या मुलीने परभणीत पिकवली नादरलँडची मिरची

दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि मागासलेला विभाग हे चित्र आहे महाराष्ट्रातील मराठवाडा विभागाचे.  हे वास्तव पुसून काढण्यासाठी इथल्याच एका लेकीने/  चिऊताईने प्रयत्न केला;  आणि आपल्या चोचीतून भाग्य बदलण्याचे  उदात्त ध्येय बाळगून ते कृतीत उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. [  युरोपात जर्मनी आणि मराठवाड्यात परभणी ] ही म्हण सार्थक ठरवण्याचा प्रयत्न परभणीतील [वैष्णवी देशपांडे]  या युवतीने केला आहे.  त्यांनी  टाळेबंदी असताना  नादरलँड देशातून मिरचीचे बीज  आयात केले; आणि परभणी जिल्ह्यातील आपल्या शेतातील दहा गुंठे क्षेत्रफळावर कृत्रिम तापमानाची व्यवस्था करून मिरचीची लागवड केली.  आणि आज त्या मिरचीची विक्री करत आहेत.  हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतानाच,  त्यांनी गावातील अनेक महिलांना रोजगार देऊन महामारीच्या काळात अनेक चुली पेटवण्याचे काम  त्या करीत आहेत. 

 वैष्णवी यांचे शिक्षण एम ए इतिहास महामारीच्या आधी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून आपण विद्यार्थ्यांसमोर ऐतिहासिक काळ उभा करावा;  आणि इतिहासातून वर्तमान जगण्याचा दृष्टीकोन विद्यार्थ्यांना द्यावा;  आणि भविष्यात निवडायची पाऊलवाट त्यांना दाखवून द्यावी.  हे ध्येय त्यांचे  महामारी सुरू झाल्यावर लागलेल्या ताळेबंदीत दिवसागणिक दूर-दूर जात होते.  टाळेबंदी वाढत गेली,  समोर सर्वत्र अंधकार दिसत होता,  आणि साशंक अवस्थेतच त्यांचे स्वप्न त्यांच्या डोळ्यापासून दूर गेले;  आणि ते काही दिवसातच नजरेआड गेले.  अशा परिस्थितीत  नैराश्य येणे हे स्वाभाविक आहे.  त्यातून त्या बाहेर आल्या;  आणि त्यांना अशा प्रकारची शेती आपण करावी असेच सुचले;  टाळेबंदी शिथिल झाल्यावर त्या आपल्या भावाकडे लोणावळ्याला जाऊन आल्या.  भावाच्या मार्गदर्शनात त्यांनी या कामाला सुरुवात केली.  नादरलँड देशातून मिरचीचे बीज मागवून परभणीत आपल्या गावातील शेतात दहा गुंठे क्षेत्रफळावर कृत्रिम रीत्या तापमान ठेवण्याची व्यवस्था केली;  त्यातूनच  शेतीत पहिल्यांदाच उतरलेल्या वैष्णवी ताई यांनी यश संपादित केले.  मिरची विक्रीयोग्य झाल्यावर आपण मुंबई-पुण्यातील पंचतारांकित उपहारगृहात म्हणजेच ५ स्टार हॉटेलमध्ये मिरची विकावी असा बेत ठरला होता.  पण महामारीचा  प्रकोप दिवसागणिक वाढत आहे;  त्यामुळे विद्यमान परिस्थितीत त्यांना ते शक्य नाही.  तर दुसरीकडे परभणी विभागात या मिरचीला मागणी नाही;  लोक पिवळी मिरची खाणे पसंत करत नाहीत;  अशा परिस्थितीत त्यांना आपले विक्री कौशल्य पणाला लावावे लागत आहे.  त्याचबरोबर त्यांना काही प्रमाणात तोटा देखील सहन करावा लागत आहे.  त्या आपल्या या उपक्रमाविषयी सांगताना म्हणतात  [नफा तोटा हा व्यवसायाचा भाग आहे.  आज काही प्रमाणात तोटा सहन करत असली;  तरी उद्या यातूनच आर्थिक लाभ होणार  असा मला विश्वास वाटतो. पण या महामारीच्या काळात आरोग्य निरामय ठेवायचे असेल तर सेंद्रिय खाद्य पदार्थांत कडे वळणे गरजेचे आहे. ] त्या स्वतः कुठले हि रासायनिक खत  वापरत नाहीत. 

 त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाची चर्चा परभणी परिसरात सर्वत्र रंगली आहे.  त्यांनी केवळ एक वेगळी वाट निवडली नाही;  तर अनेक तरुण शेतकऱ्यांना अपारंपारिक शेती करण्याचा मार्ग दाखवला आहे.  या व्यवसायातून त्यांनी महामारीच्या काळात अनेक महिलांना रोजगार देऊन शेकडो चुली पेट्या ठेवल्या आहेत. 

 खडतर परिस्थितीत संघर्ष करून अकोल्यातील एका महिलेने एकोणतीस एकर शेती यशस्वीरित्या सांभाळून दाखवली त्यांची यशोगाथा वाचण्यासाठी नक्की भेट द्या 

https://www.premsparsh.com/2021/02/29.html

 

 वैष्णवी ताईंनी हाती घेतलेल्या उपक्रमातून अनेक गोष्टी सिद्ध करता आल्या आजच्या काळात दुष्काळग्रस्त परिस्थिती,  कर्जाचा डोंगर,  या परिस्थितीला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्या करतात.  त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करून आधुनिक शेती करण्याचा ध्यास लागेल.  त्याच बरोबर शेती आणि तंत्रज्ञान या दोन गोष्टींवर योग्य गुंतवणूक शासनाने केली;  तर कदाचित भविष्यात शेतकरी आत्महत्या थांबतील.  महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन दुर्दैवानं अद्यापही नकारात्मक आहे;  एक सुशिक्षित मुलगी शेती हे आपले करिअर म्हणून निवडू शकते. आणि त्यातूनच शिक्षण हे नोकरीसाठी घ्यायचे नसून चांगला माणूस होण्यासाठी घ्यायचे असते शेतकीय अनुभव नसताना इतिहासाच्या विद्यार्थिनीने रचलेला हा इतिहास अनेकांना नवी दिशा दाखवणारा ठरला  आहे. 

तो म्हणजे ते केवळ त्यांच्यातील आत्मविश्वासामुळे महिलांमध्ये असलेली ही शक्ती समाजाला जाणवली तर मुली आर्थिक दृष्ट्या देखील सक्षम होऊ शकतात.  त्याचीही सुरुवात आहे. 

काही महिलांनी एकत्र येऊन सहकारी तत्वावर शेती करायला सुरुवात केली; आणि त्या लक्षाधीश झाल्या. त्यांची यशोगाथा वाचण्यासाठी नक्की भेट द्या 

https://www.premsparsh.com/2021/04/blog-post_2.html

 

 महामारीच्या काळात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले.  त्यातून अनेक लोक नैराश्याच्या गर्तेत सापडतात काही अनैतिक पद्धतीने पैसे कमावण्याचा मार्ग शोधतात;  तर काही वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करतात.  त्या सर्वांना स्वतंत्र वाट चोखडण्याची दिशा वैष्णवी देशपांडे यांच्याकडे बघून कळेल. 

  •  सारे सुखिन सन्तु म्हणणाऱ्या या संस्कृतीत दुःखा कडून सुखाकडे प्रवास करत असताना,  सगळ्यांना सोबत घेऊन हे सुख आणि यश मिळवण्यासाठी तरुणांनी एकत्रित रीत्या प्रयत्न करायला हवा.  आज अनेक उच्चशिक्षित युवक- युवती नोकरीच्या शोधात इकडे-तिकडे भटकत असतात;  पण नोकरी देण्यासाठी स्वतःला सिद्ध करत नाहीत.  महामारी  नंतर पुन्हा समाजाची घडी बसवायची असेल तर तरुणांनी नोकरी देण्याच्या दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे.  रोजगार निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम प्रत्येकाने हाती घ्यावा;  आणि त्यातून आपापल्या क्षेत्रात प्रगती करावी.  जेणेकरून अल्पशिक्षित किंवा अशिक्षित असणाऱ्यांना आपण रोजगार देऊन आर्थिक चक्रा बरोबरच सामाजिक सलोखा देखील कायम ठेवू शकतो वैष्णवी ताईंच्या या स्तुत्य उपक्रमास सलाम.  आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन युवा पिढी आपल्या बौद्धिक कौशल्याच्या आधारे नवीन वाट शोधेल ही अपेक्षा. 
  • फोटो - साभार गूगल

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा