जीन्स पॅन्टची हत्या

जगाच्या इतिहासात नारी शक्ती ने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.  सर्वत्र कित्येक शतकापासून तिला दुय्यम दर्जा दिला होता त्यावर  मात करून तिने आपल्या हक्काचे मिळवले आणि आपली नवीन ओळख सृष्टीच्या सर्वांगात सर्व क्षेत्रात निर्माण केली. भारतीय नारी यात कुठ ही मागे नाही.

  • आज पुरोगामी म्हणवणाऱ्या विकासाचा शिक्का स्वता: वर मारणाऱ्या पाश्चिमात्य देशांनी तिला समानतेचा अधिकार नाकारला होता तो अधिकार तिला पहिल्या दिवसापासूनच  भारतीय संविधानाने बहाल केला. आपल्या देशात कागदपत्रे अथवा कायदेशीर दृष्ट्या स्त्री पुरुष समानता आहे. पण वास्तविकता पूर्णपणे उलट आहे आजही भारतीय समाज हा पुरुषप्रधान  आहे त्याच्या मते स्त्री ही खाजगी संपत्ती आहे आणि तिने पुरुषाच्या वर्चस्वाखाली राहणे हे तिचे स्त्रीत्वाचे रक्षण आहे.

    शिक्षणाच्या प्रचारामुळे स्त्री ही चौकटीबाहेर जाऊन आपल्या क्षमता नुसार जगाशी स्पर्धा करण्यास  सज्ज  झाली आहे. तिने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर जगाला पेलण्याची शक्ती दाखवून दिली आहे .तरीदेखील तिचं हे वैभव तिचं हे परिघाबाहेर पाऊल टाकणे अनेक समाजकंटकांना पचनी पडत नाही. त्यांच्या मते हा त्यांच्या संस्कृतीवर घाला आहे ही मानसिकता केवळ अडाणी अशिक्षित लोकांची नाही तर  मुख्यमंत्री पदावर विराजमान  असणाऱ्या  राज्याचे  नेतृत्व करणाऱ्या पुरुषांना वाटते अशीच एका मुख्यमंत्र्यांची आगपकड सविस्तर वाचण्यासाठी या लिंकला नक्की भेट द्या. http://www.premsparsh.com/2021/03/blog-post_18.html

    एका पोलिस अधिकाऱ्याचे स्वप्न उराशी बाळगून आपल्या करमत कुटुंबियांशी लढा देत एक युती स्वप्न जगत होती. त्या दिशेने प्रत्येक पाऊल टाकत होती परंतु काळाने घाला घातला आणि रक्ताच्या नात्यातील आजी आजोबा काका काकू यांनी तिची चक्क जीन्स पॅंट घातली म्हणून हत्या केली आणि नारीशक्तीच्या सक्षमीकरणात बाधा पोहोचवणाऱ्या अनेक मर्यादा स्पष्ट झाल्या. त्यांच्या मते त्या मुलीने जास्त शिकू नये किंबहुना तथाकथित मुलीसारखे वागावे ,तिने स्वतंत्र होऊ नये तर धार्मिक चौकटीत जगावे अन्यथा तिला जगण्याचा अधिकारच नाही हा भाव केवळ एका कुटुंबयापुरता मर्यादित नाही तर देशातील लक्षावधी कुटुंबातील कोट्यावधी मुली याच दबावाखाली जगतात आणि आपलं माणूस म्हणून अस्तित्व हरवतात ही घटना घडली उत्तर प्रदेशातील एका गावात  हि बातमी बीबीसी मराठी या संकेतस्थळावर प्रकाशित झाली. असून त्यानुसार नेहा पासवान नावाची १७ वर्षाची तरुणी दररोज जीन्स पॅन्ट परिधान करत होती. तिला आजी आजोबा काका काकू यांचा तीव्र विरोध होता. ते नेहमीच मारहाण करायचे त्रास द्यायचे तरीदेखील ती आपल्या हक्कासाठी लढत होती. विरोधाला झुगारून देत होती आणि येणाऱ्या प्रत्येक दिवसाशी सामर्थ्याने लढा देत होती. पण एक दिवस त्यांनी कहर केला आणि चक्क तिची हत्या केली . आईला ती बेशुद्ध आहे  म्हणून रुग्णालयात भरती करतो असे सांगून

    रिक्षात टाकून घरा पासून २० किलोमीटर वर असणाऱ्या नदीच्या पुलावर फेकून दिले तिचा एक पाय वर अडकल्यामुळे ती पूर्णपणे नदीत कोसळली नाही घरी आल्यावर ती रुग्णालयात  भरती आहे आपण तिच्याशी बोलू शकत नाही असे सांगून त्यांनी काही काळ आईला थाप मारली पण नातलगांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केल्यानंतर त्या नावाची कोणतीही मुलगी तिथे सापडली नाही त्यानंतर शोध घेतल्यास नदीवरचा तो मृतदेह नेहा पासवान हिचा आहे हे स्पष्ट झाले आणि आईचा मातृत्वाचा बांध फुटला आणि कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी तिने पोलिसात धाव घेऊन आजी आजोबा काका काकू सह १० लोकांच्या विरोधात तक्रार नोंदवली आणि आता पोलिस तपास सुरू आहे. पोलिस तपासाअंती कदाचित ते दोषी आढळतील न्यायालय त्यांना योग्य ती शिक्षा देईल. इथल्या स्त्री स्वातंत्र्याचे काय?? हा यक्षप्रश्न लक्षावधी तरुण-तरुणी समोर कायम असणार त्यांच्या प्रगतीचे पंख छाटणार्याय या दुष्टांचे हे वर्तन केवळ एका व्यक्तीच्या शिक्षेने संपणार नाही तर अशा प्रकारची विकृती असणाऱ्या सर्व व्यक्तींमधला तो गुण नाहीसा होईपर्यंत हे असेच सुरू राहणार यासाठी त्यातील सर्व स्तरात प्रबोधन करत असतानाच कायद्याची दहशत निर्माण करणे गरजेचे आहे. एकीकडे नेहाच्या शाळेच्या भिंतीवर  “पडी हुई लडकी घर की रोशनी “ अशाप्रकारचे वाक्य लिहिली जातात तर दुसरीकडे हीच रोशनी भिजवण्यासाठी मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी त्याचबरोबर त्यांचा विकास खुंटवन्यासातघी कर्मठ परंपरांचे पालन करण्यासाठी त्यांच्यावर सक्ती दाखवली जाते.  आणि रक्ताचे लोक रक्ताचा घोट घेऊन तथाकथित धर्माचे   करण्यासाठी मानवतेच्या धर्माची हत्या करतात . हे सगळे या संस्कृतीचा अभिमान बाळगणारे या संस्कृतीचे पाईक वागतात. तेव्हा हा देश संविधानिक मुल्यांवर चालतो की धार्मिक ग्रंथांच्या आधारे चालतो.  हा ही एक प्रश्न या शिलेदारांना विचारावा लागेल धार्मिक दृष्ट्या विचार केलास धर्माच्या गावात शिरल्यास सर्व धर्मीय लोकांनी नारी शक्तीचा कायम सन्मान केला हिंदुत्वाचा विचार केलाच शंकराबरोबर पार्वती आहेच ना राधा आणि कृष्णा आहेच ना राम आणि सीता आहे की नाही मग या सर्व स्त्रिया जर…

     सामर्थ्यशाली असतील तर आजची सीता आजची राधा किंबहुना आजची पार्वती त्या दिशेने नवीन समिकरणा सह काळाला सुसंगत पाऊल टाकत असेल तर यात गैर काय ? 

    शेवटी नारी सम्मान करणे हा केवळ पुरुषांचा अहंकार दुखावल्या सारखे नाही तर मानवतेचा विकास करण्यासाठी गरजेचे आहे . असे म्हणतात की ज्या समाजातील स्त्री सुशिक्षित असते तो समाज पुढे जातो . म्हणूनच कदाचित आपल्याकडे म्हण रूढ झाली असेल “शिकलेली आई घराला पुढे नेई “ आपल्या देशाचा समाजाचा विकास  साधायचा असेल तर महिलांना आरक्षणाची नाही तर संरक्षणाची गरज आहे . आज टोकियो ऑलम्पिक मध्ये पहिल्याच दिवशी एका महिला क्रीडापटू ने देशाला पदक मिळवून दिले . राष्ट्रपती , पंतप्रधान , लोकसभा अध्यक्ष , मुख्यमंत्री ग्रामसेवक , तलाठी सरपंच , महापौर आमदार , खासदार , मंत्री , न्यायाधीश , पायलट , क्रीडापटू , सफाई कामगार , परिचारिका , डॉक्टर इंजिनियर , रोहिणी पोलीस , अधिकारी सैनिक , चालक, लेखिका, कवयित्री,  अभिनय क्षेत्रात देखील तिने ठसा उमटवला आहे. 

    महिलांनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे ; त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे पण त्यांची संख्या कमी असण्याचे कारण आपली सामाजिक व्यवस्था आहे . ज्या दिवशी स्त्रियांवरचे हे तथाकथित स्त्रीत्वाचे ओझे काढून तिला समानतेची संधी निर्माण करुन दिली जाईल त्या दिवशी पुरुषांइतकेच किंबहुना त्यापेक्षा थोडे जास्तच स्त्रिया आपल्या यशाचा डंका पिटवून देशाची मान अभिमानानं उंचावतीळ म्हणून प्रत्येकाने नाही सन्मान करणे गरजेचे आहे . आणि सन्मान हाच मानवतेचा सन्मान आणि हाच राष्ट्राचा सन्मान आपण भारत माता म्हणतो त्याप्रमाणे आपण देशाला मातेसमान मान  देतो; त्याचप्रमाणे देशाच्या विकासासाठी मातेचा सन्मान करणे क्रमप्राप्त आहे . 

    •  फोटो - साभार गूगल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा