मुलाने केली वडिलांची हत्या

आईचे प्रेम जाणवते ते क्षणोक्षणी सर्वाना अनुभवता येते. पण वडिलांचे प्रेम ते नसताना समजते. 

वडील आणि मुलाचे नाते प्रचंड गुंता-गुंतीचे असते; त्यातील अर्थ हा कधीच शब्दात व्यक्त करता येणे शक्य नाही केवळ अनुभवता येते. पण बदलत्या युगात माणसातील माणूसपण हरवत चालले आहे. इथे केवळ स्वतःपुरता इचार करणारे तरुण व्यक्तिवादाने प्रवृत्त झाले आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी वडिलांचे महत्व ० आहे. 

मन हेलावून टाकणारी घटना अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली एका २२ वर्षाच्या मुलाने वडिलांची हत्या केली. एका शुल्लक कारणावरून दोघं बाप लेखात वाद सुरु झाला; त्याच्यी परिमिती वडिलांच्या हत्येत झाली. मग नेमके आज चे तरुण जन्मदात्यांवर हात उगारण्याचे धाडस का करत असावे; कारण त्यांच्यात असणारा ओलावा कधीचाच संपलाय त्यांच्यासाठी आपला अहंकार जपणे हे पुरुषार्थाचे लक्षण झाले आहे. तर दुसरीकडे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली; याच पोलीस स्टेशनच्या क्षेत्रात पोलिसांनी मुलावर हात उगारला हे दृश्य पाहून एक स्वाभिमानी बाप कोसळला आणि त्यांची प्राण जोत मालवली. दोन तरुणांमध्ये छोटासा वाद झाला एक तरुण पोलिसात तक्रार घेऊन गेला; आणि पोलिसांनी ज्याच्या विरोधात तक्रार आहे त्याला मारहाण केली आयुष्यात पोलीस ठाण्याची पायरी न चदलेल्या वडिलांना हे दृश्य पाहून धक्का बसला नंतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; पण शेवटी व्हायचे तेच झाले आणि हा तरुण पोरखा झाला. वरील दोन्ही हि घटनांचा विचार केल्यास नेमके वडिलांचे आणि मुलांचे नाते कसे असते आणि त्यात नेमके विष कोण कालवते या दोन गोष्टींचा विचार करणे गरजेचे वाटते.  

काही वर्षांपूर्वी घरात वडिलांचा दबदबा असायचा त्यांचा शब्द म्हणजे पूर्व दिशा; तो प्रत्येकाने आज्ञा म्हणून स्वीकारावा. त्यांच्या निर्णयाला नकार देणे शक्य नसायचे मग सगळे निर्णय तेच घ्यायचे अगदी मुलाची सल्ला न घेता त्याच्यावर लादायचे. पण जसजशी परिस्थिती बदलत गेली त्यानुसार घरात काही प्रमाणात लोक शाही नांदू लागली. मग सर्वजन सल्लामसलत करून निर्णय घेऊ लागले. आणि आदर्श पद्धती निर्माण झाली. 

  • आजच्या काळात मात्र चित्र फार पालटले आहे लग्न झाले कि मुले आपले बिराड हलवतात आणि स्वतंत्र राहायला लागतात त्यांच्यासाठी वडील एका परक्या व्यक्तीसारखे असतात. पण हि मानसिकता लग्न झाल्यावर तयार होते असे नाही; त्याआधी आजूबाजूचे मित्र त्याच्या नजरेत वडिलांचे स्थान कमी प्रतीचे ठरवतात आणि मग तो वडिलांना आपला घरातला स्पर्धक समजू लागतो. त्यातूनच तो त्यांच्याशी भांडायला सुरुवात करतो; आणि प्रसंगी त्यांना संपवतो. पण अशे विकृत मानसिकतेच्या लोकांचा अपवाद वगळला तर इतिहासात आणि वर्तमानात वडिलांचा सन्मान राखणारे अनेक मुले आहेत. https://rautpratikpr9622394.blogspot.com/2021/01/blog-post_17.html 

आई घराचे मांगल्य असते तर वडील घराचे अस्तित्व असतात. त्यांचा आनंद ते व्यक्त करत नाहीत तर दुःख दाखवत नाहीत आपल्या हसण्यात त्यांचा आनंद असतो; तर आपल्या रडण्यात त्यांचे दुःख असते. मुलगा घरी का आला नाही? 

याची चिंता करणारे वडील 

मुलाच्या पुढच्या वर्षाच्या शिक्षणासाठी तरतूद करून ठेवणारे वडील मुलाच्या नोकरीसाठी हात पाय जोडणारे वडील 

मुलाच्या लग्नात हसत मूक असणारे वडील 

अशे किती तरी त्यांचे रुपे मांडता येतिल आणि हे सर्व रुपे जेव्हा एकाच यक्तीच्या थाई असतात त्या व्यक्तीला बाप म्हणतात. 

स्वतः आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या वडिलांनी मुलाला कडी हि लाचार होऊ दिले नाही. त्याच्या सुखासाठी त्यांनी हाडाचे मनी आणि रक्ताचे पाणी केले असते. पण जर त्यांच्यासमोर मुलाचा अपमान होत असेल तयार त्यांचे काळीज तुटते मग पोलिसांनी आपल्या मुलावर हात उगारला म्हणून हा देह त्यागणारे वडील जेव्हा हे जग सोडून जातात त्यावेळी त्यांचे महत्व उमगते दुर्दैव असे त्यावेळी पश्चाताप व्यक्त केल्या पेक्षा हाती काही नसते. अगदी पुराणकाळातील श्रावण बाळाचे आई बाबा किव्हा आजच्या श्रावण बाळाचे आई बाबा सारखेच आहेत. दसरत राज्याने श्रावण बाळाला बाण मारून ठार केले; म्हणून श्रावण बाळाच्या आई वडिलांनी दसरत  राजाला शाप दिला आणि पाणी न पिता आपले प्राण त्यागले. 

आज देखील मुलासाठी वडिलांनी प्राण त्यागले आहेत उत्तर प्रदेशात आपल्या मुलीची अब्रू राखण्यासाठी वडिलांनी गोळ्या झेलल्या आहेत https://rautpratikpr9622394.blogspot.com/2021/03/blog-post_3.html वडील आणि मुलाचे नाते अदृश्य असते नाही तर अस्पष्ट असते यात बदल घडायला हवा वडिलांनी मुलांशी संवाद वाढवायला हवा कारण आजच्या बदलत्या युगात समाज माध्यमावर जास्त वेळ घालवणाऱ्या पिढीच्या डोक्यात व्यापकतेने विचार करण्याची शक्ती लोप पावते आहे. त्यांच्यासाठी झटपट प्रसिद्धी आणि लोकप्रिय होणे सर्वाधिक महत्वाचे आहे. आपल्या मित्र मंडळीत आपण नेहमी  केंद्रबिंदू असावे असे वाटते त्यासाठी ते घरून नाही तर बाहेरून मिळेलत्या मार्गाने पैसे जमवतात नंतर वेसण करताना किव्हा इतर गोष्टींसाठी उधळतात आणि हे जगणे त्यांना प्रतिष्ठेचे वाटते मग वडील घरात रागावले तर तो त्यांना अपमान वाटतो मग ते बदला घेण्याच्या हेतूने भांडतात आणि प्रसंगी बापाला यमसदनी झडतात म्हणून वडिलांनी प्रकरण नियंत्रणा बाहेर जाण्यापूर्वी मुलांवर नियंत्रण आणले पाहिजे. पहिल्या सारखा दबाव निर्माण करून मुलांना नियंत्रित ठेवणे अशक्य झाले आहे त्यासाठी आता त्यांच्याशी संवाद वाढवायला हवा. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवायला हवी आणि सर्वात महत्वाचे मुलांना लगेच मागितलेली वस्तू देऊ नये. त्यांना पैश्यांची जाणीव करून द्यावी. 

एक मुलगा म्हणून आपले काही कर्तव्य आहे आज दोन पिढ्यांमधील दुरी प्रचंड वाढली असल्यामुळे मतभेद होताना दिसतात तरी देखील कोणत्या हि परिस्थितीत आपण त्यांचा अपमान करू नये कदाचित त्यांचे विचार आजच्या परिस्थितीशी सुसंगत नसतील पण ते ऐकून घेण्याची सवय लावायला हवी ४ भिंतींचा खोका म्हणजे घर नसते तर त्यात घरपण असले पाहिजे. त्यांची इच्छा केवळ त्यांना राहायला घर मिळावे आणि त्यांच्या मुलाचे कल्याण व्हावे एवढीच असते. भक्त पुंडलिकाला भेटायला आलेला विठ्ठल २८ युगांपासून विटेवर उभा आहे कारण पुंडलिकाची आई वडिलांची सेवा अद्याप संपली नाही. जगात आई वडिलांपेक्षा सर्वश्रेष्ठ कोणताच देव नाही.  हे उदाहरण जर पटत नसेल तर बाबा आमटेंच्या वाटेवर पाऊल टाकून समाजाला प्रकाश देणाऱ्या डॉकटर प्रकाश आमटेंच्या आयुष्याकडे पहा त्यांनी हे सर्व केले विना तक्रार ज्यावेळी  मुले समाजात प्रतिष्ठा मिळवतात त्यांच्याविषयी सर्वत्र कौतुकाचे शब्द बाहेर पडतात त्यावेळी वडिलांसाठी त्रिभुवन ठेंगणे झाले असते. 

प्रत्येक मुलाने एक कायम स्मरणात ठेवावे आज जरी आपण मुलगा असलो तरी उद्या आपण बाप होणार आहोत ; मग जसे आपण आज वागणार तसे आपल्या बरोबर आपली मुले वागतील शेवटी आपण आपल्या मुलांकडून काय अपेक्षा ठेवतो ती जर पूर्ण करायची असेल तर त्याच भूमिकेतून वागावे. 

फोटो - साभार गूगल




 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा