक्षकाची भावना असताना आपल्या धर्मातील मुलांनी इतर धर्मातील मुलीशी लग्न केलं त्यांना चालतं; हा धर्म रक्षणाच्या नावाखाली स्त्रियांचं अतोनात शोषण आणि प्रेमाची हत्या  करण्याचा उद्योग आहे. हे अशा विवाहांचे फलित असतं. मानवतेच्या धर्माचे पालन करणे अपेक्षित असताना मानवातील अज्ञान इतरांच्या जीवितास बाधा पोहोचते म्हणून या वृत्तीचा नायनाट करणे अत्यंत जरुरीचे आहे.याआधी एका मुस्लिम मुलीने  हिंदू मुलाशी लग्न केल्यामुळे देशाच्या राजधानीत रक्तरंजीत होळी खेळल्या गेली सविस्तर वाचण्यासाठी भेट द्या : http://www.premsparsh.com/2021/03/blog-post_22.html

अरे हिंदू-मुस्लीम शीख बौद्ध ईसाई पारशी हे सर्व धर्म मानवाने आपल्या टोळीतील इतरांना नियंत्रित ठेवण्यासाठी निर्माण केले होते ,त्याची भावनिक नाळ अद्यापही कायम आहे. पण आता संविधान नावाच्या धर्मग्रंथा खाली राष्ट्रीयत्व नावाचा धर्म सर्वांना न्याय देऊ शकतो त्यामुळे  शतकानुशतकांपासून कौटाळलेल्या या धर्माची चौकट ओलांडून प्रीतीचे प्रीतीचे नाते फुलू द्या मानवाला माणसाला माणसाला माणसाशी माणसासम वागणे ही आता काळाची गरज आहे .कारण प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा हक्क त्या व्यक्ती पासून हिरावून घेणे हे धर्मद्रोही असण्याचे लक्षण आहे, प्रत्येक धर्माने मानवता शिकवून  आपल्या धर्मियांसमोर आदर्श घालून दिला आहे. पण दुर्दैवाने आज स्वघोषित धर्म रक्षकांना त्याचा विसर पडला  आहे मोहम्मद पैगंबर यांनी देखील प्रेम विवाह केला होता आणि हिंदू धर्म यातील अनेकांनी प्रेम विवाह केल्याची उदाहरणे आहेत.सविस्तर माहितीसाठी : http://www.premsparsh.com/2021/02/blog-post_34.html

अगदी कृष्णाचं आणि त्याच्या सर्व गोपिकांचा नातं आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. धर्मगुरूंचे हे वर्तन त्यांच्या अनुयायांनी  मोडा व किंबहुना त्याचे उल्लंघन करावं ,हे खरं धर्माचं कार्ड आपण न चालवता त्यांना ठेंगा दाखवून त्यांच्या मूल्यांची पायमल्ली करणे हे त्यांच्या अपमान करण्यासारखे आहे त्यामुळे प्रेम विवाह होणे, आंतरजातीय विवाह करणे हे सर्व धर्मियांना अभिप्रेत आणि यासाठी त्यांना मदत करणे हे प्रत्येक धार्मिक व्यक्तीचे तसेच संविधानावर एकनिष्ठ असणाऱ्या भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करू आणि अशाप्रकारे कट्टर  पंथियांचा द्वेषाला आपण सज्जनांच्या प्रेमाने उत्तर देऊ.

फोटो - साभार गूगल


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा