प्रेम विवाह वास्तव की आभास

अडीच अक्षरांची दुनिया भलतीच न्यारी, एकमेकांचा जीव घेण्यासाठी आणि एकमेकांना जीव देण्यासाठी सदैव तत्पर असतात नर नारी  ज्याला ते प्रेम म्हणतात,  आयुष्यभर सोबत जगण्यासाठी यालाच ते प्रेम म्हणतात एकमेकांचे तोंड न पाहण्यासाठी.   महामारी  सुरु झाल्या नंतर अनेक वेळा आमचे बोलणे झाले. पण नेहमी इकडच्या-तिकडच्या  गप्पा मारून फोन ठेवला जात  असे;  असा त्याने काळ फोन केला आणि बोलता बोलता त्याच्या मनातील गुप्त दडून राहिलेल्या भावनांना व्यक्त करावं असं त्याला वाटले.  आणि हा माझा मित्र त्याने अनुभवलेले दुःख,  त्याने केलेला संघर्ष सर्व काही मोकड्या मनाने सांगू लागला. महामारी सुरु होण्याच्या आधी त्याचे महाविद्यालयीन जीवन आनंदी होते. त्याच्या स्वप्नातील परी त्याच्या सोबत होती. त्यांनी देखील अनेकांसारखे कधी हि पूर्ण न होणारे अनेक स्वप्ने रंगवली होती. आणि महामारी सुरु झाली महाविद्यालय बंद झाले त्यांच्यातील संवाद दिवस गणिक कमी कमी होऊ लागला;  त्याची परिमिती म्हणजे त्यांच्यातले सर्व प्रकारचे सम्बन्ध संपले.  पण असे का घडले?  याचे उत्तर त्याच्यापाशी नव्हते. 

हि कहाणी त्या एका मित्राचीच नाही तर थोड्याफार फरकाने अनेकांच्या अयशस्वी प्रेमाची वास्तविकता आहे;  किव्हा डोळ्यादेखत आपल्या स्वप्नांच्या चुराडा होत असताना काहीही करू न शकलेल्या हताश झालेल्या अनेकांच्या काळजावरची जखम आहे. 

अशा अनेकांच्या व्यथा ऐकल्यावर अनेक प्रश्न पडतात त्यांच्या खोलात जाणे गरजेचे वाटते 

१ खरे प्रेम कशाला म्हणायचे?

२ प्रेम विवाह करणे नशिबावर अवलंबून आहे का?

३ प्रेमात पडण्याचे नेमके योग्य वय कोणते?

४ प्रेम आणि आकर्षण यात नेमका काय फरक आहे?

५ प्रेम भंग झाल्यावर आलेल्या नैराश्यातून बाहेर कसे पडावे?

६ अनेकांवर अशी दुर्दैवी वेळ का येते?

७ समाजाची भूमिका काय असावी?

प्रेम कशाला म्हणावे हा सर्वांत जटिल प्रश्न आहे याची व्यक्तिगणिक व्याख्या करतायेत पण महाविद्यालयीन तरुण तरुणींचा विचार केल्यावर विशिष्ट गूण धर्म असतील तर ते प्रेम असू शकते या वयातील सर्व प्रेमींचा विचार केल्यास अपवाद वगळता काही गोष्टी सर्वत्र आढळतात आणि त्यातूनच त्यांचे आयुष्य अस्थिर होते 

१ उतावीळपणा- महाविद्यालयात जाण्यापूर्वी अनेकांचे ठरलेले हेतू असतात आणि पहिल्या दिवसापासून ते आपल्या या ध्येयय प्राप्तीच्या दिशेने लागतात मग वाटेल ते कष्ट करण्याची त्यांची तयारी असते अगदी तिच्या सांगण्यावरून तिची मर्जी राखण्यासाठी कर्ज घेणारे अनेक नमुने आहेत यांच्यासाठी आपली एखादी मैत्रीण असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण असते त्याशिवाय जगणे म्हणजे एखाद्याला तू मर्द नाहीस असे म्हटल्यावर वाटेल तसे असते. 

२ वाईट संगत गुण तो सोबत गुण असे म्हणतात त्यामुळे अशी वागणूक असणारे मुले मुली एकत्र आल्यास त्यांच्यासमोर अभ्यास इतर सर्वनगीन विकासासाठी आवश्यक असणारे सर्व काही बाजूला जाते आणि केवळ आपल्या क्षणिक सुखाच्या मागे हे सर्व धावतात आणि केवळ सौंदऱ्याच्या प्रेमात पडतात.   

मग महत्वाचा प्रश्न असा आहे कि, यांच्यात घनिष्ट नाते कसे निर्माण होते; तर त्याला प्रेम का म्हणायचे नाही? या वयात भिन्न लिंगी व्यक्तीचे आकर्षण निर्माण होते त्यामुळे असे भिन्न लिंगी व्यक्ती या भावनेतून जवळ येतात केवळ शारिरीक गरज भागवण्यासाठी एकत्र येतात असे नाही तर या वयात भावनिक गरज देखील आपल्या आवडत्या व्यक्तीपासून पूर्ण होतात पण याला आपण प्रेम म्हणत असलो तरी सुद्न्य जोडीदारांमध्ये असणारे प्रेम हे नव्हे.  प्रेम हे एका रबरासारखे आहे ते ताणले कि अधिक ताणले जाते एका मर्यादे पलीकडे गेल्यास ते तुटते पण हेच रबर एखाद्या नोटांच्या गड्डीला लावले तर ते सुरक्षित राहते आणि त्याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे या वयात कुटुंबियांकडून अशा नात्यानं स्वीकृती मिळत नाही जे काही करायचे सर्व त्यांना अंधारात ठेऊन केले जाते म्हणून त्याची उत्सुकता जास्त असते आणि एखाद्याच्या नशिबाने हे कौटुंबिक अड्थडे दूर झाले तर रबर जसे सोडून दिल्यावर जमा होते तशी या नात्यातली रुची कमी कमी होत जाते म्हणून अनेक प्रेम विवाह शेवट पर्यंत जाऊ शकत नाहीत . 

जे नाते पद प्रतिष्ठा आणि पैसे तसेच शारिरीक सौंदर्याच्या पलीकडे असणाऱ्या धाग्यांनी जोडलेले असते त्यांच्या आयुष्याचे प्रयोजन ठरलेले असते जे एकमेकांच्या सहवासात नसताना देखील नेहमी प्रमाणे वागू शकतात या नात्याला प्रेम म्हणावे. 

अशाप्रकारे जे दोन भिन्न लिंगी तरुण आयुष्य सोबत जगायचे ठरवतात त्यांच्यात प्रेम विवाह घडून येतो. आज दुर्दैवाने अशा प्रेमी युगुलांची कमतरता आहे जे विवाह केवळ आकर्षण असल्यामुळे घडून येतात त्यांच्या नात्यात नंतर वितुष्ट निर्माण होते अनेकांना जिच्याशी लग्न करावे असे वाटते तिच्याशी ते लग्न करू शकत नाहीत मग ते स्वतःच्या नशिबाला दोष देत राहतात पण त्यांनी हा फरक समजून घेतला पाहिजे आणि वास्तवाचा स्वीकार करावा जर तुमच्याकडे उदात्त ध्येय नसेल तरी हरकत नाही किमान तुमचे विचार जोडायला हवे आणि रोज नावीन्य असावे जणे करून तुमचे वैवाहिक जीवन महाविद्यालयाच्या कट्ट्यावर चालत असणाऱ्या प्रसन्न हसत मुख 

