मानवतावादी गुन्हेगार

रक्ताचा घोट पिणारा मी आज रक्त दान करतो, 

दारूच्या नशेत  जगणारा मी आज दारूला लाट मारतो, 

नजर माझी मेली माणसांना मारताना, 

आज समाजाला माणूस जोडतोय.  

काही माणसांचे आयुष्य मानवी समजुतीला फाटा देणारे आणि समस्त मानव जातीला माणुसकीची  शिकवण  देणारे असते.  

गुन्हेगारीच्या दलदलीत फसून  वेसनांच्या विडाख्यात अडकून बाहेर येतात आणि नंतर अशा सर्व लोकांसाठी ते बाहेर पडण्यासाठी प्रेरणा देतात. 

राहुल  जाधव  या  तरुणाची काही अशीच  कहाणी आहे. मध्यम वर्गीय घरातील  मुलगा  शाळेत जायला लागला. 

सर्व मित्रात रमणारा हा मुलगा सर्वांचा चाहता होता पण शेवटी वाढत्या स्पर्धेत तो टिकू  शकला  नाही. 

बाकी मित्र अभ्यासात हुशार हे  कसब यांच्याकडे नव्हते त्याला सर्वांपेक्षा अधिक गुण मिळवता येत नाहीत म्हटल्यावर काही  करायचे. त्याला मग आकर्षण होऊ लागले तथाकथित दादांचे आणि तो त्या जाळ्यात फसला. 

इतर मित्र डॉकटर इंजिनियर होणार आपण देखील श्रीमंत प्रतिष्ठित असावे असे त्याला देखील वाटू लागले. हे अडाणी लोक आपल्या दहशदीच्या भरोशावर लोकांना घाबरवत आणि त्यांना लोक सन्मान देत पण याला देखील हा शॉर्टकट फार भावला. आणि याची एन्ट्री चित्रपटातल्या नायकाच्या प्रवेशासारखी झाली. 

आणि धमकी देणे, मारहाण करणे, लूटमार करणे असे उद्योग सुरु झाले; आणि शेवटी तुरुंगाची वारी घडली. 

त्यांनी कल्याण आणि अर्थवरोड तुरुंगात २००७ ते २०११ हा कालखंड मुक्काम ठोकला; त्यादरम्यान स्वतः कायद्याचा अभ्यास करून न्यायालयातून जामीन मिळवला आणि आई वडिलांनी घरची जमीन विकून या दादाला आर्थिक मदत केली.  या वेळी ज्यांच्यासाठी काम केले त्यांच्यापैकी कोणी हि मदतीला धावून आले नाही. 

त्यानंतर बाहेर आल्यावर त्याने सन्मानाने जगायचे ठरवले; पण त्याला ते जमलेच नाही. जिथे जायचा तिथे संशयित म्हणून त्याला पोलीस पकडायचे आणि मग इतर सहकारी त्याला वेगळ्या नजरेने पाहू लागले. त्याला नोकरीवरून काढून टाकले गेले

आता काही हाताला काम नाही मग वेसनाकडे अधिकचे आकर्षण वाढू लागले . चरस दारू नशेच्या गोळ्या हे सर्व त्याच्या दिनचर्येचा भाग होऊन बसले. 

शेवटी बहिणीने ठाण्याच्या. एका संस्थेकडे मानसोपचार घेण्यासाठी नेले. तिथे उपचार सुरु झाले आणि नंतर पुण्याच्या मुक्तांगण या संस्थेत याना दाखल करण्यात आले

दरम्यान २०१३ साली त्यांच्यावरचे सर्व खटले निकाली निघाले. 

तिथे अनेक छोटी मोठी काम करताना आनंद मिळायचा अगदी स्वच्छतालय साफ करताना आपले मन साफ करत असल्याचे त्यांना वाटायचे तिथे सर्वजन सन्मानाने वागवायचे या जगात आपल्याला माणूस म्हणून वागवणारे देखील काही माणसे आहेत याची त्यांना जाणीव झाली. 

आणि वेसण कायमचे सुटले. हा सर्व दिन क्रम सुरु असताना संस्थेच्या संचालिका मुक्ता ताईंनी एक सभा घेऊन आपल्यातील कोणी मॅरॉथॉन मध्ये सहभागी होणार का? असे विचारले त्यावेळी फक्त राहुलने हात उचलला आणि त्याचे जीवनमान उंचावले. सर्वाना वाटायचे हा स्वच्छतागृह साफ करणारा काय धावणार पण त्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली; आणि त्यांचे एक गुन्हेगार हा शिक्का पुसून आता एक धावपटू म्हणून उदय झाला. 

त्यानंतर त्यांनी मुंबई पुणे नाशिक इत्यादी शहरातील जवळ जवळ ६० पेक्षा अधिक मॅरॉथॉन धावून पूर्ण केल्या. 

आता त्यांना पोलीस संशयित म्हणून पकडत  नाहीत तर ते स्वतः या गुन्हेगारी विश्वात अडकलेल्या आणि वेसनांच्या आहारी गेलेल्या तरुणांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. 

त्यांच्या लग्नाची कहाणी तेवढीच रोमांचक आहे; त्यांनी शादी.कॉम आणि अशा इतर संकेतस्थळावर नोंदणी केली असताना त्यांनी आपली सत्य कथा सर्वाना सांगितली; मग त्यांना सर्वानी नाकारले. 

एक दिवस मुक्तांगण मध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या मुलीला भेटून माझ्यासाठी एखादी मुलगी असेल तर बघा अशी विनंती केली त्यांनी काही स्थळ दाखवले; पण काही जमले नाही. शेवटी या नर्सने विचारले. तुम्हाला कशी मुलगी पाहिजे? तुमच्यासारखी असली तरी चालेल. तुमचे लग्न झाले का? तर नर्सने नाही. म्हटल्यावर तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? मग नर्स मॅडम घरी गेल्या या तरुणाची सत्य परिस्थिती सांगितली आणि घरून नकार आला; पण त्यांनी त्यांना राहुलची आजची परिस्थिती सांगून त्यांचे मन वळवले; आणि मग जे पोलीस सतत राहुलचा पाठलाग करायचे त्यांनी त्याला स्वतःची मुलगी दिली. आयुष्यात येणारे चड उत्तर सर्वांच्या जीवनात असतात; काही लोक पडतात तर काही पडून उठतात. 

आज देखील अनेकांच्या यशात अपयशात आनंदी होणारे दुखी होणारे सहकारी असतात पण ज्याच्याशी रक्ताचे नाते नाही; ज्याच्याकडून आपला कुठला स्वार्थ पूर्ण होण्याची अपेक्षा नाही अशा तरुणांना सहकार्य करणाऱ्या मुक्तांगण सारख्या संस्था कायम माणसांना घडवण्याचे कार्य करतात आणि प्रेमाने तुटलेली माणसे जोडतात.  

बेरोजगार तरुणांना पैसे कमावण्यासाठी सर्वांत आवडता मार्ग म्हणजे गुन्हेगारी जगत इथे येऊन आपण क्षणात लखोपती होत असू पण माणूस म्हणून आपली किंमत ० असते अशा तरुणांना नेहमी योग्य वाट दाखवण्याचे काम करताना त्यांना एकाने प्रश्न विचारला आज तुम्हाला या जाळ्यात पुन्हा फसवण्याचे प्रयत्न केले जातात का? 

ते म्हणाले आता मी त्यांच्या कामाचा राहिलो नाही. 

        म्हणून या वाटेवर असणाऱ्या अथवा या दलदलीत  फसलेल्या तरुणांनी बाहेर येण्याची गरज आहे हे शक्य आहे; फक्त मनाची तयारी पाहिजे. 

शेवटी द्वेषाने माणसे तोडली जातात आणि प्रेमाने जोडली जातात तोडण्यापेक्षा जोडण्यात सर्वांचे हित असते. आपण या समाजाचा घटक म्हणून सर्वाना जोडण्याचा प्रयत्न करू वाट चुकलेल्या लोकांना योग्य वाट दाखवू आणि त्यांचा मोठ्या मनाने स्वीकार करू. 

फोटो - साभार गूगल

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा