उपेक्षित महिला डॉक्टर

        

जगाच्या पाठीवर भारतीय समाज एक सुधारित समाज म्हणून आज ओळखला जात असला तरी त्याचा इतिहास हा शोषणावर आधारित आहे. आजही स्त्री-पुरुषांमध्ये जाणवणाऱ्या विषमते मध्ये आपल्या इतिहासाची काही चिन्हे प्रकर्षाने निदर्शनास येतात आज कायदेशीर दृष्ट्या स्त्री पुरुष समानता हे तत्व इथल्या समाजाने स्वीकारलं असलं तरी मोठ्या प्रमाणात महिलांचे शोषण होणे ही इथली वास्तविकता देखील लपवता येत नाही; म्हणून या सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून अनेकांनी विरोध पत्करून आपल्या स्वकर्तुत्वाच्या बळावर आणि प्रवाहाच्या विरोधात जाऊन भविष्यातल्या  पिढ्यांना त्यांनी एक नवा आयाम घालून दिला समाजिक रूढी परंपरेनुसार चूल आणि मूल एवढेच क्षेत्र मर्यादित असणारी स्त्री शिकू लागली तिने शिक्षण घेतलं पण प्रश्न होता तिचा एक स्वाभिमानी आणि सक्षम व्यक्ती म्हणून जगण्याचा, माणूस म्हणून उघड माथ्याने समाजासमोर वावरण्याचा, पुरुष प्रधान संस्कृती असलेल्या या समाजाने तिला मात्र असा मुक्त श्वास घेऊच दिला नाही. तिला  अनेक बंधनं खाली  जखडून  ठेवलं तिच्यावर अनेक रूढी  लादल्या;  आणि मग ती झाली केवळ एखाद्या ची पत्नी, एखाद्या ची मैत्रीण, एखाद्या ची मुलगी, किंवा एखाद्या ची आई पण तिला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून ओळख  नव्हती. बालविवाह, जरठ कुमारी विवाह, हुंडा प्रथा हे सगळं घडत असताना सासरच्या लोकांकडून होणारा छळ आणि घरी होणारं शोषण हे तिच्या पाचवीला पुजले होते. 

अशा परिस्थितीत आपल्या स्वकर्तुत्वाने  या समाजाला जाणीव करून देण्याचा; एका महिलेने कृतीतून उत्तर देण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि समाजातल्या अगदी प्रतिष्ठित लोकांचा देखील विरोध झुगारून तिने इथल्या स्त्रीस्वातंत्र्याचा मैलाचा दगड रचला. हि कहाणी आहे पहिल्या प्रॅक्टिस करणाऱ्या महिला डॉक्टरची 22 नोव्हेंबर 864 एका मराठी कुटुंबात रखमाबाईचा जन्म झाला. जयवंती आणि जानराव या जोडप्याचे ती एकच अप्पटी होती.  वयाच्या तिसऱ्या वर्षीच पितृछत्र हरवले;  आणि  रखमाबाई मायेच्या पदरात वाढू लागली.  त्यांच्या आईने मुंबईतल्या एका प्रतिष्ठित आणि सृजनशील विचारधारेच्या व्यक्तीशी लग्न केले आणि रखमाबाईच्या आयुष्याला नवे वळण मिळाले वैज्ञानिक दृष्टिकोनाचे धडे या संस्कारात उतरू लागली ती मोठी होत असताना वयाच्या 10व्या वर्षी तत्कालीन रूढी परंपरेनुसार मुलीचा विवाह निश्चित करणे गरजेचे होते; त्यासाठी त्यांनी आपल्या वृद्ध मृत पतीच्या नात्यातील असणाऱ्या एका तरुणाची निवड केली आणि विवाह लावून दिला त्यानंतर रखमाबाई चे शिक्षण सुरूच राहिले त्या शिकल्या; वैद्यकीय शाखेत प्रवेश  मिळवण्या इतपत त्या पात्र झाल्या. पण त्यांचे वय वाढत गेले; आणि जवळजवळ रखमाबाई वीस वर्षांच्या असताना त्यांच्या सासरकडून त्यांना पाठवा असे पत्र आले आणि रखमाबाई तसेच त्यांच्या आईवडिलांनी न पाठवण्याचा निर्णय घेतला त्यांचा हा निर्णय म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेला ठेंगा  दाखवण्यासारखा होता या व्यवस्थेने लादलेल्या बंधनांना झुगारणारा होता स्त्रीत्वाच्या दुय्य्म दर्जाला लात मारणारा होता. आणि स्वाभिमानाची  बीजे रोहणारा होता या निर्णयाविरुद्ध त्यांचे पती अर्थात भिकाजी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आणि माझ्या पत्नीला माझ्या घरी नांदायला नांदायला येण्याचा आदेश देण्याची विनंती केली; पण मग रखमाबाई आणि त्यांचे आई-वडील त्यांच्या निर्णयावर ठाम होते  त्यांनी न्यायालयीन लढाई लढण्याची ठरवले आणि महाराष्ट्रातल्या सर्व समाज घटकात एका नव्या चर्चेला उधान आले कारण हा सामाजिक स्थित्यंतराचा काळ अनेकांना पचत नव्हता मग लोकमान्य टिळकांसारख्या नेत्यांनी सुद्धा धर्म ग्रंथांचा आधार घेऊन रखमाबाई वर टीका केली त्यांचे जिने मुश्किल केले. अशा परिस्थितीतही त्या डगमगल्या नाहीत शेवटी जवळजवळ चार वर्ष हा लढा चालला आणि रखमाबाईच्या बाजूने न्यायालयाने निर्णय दिला त्यानंतर ही लढाई थांबली नाही; तिच्या  सासरच्या लोकांनी वरच्या न्यायालयात दाद मागितली आणि  कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाच्या पूर्णपणे विरुद्ध निर्णय वरच्या न्यायालयाने दिला.  रखमाबाईकडे २ प्रर्याय ठेवले; १ सासरी नांदायला जा. २ ६ महिने तुरुंगवास भोग.  रखमाबाईच्या मतानुसार त्यावेळी झालेला विवाह हा बाळ विवाह होता. त्याला माझी संमती नव्हती. म्हणून मी त्याच्याकडे न जाता  तुरुंगात ६ महिने राहणार असा निर्धार केला. त्यांना तुरुंगवास होऊ नये म्हणून  रखमाबाई स्वरक्षक  या नावाने लोकांनी समिती तयार करून आर्थिक तरतूद  करायला सुरुवात अचानक प्रस्तावाला त्यानुसार रखमाबाईंनी भिकाजीना २००० रुपय देऊन स्वतःला या विवाहातून मुक्त केले.  त्यामुळे त्यांच्या वैद्यकीय शिक्षणातील अडथडा दूर झाला; त्यानंतर त्या इंग्लंडला गेल्या; आणि १८९५ साली डॉक्टर रखमाबाई राऊत इंग्लंड मधून वैद्यकीय शाखेतील पदव्युत्तर पदवी घेऊन मायदेशात परतल्या आणि काही काळ त्यांनी मुंबईतील कामा रुग्णालयात रुग्णसेवा केली परंतु त्यांच्या या संघर्षाने अनेकांच्या तथाकथित सामाजिक स्वाभिमानाच्या जखमांवर मीठ चोळले असल्याने त्यांच्याकडे बघण्याची त्यांची वक्र दृष्टी मात्र अद्याप बदलली नव्हती म्हणून त्यांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला; आणि गुजरात राज्यातील राजकोट सुरत इत्यादी ठिकाणी रुग्णसेवा केली प्लेग सारख्या साथीला ही त्यांनी तोंड दिलं आणि आपली रुग्णसेवा अविरत कायम ठेवली.  पहिल्या महायुद्धात जखमी सैनिकांची ही त्यांनी सुश्रुषा केली आणि एका डॉक्टरची कर्तव्य पार पाडले त्यांच्या या कार्याचा सन्मान गोऱ्या सरकारने त्यांना  [कैसर-ए-हिंद ] हा किताब बहाल केला रेड क्रॉस सोसायटीने सुद्धा त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आपल्या पतीच्या घरी नांदायला न जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला सगळ्यात मोठी क्रांती झाली ते संपूर्ण इंग्रजांचे साम्राज्य असणाऱ्या देशांमध्ये त्यात बालविवाह मान्य नाही म्हणून पतीच्या घरी नांदायला न जाण्याच्या त्यांच्या या धाडसी निर्णयाने कोट्यावधी महिलांचे आयुष्य बदलून टाकले कारण इंग्रजांच्या साम्राज्यात यामध्ये बाल विवाह प्रतिबंधक कायदा 891 हा संपूर्ण साम्राज्य मध्ये लागू झाला आणि महिलांना स्वतःचा  जीवनसाथी निवडण्याचा एक प्रकारे अधिकार मिळाला रखमाबाई १९३०  साली वैद्यकीय सेवेतून निवृत्त झाल्या पण त्या कधीच निवृत्त झाल्या नाहीत अगदी 25 डिसेंबर 1955 पर्यंत म्हणजे त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत या समाजासाठी कार्यरत राहिल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन केले समाज प्रबोधनाचे धडे  दिले.  

त्यांना शेवटी भारतीय समाज म्हणून आणि त्यांच्याकडे हवे तेवढे लक्ष दिले नाही; आज त्यांचा विसर संपूर्ण देशाला पडलाय हि सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. त्यांनी आपल्या दुःखाच्या वेदनांच्या कहाण्या जगासमोर कधीच ठेवल्या नाहीत; स्वतःचे दुःख पचवता पचवता त्यांनी या शोषणाच्या इतिहासाची पाने ही कायमची जीर्ण केली पण आम्हाला आठवण झाली ज्या वेळी गुगलने 2017 साली त्यांच्यावर एक डूडल तयार केलं तेव्हा हा आमचा मराठी स्वाभिमान जागा झाला आणि यांच्यावर चर्चा व्हायला सुरुवात  झाली. अशा या संघर्षाच्या वाटेवर चालणाऱ्या शोषणाच्या ज्वालेतून भाजून निघणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे आयुष्य कथा म्हणजे इथल्या समाजात सर्वात शेवटच्या घटकाला सुद्धा जगण्याची प्रेरणा देते आणि अशक्य ते शक्य करून दाखवण्याची स्फूर्ती मिळते यासाठी आपण आपल्या आयुष्यात असंभव संभव करून स्वतःला घडवावे हीच खरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला दिलेली सलामी ठरणार. 

 👇👇 फोटो - साभार गूगल      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा