लिव इन रिलेशनशिपची नेमकी चौकट कोणती?

श्लिल अश्लील नैतिक अनैतिक मानवी स्वभावाच्या अनेक पैलू मधील एक पैलू  आहेत. पण याही पलीकडे जगाच्या कानाकोपऱ्यात सृष्टीच्या सर्व घटकात जपणारा;  आणि चिरकाल अमरत्व असलेला भाव म्हणजे प्रेमभाव. 

 प्रेम नात्यांच्या बंधन घट्ट करणारा  घटक आहे; कुटुंबाला एकसंध ठेवणारा दुवा  आहे; भेदाभेद तफावत उच्चनीचता या सर्वांना खड्यासारखे दूर  करणारा धागा आहे;  २ मनाला जोडणारा दुवा  आहे. याच प्रेमाने नाती जोपासले जातात,  संसार थाटले जातात,  आणि कुटुंब प्रस्थापित केले जातात.  सामाजिककीड असणारी जाती व्यवस्था प्रेमातूनच मातीमोल झाली;  या व्यवस्थेला मोडण्यासाठी प्रेम विवाह घडून येणे आवश्यक आहे.  असे प्रतिपादन अनेक महापुरुषांनी केले असताना;  या दिशेने पाऊल टाकणाऱ्या युवक-युवतींच्या समोर समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे.  तो केवळ बुरसटलेल्या समाजानेच नव्हे,  तर विवेकी विचारांवर श्रद्धा असावी अशी अपेक्षा असणाऱ्या न्यायालयाने सुद्धा यांना आरोपाच्या कचाट्यात उभे केले;  आणि प्रश्न निर्माण झाला. 

१  श्लील अश्लील नैतिक-अनैतिक त्याचे निकष तरी कोणते? 

२  खरंच प्रेम करणे नैतिक दृष्ट्या ठीक आहे का? 

३  विवाह शिवाय दोन प्रौढ भिन्नलिंगी व्यक्ती सोबत एकत्र राहू शकणार नाहीत का? 

४  समाजाच्या विरोधात जाऊनप्रेम विवाहाचा संकल्प करणार्‍यांना संरक्षण देण्याची जबाबदारी शासनाची नाही आहे का? 

५  नेमकं लिव इन रिलेशनशिप याचं स्थान आपल्या समाज व्यवस्थित काय आहे? 

 या असंख्य प्रश्नांची चर्चा ओहापोह करणं अत्यंत आवश्यक आहे.  हरियाणात राज्याच्या सीमेवर राहणाऱ्या एका लिव्ह इन रिलेशनशिप मधील जोडप्याने न्यायालयात संरक्षणासाठी पोलीस संरक्षणाची मागणी केली.  त्यांच्यामते मुलीच्या आई-वडिलांकडून त्यांच्या जीवितास धोका आहे;  कारण दोघेही भिन्न जातीचे आहेत,  मुलगी 19 वर्षीय आणि मुलगा बावीस वर्षे आहे.  त्यांना विवाह करायचा आहे;  पण मुलीच्या वयाचा दाखला तिच्या आई-वडिलांकडे असल्यामुळे ते आता लगेच विवाहबद्ध होऊ शकत नाहीत.  त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे.  यावर पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने निर्णय देताना,  त्यांचे संरक्षण नाकारले आणि त्यांना तुम्ही या माध्यमातून लिव्ह-इन-रिलेशनशिप ला चालना देता आहात देत आहात असे फटकारले.  आणि ही वृत्ती सामाजिक आणि नैतिक दृष्ट्या योग्य नाही अशी पुष्टी देखील त्यांनी जोडली;  पण सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिप ला योग्य ठरवले.  त्यांनी दोन प्रौढ व्यक्तीचा एकत्र राहण्याच्या निर्णयाचे समर्थन केले;  तसेच २००५ साली अस्तित्वात आलेल्या कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याचे संरक्षण लिव्ह-इन-रिलेशनशिप मधल्या जोडप्यांना असल्याचे सांगितले.  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पूर्णपणे विरुद्ध निर्णय पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने देऊन मोठा गोंधळ निर्माण केला.  त्यातूनच वर नमूद केलेले प्रश्न उदभवले  आहेत. पूर्वीपासूनच स्त्री-पुरुषांमध्ये कमालीची तफावत ठेवणाऱ्या समाजाने त्यांच्या प्राणें कलेला कधी चालना दिली नाही.  विवाहपूर्व शारीरिक संबंध ठेवणे मनुवादी वृत्तीच्या लोकांच्या मते पाप आहे;  आणि ते समाजाला काळिमा फासणारे कृत्य आहे.  परंतु आधुनिक काळात सुशिक्षित पिढीच्या जाणिवा प्रगल्भ झाल्यामुळे त्यांनी स्वतंत्र रित्या जगण्याचा निर्णय घेतला;  आणि प्रेम विवाह करण्याचे धाडस जोपासले अशा धाडसी वृत्तीच्या युवक- युवतीना  मनापासून सलाम. 

 १ श्लीलता अश्लीलता नैतिक-अनैतिक याचे निकष तरी कोणतेआहेत व्यक्तीच्या संस्कारांवर हे निकष ठरवले जातात;  प्रतिगामी विचारधारेच्या लोकांच्यामते सामाजिक चालीरीती च्या विरुद्ध कोणी पाऊल टाकले;  किंबहुना स्त्रीने स्वातंत्र्याचा उपयोग घेणे विज्ञानवादी दृष्टिकोनातून जगत असताना रूढी परंपरांना फाटा देणे.  हे अनैतिक पद्धतीचे समजले जाते.  विवाह पूर्व शारीरिक संबंध ठेवणे;  किंवा प्रेमी युगुलांनी एकत्र वावरणे हे अशा मानसिकतिच्या  लोकांना अश्लील वाटते,  परंतु विवेक बुद्धीने विचार केल्यास तसेच भारतीय संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याच्या निकषांत अनुव्ये हे सर्व अधिकार प्रत्येक व्यक्तीचे आहेत;  आणि त्यांनी ते उपभोगावे.  स्वमर्जीने  कोणतेही प्रौढ व्यक्ती एकत्र येऊन राहू शकतात,  आणि जर त्यांच्या जीवितास कुणाकडूनही धोका असेल तर संरक्षण देणे हे शासनाचे कर्तव्य आहे.  त्यामुळे अशा गोष्टींना नैतिक-अनैतिक वगैरे ठरवणे शुद्ध मूर्खपणा आहे.  

२  नैतिकदृष्ट्या प्रेम विवाह करणे योग्य आहे का?  जुळुन केलेल्या विवाहामध्ये केवळ वरवर सर्व काही बघितले जाते.  यातून सामाजिक चालीरीती रूढी परंपरा जोपासणे यावर मोठा भर असतो.  जातिव्यवस्थेचे पालन याच माध्यमातून अधिक दृढ केले जाते. यामध्ये उभयतांना परस्परांचे विचार इच्छा,  एकमेकांकडून असणाऱ्या अपेक्षा यांची यत्किंचितही जाणीव नसते.  पण प्रेम विवाह मात्र पूर्णपणे यापेक्षा वेगळा आहे;  आणि व्यक्ती स्वातंत्र्य जपण्यासाठी,  सुंदर आयुष्याची चित्र रेखाटण्यासाठी,  सर्वोत्तम आहे. यामध्ये २ मने जोडली जातात त्यातून त्यांच्या आयुष्याचे स्वप्न रेखाटण्याची संधी त्यांना प्राप्त होते;  कुठलाही प्रकारचा कृत्रिम भेदाभेद यात राहत नाही.  त्याचबरोबर भारतीय संविधानाने देखील आपल्या जोडीदाराची निवड करण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला दिला आहे.  याद्वारे जातीव्यवस्थेचे निर्मूलन होऊन सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी मदत होते; त्यामुळे प्रेम विवाह होणे ही एक सुधारक वृत्तीची गरज आहे. 

 ३ २ प्रौढ व्यक्ती विवाह शिवाय खरंच एकत्र राहू शकत नाहीत का?  २ प्रौढ व्यक्तींनी विवाहाशिवाय एकत्र राहणं हे कायदेशीर दृष्ट्या पूर्णपणे योग्य आहे.  परंतु सामाजिक दृष्ट्या त्याला अजूनही स्वीकृती प्राप्त झाली नाही.  त्या व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक,  आणि संशयास्पद असतो;  पण तरी देखील अशा प्रकारचे आयुष्य जगू इच्छिणाऱ्या लोकांनी एकत्र राहायला हरकत नाही.  

४  नवविवाहित प्रेमी जोडपे किंवा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या दोन व्यक्ती यांच्या संरक्षणाची जबाबदारी नेमकी कोणाची?  ज्या देशांमध्ये शस्त्र बाळगण्याचा अधिकार सामान्य माणसाला नाही;  तिथे संरक्षणाची सर्व जबाबदारी ही शासन व्यवस्थेची असते;  या निकषानुसार प्रत्येक नागरिकांचे संरक्षण करणे हे शासनाचे आद्य कर्तव्य आहे.  समाजाच्या प्रवाहात विरोधात जाऊन त्यांनी सामाजिक सुधारणेच्या दिशेने पाऊल उचललं त्या सर्वांना वैयक्तिक संरक्षण देणे मानवी कर्तव्य आहे.  एक प्रकारे अशा व्यक्तींचे संरक्षण नाकारणे म्हणजेच सुधारक वृत्तीला नाकारल्यासारखे आहे.  त्याच बरोबर समाजकंटकांच्या दहशतीला बळी पडून प्रतिगामी विचार धारेला खतपाणी घालण्याची हे लक्षण आहे. त्यामुळे राष्ट्र म्हणून प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकत असताना,  प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा अधिकाराचे रक्षण करणे तितकेच महत्त्वाचे आहे.  

 लिव इन रिलेशनशिपचे  नेमके स्थान तरी काय? सुंदर आयुष्याचे स्वप्न रेखाटणार्‍या प्रत्येकाच्या आयुष्यात विवाह हा महत्त्वाचा घटक असतो;  तो करार नसून संस्कार आहे.  आणि प्रत्येकाला आपले वैवाहिक आयुष्य मंगलमय असावे हीच इच्छा असते.  त्यानुसारच पुढचे धोके टाळण्यासाठी,  आपल्या वैवाहिक आयुष्याची प्रचिती घेण्यासाठी,  दोन प्रौढ व्यक्ती एकत्र येऊन काही दिवस सोबत राहतात;  आणि नंतर विवाह करायचा की नाही?  या प्रकारचे निर्णय घेतात.  या द्वारे वैवाहिक आयुष्यात येणारे अडथदे, विभक्त होण्याचे प्रकार  कमी करण्यास मदत होते. त्यामुळे या पद्धतीला चालना देणे हे पुढचे धोके टाळण्यासाठी आवश्यक आहे.  एक समाज म्हणून या बदलत्या प्रवृत्तीचे स्वागत केले पाहिजे.  

  • 💃 शेवटी प्रत्येकाचे आयुष्य हे ज्याने त्याने तसेच आपल्या मर्जीने जगायचे असते,  फक्त ते कायद्याच्या चौकटीत असावे;  आणि स्वतःच्या नैतिकतेच्या मर्यादित असावे;  याचे भान प्रत्येकाने राखावे.  विवाह हा प्रकार तेवढा सहज समजण्यासारखे नाही त्याचे अनेक प्रकार असतात काही विवाह जगा वेगळे असतात त्यातीलच एक ४ अटींवर ठरलेला विवाह नक्की वाचा

https://www.premsparsh.com/2021/03/4.html  

फोटो - साभार गूगल


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा