अजित डोवाल व्यक्ती की, वृत्ती

 

 राष्ट्र भक्ती माणसाच्या धमन्यांमधून वाहत असेल तर देशासाठी ती व्यक्ती बलिदान देण्यास सदैव तत्पर असते. अशा व्यक्तीसाठी देश हेच आपले कुटुंब असते. आणि आपल्या कुटुंबाची प्रगती हि जेवढी महत्वाची आहे. तेवढीच सुरक्षा आवश्यक आहे. देशाच्या सीमांवर रक्षण करण्यासाठी डोळ्यात तेल घालून पहारा देणारे सैनिक भारत मातेच्या सर्व लेकरांची संरक्षक असतात.  पण देशांतर्गत हिंसक प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी,  कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी,  प्रत्येक नागरिकाला सुरक्षिततेची हमी देण्यासाठी पोलीस नावाची यंत्रणा तैनात असते. अशाच एका पोलीस अधिकाऱ्याने या देशाच्या इतिहासात आपल्या कर्तव्य निष्ठेची मुहूर्तमेढ रोवून सैनिकांना मिळणारे कीर्ती चक्र हे पदक पटकावले.  या शस्त्र हातात न घेता लढणाऱ्या योध्याने सिक्कीमला भारतात सामील करण्यासाठी सिंहाचा वाट उचलला. मिझोरम राज्यात एक प्रकारची हुकूमशाही उधळून लोकशाही राज्यात रूपांतरित केले. काश्मीर काश्मीर मध्ये निवडणुका घेण्यासाठी वातावरण तयार केले.  गुप्त माहिती गोळा करून अगदी अनेक बहुधिक क्लुप्त्या वापरून पाकिस्तानची अणुकेंद्र उधळून लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला दाऊदला यमसदनी पाठवण्याची योजना आखली.  एवढेच नव्हे तर इराकमध्ये अडकलेल्या शेचाळीस परिचारिकांना सुरक्षित मायदेशात परत आणले. अभिनंदन या वैमानिकाला पाकिस्तानातून देशात आणले. कंधार मध्ये भारतीय विमान हायजॅक  केले असताना दहशतवाद्यांच्या अवास्तव मागण्या पूर्ण नकरता आपल्या सर्व प्रवाशांच्या मोबदल्यात केवळ तीन दहशतवाद्यांना परत केलं आणि 170 पैकी 169 जिवंत नागरिकांना स्वदेशात आणले. आपल्या युक्तीने आपल्या बुद्धिचातुर्याने आणि मानवी मनाचा वेध घेणाऱ्या आणि दुसऱ्याच्या शरीरात आपल्या मनाने प्रवेश करून त्याच्या मेंदूवर मानसिक नियंत्रण प्रस्थापित करण्याचे अद्भूत कौशल्य असलेल्या या  अधिकारी राष्ट्र भक्ताला आपण अजित डोवाल या नावाने ओळखतो. अर्थशास्त्राचे पदव्युत्तर पदवी मिळवलेल्या खऱ्या मानसशास्त्रज्ञांनी आपल्या कर्तुत्वाने असामान्य कृती प्रस्थापित केली.  आणि आज ते आपल्या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.  वयाच्या 76 व्या वर्षी देखील त्यांची सक्रियता अगदी पंचविशीतल्या I P S पोलिस अधिकाऱ्यासारखी आहे.  बालपणं पासून वडिलांकडून शिस्तीचे धडे गिरवले.  नंतर १९६८ साली I P S अधिकारी म्हणून केरळ मध्ये त्यांची नियुक्ती झाली.  त्यानंतर त्यांनी सात वर्ष पोलीस खात्यात काम केले. त्यांना अगदी कमी वयात राष्ट्रपती द्वारे देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकाने गव्हरवण्यात आले आहे.  नंतर गुप्तचर विभागात त्यांनी सेवा द्यायला सुरुवात केली;  आणि  गुप्तचर विभाग प्रमुख म्हणून ते 2005 साली निवृत्त झाले.  त्यांच्याकडे दूरदृष्टी भविष्यातील घडामोडीचा वेड घेण्याची किमया उत्तम वेषांतर करण्याचे कौशल्य  आपले मत दुसऱ्याला पटवून देण्याची युक्ती  तणावग्रस्त परिस्थितीत शांतपणे विचार करून निर्णय घेण्याचे सामर्थ्य या सर्व गुणांनी ते परिपूर्ण होते.  आयुष्याचे सर्तक करण्याची अद्भुत शक्ती त्यांच्यात आहे.  त्यातून म्हणून त्यांनी आपला जीव तोफेच्या तोंडावर ठेवून शत्रूच्या गोटात जाऊन त्याचा कोथळा बाहेर काढण्याची किमया साध्य केली आहे.  मिझोरम प्रांतात लालडेंगा यांची सत्ता होती.  त्यांना स्वायत्तता हवी असताना त्यांनी आपल्या बुद्धिचातुर्याने सात पैकी सहा नेत्यांना आपल्या बाजूने वळवले.  आणि त्यांचा कट उधळून लावला.  ऑपरेशन ब्लू स्टार स्वर्ण मंदिरात झालेल्या या ऑपरेशन्स ची गुप्त माहिती मिळविण्यासाठी ते अगदी सामान्य रिक्षावाल्याचा भूमिकेत वावरत होते. त्यातून त्यांनी आतंकवाद्यांना आपण पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेचे एजंट असल्याचे पटवून दिले. आणि तुमच्या मदतीसाठी मला पाठवण्यात आले असे बतावणी करून त्यांनी आतील सर्व महत्वाची माहिती मिळवली.  शस्त्रास्त्रांचा साठा किती आहे कोणत्या या प्रकारे आपल्याला यांचं कट उधळून लावता येईल याची इत्यंभूत माहिती गोळा करून पुढील त्यांच्या संकल्पनेतील ऑपरेशन घडवून आणले.  पाकिस्तान मध्ये असणाऱ्या अनु केंद्राबाबद त्यांनी भिकाऱ्याच्या वेशात जाऊन माहिती मिळवली.  वैज्ञानिकांचे केस गोळा करून देशात पाठवले आणि याची खातरजमा केली.  दुर्दैवानं तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नाकर्तेपणामुळे यश संपादन करता आले नाही.  दाऊदला संपवण्यासाठी त्यांनी उत्तम योजना आखली असताना तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्तांच्या अडथळ्यामुळे आज दाऊद जिवंत आहे.  आज ते अंतर्गत सुरक्षा आंतरराष्ट्रीय सहकार इत्यादी विषयांवर देश-विदेशात व्याख्याने देतात.  त्यांना देशाने कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला असून ते पंतप्रधान कार्यालयाला थेट देतात सल्ला देतात.  त्यांना दोन विद्यापीठांनी विद्यावाचकपटी डॉक्टरेट ही पदवी देखील बहाल केली आहे.   त्यांचे आयुष्य त्यांनी मिळवलेले पुरस्कार माहिती तपशीलवारपणे विकिपीडिया या संकेतस्थळावरून आपण वाचू शकतो.  अजित डोवाल यांचे आयुष्य एक व्यक्तीभोवती केंद्रित असणारे नसून ते राष्ट्रीयत्वाच्या प्रेमाने भारलेल्या भारलेली एक जिवंत प्रेमळ झरा आहेत.  ते एक राष्ट्र भक्ताची वृत्ती आहेत. कर्तव्य निष्ठेची जिवंत उदाहरण आहेत. आजच्या परिस्थिती बहुतांशी अधिकारी मलाई खाण्याचे काम करतात त्यांच्यासाठी टेबल खालून मिळणारी दक्षणा सेवेचा प्राधान्यक्रम ठरवते. आणि नंतर असे कौरव तरुणांच्या गळ्यातील टाइड बनतात हे फार घातक आहे. म्हणून तरुण पिढीने अजित डोवाल सारख्या अधिकाऱ्याच्या  जीवनात आपला आदर्श शोधावा. त्यासाठी देशाने त्यांना [ भारतरत्न ] या पुरस्काराने सन्मानित करायला हवे . दुर्दैवाने त्यांना पदमश्री देखील देण्यात आलेला नाही.

फोटो - साभार गूगल 

  • ☝☝☝

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा