18 वर्षाच्या मुलीने आईसाठी खोदली कबर


[ सुख के सब साथी ; दुःख मे न कोई]  महामारीच्या काळात मानवाला मानवाचा स्पर्श नको आहे; त्याची सावली देखील आपल्यावर पडू नये अशी त्याची इच्छा आहे. अनेक घरांना कायमचे कुलूप लागले, अनेकांचे माता-पिता  कायमचे सोडून गेले, अनेकांना आपल्या मुलांच्या चिता जळताना उघड्या डोळ्यांनी पाहाव्या लागल्या, तर काही मुलांवर बालपणातच जन्मदात्यांच्या चितेला अग्नी देण्याची वेळ आली आहे. 

राज्य गणित परिस्थिती भिन्न आहे. आज एखाद्या घरात कोरोना बाधित रुग्ण दगावला; तर अंत्य विधीसाठी देखील कोणी  येत  नाही. महाराष्ट्रात अनेक सोयंसेवक अशा व्यक्तींवर अंत्यसंस्कार करतात; पण बिहार सारख्या राज्यात मात्र सहसा कोणी धजावत नाही. 

बिहार राज्यातील एका गावात १८ वर्षाच्या मुलीला आपल्या आई साठी कबर खोदावी लागली आणि अशा परिस्थितीत  लहान भाऊ-बहिणीसह तीच्यावर आपल्या कुटुंबाची धुरा सांभाळायची वेळ आली. हि बातमी bbc   मराठी       या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे.  

वडील कोरोना बाधित झाले. त्यांना तिने रुग्णालयात दाखल केले; त्यांचा दुर्दैवाने प्राण गेला. ती तब्ब्ल ३ तासांचा प्रवास करून घरी आली; आणि आईला तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी ३ तासांच्या प्रवासाला लागली. रस्त्यातच आईने दम सोडला ; माय लेकीची झुंझ अयशस्वी ठरली. हे सर्व धावपद ती कोविद पॉजिटीव्ह असताना करीत होती. वडिलांचे जाण्याचे दुःख दूर होत नाही तोच आईचे छत्र हरवले. आणि १८ वर्षाच्या सोनीने प्राप्त परिस्थितीशी दोन हात  करण्याचे ठरवले. त्या वेळी तिने आपल्या घरासमोरच्या जागेत आईसाठी कबर खोदली; आणि आईवर अंत्य संस्कार केले. ती bbc मराठी या संकेतस्थळाशी बोलताना म्हणाली, [ माझे आई-बाबा सर्वाना मदत करायचे; पण त्यांच्यावर संकट आले त्यावेळी त्यांच्या मदतीला कोणी धावून आले नाही. हि बातमी प्रकाशित झाल्यामुळे आता अनेकांकडून मदतीचा हात येत आहे, शासनाने देखील धान्य दिले आहे; अनेकांनी आर्थिक मदत केली आहे. आमचा रिपोर्ट निघेटीव्ह येई पर्यंत आमच्याशी कोणी बोलले देखील नाही. आईने केलेला सोयंपाक शेवटचा होता; त्यानंतर कोणी तुम्हाला काही खायला आहे कि नाही?   एवढे देखील विचारले नाही. मला १ १४ वर्षाची बहीण आणि १२ वर्षाचा भाऊ आहे. आता मिळणाऱ्या मदतीतून बचत करून भविष्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न करू. शेवटी आम्ही तिघे आहोत आणि आम्हाला एकमेकांसाठी जगायचे आहे. बाबा स्थानिक drहोते, माझ्या भावंडांपैकी एखाद्याने तरी त्यांच्या पावलावर पाऊल टाकावे. हि माझी इच्छा आहे. ] सोनी कुमारी सारख्या अनेक मुलं-मुलींची हि हकीकत हृदय पिळवटून टाकणारी आहे. आता उभे आयुष्य या असंख्य मुलं-मुलींनी जगावे कसे? 

या प्रश्नांचे उत्तर शेवटी त्यांना शोधावे लागणार कारण त्यांच्यासमोर असणाऱ्या अंधःकारावर ते कश्याप्रकारे मात करून प्रकाश वाट धुंडाळतात यावर त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध ठरेल. 

त्यांच्यासाठी काही करायचे असेल तर त्यांना धीर देण्याची गरज आहे; तुम्ही आपले आई-बाबा गमावले असले तरी तुम्ही सर्व काही गमावून बसला आहेत अशे नव्हे; आता देखील तुम्ही आई-बाबांचे स्वप्न पूर्ण करू शकतात हा आत्मविश्वास जागा करायला हवा. 

१ अशा मुलांना दत्तक घ्यावे का? दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया फार किचकट आहे. त्यासाठी आधी ‘child line ‘ ला माहिती द्यावी लागते; त्यानंतर ते अन्य प्राधिकरणाला माहिती देतात, त्यानंतर त्या मुलासाठी निर्णय घेतला जातो. पहिल्यांदा नातेवाईक सांभाळ करू शकतात का? याची चाचपणी केली जाते. त्यानंतर मूल जर फार लहान असेल तर खात्री पटवून दत्तक दिले जाते; नाही तर शासन सांभाळ करते. त्यांची सर्व जवाबदारी अनाथालय सांभाळतात. दत्तक घेताना ना समज मुलांना सोपे जाते; त्यांना आपले खरे आई-बाबा माहिती नसतात. पण समजदार मुलांना मात्र त्यांच्या आई-बाबांचा सहवास लाभलेला असतो; म्हणून ते अनोळखी घरात रमण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे त्यांना कायदेशीर दत्तक घेण्यापेक्षा त्यांना सर्वतोपरी मदत करावी. त्यांच्या राहण्याचा शिक्षणाचा खर्च उचलावा. एका मुलाला दत्तक घ्यायचे आहे अशाप्रकारच्या कुठल्या हि समाजमाध्यमवरच्या भ्रामक पोस्टवर विश्वास ठेऊ नका. कारण या माध्यमातून बाल अपहरण होऊ शकते; आणि तुमच्यावर कायदेशीर कार्यवाही देखील होऊ शकते.  

२ अशा मुलांची व्यवस्था अनाथालयात करावी का? वर उल्लेख केल्या प्रमाणे मुलाच्या वयानुसार हा निर्णय घ्यावा माझ्या मते १० वर्ष खालील मुलांचे आपल्या घराशी भावनिक नाते असले तरी त्यांना संपत्ती व्यवहार याची माहिती नसते; जर असली तरी त्याचा सांभाळ करण्याची त्यांची क्षमता नसते. पण त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलांना त्यांच्या नातेवाईकांकडे ठेवावे; नाही तर त्यांच्या राहत्या घरी राहू द्यावे. अशा वेळी त्यांचा विचार जाणून घ्यावा जर ते आपल्या घरी राहणे पसंत करीत असतील तर शासनाने / स्वयंसेवी संस्थांनी त्यांना मदत करावी १५ दिवसातून किमान एकदा घरी जाऊन भेट घ्यावी. याद्वारे अशा मुलांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास बळ मिळेल, जीवनात येणाऱ्या संकटांचा सामना करण्याची शक्ती मिळेल, एक स्वाभिमानी व्यक्ती म्हणून जगता येणार. 

३ सामाजिक दृष्टिकोन कसा असावा? समाज हा व्यक्तींचा बनलेला असतो. प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे समाजाने अशा मुलांना आपल्यात सामावून घेतले पाहिजे. सोनीने सांगितल्या प्रमाणे तिला कोणी हि मदत केली नाही अशी वागणूक खरोखरच चुकीची आहे. प्रत्येकाला आपला जीव प्रिय आहे; पण अशा परिस्थितीत देखील योग्य काळजी घेऊन इतरांची मदत करता येते. अशा मुलांना अनाथ म्हणून हिणवण्या पेक्षा त्यांचा सांभाळ करण्यात खरा पुरुषार्थ आहे.  आज या मुलांच्या साम्भाळाचे ढोंग करून अनेक टोळ्या त्यांचे अपहरण करीत आहेत, त्यांचा बाल कामगार म्हणून वापर करीत आहेत, त्यांची विक्री करीत आहेत, त्यांचे शोषण करीत आहेत. अशा सर्व प्रकारांना अटकाव घालण्यासाठी आपण पुढे सरसावले पाहिजे. आज भारत सरकारने घोषणा करून अशा मुलांच्या स्वरक्षणाचे वचन दिले आहे. त्यांच्यासाठी शिक्षण पूर्णपणे मोफत केले आहे, १०००००० रुपयांचा विमा म्हणजेच २३ वर्षाचे झाल्यावर त्यांना देणार आहे; तसेच उच्शिक्षणासाठी कर्ज मिळवून देणार आहे आणि त्या कर्जावरचे व्याज शासन भरणार आहे. शासन सर्व प्रकारची आर्थिक मदत करणार; पण त्यांच्या सामाजिकरणासाठी समाज म्हणून आपली सर्वांची जवाबदारी आहे. ते पूर्ण करण्याचा संकल्प आपण करू; आणि सर्वाना जगण्याचा अधिकार आहे. त्यासाठी आपण त्यांचा आधार होऊ. हे आपण कोणावर तरी उपकार करीत आहोत या भावनेने न वागता; आपले सामाजिक कर्तव्य पार पाडीत आहोत हि वृत्ती असावी. 

फोटो - pixabay aap


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

बायकोचा जाच

समर्पण