[ तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केले; पण माझ्यापेक्षा देशावर जास्त प्रेम केले ]


"तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केले; पण माझ्यापेक्षा देशावर जास्त प्रेम केले", हे उद्गार आहेत शहीद जवानांच्या पत्नीचे निकिता कौल यांचे सैन्यात लेप्टनंट पदावर रुजू झाल्यावरचे. 😊 ज्या नात्यात प्रेम असते, ते नाते सर्वाधिक सुंदर असते. प्रेम आपल्याला अशक्य ते शक्य करण्याची शक्ती देते, विस्कटलेली आयुष्याची घडी बसवण्याचा विश्वास देते, म्हणून प्रेम सर्व शक्तिमान असते. 💕 मेजर विभूती शंकर डोंडियाल हे सैन्यात भरती झाल्यावर सर्वांना आनंद झाला होता. तसे ते आई-बाबांचे लाडके; पण राष्ट्रभक्तीने भारावलेल्या या गुणवान लेकराने भारत मातेचे रक्षण करण्याचा संकल्प सिद्धीस नेला. सर्व काही सुरळीत सुरु असताना त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दिल्लीत बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करणाऱ्या निकिता कौल यांच्याशी त्यांनी लग्नगाठ बांधली. दोघांचा सुखी संसार सुरू झाला.

आपल्या आयुष्याची अनेक स्वप्ने त्यांच्या डोळ्यात तरंगत होती. तोच अनपेक्षित दिवस उगवला; दहशदवाद्यांचा पाठलाग करत असताना, १७-०२-२०१९ रोजी मेजर साहेब शहीद झाले😢😢.  

या दुखत त्यांच्या स्वभाग्याचे लेन असणार कुंकू पुसल्या गेले. आता सर्व काही  संपलं अशी उद्विग्न भावना सहज बाहेर पडेल; पण त्या दुखत बुडाल्या असल्या तरी त्यांचे जगणे थांबणार नव्हते, त्यांना आपल्या पतीचा प्राण घेणाऱ्या दहशदवाद्यांना  धडा  शिकवायचा होता. त्यावेळी एका मुलाखतीत त्या म्हणाल्या , [  मला साहुनुभूती  नको; आता कणखरपणे उभे राहिले पाहिजे ] 🤔 

त्यासाठी त्यांनी भरपूर पगार असणारी नोकरी सोडली; आणि लष्करी परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. आणि त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या; मुलाखतीतून ऑफिसर म्हणून निवडल्या गेल्या. जवळजवळ २ वर्षे त्यांनी चेन्नईच्या ‘ऑफिसर ट्रेनींग अकादमीत ‘ खडतर प्रशिक्षण घेतले; आणि आता त्या अधिकृत रित्या सैन्यात सेवा बजावायला सज्ज्य झाल्या. लेप्टनंट जनरल Y K जोशी यांनी त्यांच्या लष्करी पोशाखावर star लावले. ✌ 

या पूर्वी देखील काही शहीद जवानांच्या पत्नींनी अशीच आपल्या पती प्रति प्रेम भावना / भारत मते प्रति कर्तव्य निष्ठा दाखून दिली. महाराष्ट्रातील मेजर संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक सुद्धा सैन्यात भरती झाल्या आहेत. मेजर विभूती याना परमवीरचक्र या पुरस्काराने गव्हरवण्यात आले आहे. 

राष्ट्र भक्ती हे एक वेगळे रसायन आहे. हि रासायनिक अभिक्रिया ज्या व्यक्तीवर झाली; ती व्यक्ती स्वतःला राष्ट्राप्रती समर्पित करते. प्रत्येक जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देत असताना, त्याच्या डोळ्या समोर साक्षात मृत्तिव उभा असतो. त्या यमदूताला हे जवान ठणकावून सांगत असतात, जोवर मी या देशाचे रक्षण करता करता शहीद होत नाही तोवर तू मला येथून घेऊन जाऊ शकणार नाही. अशा सर्व राष्ट्र रक्षकांच्या त्यागाला सलाम . 

प्रत्येक व्यक्तीला कुटुंब असते; त्याचप्रमाणे हे जवान देखील कुटुंबाचा भाग असतात. जेवढा त्याग सैनिक करतात तेवढाच त्याग त्यांचे कुटुंबीय करतात. 

प्रत्येक पती-वपत्नीला आपल्या आयुष्यातील सर्व दिवस एकमेकांच्या सहवासात घालावे असे वाटते. पण वर्षातून केवळ थोडे दिवस आपल्याला पतीचा सहवास लाभणार हे माहिती असताना, त्यांच्या जीविताची हमी नसताना अशा राष्ट्र रक्षकाची अर्धांगिनी होण्याचा निर्णय घेणाऱ्या प्रत्येकीच्या धमन्या-धमन्यातुन राष्ट्र भक्ती संचारत असते. सर  प्रकारचा त्याग करून निस्वार्थी प्रेम करणाऱ्या या भारत मातेच्या लेकींचे अचानक कुंकू पुसले जाते. काही दिवस त्यांना समाजाची / शासनाची मदत मिळते; पण त्यानंतर त्यांना अवघे आयुष्य एकटेपणाची दुःख सहन करत जगावे लागते. 

पण आज तरुणी आपल्या पतीच्या निधनानंतर सैन्यात जाण्याचा निर्णय घेतात त्यावेळी त्यांच्या मनात काय भाव असतील? 

सांगता येत नाही. पण निकिता यांच्या शब्दात [ तुम्ही मला नेहमी माझ्या आजूबाजूला दिसता ; तुमच्यामुळे माझे आयुष्य पूर्ण बदलले; मी तुमच्यावर प्रेम करत होती भविष्यात देखील करणार; माझ्या जीवनाचा तुम्ही अविभाज्य घटक आहात ] केवळ १० महिने सांसारिक आयुष्य लाभलेला या जोडप्यास विनम्र अभिवादन आज एकीकडे प्रेमाचा करार केला जातो तर दुसरीकडे हे निस्वार्थी प्रेम अद्यापही प्रीतिभावाचे अढळ स्थान मानवी हृदयात कायम असल्याची प्रचिती देते. 

 आपल्याकडे सैनिकांच्या नावाने राजकारण केले जाते; पण सैनिक मात्र राजकारणापासून दूर आहेत. देशाच्या सीमांचे रक्षण ते करतात म्हणून आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत. देशासाठी जवान जेवढे त्याग करतात त्याचप्रमाणे या जवानांना गुप्त रित्या माहिती देणारे गुप्त हेर देखील स्वतःला तोफेच्या तोंडी देतात. काहींना शेवटी देह ठेवण्या एवढी या देशात जमीन देखील मिळत नाही अशाच एका हेरांची कहाणी वाचण्यासाठी नक्की भेट द्या. 

https://www.premsparsh.com/2021/05/blog-post_17.html

फोटो - साभार गूगल

 


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

बायकोचा जाच

समर्पण