लक्षाधीश शेतकरी महिला

तिला चूल आणि मूळ एवढेच बांधून ठेवले. नंतर तिने लढा उभारून स्वतःचे हक्क मिळवले. ती शिकली नोकरी व्यवसाय करू लागली घराचा डोलारा सांभाळता सांभाळता तिने समाजाला दिशा दाखवली. 

आज सर्वत्र शेतकरी आत्महत्या होत आहेत कारण नापिकीला दुष्काळाला शेतीकरणारा पुरुष कंटाळला तो हतबल झाला. त्याने शस्त्र खाली टाकले आणि स्वतःला संपवले. अशावेळी अनेक महिलांनी यशस्वी रित्या शेती करून स्वतःला साबीत केले. 

चिपळूण शहरानजीकच्या एका गावात अनेक वर्षांपासून पडित असणाऱ्या २५ एक्कर क्षेत्रफळावर गावातील १५ महिला एकत्र आल्या आणि या पडित जमिनीला कसायला सुरुवात केली आणि त्या लखोपती झाल्या. 

त्यांनी काही अत्यन्त वेगळे केले  नाही.  फक्त सहकार्य आणि विश्वास या दोन तत्वांवर त्यांच्या यशाची इमारत उभी आहे. दिशांतर या संस्थेने या महिलांना दिशा दाखवली त्यांनी याना नेहमी योग्य मार्गदर्शन केले. 

गावांतील [ भागेश्री आणि प्रगती ] या दोन महिला बचत गटांनी  हे सहकारी शेती कसायला सुरुवात केली आणि दिवसातील ८ तास काम करून त्यांनी या वाळवंटात हिरवळ फुलवली आज त्यांचे वार्षिक उत्पन्न २५००००० रुपय आहे. 

त्यांनी शेंद्रीय शेती करायला सुरुवात केली. आणि थेट सर्व उत्पादने थेट ग्राहकांना विकायला सुरु केले याने एका दगडात दोन पक्षी मारल्या गेले. 

चीपळून शहरातील नागरिकांना नैसर्गिक पद्धतीने कुठले हि विष न वापरलेले शुद्ध भाजीपाला धान्य मिळू लागले आणि या महिलांना त्यांच्या भावाला योग्य भाव मिळू लागला. 

महामारीच्या काळात सर्वत्र आरोग्य जण जागृती होत असताना सर्वांची शेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या खाण्याची इच्छा आहे. पण दुर्दैवाने ते शक्य होत नाही तर दुसरीकडे बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.  

अशा बिकट परिस्थितीत या महिलांनी उचललेले हे पाउल प्रगतीच्या दिशेने टाकलेले आहे आणि या समूहातील प्रत्येक स्त्री हि भाग्यश्री आहे. 

महिलांनी यशस्वी रित्या शेती करण्याचे हे पहिले उदाहरण नाही एका आत्महत्या ग्रस्त पत्नीने अकोला जिल्ह्यात तब्ब्ल २९ एकर शेती कसायला सुरुवात केली आणि लक्षाधीश झाली. त्यांची हि यशोगाथा  https://www.premsparsh.com/2021/02/29.html

आज एका कुटुंबाचे अनेक कुटुंबे झाली आहेत त्यामुळे शेतीचे छोटे छोटे तुकडे झाले त्यामुळे शेती आता नपरवडणारा उद्योग झाला आहे. 

आता जर शेतीतून उत्पन्न मिळवायचे असेल तर सहकारी शेतीशिवाय पर्याय नाही. म्हणून गावातील सर्वानी एकत्र येऊन शेती करायला हवी याचे अनेक फायदे आहेत 

१ शेतीचे क्षेत्रफळ वाढते अनेकांनी मिळून शेती केली तर शेतांच्या मध्ये असणारे धुरे म्हणजेच शेतावरचे बंद काढून पेरणी करता येते त्याचबरोबर शेतातील सर्व जमीन लागवडी खाली येते. 

२ अधिक उत्पन्न मिळते अनेकांनी एकत्र येऊन काम केले तर अर्थात श्रम शक्ती वाढते त्याच बरोबर क्षेत्रफळ वाढत असल्यामुळे स्वाभाविक उत्पन्नात वाढ होते शेताचे वन्य प्राण्यांपासून स्वरक्षण करता येते नैसर्गिक स्रोतांचा वापर सर्वांमिळून केल्यामुळे खर्च कमी येतो आणि नफा जास्त उरतो. 

३ हमी भाव मिळतो सर्व शेतकऱ्यांची नेहमी एक मागणी असते हमीभाव मिळाला पाहिजे एकट्याने शेती केल्याने त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो त्यामुळे त्याला मिळेल त्या भावाला पीक विकावे लागते त्याचे उत्पादन कमी असल्यामुळे कारखाने थेट मागणी करत नाहीत तसेच त्याला शहरात नेऊन स्वतःच्या हाताने थेट ग्राहकांना विकणे शक्य होत नाही. 

४ गाव गाडा उत्तम रित्या चालतो सर्वानी सहकारी शेती केल्यामुळे प्रत्येकजण आपल्याकडे असलेले सर्व आवश्यक साधने सामोहिक रित्या वापरणार त्यामुळे कुणाकडे ट्रॅकटर नसेल तर त्याची अडचण होणार नाही कुणाकडे बैल नसतील तर त्याचे काम थांबणार नाही. आणि भावकीतील भांडणे थांबतील 

शेवटी एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंतें या भावाने शेती क्षेत्रात स्वतःला झोकून दिले तर काळ्या मातीतील पांढरे सोने सर्वांचे खिशे भरल्याशिवाय राहणार नाही. 

शासनाने यासाठी काही विशेष सुविधा देऊन पुढाकार घ्यावा जनेकरून सहकारी शेतीला चालना मिळेल 

१ सहकारी शेतीसाठी नेहमी पेक्षा कमी व्याज दरावर अधिक कर्ज मिळवून द्यावे 

२ सरकारने मध्यस्ती करून सहकारी शेतीतील उत्पादनाच्या खरेदीचे करार कंपन्यांशी करावे 

३ सातबारा उताऱ्यात थोडा बदल करून मालकीचे क्षेत्रफळ आणि सहकारी शेतीचे क्षेत्रफळ अशा दोन तरतुदी कराव्या जनेकरून मालकीच्या शेतीवर सर्व लाभ मिळतील आणि सहकारी शेती करत असल्यामुळे शासनाच्या विशेष सुविधांचा लाभ मिळणार 

४ अशे सहकारी शेतीचे क्षेत्रफळ १० हेक्तर पेक्षा जास्त असेल तर त्यांच्यासाठी नजीकच्या शासनाच्या मालकीच्या जागेत शेत तळ निर्माण करून द्यावे जनेकरून सर्व शेतकऱ्यांना अल्पभूधारक शेतकऱ्यांना वयक्तिक लाभ देण्या पेक्षा तो निधी सर्वांसाठी खर्च करावा 

या देशातल्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर वीज पाणी शेत रस्ते आणि हमीभाव शेतकऱ्याला द्यावा आत्महत्या केल्या नंतर १००००० देण्या पेक्षा जिवंत असताना थोडी मदत करावी माती परीक्षण करून योग्य फवारे योग्य पिके या प्रकारचे मार्गदर्शन नेहमी होणे गरजेचे आहे सर्वत्र कृषी सहायक अधिकारी आहेत ते बहुतांशी शेतकऱ्यांना ओळखत नाहीत आणि शेतकऱ्यांनी त्यांचे तोंड देखील पहिले नसते म्हणून यांच्यातला संवाद वाढवला पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांची नेहमीच्या सभा घेण्याची जवाबदारी देखील अशा अधिकाऱ्यांवर टाकली पाहिजे बोगस औषेधे हि सर्वांत मोठी कृत्रिम समस्या आहे त्याच सोबत खतांचा कृत्रिम तुटवडा हे सर्व साठेबाजी फसवणूक थांबवली पाहिजे आणि अशा प्रकरणात कोणी दोषी असेल तर त्याच्यावरत्वरितकार्यवाहीहोणेगरजवLतaवLह

प 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा