पहिले मुलींची हत्या; नंतर आत्महत्या हा बाप नेमका आहे तरी कोण?

सजीव सृष्टीतील प्रत्येक प्राण्याकडे भय निद्रा प्रजनन क्षमता इत्यादी गुणधर्म निसर्गतः प्राप्त झाले असतात . पण माणूस नावाचा प्राणी या गुणांसोबतच विवेक बुदधी लाभलेला प्राणी आहे आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जाणिवेतून तो योग्य अयोग्य बरेवाईट नैतिक-अनैतिक या सर्व गोष्टींची निवड करू शकतो समाजात राहत असताना त्यांनी सामाजिक स्वास्थ्य टिकून ठेवण्यासाठी नैतिकतेच्या आधारावर एक आचारसहिता आखली आहे; सर्वांचा सन्मान करणे कौटुंबिक व्येवस्थेत आपल्या कुटुंबातील लोकांना आधार देणे, सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील दुर्बल घटकांना सोबत घेऊन चालणे इत्यादी मुले त्यांनी स्वीकारले आहेत मानवी मनाने विणलेले हे सामाजिक जाळे प्रेमाच्या धाग्याने गुंफले आहे इथे प्रत्येक व्यक्तीला आप्तेष्ठांबद्दल स्नेह इतर लोकांबद्दल प्रेमभाव असतोच. 

 बीबीसी मराठी या संकेत स्थळावर आज हृदय पिळवटून टाकणारी आणि वैचारिक दृष्ट्या कित्येक शतके स्वताला मागे नेणारी विदारक बातमी प्रकाशित झाली; बीबीसी मराठी ह्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या बातमीचा मजकूर थोडक्यात अशा प्रकारे होता; ‘पुणे शहरानजीक एका चाळीस वर्षे ट्रक ड्रायव्हरने स्वतःच्या दोन मुलींची हत्या करून आत्महत्या केली त्यापूर्वी त्याने आत्महत्येपूर्वी ची चिट्टी लिहून आपल्या पत्नीची स्वाक्षरी घेतली  त्या सोसाइट नोट्स नुसार आज दुपारी मी माझ्या मुलीचा मोबाईल तपासला होता ती कोणत्यातरी मुलाशी व्हाट्सअप द्वारे संभाषण साधत असल्याचे निदर्शनास आले तिचे बाहेर प्रेम प्रकरण असावे अशी माझी खात्री पटली त्यामुळे आम्ही सर्व जण आत्महत्या करीत असून त्यासाठी इतर कुणाही व्यक्तीला जबाबदार धरण्यात येऊ नये. ‘  अशा प्रकारच्या घटना घडत असताना बदलत्या युगानुसार अभवतीक बदल स्वीकारण्याची आमची मानसिकता अद्याप परिपक्व झाली नाही हे स्पष्ट होते आज देखील आम्ही संस्कृतीच्या चौकटीत अडकून बसलोय संस्कृती ही नेहमी कालानुसार बदलत असते  त्यात परिवर्तन होत असते पण आम्ही भौतिक स्वरूपाचे परिवर्तन स्वीकारत असताना; अभवतीक मुल्ले मात्र संकुचित ठेवली आहेत अशा प्रसंगी पुढील काही मुद्द्यांचा विचार करणे क्रमप्राप्त वाटते. 

 एक अशा घटना का घडत असाव्यात? 

 दोन प्रेम प्रकरण प्रेमविवाह ही खरंच माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे का? 

 ३ तरुणांनी कौटुंबिक सदस्यांची मर्जी आणि आपले स्वप्न यांच्यात ताळमेळ कसा बसवावा?  

चार समाज म्हणून आपली भूमिका काय असावी? 

 आपल्या देशाने धर्मनिरपेक्षता हे संविधानिक तत्व स्वीकारले असले तरी मानवी मनावर धार्मिक मुल्ले रुजले आहेत आणि सर्व धर्मीय मानवतेची शिकवण देत असले तरी धर्माच्या आहारी गेलेली आणि धर्मांध लोकांनी चुकीचं मार्गदर्शन केल्यामुळे भोळी भाबडी जनता मात्र धर्माचा दंभ करून वागत आहे त्यांच्या लेखी स्त्री ही अद्यापही दुय्यम दर्जाचे आहे तिने चौकटीबाहेर जाऊ नये, तिने स्वमर्जीने वागू नये, तिने पैसा नक्की कमवावा; पण खर्च मात्र करू नये आयुष्यातील तील सर्वात मोठा निर्णय हा विवाहाचा असतो त्यासाठीसुद्धा तिची मंजुरी आवश्यक नसते अशा मानसिकतेत वाढलेल्या लोकांना तिच्या भूमिकेतून बघण्याची दृष्टी या लोकांकडे नसते आणि सातत्याने संकुचित दृष्टिकोनातून मुलींशी वागतात त्यातूनच अशा घटना घडतात त्यांच्या मते मुलीने तथाकथित चौकट मोडली म्हणजे कुटुंबप्रमुखाच्या तोंडाला काळे फासण्यासारखे असते त्यांच्यासाठी करमत वृत्तीचे पालन हे जगण्याचे ध्येय झाल्यामुळे या ध्येयप्राप्तीसाठी ते आत्मबलिदान देण्यास तत्पर असतात; आणि रक्ताच्या नात्यांचा बळी घेण्यास देखील सज्ज्य असतात  

2 प्रेम प्रकरण प्रेमविवाह खरंच माणुसकीला काळीमा फासणारे आहे का? 

 प्रतिगामी विचारधारेच्या लोकांनी प्रेम म्हणजे सामाजिक स्थैर्यावर आलेलं सगळ्यात मोठं संकट आहे; अशी स्वतःची समजूत करून घेतली वयानुसार माणसाच्या शारीरिक गरजांबरोबरच भावनिक गरजाही पूर्ण करणे ही त्याची त्याची आवश्यकता असते; सर्व गरजा कुटुंबातच पूर्ण होतील असे नाही व्यक्ती गणित त्याची व्यक्ती भिन्न असते या वयात समवयीन मित्र-मैत्रिणींची संबंध ठेवणे त्यांच्याबरोबर वावरणे हे अधिक आनंद देणारे असते अशा प्रसंगी भिन्नलिंगी व्यक्तीच्या आकर्षणातून प्रेम भाव जागृत होतात; आणि अशा प्रसंगी ही तरुण प्रेमी भावी आयुष्याची सुंदर स्वप्ने रेखाटत असतात  त्यासाठी सर्वतोपरी त्याग करण्याची त्यांची आंतरिक इच्छा असते यासाठी रक्ताचे नाते तोडण्याची ही त्यांची तयारी असते. हि त्यांनी ही वेळ त्यांच्यावर का यावी?तर आजही समाजाने आपल्या कालबाह्य समजुती जागृत ठेवल्या असल्यामुळे ही नामुष्कीची वेळ संपूर्ण समाजावर आली आहे.  कायदेशीरदृष्ट्या किंवा आधुनिक समाजाच्या सर्व संमतीने तरूण वयात प्रेम असणे आणि त्याचे रूपांतर विवाहात होणे हे सर्वसंमत आहे.  या घटनातून अशा निर्णयातून व्यक्ती स्वातंत्र्य उपभोगण्याची संधी प्राप्त होते;  त्याच बरोबर जोडीदाराच्या निवडीचा अधिकार त्याला वापरता येतो.  जागतिकीकरणानंतर जगाचे एक खेडे झाले आहे;  ज्याप्रमाणे आपण यांत्रिक शक्तीद्वारे मानवी श्रमाची गरज भागवली आहे त्याच प्रमाणे वैचारिक दृष्ट्या असणारी ही तफावत आता प्रबोधनाच्या माध्यमातून भरून काढणे आवश्यक आहे.  म्हणून जुन्या पिढीतील लोकांनी काळानुसार स्वतःला अध्यावत आवत करत राहावे,  जेणेकरून जगाच्या आणि आपल्या मध्ये असणारी तफावत कमी होणार.  आणि आपल्या या पुरोगामी विचारातून कौटुंबिक मूल्य टिकून राहतील आणि पुढच्या पिढीला माणूस म्हणून जीवन आनंदाने जगता येईल. 

 ३ कौटुंबिक सदस्यांची मर्जी सांभाळताना आपली स्वप्ने कशी पूर्ण करावी? 

 आई बाबा आणि त्यांची मुलं अशी कुटुंबाची रचना सर्वत्र आढळत असली तरी माझ्या मते कुटुंब तीन पिढ्यांचे असावेत कारण मुलांना आई-बाबांसोबत तसेच आजी-आजोबा तितकेच महत्त्वाचे असतात.  आज दुर्दैवाने प्रतिष्ठा आणि पैसा मिळवून अनेकांनी तथाकथित सामाजिक स्थान उंचावले आणि महाराष्ट्राच्या वृद्धाश्रमात वार्धक्य लाभलेल्या आई-वडिलांची रवानगी केली हे खरंच टाळण्यासारखे आहे.  एखाद्या व्यक्तीला जर आपल्या मर्जीने जगायचे असेल आयुष्याच्या जोडीदाराची निवड करायची असेल?  तर सर्वप्रथम आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होणे आवश्यक आहे   वयाच्या विशिष्ट टप्प्यावर साधारण पंचविशीत असताना आपला जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खुल्या मनाने आई वडिलांसमोर मांडणे क्रमप्राप्त ठरते.  जेणेकरून त्यांना आपला मुलगा / मुलगी आपल्या मनाविरुद्ध वागत असेल तरी अनैतिक पद्धतीने वागणार नाही.  हा विश्वास त्यांच्यात निर्माण होईल यासाठी तुम्ही त्यांना विविध कार्यशाळांमध्ये घेऊन जाऊ शकता एक कौटुंबिक सहल म्हणून तुम्ही अनेक व्याख्यानांना त्यांना सोबत घेऊन घेऊन जायला हवे आणि यातूनच तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करत असताना तुमच्या मर्जीने आवडी नुसार प्रेम विवाह करत असताना आपले कुटुंब एकसंध टिकवता येणे शक्य आहे.  

  • ४  समाज म्हणून आपली भूमिका काय असावी?  समाज म्हटलं म्हणजे भिन्न विचारधारा भिन्न व्यक्ती आणि वेगवेगळी मते सर्वच आलंच पण काही लोक असे असतात की पैदल चालू देत नाहीत आणि घोड्यावर देखील बसू देत नाहीत.  अशी समाजकंटक तुम्ही आयुष्यात यशस्वी झालात  तर जळतात,  आणि तुमच्या आयुष्यात जर अपयश आलं तर तुम्हाला टोचून बोलतात. सांस्कृतिक मुल्ल्यांच्या बाबतीत देखील समाजकंटकांची हीच वृत्ती दिसून येते.  कोणी समाजात कोणी तथाकथित मूल्यांची चौकट ओलांडली तर त्याला बहिष्कृत करणं आणि त्या व्यक्तीवर नेहमी टीका करणे कुश्चितपणे चर्चा करणे हे सर्व सुरु असते. हे थांबवण्यासाठी मुळात स्त्री आणि पुरुष हे भेदाभेद संपवून माणूस ही एकच जात निर्माण झाली पाहिजे;  आणि या जातीच वर आधारलेला समाज हा मानवी समाज उभारला पाहिजे.  त्यासाठी आपण स्वातंत्र्य आणि समता ह्या दोन मूलभूत अधिकारांपासून त्यातल्या काहींना वंचित ठेवता कामा नये आणि प्रेम हे  माणसं जोडण्यासाठी असतं तोडण्यासाठी नाही.  हा एक उदार दृष्टिकोन समाजाने स्वीकारणे काळाची गरज आहे यासाठी आपण स्वतः पासून सुरुवात करून बदलत्या युगाच्या समवेत स्वतःही बदल घडून आणावा;  आणि हे बदलाचे वारे सर्वत्र वाहतील यासाठी आपण प्रयत्न करावे. 
  • फोटो - साभार गूगल


     👫💔😠        

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा