महाराणीच्या स्वप्नातील महाराजा

 मानवी समाजात स्वतःला श्रेष्ठ ठरवण्यासाठी इतरांपेक्षा आपल्यात काही तरी विलक्षण गुण आहेत असा आभास निर्माण करण्याच्या हेतूने माणसाने माणुसकीपासून फारकत घेतली असताना या कृत्रिम विषमतेच्या माणसाला एकमेकांशी कोणत्या हि स्वार्थाशिवाय जोडण्याची ताकद प्रेमात आहे. 

जिथे प्रेम असते तिथे शुद्ध  अंतकरणाने नाते जोडले जाते. 

दुर्दैवानं या प्रेमाचे बाजारीकरण झाले आहे आता प्रेमाचा करार केला जातो हुद्द्यांचे एकमेकांशी लग्न ठरतात संपत्तीचे हार गळ्यात टाकून बेरीज वजाबाकीचे संसार थाटून तथाकथित आधुनिक जोडपे चेहऱ्यावर समाधानाचे उसने अवसान आणून जगासाठी जगतात. 

 पण याला काही अपवाद आहेत त्यांनी पवित्र प्रेमाला व्यवसायिक वृत्ती पासून दूर ठेवले आहे. 

वैश्विक स्तरावर ५०च्या दशकात एका प्रेम विवाहाची चांगलीच चर्चा रंगली; तो विवाह होता इंग्लंडची वर्तमान राणी इलिझाबेद आणि दिवंगत राजकुमार फिलिप ड्यूक याचा. 

तसा हा विवाह वाटतो तेवढा सोपा नव्हता राणीला त्यासाठी आपली सर्व  शक्ती पणाला लावावी लागली तेव्हा कुठे वडिलांनी संमती दिली. 

या राणीच्या आईचा स्वभाव देखील फार प्रेमळ होता त्यांनी एका भारतीय सेवकाला राजवाड्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विरोध असताना जीव लावला त्याला हृदयाशी कवटाळले. 

सेवकाच्या प्रेमात महाराणी  https://www.premsparsh.com/2021/01/blog-post_31.html 

अवती-भवती सर्व सुखे पायाशी लोळण घेत असली तरी माणसांवर निस्वार्थी प्रेम करण्याचा संस्कार कदाचित आईकडूनच मुलीला मिळाला असावा. 

म्हणून तिने खडतर वाटेवरून आपल्या कर्तृत्वाने जग जिंकणाऱ्या योध्यात प्रियकर शोधला. 

आपल्याकडे बहुतांशी तीर्थ क्षेत्र नद्यांच्या सँगमावर आहेत तसा या उभयतांचा प्रवास देखील दोन भिन्न प्रवाहाच्या मिलनातून झाला. 

फ्लिप ड्यूक यांचे जीवन कायम अस्थिर होते ते  केवळ १८ महिन्यांचे असताना माय देशातून पलायन करण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली.  त्यांचे शिक्षण वेगवेगळ्या ३ देशातून पूर्ण झाले त्यांनी अशा परिस्थितीत आपल्या कौशल्याला मेहनतीची धार चढवून ब्रिटिश रॉयल नेव्हीत नोकरी मिळवली. 

ते १८ वर्षाचे असताना  लष्करी तुकडीच्या एका नाटकात सहभागी झाले हा नाट्य प्रयोग पाहण्यासाठी राजा जॉर्ज ६ आपल्या मुलींसह आले; त्याचवेळी १३ वर्षाच्या इलिझाबेत यांनी त्यांच्या स्वप्नातील राजकुमाराला पाहिले तिथून झालेली हि ओळख आयुष्याच्या अखेर पर्यंत टिकली;  पहिले पत्र,  नंतर मित्र,  आणि शेवटी पती-पत्नी म्हणून एकत्र आलेल्या या प्रेमी युगुलाने जगासमोर नवा आदर्श ठेवला. 

असे म्हणतात “बाहदूरो का किसमत साथ देता है” 

या धाडसी जोडप्याला हे वचन तंतोतंत लाघु पडते. 

१३ वर्षाची इलिझाबेत चोरून फिलिपला पत्र पाठवायची तो देखील आपले काम सम्भाळत तिला पत्र लिहीत असे बरेच दिवस हा ऊन सावलीचा खेळ चालला. 

त्यांची पहिली भेट १९३९ साली झाली आणि १९४७ साली साखरपूडा झाला. 

विवाहाची शास्वती नसताना  शाश्व्त प्रेमाने त्यांना तारून नेले. 

त्यांच्यासमोर नागरिकत्वाचे सर्वांत मोठे आव्हान होते. 

आपल्याकडे आज देखील अंतर जातीय विवाह करण्याचे धाडस फार कमी लोक करतात कारण हा समाज जातीसाठी पोटच्या लेकराला देखील सम्पवतो. 

त्याचेच एक प्रातिनिधीक उदाहरण-- 

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान https://www.premsparsh.com/2021/07/blog-post_31.html 

युरोपात त्या काली फारशी वेगळी परिस्थिती नव्हती तरी देखील इच्छा असेल तर मार्ग दिशेल या आशेवर त्यांनी प्रत्येक श्वास घेतला. 

आणि अखेरीस त्यांच्या मेहनतीला फळ आले 

दुसऱ्या महायुद्धात राज्याच्या होणाऱ्या जावयाने कमालीचे शौर्य दाखवले त्यांच्या कामगिरीवर समस्त इंग्लंड देश हरकून गेला. 

मग केवळ उत्साहाच्या भरात राजा या सैनिकांबरोबर आपल्या मुलीचा विवाह लावुन देईल असे म्हणणे भाबलेपणाचे ठरेल. 

त्यांची पहिली अट होती कि जावई हा ब्रिटिश नागरिक असावा म्हणून फिलिप यांनी ग्रीस नागरिकत्वावर पाणी सोडून इंग्लंडचे नागरिकत्व मिळवले; त्यानंतर आईच्या नात्यातले माऊंट बटण हे आडनाव धारण केले. 

या सर्व तडझोडीनंतर शाही विवाह संपन्न झाला. 

सुरुवातीचे काही वर्षे या जोडप्याला एकांतात घालवता आले  अवघ्या ४ वर्षात राजा जॉर्ज ६ यांचे निधन झाले; आणि एलिझाबेथ यांच्यावर राज्यकारभार सांभाळण्याची जवाबदारी आली. 

हि जवाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांच्या पतीला  नोकरीचा राजिनामा द्यावा लागला. 

त्याचबरोबर दोघांच्या भूमिका अधिक व्यापक आणि जवाबदार झाल्या. 

४ लेकरांच्या आई-बाबावर ४ सीमांच्या रक्षणाचे आव्हान होते. 

त्यांनी विनातक्रार त्याला तोंड दिले. 

राणीची प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी आपल्या मुलांना ते वडिलांचे आडनाव लावू शकले नाहीत याची फिलिप याना कायम खंत वाटत असे; ते एकदा म्हणाले होते “ आपल्या देशात मुलांना स्वतःचे नाव न लावू शकणारा मी एकमेव बाप आहे” 

आता पर्यंत आपण पतीच्या प्रतिष्ठेसाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या अनेक पत्नी पाहिल्या असतील पण पत्नीच्या प्रतिष्ठेसाठी सर्वस्वाचा त्याग करणारा हा  पती एक दुर्मिळ उदाहरण आहे. 

त्यांच्या आयुष्यात देखील खटके उडाले असले तरी त्यांनी त्याची वाच्चता केली नाही घरातील भांडणे रस्त्यावर आणली नाहीत कदाचित एकमेकांना मनापासून माप करण्याची शक्ती प्रेमातूनच मिळाली असेल. 

शेवटी ०९/०४/२०२१ रोजी या संसाराच्या रथाचे फिलिपच्या रूपाने एक चाक गळून पडले पण त्यांच्या या जीवन गाथेतून येत्या कित्त्येक पिढ्याना मार्गदर्शन मिळेल. 

जगातील 

कोणत्या हि मुलाबरोबर आपल्या मुलीचा विवाह लावून देणे इंग्लंडच्या राजाला शक्य होते पण त्यांनी तथाकथित प्रतिष्ठेसाठी तिच्या प्रेमाची हत्या केली नाही तिला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. 

तिने देखील सुखाच्या लोळावर लोळणाऱ्या मुलापेक्षा कर्तृत्ववान व्यक्तीला पसंत केले. 

उभयतांच्या या मूल्य निष्ठ तत्वांना सलाम 

आपल्याकडे एखादी मुलगी दुसऱ्या मुलाबरोबर समाज माध्यमावर   बोलते म्हणून तिची हत्या करणारे वडील अद्याप जिवंत आहेत. 

हे सर्व थांबवायचे असेल तर वास्तव जाणून घेणे गरजेचे आहे. 

त्यासाठी हा लेख नक्की वाह-- 

पहिले मुलींची हत्या; नंतर आत्महत्या हा बाप नेमका आहे तरी कोण?  https://www.premsparsh.com/2021/04/blog-post_20.html 

 

 

    
महाराणीच्या स्वप्नातील महाराजा 

फोटो - साभार गूगल

     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा