पाक लष्करातील भारतीय अधिकारी
रंगमंचावर सैनिकाच्या वेषात नाटक करणारा हा कलाकार आयुष्याच्या नाट्यमय वळणांवर यशस्वीरीत्या भूमिका पार पाडणारा ठरला. भारतातल्या या देशभक्ताने पाकिस्तानातील लष्करातील मेजर पदापर्यंत चा प्रवास सहजरित्या देशभक्ती च्या जोरावर आणि राष्ट्र प्रेमाच्या साक्षीने पूर्ण केला; शेवटी कठीण समय भारत सरकारने हात काढून घेतले एकट्याला सोडून दिले. पण देशभक्त पाकिस्तानी अधिकारी मात्र डगमगला नाही; आणि त्याचे राष्ट्रप्रेम तीळभरही कमी झाले नाही. राष्ट्र संरक्षणासाठी अनेक हेर जिवाच्या आहुती देतात काही यशस्वीरीत्या आपली कारकीर्द पूर्ण करतात तर काही अर्ध्यावर्तीत एखाद्या चुकीमुळे आयुष्य संपवतात. अजित डोवाल यांचेही आयुष्य असंच विलक्षण आहे ते वाचण्यासाठी इथे नक्की भेट द्या
https://www.premsparsh.com/2021/04/blog-post_23.html
11 एप्रिल 1952 रोजी राजस्थान राज्यात रवींद्र कौस्तुकीं यांचा जन्म झाला. वडील हवाई दलात असल्यामुळे देशभक्तीचे संस्कार त्यांच्यावर बालपणापासून झाले. रवींद्र सुरुवातीपासूनच नाट्यकलेत पारंगत होते. एका राष्ट्रीय नाट्य स्पर्धेत लखनवला ते रंगमंचावर नाट्य सादर करत असताना एका सैनिकाच्या वेशात त्यांचा अभिनय रोव या भारतीय गुप्तचर संघटनेने बघितला आणि अधिकारी प्रभावित झाले; त्यांनी रवींद्र यांना दिल्लीच्या कार्यालयात भेटायला बोलावले. त्या भेटीत त्यांना संस्थेबद्दल भारतीय गुप्त हेरंबद्दल सर्व माहिती सांगितली. आणि त्यांनी ही देशासाठी सेवा द्यावी अशी विनंती करून त्यांचे मन वळवले. त्यासाठी करावा लागणारा त्याग, येणारी आव्हाने, याची कल्पना रवींद्र कौस्तुकीं यांना देण्यात आली. त्यांचा होकार आल्यावर 1975 ते 1977 दोन वर्षे कठोर प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण आणि त्यानंतर त्यांना सहा ते सात देशात परीक्षेसाठी पाठवण्यात आले; त्यात यशस्वी झाल्यानंतर त्यांच्यासाठी पाकिस्तानातील बनावट कागदपत्रे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र इत्यादी बनवून देण्यात आली. पाकिस्तानात मुस्लिम चालीरीती त्यांची भाषा नमाज पठण या सर्व गोष्टींचा सराव त्यांच्याकडून तंतोतंत करून घेण्यात आला. त्यानंतर 1977 साली ते पाकिस्तानातील कराची शहरात गेले; आणि रवींद्र कौस्तुकीं हे नबी अहमद शकीर झाले. त्यांनी कराची विद्यापीठात विधी शाखेत प्रवेश मिळवला; आणि इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच ते वागू लागले. एक दिवस वर्तमानपत्रात सैन्यातील भरती संदर्भातील जाहिरात वाचून ते प्रभावित झाले; आणि त्यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने पहिल्याच प्रयत्नात त्यांची निवड झाली; आणि ही माहिती रोव या यंत्रणेला भेटताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानंतर त्यांनी एकेक पद पादाक्रांत करता अगदी पाकिस्तानातील लष्करात मेजर पदापर्यंत मजल मारली. दरम्यानच्या काळात अमानत नावाच्या एका सैनिकी अधिकाऱ्याच्या मुलीवर त्यांचे प्रेम जडले आणि तिच्याशी लग्न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आपल्या गुप्तचर यंत्रणेने त्यासाठी देखील अनुमती दिली; आणि त्यांचे कुटुंब पाकिस्तानात तयार झाले. त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले दरम्यान त्यांनी आपल्या लहान भावाच्या लग्नाला उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांना केवळ एकदाच परत मायभूमीत येता आले. त्यांची ही कारकीर्द एवढी गुप्त होती की त्यांच्या कुटुंबियांना देखील ते काय करतात याची यत्किंचितही माहिती नव्हती. त्यांनी आपल्या घरी मी दुबईला नोकरी करतो अशा प्रकारची बतावणी केली होती. ते परत विवाह सोहळा आटपून दुबईमार्गे पाकिस्तानात आले आणि आपल्या कामावर रुजू झाले. दरम्यान 1983 मध्ये एका हेर द्वारे काही गुप्त कागदपत्रे पाकिस्तान लष्करातील मेजर नवी अहमद शकीर अर्थात रवींद्र कौस्तुकीं यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी एका गुप्तहेरआला पाठवण्यात आले; पाकिस्तानी सीमेत प्रवेश करताना तो पकडला गेला. आणि पाक सैन्यासमोर त्याने शरणागती पत्करली आपण इथे कशासाठी आलो आहोत याची इत्यंभूत माहिती त्यांना दिली. त्यानंतर सापळा रचून त्यांनी रवींद्र कौस्तुकीं यांना पकडले. त्यासाठी आलेल्या या हेराला रवींद्र कौस्तुकीं यांना भेटायला सांगितले आणि कागदपत्रांची देवाणघेवाण करण्याची विनंती केली. आणि हे सर्व घडत असताना पाक सैनिकांनी दोघांनाही अटक केले. त्यानंतर रवींद्र यांच्या आयुष्यातील उत्तरार्ध सुरु झाला. त्यांच्यावर अनेक संकटे आली भारत सरकारने देखील त्यांना हवी तेवढी मदत केली नाही. त्यांनी कारागृहातून उर्दू भाषेत आपल्या घरी एक पत्र लिहून सविस्तर हकीकत सांगितली. आणि ते वाचत असतानाच वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा अंत झाला. त्यानंतर कुटुंबियांनी उर्दू वाचणाऱ्या एका व्यक्तीकडून हे पत्र वाचून घेतले भारत सरकारला माहिती दिली. पण काहीही होऊ शकले नाही. शेवटी नोव्हेंबर 2001 साली पाकिस्तानी तुरुंगातच रवींद्र कौस्तुकीं यांचे निधन झाले. त्यांना माय भूमी वर देह ठेवता आला नाही. पण या राष्ट्र पुत्रांनी आपण पदावर असताना कोणत्या स्वरूपाची माहिती भारताला दिली याची किंचितही उघड केली नाही. असे वीर या देशासाठी शहीद होतात दुर्दैवाने त्यांच्या कर्तुत्वाचा सर्वांना विसर पडतो; म्हणून या सच्चा राष्ट्र भक्तांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आयुष्य जगावे. आणि तिरंगा हा केवळ झेंडा नाही तर तो जगण्याचा आपला श्वास आहे.
म्हणूनच तर त्यांच्या या शौऱ्याचा गवरव करताना माझी पंतप्रधान इंदिरा गंधिनी [ black tigr ] अशी त्यांना उपाडी दिली.फोटो - साभार गूगल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा