पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विवाहाचं खरं वय

इमेज
सृष्टीवरचा प्रत्येक सजीव आपल्या वंशजांना जन्म देतो; निसर्गाने तशी तरतूद केली आहे.   मानव सर्वाधिक बुद्धिमान प्राणी आहे असे त्याने स्वतः जाहीर केले.  पण  इतर प्राण्यांना वाचा नसल्यामुळे तसेच स्वार्थी माणसाने त्यांच्याकरिता अब्रू नुकसानीचा कायदा केला नाही म्हणून ते माणसाच्या श्रेष्ठतेला आव्हान देऊ शकत नाहीत.  टोळीतील माणसाच्या पुढे अनेक टोळ्या झाल्या; परिणामी त्याच्या गरजा विस्तारल्या सत्तेच्या महत्वकांक्षा वाढल्या म्हणून त्याने कुटुंब या संस्थेची स्वतःच्या रक्षणासाठी आणि समाज नावाच्या संस्थेची समूहाच्या रक्षणासाठी स्थापना केली.  यात सुसूत्रता आणण्यासाठी सर्वांचे हित जोपासण्याच्या हेतूने आपल्या मुलांवर अनेक संस्कार करायला माणूस नावाच्या जातीच्या प्राण्याने सुरुवात केली.  नामकरण संस्कारापासून अंत्य संस्कारापर्यंत वयाच्या सर्व टप्प्यावरचे सुसंस्कार निश्चित केले. त्यातीलच सार्वकालीन आणि सर्वत्र अतिमहत्वाच्या संस्कार ठरण्याचे भाग्य विवाह संस्काराला लाभले.  विवाहाच्या पद्धती काळ सापेक्ष त्याचबरोबर व्यक्तिसापेक्ष असतात पण मुख्य हेतू मात्र जगात सर्वत्र कुटुंब प्रस्थापित करणे अर्थात आयुष्भर ज्या

चौकटीतील शिवराय

इमेज
मानवतेचे प्रतीक छत्रपती शिवाजीमहाराज,  जाणता राजा छत्रपती शिवाजीमहाराज,  स्वाभिमानाचा कणा छत्रपती शिवाजीमहाराज,  मॅनेजमेंट गुरु छत्रपती शिवाजीमहाराज,  स्त्री, शेतकरी यांचे रक्षक शिवाजीमहाराज,   हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीमहाराज,  रयतेचा राजा छत्रपती शिवाजीमहाराज,  मध्य युगात आधुनिक लोकशाहीचे बीज पेरणारा द्रष्टा राजा छत्रपती शिवाजीमहाराज,  चिरकाल कोट्यवधी   लोकांच्या मनावर राज्य करणारा सम्राट  छत्रपती शिवाजीमहाराज,  अशा असंख्य बिरुदांमधून बाहेर पडून माणूस म्हणून आपली प्रतिमा जपणारा मानव शिवाजीमहाराजांमध्ये मला कायम दिसतो.  कर्नाटक  राज्याच्या राजधानीत महाराजांच्या पुतल्याची विटंबना झाली म्हणून सर्वत्र समाज कंटकांवर कारवाही करा अशी मागणी केली जात आहे. बेळगावातील शिव प्रेमींनी कानडी दुकानदारांना दुकाने बंद करायला भाग पाडले. कारण शिवाजी हे नाव नाही तर जगण्याची आदर्श जीवन पद्धती आहे.  पण महाराजांच्या पुतललाय नेमकं असं काय केलं कि त्याची विटंबना करण्यात समाज कन्टकांना आनंद मिळाला असेल?  तर माझ्यामते केवळ काही विकृत मानसिकतेच्या लोकांचे मतलब साधण्यासाठी म्हणून बिचार्या निर्जीव

बाबासाहेबाना विद्यार्थ्यांचे पत्र

इमेज
प्रिय बाबासाहेब,  पत्रलिहीणाऱ्याचा तुमच्या विचाराचा वारसा घेऊ पाहणाऱ्या लेकराचं साष्टांग नमस्कार.  पत्र लिहिण्याचे कारण कि आज तुम्हावर महापरिनिर्वाहन दीना निमित्य शुभेच्छांचा वर्षाव झाल्याने इजा पोहचली असेल म्हणून सांत्वनासाठी.  तसं जगाला वैचारिक दिशा दाखवणाऱ्याचे माझ्यासारख्या छोट्या तरुणाने सांत्वन करावे तरी कसे?  पण तुम्हीच घटनेत अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आम्हाला दिले असल्याने हा तोकडा पण मनापासून प्रयत्न.  वेळ मिळाल्यावर नक्की  वाचा आणि अभिप्राय कळवा   आज या पत्रात मी काही तुमची थोरवी मांडणार नाही अथवा तुमच्या जीवित  कर्तबगारीवर माझे मत व्यक्त करणार नाही.  तुम्ही जेव्हा या भूमीवर शेवटचा श्वास घेतला त्यावेळी माझ्या बाबाचा देखील जन्म झाला नव्हता त्यामुळे आपली प्रत्येक्षात भेट होण्याचे कारणच नाही.  तुमच्या लेखनातूनच मी तुम्हाला भेटू शकलो म्हणून तुम्हाला पत्र लिहिण्यास घेतले.  तुम्हाला समजून घेण्यासाठी माझ्यासारख्या सामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्याला अख्ख आयुष्य अपुरे पडेल म्हणून मी अजून तुम्हाला समजू शकलो नाही हे प्रामाणिकपणे मान्य करतो; आणि जे आमच्या अंगात बाबासाहेबांचे रक्त आहे असे छाती

कळपातील माणूस

इमेज
या हिरवागार वाळवंटात  माझं काळीज आतून होरपडून निघालं  वरून सहानुभूतीचा मुलामा आतून भावनांचा उद्रेक त्यात तीळ-तीळ माझा स्वाभिमान जळतोय कारण मला देखील माझ्या शारिरीक अभावातून अस्तित्व निर्माण करायचं आहे.  पण खर्च ते मला करता येणार का?  हा निर्थक प्रश्न माझ्या मनात घर करून बसला कारण स्वतःच्या नजरेत माझी या समाजाने नकारात्मक प्रतिमा निर्माण केली.  एकीकडे प्रचंड सहानुभूती मिळते तर कुठे मला देवदूत समजतात; तर मोठ्याप्रमाणात गेल्या जन्मातील पापी,  ऐतखाऊ, भिकार्डा नाही तर जमीनीला भार म्हणून हिंवतात.  पण या बुद्धी शत्रू मानवाना माझ्यातील माणूस केव्हा कळणार का?  काही अपवाद वगळले तर बहुतांशी दिव्यांग व्यक्तीची थोड्याफार अंतराने हि शोकांतिका आहे.  म्हणून जागतिक अपंग दिनाचे अवचित्य साधून अंतर्मनात डोकावणारा सामान्यांच्या डोळ्यासमोर दर्पण पकडणारा लेख  “Happy wold handicapped day” जागतिक अपंग दिनाच्या सर्वाना शुभेच्छा  आज मला लक्षावधी भावंडांच्या काळजाला हात घालायचा आहे,  त्यांच्या मनातील खदखदणारा असंतोष जनतेसमोर मांडायचा आहे,  आजवर आमच्या हक्काचे जे-जे म्हणून हिरावले ते सर्व मिळवायचे आहे,  समाजाच्या