राहावे

पण हे सर्व समजदारी असणारे वय खर्च महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे असते का? आज शाळेतील अगदी आठवी/नौवी शिकणारे विद्यार्थी आम्ही प्रेमात आहोत असे सांगतात मग हि वाढत जाणारी वृत्ती खरोखर किती घातक आहे हे लक्षात येते.  महाविद्यालयात अब्यास सोडून सर्व काही करणाऱ्या मुलं मुलींना खरोखर गांभीर्य नसते त्यांच्यात आपण इतरांपेक्षा जास्त लोकप्रिय असावे त्यांच्या पेक्षा अधिक hand some असावे या वयात आयुष्यातील खच खडग्यांची चाहूल लागलेली नसते.  अशा वयात जर केवळ आकर्षणावरून प्रेमात पडले तर आयुष्यातील उमेदीचे वर्षे वाया जातात आणि दोघांचे देखील नुकसान होते.  म्हणून पदवी घेतल्या नंतर जर तुमच्या मनाला भावणारा जोडीदार प्रेमी मिळाला तर दोन हृदयाचे धागे जुडतात का?  तपासून पाहायला हरकत नाही. 

नाही तर अजाणतेपणी हा मार्ग स्वीकारला तर ram भरोसे तुमचे पुढचे आयुष्य असणार कारण तुमचा जरी ठाम निश्चय असला तरी तुमच्या सहकारी असणाऱ्या प्रेमी देहाचा असेलच असे नाही.  पण मग अशा परिस्थितीत नैराश्यात बसून न जाता व्यक्त होणे गरजेचे आहे.  कारण तुम्ही तुमचे दुःख वेदना इतरांसमोर व्यक्त केली  नाही तर आतल्याआत धुसमुसत राहणार आणि तुम्हाला कदाचित पुन्हा पूर्ववत जीवन जगता येणार नाही.  एखादी व्यक्ति तुमच्यासाठी खूप काही असू शकते;  पण सर्व काही नाही.  म्हणून तुम्ही ज्याव्यक्तीवर जीव ओवाळून टाकला त्याने जर तुंहाला खड्यासारखे दूर केले तर तुम्ही त्या व्यक्तीचा राग मनात धरून खचल्या पेक्षा जीवनात असे काही अचाट करून दाखवा उद्या त्या व्यक्तीला स्वतःच्या निर्णयावर पश्चाताप होणार.  अनेक प्रेमी अशा परिस्थितीत आत्महत्या करतात;  आत्महत्या कोणत्या हि समस्येचे उत्तर असू शकत नाही; तर  ते भीतर्पणाचे लक्षण आहे.  समीर गायकवाड या इंस्टाग्राम स्टार असणाऱ्या २२ वर्षीच्या युवकाने प्रेम भंग झाला म्हणून आत्महत्या केली;  हे फार घातक आहे.  अशा परिस्थितीत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे 


हि वेळ का येते कारण आपण भावनिक होऊन निर्णय घेतो.  अनेकांच्या आयुष्यात प्रेम भंग होण्याला देखील हेच कारण आहे.  अजाणतेपणी आपण केवळ शारिरीक आकर्षणाला प्रेम समजतो आणि मग त्याचे परिणाम भोगावे लागतात 


समाजाने आता बदलत्या युगाच्या नवीन विचारणा जीवन पद्धतीला मान्यता दिली पाहिजे.  आज देखील प्रेम विवाह केल्यामुळे अनेकांना आपले घर सोडावे लागते;  अनेकांना हिंसाचाराला सामोरे जावे लागते.  हे सर्व थांबले पाहिजे जर या समाज व्यवस्थेत सर्वाना समान अधिकाराने वागायचे असेल तर प्रेम विवाह होणे गरजेचे आहे.  त्यामुळे सामाजिक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडून येणार जाती धर्माच्या भिंती कोसळून जातील म्हणून आता हा बदल घडवण्यासाठी प्रबोधन केले पाहिजे. 
फोटो - साभार गूगल



 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा