कर्तृत्वाचा वटवृक्ष महात्मा फुले

अनेक नेत्यांच्या मागे समाज उभा राहिला; पण त्यांना वैचारिक बैठक ड्एता आली नाही. ज्यांच्याकडे वैचारिक अधिष्ठान होते त्यांच्या मागे समाज उभा राहिला नाही. पण समाजावर चिकित्सक बुद्धीने ताशेरे वोढणाऱ्य जोतिबा फुले याला अपवाद होते.  समाज परिवर्तक शैक्षणिक क्रांतीचे जनक         स्त्री सुधारणा चळवळीचे प्रवर्तक  स्वातंत्र्य प्रज्ञेचे साहित्यकार शेतकऱ्यांचे नेते  असे असंख्य उपमा देऊन त्यांचे कार्य शब्दात पकडता येत नाही अशा कर्तृत्वाच्या वटवृक्षाला अर्थात महात्मा जोतिबा फुले याना जयंती दिनी त्रिवार वंदन  त्यांनी इथल्या स्त्रीला शिकवून बुरसटलेल्या समाजिक विचारधारेला चिरडून टाकले. आणि विद्वा विवाहाला चालना देऊन अनेकीनच्या सुखी संसाराच्या आड येणारी भिंत पाडली . केसोपं करणाऱ्या न्हावयांचा संप घडवून तिला देखील केस वाढवण्याचा अधिकार आहे. हे रूढी वाद्यांना ठणकावून सांगीतले ज्यांनां पानी पिण्यापासून रोखले जायचे त्यांच्यासाठी घरचा हौद खुला करुन दिला. आणि संकुचित हृदयाच्या माणसांना खुल्या मनाने कृतीतून उत्तर दिले. आणि विखुरलेल्या घटकाणा एकत्र गुंफून ठेवले. विद्वा महिलेच्या मुलाला दत्तक घेऊन नवा आदर्श घालून दिला. त्याच बरोबर त्यांना मूल जन्माला घालता येत नाही; याची जवाबदारी स्वीकारून स्वताहातली कमतरता दाखवून दिली. त्यांच्या अफाट कार्याचा आज उदो उदो केला जात असला तरी त्यांना त्याकाळी प्रचंड विरोध झाला होता. अगदी पत्नीला शिकवले; त्यानंतर मुलींसाठी शाळा सुरू केली. म्हणून वडिलांनी घरातून काढून दिले. स्वजातीय लोकानी त्यांचा द्वेष केला. अज्ञानी लोकांच्या या वृत्तीला समाजाची उस्फूर्त प्रतिक्रिया म्हणून माप करता येणे शक्य आहे. परंतु विष्णू शास्त्री चिपळूणकर सारख्या जाणत्या लोकांनी महात्मा फुलेंचा शूद्र महात्मा असा अपमानकारक उल्लेख केला. यावउण तत्कालीन जाती द्वेषाची भावना किती तीव्र होती; याचा अंदाज येते. अनेकांनी त्यांचावर प्राण घातक हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पण  सुदैवाने ते वाचले. देशाच्या इतिहासातील एकमेव व्यक्ति आहे की, त्यांच्या वाट्याचे Ṣत्यांना दिले जात नाही. तृतीयरत्न हे पहिले सामाजिक नाटक 1855 साली महात्मा फुले यांनी रचले पण नाट्य इतिहासात त्याला मानाचे स्थान दिले गेले नाही, याला देखील जातीय द्वेष कारणीभूत आहे. त्यांचे साहित्य म्हणजे बोली भाषेत झिरपणारा ज्ञानाचा जरा आहे. गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असुल, ब्राम्हणांचे कसब, सार्वजनिक सत्य धर्म, हंटर कमिशनला दिलेले निवेदन हे सर्व याचीच उदाहरणे आहेत. त्यांनी सामान्यातल्या सामान्याला समजावे म्हणून प्रश्न उत्तर स्वरूपात साहित्य निर्मान केले. आज देखील त्यांनी सुचवलेले उपाय लागू पडतात. हे सर्व शक्य झाले एका अपमानामुळे एका मित्राच्या वरातीत सहभागी झाल्यावर ब्राम्हण नसल्यामुळे त्यांना अपमानित केलेगेले. मग त्यांच्या हाती थॉमस  पेन यांचे [ writes of man ] हे पुस्तक पडले आणि त्यांचे आयुष्य ३६० डिग्री बदलले त्यांना स्वातंत्र्य समता बंधुता याची ओळख झाली; आणि त्यांच्याकडे समाजाच्या शोषक आणि सोशीत या दोनीही घटकाच्या वागणुकीचा अनुभव होता. १८४८ साली स्वतःच्या पत्नीला साक्षर करून पहिली मुलींची शाळा सुरु केली आणि क्रांतीच्या रणांगणात उतरले वर उल्लेख केल्या प्रमाणे त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. ते करते सुधारक होते. त्यांनी बदलाची सुरुवात स्वतःपासून केली. त्यांचे आयुष्य हे समाजाला समर्पित केलेले होते या फुले दाम्पत्याचे समर्पण वाचण्यासाठी इथे भेट द्या. https://www.premsparsh.com/2021/01/blog-post.html
 

आल्या जन्मात त्यांनी चिरकाल अमर राहणार अशी कीर्ती केली. पण कलम कसाई असणाऱ्या जमातीने त्यांना डावलले १८६९ साली रायगडावर जाऊन समाधी स्थळ शोधून पहिली शिव जयंती साजरी करणारे महात्मा फुले बाजूला गेले आणि याचे श्रेय टिळकांच्या माथी चिटकवले. महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांवर पोहाडा लिहून महाराजांना [ कुळवाडी भूषण  ] असे संबोधले. 

त्यांनी स्वीकारलेला मार्ग आता जरी समाज सुधारणेचा वाटत असला; तरी त्याकाळी तो अनेकांच्या दृष्टीने धर्मद्रोह होता. त्यांच्या हयातीत याची त्यांनी किंमत चुकवली पण आजच्या आधुनिक युगात स्वातंत्र्य भारत देशात देखील त्यांच्यावर समाज कंटकाची वक्रदृष्टी असते. 

आजच्या समाजाची हि अवस्था  अशी का झाली? 

याचा शोध घेत असताना ते लिहितात "  

विद्ये विना मती गेली, 

मती विना गती गेली, 

गती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, 

वित्ताविना शूद्र खचले, 

अवघे अनर्थ एका अविद्येने केले."  

म्हणून ज्ञान गंगा प्रत्येकाच्या दारात पोहचावी आणि ते गंगा जल म्हणजे ज्ञानामृत सर्वानी प्राशन करावे यासाठी त्यांची अखेर पर्यंत धडपड सुरु होती. उभ्या आयुष्यात त्यांनी अंधश्रद्धेला चुकून देखील खत पाणी घातले नाही. या सृष्टीचा निर्माता असणाऱ्या निर्मिकाच्या आणि इथल्या लोकांच्या मध्ये कोणी दलाल नसावा; जसे आई बाबा आणि मुलाचे नाते असते तसेच निर्मिकाचे आणि त्याच्या लेकराचे नाते असावे. 

त्यांच्या या महान कार्याप्रती नतमस्तक होताना महात्मा गांधींनी [ खरा महात्मा ] या गव्र्व पूर्ण शब्दात जोतिबा फुलेंचा उल्लेख केला. त्यांच्या या अफाट कार्यापासून पुढे अनेकांनी प्रेरणा घेतली शाहू महाराज विश्वरत्न  बाबासाहेब आंबेटकर आणि लक्षावधी पुरोगामी विचारधारेचे  कार्यकर्ते आज तरुण पिढीचे नेत्रुत्व उद्या देशाची वाटचाल त्यांनी दाखवलेल्या मार्गाने करेल हीच त्यांच्या जयंती दिनी अपेक्षा . त्यांच्या कल्पनेतला नागरिक हा स्वातंत्र्य प्रज्ञेचा होता. त्याच्याकडे स्वतःचे डोके असावे त्याच्या हृदयात व्यवस्थेचे बळी ठरलेल्या प्रत्येकासाठी जागा असावी. हिंदू, मुसलमान, ख्रिष्टी, पारशी, जैन, बुद्ध इत्यादी धर्माना बाजूला टाकून मानवतेचा धर्म सर्वानी स्वीकारावा या समाजाने नेहमी अवती भवती घडणाऱ्या घडामोडीतले सत्य शोधण्याचा प्रयत्न करावा मग या आचरणातूनच हा समस्त समाज [ सत्य शोधक समाज ] होणार या दिशेने आपण एक पाऊल टाकून स्वतःपासून सुरुवात करू

फोटो - साभार गूगल

    •          
         

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा