चाललंय तरी काय?

“जो समाज महिलांचा सन्मान करतो; तो समाज प्रगती करतो” मानवी सृष्टीच्या इतिहासापासून ज्या ठिकाणी महिलांना संधी मिळाली त्या ठिकाणी त्यांनी आपला ठसा उमटवला. पण पुरुष प्रधान समाजाने तिचे शौर्य कधी समजून घेतलेच नाही. तिला कायम दुय्यम दर्जा देऊन तिचे कार्य क्षेत्र ४ बिंतींत मर्यादित ठेवले. .

नंतर शिक्षण मिळाल्यावर तिने काळबाह्य रुढींचे वर्तुळ मोडून मुक्त झेब घ्यायला सुरुवात केली; पण तिच्या समोर नवीन संकटे उभी ठाकली. 

कामावर जाणाऱ्या महिलांवर  अत्याचार  वाढले, नोकरी करणाऱ्या महिलांना स्वतःच्या कष्टाचा पैसा खर्च करण्याचा अधिकार कुटुंबाने काढून घेतला, समाज माध्यमावर तिची बदनामी सुरु झाली,  तिच्या जवाबदाऱ्या वाढत असताना तिच्यावर अधिकार गाजवण्याची  कुटुंबातील पुरुषांची वृत्ती बळावली.   इत्यादी अशा सर्व संकटाना तोंड देत ती जीवनाच्या नव्या वाटा शोधत आहे. 

समाज माध्यमावर तिचे जीवन जगणे फार कठीण आहे तिला नेहमी अश्लील  शब्दात उपदेश केले जातात; तिच्यावर अत्याचार करण्याचा धमक्या दिल्या जातात  काही लोक तिची नाहक बदनामी करतात.  आता या विकृतीने कळस गाठून चक्क   तिचा लिलाव सुरु केला आहे.  

गेल्या २-३ दिवसांपासून समाज माध्यमावर तसेच मुख्य प्रवाहातील प्रसार माध्यमावर एका मोबाईल आपलेकेशनची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. 

[Sulli Deals ] या नावाच्या अप्लिकेशनद्वारे मुस्लिम महिलांचे छायाचित्र चोरून त्यासोबत त्यांच्या ट्विटर अकाऊंट बद्दलची माहिती दिली जात होती; आणि त्यांच्या फोटोचे लिलाव केले जात महिलेच्या सौंदर्यावरून किंमत निश्चित केली जात असे. आता हे अप्लिकेशन हटवण्यात आले आहे. 

दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना तक्रार नोंदवायला सांगितल्यावर अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल  करण्यात आला आहे; पोलिसांचा तपास सुरु आहे. 

तपासाअंती सत्य बाहेर येऊन गुन्हेगारांना शिक्षा होईल अशी अपेक्षा ठेवत असताना काही प्रश्न समाजाला नक्की विचारावे लागतील. 

१ मुस्लिम महिलांचा ऑनलाईन लिलाव करणाऱ्या विरोधात धर्माच्या भिंती वलांडून संपूर्ण समाज आवाज का उठवत नाही? 

२ धर्माच्या जोखडात महिलांना किती दिवस अडकवणार? 

३ समाज माध्यमावर महिला स्वातंत्र्याची  होणारी पायमल्ली कधी थांबणार? 

४ महिला वस्तू नसून व्यक्ती आहेत समाज याचा स्वीकार केव्हा करणार? 

सर्व महिला समाजाचा अविभाज्य घटक आहेत म्हणून त्यांच्यासाठी धावून जाणे सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे. आपल्याकडे सर्व क्षेत्रात जाती-धर्म आडवा येतो; त्यामुळे समाज हि व्यापक संकल्पना लोप पाऊण माणूस गटागटांत विभागला गेला आहे. त्यामुळे सर्वाना मुळात आपल्या गटातून बाहेर येऊन समस्त महिलांना सहकार्य केले पाहिजे. पण असे होताना दिसत नाही. कारण आपल्या वैचारिक कक्षा संकुचित आहेत. पण आज त्या धर्माच्या महिलांवर हि वेळ आली उद्या आपल्या धर्माच्या महिलांवर येऊ शकते. म्हणून आजार पसरन्या पूर्वी सावधानी बाळगायला हवी. आणि सर्व महिलांचा सन्मान करावा. त्यांच्यासाठी धर्माचा निकष लावू नये. 

“धर्म हा अफूची गोळी आहे” या अफूने कोट्यवधी स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा घास घेतला. आज देखील कट्टरपंथी मानसिकतेचे लोक तिला खाजगी मालमत्ता समजतात विशेषतः मुस्लिम स्त्रियांवर जाचक बंधने लादली जातात. त्यामुळे त्यांची प्रगती खुंटते. वरील अप्लिकेशन बाबत बोलायचे झाल्यास अप्लिकेशन विकसित करणाऱ्या व्यक्तीने मुस्लिम द्वेषातून  केवळ मुस्लिम महिलांची बदनामी करण्याच्या हेतूने हे घृणास्पद कृत्य केले असावे. 

त्यामुळे सर्व धर्मीय लोकांनी मानवी मूल्यांचा स्वीकार करावा आणि महिलांना सॉप्ट टार्गेट बनवून त्यांचा वापर करू नये. हे सर्व टाळण्यासाठी; महिलांना सक्षम करून जगाच्या स्पर्धेत उतरवण्यासाठी त्यांच्या पायातून धार्मिक बेड्या काढायला हव्या. 

समाज माध्यमावर  सर्वाना मुक्तपणे विचार व्यक्त करण्याचे स्वतंत्र असते. परंतु अनेक मुली / स्त्रिया त्यांचे खाते पुरुषाच्या नावाने सुरु करतात कारण त्यांना   स्वतःच्या नावाने खाते सुरु करण्याची भीती वाटते. अनेकींना अनोळखी व्यक्तींकडून त्रास दिला जातो, त्यांच्या खाजगी जीवनातील फोटो / व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी देऊन त्यांचे शोषण केले जाते, प्रवाह विरुधातील त्यांच्या वर्तनावर  अर्वाच्च भाषेत टीका केली जाते. त्याच बरोबर आई-वडील भाऊ यांच्याकडून त्यांच्या सर्व कृतींवर पाळत ठेवली जाते आता तर अशा खात्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उभा राहिला आहे कारण त्यांची माहिती चोरून लोक चुकीच्या प्रकारे वापर करत आहेत. म्हणून शासनाने लक्ष घालून खाजगी माहितीच्या सुरक्षितेवर लक्ष्य द्यायला हवे. त्याच बरोबर सर्वाना विचार मांडण्याचे स्वतंत्र देत असताना समाज माध्यमाच्या कंपन्यांनी महिलांचा अपमान करणाऱ्या लोकांचे खाते कायम स्वरूपी बंद करून अशा व्यक्तीची माहिती पोलिसांना द्यायला हवी. घरातील सर्वानी तिच्या खाजगी आयुष्याचा मान ठेवून तिच्यावर नजर ठेवू नये जनेकरून तिला निर्भयपणे आपले विचार मांडता येतील.  

सर्वत्र महिलांना त्रास देण्याचे प्रमाण वाढले आहे.  पुरुष प्रधान व्यवस्थेत ती आपली खाजगी संपत्ती आहे अशी अनेकांची भावना झाली आहे. हे चित्र सर्वत्र थोड्याफार फरकाने सारखेच दिसते. 

यात आमूलाग्र बदल घडवण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी वर्चस्ववाडी वृत्ती जमिनीत गाडली पाहिजे. आणि  पुरोगामी विचार अंगिकारताना ती देखील पुरुषसमान आहे याचा स्वीकार करायला हवा. 

समाजाची सर्वांगिण उन्नती साधण्यासाठी नारी सन्मान करणे क्रम प्राप्त आहे. 

यासाठी आता स्वतःपासून सुरुवात करू. 

फोटो - साभार गूगल
 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा