मी तिचा मालक नसून जोडीदार आहे

बदलत्या जगात सर्वत्र वेगाने बदल घडून येत आहेत. पण आज देखील खुरचटलेले विचार, पुराणमतवादी मानसिकता, धार्मिक पगडा इत्यादी गोष्टींचे प्राबल्य कायम आहे. याचे बळी सामान्य माणसांपासून अगदी उच्च्भ्रू व्यक्तींपर्यंत आहेत. आणि यावर टीका होत असली तरी स्वतंत्र निर्णयाचा आधार घेऊन विषय संपवला जातो. 

आज माझी क्रिकेटपटू इरफान पठाण यांच्या मुलाच्या नावाने समाज माध्यमावर असणाऱ्या अकाउंटवर पूर्ण कुटुंबाचा फोटो टाकला होता. त्यात ते त्यांचा चिमुकला आणि त्यांची राणी तिघे हि आहेत पण त्यांच्या पत्नीचा चेहरा मात्र झाकलेला आहे. यावर प्रचंड टीका झाली. नेटकऱ्यानी तुम्ही त्यांचे मालक आहात का? 

विचारल्यावर इरफान पठाण यांनी उत्तर देताना मी तिचा मालक नसून जोडीदार आहे. असे ठणकावून सांगितले आणि या उत्तरानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. 

या प्रशांवर चर्चा करण्यापूर्वी इरफान पठाण यांच्या वैवाहिक जीवनावर एक दृष्टिक्षेप त्यांच्या पत्नीचा जन्म १९९४ साली सवडी अरब अमिरात देशात झाला. त्यांचे वडील त्या देशातील प्रसिद्ध व्यापारी त्यांचा विवाह २०१६ साली मक्का येथे पारपडला. त्यांना एक मुलगा आहे. त्या दोघांचे अनेक छायाचित्र समाज माध्यमावर आहेत त्यापैकी बहुतांश फोटोत त्यांचा चेहरा झाकलेला दिसतो. विवाह  पूर्वी त्या मॉडेलिंग करत होत्या नंतर मात्र त्यांचा सार्वजनिक क्षेत्रातील वावर कमी झाला. 

१ पती-पत्नीचे नाते कसे असावे? २

 वास्तविक जीवनात पती स्वतःला पत्नीचे मालक समजतात का?? 

३ स्त्रियांनी दुय्यमत्व स्वतः स्वीकारले आहे का४ 

धार्मिक रूढींमधून आपला समाज केव्हा बाहेर पडणार? 

या सर्व प्रश्नांचा विचार करण्यासाठी आपल्या सांस्कृतिक स्थित्यंतराकडे डोकावून पाहायला पाहिजे अनेक धर्मात स्त्रियांना  दुय्यम दर्जा दिला गेला होता. त्यात काही प्रमाणात बदल झाला असला तरी अद्यापही ती मानसिकता कायम आहे. धर्मानुसार त्यात वेगळेपण आढळते . मुस्लिम समाजात अद्याप देखील बुरखा पद्धत पाडली जाते. पण सर्वत्र चित्र वेगवेगळे आहे. प्रॉफिट मोमहाड पैगम्बर यांची प्रेम कहाणी आजच्या सर्व धर्मीय जोडप्यांसाठी आदर्श आहे. वाचण्यासाठी-- https://www.premsparsh.com/2021/02/blog-post_34.html    

१ पती-पत्नीचे  नाते कसे असावे? 

आजच्या काळात पती आणि पत्नी यांच्यात मित्रत्वभाव कायम असावा अशे सर्वाना वाटत असले तरी प्रत्येक्षात मात्र चित्र उलट आहे. आज देखील कमावत्या व्यक्ती मध्ये पुरुषाचा समावेश होतो.  अनेक महिला गृहिणी असतात त्यांच्या खांद्यावर केवळ चुल आणि मूळ एवढीच जवाबदारी असते. काही घरातील महिला नोकरी/व्यवसाय करत असतील तरी त्यांना खर्च करण्याचे स्वतंत्र नसते. त्यांना कर्त्या पुरुषाची अनुमती घ्यावी लागते. तर दुसरीकडे गृहस्थ असणारा पुरुष कधीच घर काम करत नाही; स्त्री कमावती आहे; आणि पुरुष घर सांभाळतो असे चित्र केवळ बोटावर मोजण्या इतक्या कुटुंबात सापडणार. 

याची मूळ  आपल्या परम्परेत आहे. आपल्याला वर्चस्व गाजवण्यात पुरुषार्थ वाटतो पण खरा पुरुषार्थ कशात आहे? याची आपल्याला जाणीव नाही. तर दुसरीकडे मुलींना आपण जास्त बोलू नये ४ माणसांत जाऊन विचार मांडू नये अशी शिकवण घरातील महिला देतात. त्यामुळे मुलं-मुलींची तशी मानसिकता तयार होत. आणि आपल्या वैवाहिक जीवनात ते तसेच वागतात. या जगण्यात क्रांती होणे गरजेचे आहे. त्यासाठी यशस्वी/आदर्श व्यक्तीच्या संसार गाथा समोर येणे गरजेचे आहे जनेकरून त्यांच्यापासून आपण धडा घेऊशकणार . 

 राष्ट्रपिता महात्मा गांधी एवढे महान झाले कारण त्यांनी त्यांच्या पत्नीला सोबत घेऊन अनेक स्त्रियांना आपल्या आंदोलनात समाविष्ट करून घेतले होते. त्यांची संसार गाथा वाचण्यासाठी-- https://www.premsparsh.com/2021/01/blog-post_30.html   अर्थात कुटुंब, समाज, राष्ट्र, विश्व प्रगतिशील होण्यासाठी पती/पत्नी उदारमतवादी असणे गरजेचे आहे सर्व मुले आपल्या आई  वडिलांचा आदर्श ठेऊन जगतात. व आपण काय करावे काय करू नये हे सर्व त्यांना विचारून ठरवतात. म्हणून दोघांचे हि स्थान समान असावे त्याच बरोबर स्त्रियांचे शोषण सर्वाधिक त्यांच्या कुटुंबात होत असल्यामुळे ते थांबवण्यासाठी देखील हा मित्रत्वभाव महत्वाचा ठरेल; आणि एक  आदर्श पिढी तयार होण्यास मदत होईल. यातूनच दोघांचा संसार हा सुखी संसार होणार दोघांनी देखील सर्व प्रकारची जवाबदारी वाटून घ्यावी. आज सर्वत्र मुलाला त्याच्या वडिलांचे नाव तसेच आडनाव लावले जाते त्याच बरोबर आईच्या नावाचा देखील त्यात समावेश करावा जनेकरून मुलांच्या मनात दोघांची सारखी प्रतिमा निर्माण होणार शेवटी पती-पत्नी हे वैचारिक सहचारी असावे.  

२ वास्तविक जीवनात पती स्वतःला पत्नीचे मालक समजतात का?? 

कौटुंबिक हिंसाचारात झालेली वाढ, हुंडा बळीचे वाढते प्रमाण, वाढते घटस्फोट हे सर्व उदाहरणे स्त्रियांच्या शोषणाची प्रचिती देणारे आहेत. अनेकींना जिवंत जाळले जाते, विहिरीत ढकलून दिले जाते, नाही तर चारित्र्यावर शंका घेतली जाते. पुरुष प्रधान संस्कृतीच्या कवचामुळे हि विकृती बोकडली आहे. यासाठी समाजातील सर्व घटक जवाबदार आहेत. 

स्त्रियांनी दुय्यमत्व स्वतः स्वीकारले आहे का? आज सर्व मुलींना मुलांच्या तुलनेत दुय्य्म दर्जा मिळतो. याला सर्वस्वी आई जवाबदार आहे. ज्या वयात भाऊ खेळायला बाहेर जातो त्या वयात त्याची बहीण मात्र आईला घर कामात मदत करते. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर मुलाला शिकवले जाते; आणि मुलीचे लग्न ठरवले जाते. हि विषमता वाढण्यासाठी घरातील महिला जवाबदार आहेत म्हणजे एका अर्थाने त्या आपल्या दुय्यमत्वाचा दर्जा पुढच्या पिढीकडे देतात. 

अनेक बायका निर्णय घेताना कचरतात नाही तर त्या घेत नाहीत विवाह ठरवताना मुलगी कशी दिसते? मुलगा काय करतो? असे प्रश्न विचारले जातात त्यावेळी त्यांच्यावर कुटुंबातील वरिष्ठ महिला आक्षेप घेत नाहीत. विधवा स्त्रीवर समाज अनेक बंधने लादतो; आणि अशा महिला आनंदाने ते स्वीकारतात. पण विदुर पुरुषावर मात्र कुठलीच बंधने लादली जात नाहीत. 

हे चित्र बदलण्यासाठी महिलांनी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. त्यांनी आपल्या सारख्या अनेकांचा आवाज उठवत असताना त्यांना देखील बोलते केले पाहिजे. शेवटी आपण समान आहोत हे विसरू नये. 

४ धार्मिक रूढींमधून आपला समाज केव्हा बाहेर पडणार? धर्म माणसांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी अस्तित्वात आला होता. आज देखील तो तेच कार्य करत आहे. फक्त तक्रार एवढीच आहे. काळानुसार परिवर्तित होण्यापेक्षा तो स्थिर राहिला आहे म्हणून विज्ञानवादी विचारांसमोर त्याने आपल्या पुराणमतवादी विचारधारेचे आवाहन उभे केले आहे. इरफान पठाण यांच्या पत्नी बद्दल मला माझे मत मांडायचे नसून अशा अनेक महिलांचे जीवन व्यक्त करायचे आहे त्यांना धर्मानुसार वागण्यास भाग पडले जाते का? कि, त्या स्वतः तशा वागतात. या पेक्षा त्यांची वागण्याची हि पद्धत काळ सुसंगत आहे का? हाच विचार होणे गरजेचे आहे. आज मुस्लिम , हिंदू , जैन , बुद्ध , इसाई सर्व धर्मात अंधश्रद्धांचा बाजार मांडला जातो. स्त्रियांना त्यांच्या स्वतःच्या नजरेत पुरुषाची खाजगी मालमत्ता असल्याचे भासवले जाते. त्यासाठी धर्माचा आधार घेऊन हे ईशवर संमत आहे. हा विचार पेर्ला जातो. म्हणून आता हे सर्व धार्मिक बंधने झुगारून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. केवळ मानसिक समाधानासाठी धर्माचा  आधार घ्या त्याला आपल्या जगण्यातील अडथडा होऊ देऊ नका. 

शेवटी सर्वांचा संसार राजा-राणीचा स्वप्नवत संसार असावा हीच अपेक्षा. https://www.premsparsh.com/2021/04/blog-post_9.html 

फोटो - साभार गूगल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

बायकोचा जाच

समर्पण