सफाई कामगार ते उपजिल्हाधिकारी एका घटसपोटीत महिलेचा प्रवास

हे जीवन सुंदर आहे असे आपण नेहमी म्हणतो; पण त्यातील सौंदर्य आपल्याला शोधता येते का? 

  •  स्त्री शिकून सक्षम झाली असली तरी ती सामाजिक रूढींच्या झखडातून बाहेर पडू शकली नाही. त्यांच्या वाट्याला अत्याचार नेहमीचेच आहेत त्या काही प्रमाणात विरोध करतात पण त्यांना दाबले जाते. काही मात्र अशा आव्हानांनी भरलेल्या जीवनात संघर्ष करायचे ठरवतात आणि अशा असंख्य पिढीतांना आशेचा किरण दाखवतात. 

    आशा कंडारा  यातीलच एक त्यांचा जन्म मध्यम वर्गीय कुटुंबात झाला ; त्यांचे वडील नोकरी करत होते. त्यांचे १२-वि पर्यंत शिक्षण झाले आणि त्यानंतर लग्न झाले. त्या वर्गातील हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणल्या जात असल्या तरी सामाजिक दबावामुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले. आपल्या समाजात स्त्रियांवर अनेक बंधने लादली जातात एका युवतीने जीन्स परिधान  केला  म्हणून तिच्या  नातलगांनी तिची हत्या केली. सविस्तर वाचण्यासाठी  https://www.premsparsh.com/2021/07/blog-post_25.html 

    त्यांचे वैवाहिक जीवन अत्यंत कष्टी असावे कारण त्यांना पत्रकारांनी याविषयी विचारल्यावर त्यांनी बोलायला नकार दिला. त्यांना २ अपत्ये झाली त्यानंतर ३२ वर्षाच्या असताना त्यांच्या पतीने घटस्फोट दिला. त्यानंतर त्यांच्यावर आकाश कोसळले सर्वत्र  अंधकार  होता. त्या बिकट परिस्थितीत माहेरच्या लोकांनी साथ दिली आणि त्यांनी नवा मार्ग शोधला. सुरुवातीला त्यांनी २०१३ पासून आपले रखडलेले शिक्षण पूर्ण केले आणि पदवी मिळवली. दरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अब्यास सुरु केला त्यांना याव्यात तू जिल्हाधिकारी होणार आहेस का? 

    असे सतत टोमणे ऐकावे लागायचे. तरीदेखील आपल्या निश्चयावर ठाम राहून त्यांचा प्रवास सुरु राहिला. आपल्या मुलांसाठी काही पैसे कमावणे आवश्यक होते म्हणून त्यांनी नोकरी करायचे ठरवले त्यांना सफाई कामगाराची नोकरी मिळाली. रोज सकाळी ६ वाजता कामाला जावे लागायचे . नंतर थकून घरी परतल्यावर रात्री अब्यास करायचा असा त्यांचा नित्य क्रम होता. समोर स्पष्ट ध्येय असेल तर समस्यांचे डोंगर छोटे वाटतात त्या २०१८ साली पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्या त्यानंतर मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्या आता काही दिवसांनी त्यांची नेमणूक उपजिल्हाधिकारी म्हणून केली जाणार. 

    ४० वर्षाच्या या घटस्फोटित महिलेचा सफाई कामगार ते उपजिल्हाधिकारी हा प्रवास थक्क करणारा आहे. 

    आज आपल्या देशात घटस्फोटित महिलांचे अनेक प्रश्न आहेत त्यांना समाज स्वीकारत नाही सामाजिक कार्यक्रमात त्यांना डावलले जाते. मात्र पुरुषांबाबत असे होत नाही त्यांना नेहमी इतकाच आदर मिळतो. समाजात स्त्रियांवर अनेक बँडने असताना त्या संघर्ष करतात पण वाढत्याव्यात घटस्फोट मिळाल्यावर सर्वांच्या विरोधाला तोंड देऊन स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे अतुलनीय आहे. त्यांच्यामते काम करर्ण्यात लाजण्याचे कारण नाही झाडू हाती घेऊन सफाई करण्यात त्यांना कमीपणा वाटत नाही. 

    त्यांच्याकडून अनेकांना प्रेरणा मिळणारच त्याच बरोबर समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज देखील स्पष्ट झाली आहे. 

    अशा बिकट परिस्थितीत जगण्यासाठी लढत-लढत समाजासाठी  सेवा देण्याची भावना दातृत्वाचे उदाहरण आहे. सर्व महिलांमध्ये एक प्रचंड शक्ती असते त्यांना संधी निर्माण करून देणे आवश्यक आहे त्यासाठी सर्व पुरुषांनी आपला पुरुषी अहंकार बाजूला ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अनेक घटस्फोटित महिलांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न असतो. हि समस्या सोडवण्यासाठी समाजाने प्रयत्न करावे नेहमीच तिला दोषी धरून चालत नाही तर प्रकरणाच्या खोलात जाऊन सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करावा; आणि शेवटी प्रत्येकाच्या खाजगी आयुष्याचा आदर केलाच पाहिजे. हे परिवर्तन आपल्या समाजात घडले तर अशा लक्षावधी घटस्फोटित स्त्रियांचे आयुष्य सुख कर होणार यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी. आपल्यातील माणुसकी दाखवून इतरांसमोर आदर्श निर्माण करावा. गांधीजी म्हणायचे “ जो बदल तुम्हाला इतरांमध्ये करायचा आहे तो पहिले स्वतःत करा” त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील आशा अशा ताई पासून प्रेरणा घेऊन तयारी करावी. 

    फोटो - साभार गूगल
  •  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा