शेवटी ती आलीच

आता घरातील वातावरण बिघडणार, भांड्याला भांडी लागणार, दोघांमध्ये खटके उडणार, शिव्यांच्या वाकुल्या वाहिल्या जाणार, आई-बाबा असणारे चिमुरडी अनाथ मुलांसारखी भासणार, पुन्हा उपासमार , मा-झोड हे सर्व सुरु होणार; कारण ती आली आहे. 

मागच्या सरकारने स्थानिक महिलांच्या आग्रहामुळे आणि परिसरातील समाज सुधारकांच्या शिफारशींमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व गाव-शहरात दारू बंदी केली होती; आज विद्यमान सरकारने निर्णय बदलून दारू विक्रीला मान्यता दिली. 

या निर्णयावर सर्व स्तरातून टीका होत आहे. याचा अनेक सामाजिक कार्र्यकर्त्यानी तसेच स्थानिक महिलांनी निषेद केला  आहे. 

या निर्णयाची पाठ राखण करताना चंद्रपूरचे पालक मंत्री  म्हणाले , [ दारू बंदी उठवण्याच्या बाजूने २५०००० निवेदने प्राप्त झाली; तर दारू बंदीच्या समर्थनार्थ ३३००० निवेदने प्राप्त झाली. ] मंत्री माहुद्यांचा हा दावा लोकशाही पद्धती पेक्षा बहुमताचा वाटतो कारण लोकशाही शासन व्यवस्थेने राजकीय स्थिरते सोबत सामाजिक स्वास्थ्य चांगले कसे राहणार? या बाजूने विचार करणे अपेक्षित असते. 

आजच्या लेखात आपण पुढील काही महत्वाच्या मुद्द्यांवर विचार करू.  

१ दारू बंदी केल्याने खर्च दारू विक्री थांबते का?

२ दारू विक्री केल्यामुळे तळीरामांच्या संख्येत वाढ होते का? 

३ या व्यवसायात नेमके कोणाचे फावते? 

४ दारूचे कौटुंबिक/सामाजिक परिणाम कोणते होतात? 

५ दारू सेवनापासून लोकांना कशे दूर ठेवता येणार? 

मध्यन्तरी समाज माध्यमावर एक ड्वनिफीत प्रचंड गाजली होती [ माझ्या नवऱ्याने सोडली या दारू, कोरोना पावलाय ग ] 

१ दारू बंदी केल्याने खर्च दारू विक्री थांबते का?

प्रत्येक गावात या रोगाने ग्रस्त असणाऱ्या रोग्यांना त्यांची औषध मेळतेच हे आपण सर्व जाणतो . त्यामुळे हे लोक मिळेल तिथून दारू आणतात आणि आपली गरज भागवतात . जिथे दारू बंदी आहे अशा ठिकाणी पिणाऱ्यांच्या संख्येत काही प्रमाणात घट नक्की होते; तसेच युवा पिढी या वेसनकडे खेचली जात नाही. परिणामस्वरूप दारूमुळे होणारे दुष्ट परिणाम टाळले जातात. पण मान्यता प्राप्त कंपन्यांची दारू बंद झाली; कि, गावठी बनावट दारू विक्रीस येते या मध्ये शरीरासाठी अधिक घातक पदार्थ वापरले जातात. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. दारूचा चोरटा व्यापार करणारे हे व्यवसायिक तळीरामांची प्रचंड लूट करतात; शिवाय शासनाला कर देखील देत नाहीत. दारू पासून शासनाला मोठ्याप्रमाणात कर मिळतो; म्हणूनच देशात तळे बंदी उठवताना / नियम शिथिल करताना सर्व प्रथम दारूचे दुकाने उघडण्याची अनुमती देण्यात आली होती. जर दारू बंदी असेल तर शासनाचे महसुली नुकसान तर होतेच; त्याचबरोबर पिणाऱ्यांच्या संख्येत म्हणावी तशी कमी जाणवत नाही. 

२ दारू विक्री केल्यामुळे तळीरामांच्या संख्येत वाढ होते का? 

जर सहज आणि कायम स्वरुपी सोबत राहणारी प्रियसी तुमच्या प्रेमात पडत असणार तर तिला कोण नकार देणार? दारू हि एकदा जिभेला स्पर्श करते; आणि शेवट पर्यंत तिथेच रेंगाळते. आणि त्या व्यक्तीचे शरीर हे आपले कायम स्वरूपी पत्ता असणारे घर आहे; असे जाहीर करते. गावात-शहरात आनंद व्यक्त करण्यासाठी ; दुःख विसरण्यासाठी म्हणून अनेक तरुण तिचा घोट घेतात; आणि नंतर तिच्यात रममाण होतात. जर ती सहज उपलब्ध होत नसेल तर मात्र तिच्या संपर्कात जायला किंचितसे कचरतात. बाहेर गावावरून आणणे सगळ्यांना शक्य होत नाही; तसेच कुणाला फुकट पाजावी असे कोणी ठरवत नाही. त्यामुळे एक पिढी तिच्यापासून दूर जाते; आणि जी माणसे नियमित दारू पितात त्यांचे प्रमाण किंचित घटते.  पण विक्रीला मान्यता दिली तर मात्र चित्र पूर्ण बदलते. शासनाला महसूल मिळतो. विषारी दारू पासून लोकांचे स्वरक्षण होते. शेवटी वेसण हे विनाशकारक आहेच; पण ते करत असताना कायद्याचा फास आवडला जाण्याची थोडी फार भीती असेल तर लोकांमध्ये दहशद निर्माण होते. नाही तर दारूचे सेवन करणे अनेकांसाठी प्रतिष्ठेचे होते. 

अनेक तरुण जेष्ठ पिढीचे अनुकरण करतात; आणि आपले आयुष्य बरबाद करतात.हि एकदा सवय लागली कि, मग तिच्यापासून फारकत घेणे फार अवघड असते. म्हणून माझ्यामते दारू बंदी करून त्याची कडक अमलबजावणी करावी. 

३ या व्यवसायात नेमके कोणाचे फावते? 

दारू विक्रीला मान्यता असो/ नसो. एक वर्ग मात्र आपल्या शासकीय नोकरीच्या पगारापेक्षा जास्त कमाई या व्यवसायातून करतो. आपण सर्व जनता दारू विक्रीसाठी शासनाकडून ठराविक विक्रेत्यांना परवाना दिला जातो. पण परवाना धारक विक्रेत्यांपेक्षा जास्त विक्रेते हा व्यवसाय करतात. गावात 

काय चाललंय? याची खडान्खडा माहिती असणारे पोलीस मात्र या व्यवसायिकांना अभय देतात कारण त्यांच्यात टेबलाखालून देवाण-घेवाण होते. जर मान्यता नसेल तर टेबलाखालच्या रकमेत वाढ होते. दुसरीकडे प्राप्त परिस्थितीत  हात धून घेण्याची संधी हे व्यवसायिक दवडू देत नाहीत. शेवटी सर्व दृष्ट्या पिणारा आणि त्याचे कुटुंब भरडले जाते. 

४ दारूचे कौटुंबिक/सामाजिक परिणाम कोणते होतात? 

एक व्यक्ती जर दारूचे सेवन करत असेल तरी संपूर्ण कुटुंबाला ते त्रास दायक असते. त्या व्यक्तीच्या गैर वर्तनाचा त्रास आजू-बाजूला राहणाऱ्या लोकांना देखील होतो. त्या कुटुंबातील गृहिणीचे प्रचंड हाल होतात. कौटुंबिक हिंसाचार वाढतो, मुलानांच्या सर्वनगीन प्रगतीवर नकारात्मता परिणाम होतो, याचे प्रमाण अधिक वाढले तर हि एक सामाजिक समस्या निर्माण होते. आज हि आपल्या भारतीय समाज समोरची एक गंभीर समस्या आहे. महामारीचा काळात घरात दोन वेळचे जेवण करण्यासाठी पुरेशे अन्न नसताना या वेसनाधीन लोकांमुळे कुटुंब भिकेला लागते. घरात वातावरण कायम तणाव ग्रस्त असते; त्यामुळे त्या घरातील मुलांना समाजात अपमानित व्हावे लागते. शालेय विद्यार्थ्यांवर याचा फार वाईट परिणाम होतो. [ तुझे बाबा दारू पितात का? ] असे कोणी विचारले तर त्यांच्या डोळ्यात पाणी येते. आणि त्यांचा मित्र परिवार कमी होतो. याचा आर्थिक दृष्ट्या विचार केल्यास मूलभूत गरज पूर्ण करणे अशा कुटुंबाना शक्य होत नाही. 

५ दारू सेवनापासून लोकांना कशे दूर ठेवता येणार? 

    • हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. काही लोक एखाद्या महाराजांकडे जाऊन काही फरक पडतो का? पाहतात, काही गोळ्या-औषधे घेऊन काही फरक पडतो का? असा विचार करतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या बहुदिक क्षमतेनुसार विचार करतो; पण जो पर्यंत वेसनाधीन व्यक्ती स्वतः संकल्प करून यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत नाही तोवर शक्य नाही. व्यक्तीच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास हे शक्य आहे; पण समाजाला   केंद्र स्थानी ठेवून मोठी पाऊले उचलावी लागणार. प्रबोधन करताना  आपण जण जागृती करू. पण एवढ्यावरच थांबून चालणार नाही. प्रत्येक पिणाऱ्या व्यक्तीस कमाल मर्यादा घालून द्यावी, १८ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या व्यक्तीवर कार्यवाही करावी, त्याचबरोबर समाजाने अशा अल्पवयीन / तरुणांना टोकावे, विना परवानाधारक विक्रेत्यांना तुरुंगवास द्यावा, असे विक्रेते ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत आढळतील त्या ठाणेदारांवर देखील कार्यवाही करावी, अवैध दारू निर्मात्यांवर देखील तुरुंगवासाची तसेच दंडात्मक कार्यवाही करावी. जने
करून हि समस्या आपण नियंत्रित ठेवू शकणार;  आणि या वेसनाचा प्रसार आणि प्रचार थांबणार. 
फोटो - साभार गूगल


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

बायकोचा जाच

समर्पण