बाबा साहेबांचा पराभव

शतकांनो शतके जुनी जिना नसणारी इमारत इथल्या समाज व्यवस्थेने उभारलेली असताना या शोषक आणि सोशीत दोन घटकांच्या रहिवाशी इमारतीला बदलण्यासाठी एका युगंधराने वैचारिक अधिष्ठानाच्या जोरावर कर्तृत्वाच्या बळावर यशस्वी प्रयत्न केला. आणि घडून आली युग क्रांती आज सर्वत्र जगभर  या महामानवाच्या स्मृतींना अभिवादन केले जात असताना, आपण सर्व त्यांच्या विचारधारेनुसार स्वाभिमानी जीवन जगण्याचा संकल्प करू. 

सर्व प्रथम बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी त्यांना विनम्र अभिवादन.

इंटरनेटच्या युगात सर्व प्रकारची माहिती क्षणभरात मिळते. त्याला बाबासाहेब     अपवाद नाहीत. त्यांचा जन्म कुठे झाला? 

त्यांचे शिक्षण कुठे झाले?

त्यांच्या आई वडिलांचे नाव काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला ज्ञात असणार हे गृहीत धरून मी हा लेक लिहीत आहे. 

मानवी सृष्टीच्या अलिखित नियमानुसार नियमितपणे क्रांती प्रति क्रांती घडून येत असते. एकेकाळी हा समाज तत्कालीन बुद्धिमत्तेनुसार सुसंस्कृत असावा. त्याने वैज्ञानिक दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवून जगणे पसंत केले होते. अगदी वेड काळाचा विचार केला तर महिलांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता. कधी काली आपल्याकडे मातृ सत्ताक कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. पण नंतर लोक संख्येत वाढ झाली. टोळ्यांमध्ये वर्चस्व निर्माण करण्यासाठी युद्धे करावी लागली; आणि यातूनच पुरुषी अहंकार बाहेर आला आणि इथल्या स्त्रियांचे स्वातंत्र्य हिरावून गेले. बाबा साहेब त्यांच्या [ शूद्र पूर्वी कोण होते ] या पुस्तकात शूद्र समजले जाणाऱ्या वर्गाच्या मुळाला हात घालतात त्यानुसार शूद्र पूर्वी क्षत्रिय होते, मग एका टप्प्यावर त्यांचा पराभव झाला. आणि त्यांच्या हक्कांवर गदा अली. त्यानंतर त्यांच्या जमिनी हिरावला गेल्याआणि गावाच्या स्वरक्षणाची जवाबदारी त्यांच्यावर आली . त्यासाठी त्यांच्या वस्त्या गाव कूस बाहेर गेल्या; आणि इथूनच खऱ्या अर्थाने विद्वंसला सुरुवात झाली; दुर्दैवाने अद्याप देखील आपण हि जखम भरून काढू शकलो नाही. 

नंतर या व्यवस्थेला घट्ट करण्याचे काळे कृत्य मनुश्रुती या ग्रंथाने केले. दरम्यान भगवान बुद्धाने आपल्या विद्वत्तेच्या बळावर अहिंसेच्या मार्गाने यात बदल करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचे कार्य अफाट असताना काही काळ त्यांचा प्रभाव जाणवला. आणि मग या कट्टरपंथी लोकांनी त्यांना विष्णूचा ९  वा वतर घोषित केले. आणि त्यांच्या सर्व तत्वज्ञानावर पाणी फेरले. हे सर्व १९ - २० वय शतक पर्यंत कायम राहिले; आज देखील पूर्णपणे प्रतिगामी समाजात बदल घडून आला असे म्हणता येणार नाही; पण बदलाचे वारे समाजाच्या सर्व घटकात वाहत आहेत हे मात्र इथले सामाजिक वास्तव आहे. 

अशा विषमतेवर आधारलेल्या, शोषणावर उभा असणाऱ्या, माणसांना माणसांचा स्पर्श वर्ज नसणाऱ्या व्यवस्थेत एक मुलगा जन्माला येतो; आणि सामाजिक वास्तवाचे चटके शोषून जगतो; त्याच्याशी संघर्ष करतो; आणि अशा चठकाणी पडलेल्या जखमा ज्यांच्या काळजावर आहेत त्यांना स्वाभिमान नावाची गोळी देऊन सवांच्या अस्तित्वाची जाणीव करून [ शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ] हा जगातील सरोत्तम मंत्र देतो. हे सर्व कार्य विश्व रत्न dr. बाबासाहेब आंबेडकरांनी एका जन्मात केले आहे. 

गेल्या शतकात कडवे डावे आणि कडवे उजवे या दोन विचारधारा प्रचलित असताना त्यांच्यातील दोष बाजूला काढून समाजोपयोगी आहे तेवढे स्वीकारून स्वातंत्र्य विचारधारा स्वीकारली; त्याला काही लोक आंबेटकरवाड म्हणतात तर काही मानवतावाद म्हणतात. हा शेवटी आपल्या विचारधारेचा प्रश्न आहे. 

बाबा साहेबानी त्यांच्या हयातीत अनेक आंदोलने केली. सत्याग्रह केले. अनेक परिषदांना त्यांची उपस्थिती होती. या सर्व ठिकाणी स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. त्यांच्या मते स्त्री हि जन्माला येत नसून ती घडवली जाते; म्हणजे मुलाला आणि मुलीला जन्मापासून भिन्न पद्धतीने वागवले जाते त्यांच्यावर तसे संस्कार केले जातात. म्हणून हे थांबवणे अवशवक आहे. इथल्या स्त्रियांना संपत्तीत अधिकार असावा , विभक्त झाल्यावर पोदगीचा अधिकार मिळावा, चूल आणि मूळ ह्या दोन बेड्या तोडून  श्वास घेता यावा म्हणून त्यांनी हिंदू कोड बिल संसदेसमोर मांडले. पण ज्यांच्या धमन्या धमन्यांतून शोषक प्रवृत्ती वाहते त्यांनी याला कडाडुन विरोध केला. आणि शेवटी त्यांचा मनसुबा पूर्ण झाला. आणि भारतीय नारीच्या हक्कासाठी राष्ट्र पुत्राने राजेनाम्याचे हत्यार उपसले. संविधान निर्माण करताना त्यांनी समाजातील सर्व घटकांचा स्वीकार केला; पण वयक्तिक कटू अनुभव दूर ठेवून द्वेषाच्या भावनेने कोणत्या हि घटकाला दुय्य्म दर्जा दिला नाही. स्वातंत्र्य; समता; बंधुता या तीन खांबावर हे राष्ट्र उभे केले आणि तिरंगा फडकवला. जगात पहिल्यांदा सर्वाना एकाच  समानाधिकार देणारे संविधान निर्माण केले. धर्म, जात, लिंग, भाषा असा कुठला हि भेद ठेवला नाही. 

सामाजिक आयुष्यात त्यांनी या  उतरंडीची अनेक चटके अनुभवले. त्यांच्याकडे असणाऱ्या ज्ञानाच्या तलवारीने नेहमी विकृतीची गर्दन उतरवण्याचा प्रयत्न केलात्यांच्या लेखणीने तर्काच्या आधारे मानव-मानव मध्ये भेद करणारे तकलादू दावे मोडून काढले. या धर्माच्या जिना नसणाऱ्या इमारतीत आपण वास्तव्य करणे हिताचे होणार नाही. याची त्यांना जाणीव होती म्हणून त्यांनी धर्मांतराची घोषणा केली. आणि प्रत्येक्षात धर्मांतरण केले. आणि वैज्ञानिक विचारांवर आधारलेला धर्म स्वीकारला. त्यांच्या अर्थ विषयक विचारातूनच भारत देशाची मध्यवर्ती bank  निर्माण झाली. मजूर मंत्री असताना समान कामासाठी समान वेतन हे धोरण राबवले. आणि स्त्री पुरुष यांच्यातील वेतनाची तफावत दूर केली. महिलांना  मातृत्व रजा हि त्यांचीच देणगी आहे. 

बाबासाहेबांचे राजकारण हिंदू महासभा आणि मुस्लिम   लीग या धार्मिक संघटनेत बसणारे नव्हते त्याचबरोबर काँग्रेसच्या चौकटीत अडकणार नव्हते त्यांचे राजकारण पूर्णपणे समाजकारण होते. 

त्यांना भारतरत्न त्यांच्या हयातीत न देणे आणि निधनानंतर नंतर ३४ वर्षांनी बहाल करणे या मागे सुद्धा राजकारण होते. 

एवढे त्रिभुवनात न सामावणारे कर्तृत्व करणाऱ्या महापुरुषाला आम्ही डोक्यावर घेतले. त्यांच्या नावाने त्यांच्या विचारधारेला फाटा देणारे कृत्य करायला सुरुवात केली व्यक्ती पूजा करू नये हि त्यांची विचारधारा असताना त्यांनाच देव करून बाबासाहेबांच्या विचारणा पाय खाली तुडवले. जातीच्या अडगडीत टाकून श्वास बंद केला. स्मारकाच्या आणि पुतड्याच्या सिमेंट कॉग्रेटच्या

वास्तूत बंद करून पुस्तकांपासून दूर नेले. हा त्यांचा मृत्तिव नंतर झालेला पराभव आहे. याला सर्वस्वी आपण जवाबदार आहोत. म्हणून आता सावध होण्याची गरज आहे. बाबासाहेब डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात उतरवण्याची वेळ आहे हि संधी  आपण व्यर्थ दवडू न देता हा बदल स्वीकारू हि अपेक्षा. 

  •  त्यांच्या कार्याचा पाया महात्मा फुले यांनी रचला म्हणून करतूटवाच्या वत वृक्षाची संघर्ष गाथा नक्की वाचा  https://www.premsparsh.com/2021/04/blog-post_10.html 
  • फोटो - साभार गूगल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा