[ तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केले; पण माझ्यापेक्षा देशावर जास्त प्रेम केले ]
"तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केले; पण माझ्यापेक्षा देशावर जास्त प्रेम केले", हे उद्गार आहेत शहीद जवानांच्या पत्नीचे निकिता कौल यांचे सैन्यात लेप्टनंट पदावर रुजू झाल्यावरचे. 😊 ज्या नात्यात प्रेम असते, ते नाते सर्वाधिक सुंदर असते. प्रेम आपल्याला अशक्य ते शक्य करण्याची शक्ती देते, विस्कटलेली आयुष्याची घडी बसवण्याचा विश्वास देते, म्हणून प्रेम सर्व शक्तिमान असते. 💕 मेजर विभूती शंकर डोंडियाल हे सैन्यात भरती झाल्यावर सर्वांना आनंद झाला होता. तसे ते आई-बाबांचे लाडके; पण राष्ट्रभक्तीने भारावलेल्या या गुणवान लेकराने भारत मातेचे रक्षण करण्याचा संकल्प सिद्धीस नेला. सर्व काही सुरळीत सुरु असताना त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दिल्लीत बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करणाऱ्या निकिता कौल यांच्याशी त्यांनी लग्नगाठ बांधली. दोघांचा सुखी संसार सुरू झाला. आपल्या आयुष्याची अनेक स्वप्ने त्यांच्या डोळ्यात तरंगत होती. तोच अनपेक्षित दिवस उगवला; दहशदवाद्यांचा पाठलाग करत असताना, १७-०२-२०१९ रोजी मेजर साहेब शहीद झाले😢😢. या दुखत त्यांच्या स्वभाग्याचे लेन असणार कुंकू पुसल्या गे...