अजिंक्य राजा छत्रपती संभाजी राजे भोसले
नियतीच्या भरोशावर अवघा आयुष्य सोडून लाचार निराधार आणि निरागस तिचं जिन इथल्या रयतेच्या नशिबी आलं होतं अंधश्रद्धा आणि अज्ञान या दोन्ही गोष्टी एकत्र असल्या की मग दारिद्र्य हे त्यासोबत येतच अशा भयभीत करणाऱ्या जगण्यातून बाहेर पडण्यासाठी प्रतिकूल असणाऱ्या परिस्थितीत एक प्रकाशाची ठिणगी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडली; आणि त्याचा वणवा इथल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये पेटला स्वाभिमान जागा झाला. आपल्या अस्तित्वासाठी लढलं पाहिजे आणि रयतेने स्वाभिमानाने जगले पाहिजे. स्त्री, मुले, वृद्ध या सगळ्यांचा सन्मान झाला पाहिजे. त्यासाठी स्वराज्य अस्तित्वात येणे आणि त्यासाठी आपण लढणे हे आपल्या जगण्याचं अंतिम ध्येय ठरवलेली शेकडो-हजारो लोक महाराजांसोबत आले. आणि अहोरात्र परिश्रम करून संकटांना संधीत परावर्तित करून निर्भिड छातीने मावळे लढायला लागली त्यातूनच स्वराज्य निर्माण झाले. https://www.premsparsh.com/2021/06/blog-post_6.html स्वराज्य अनेकांनी उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. पण सगळे कुटिल डाव मावळ्यांनी उधळून लावले. स्वराज्य निर्मितीच्या काळात बऱ्याच वेळा महाराजांना माघार घ्यावी लागली. शक्ती आणि युक्ती या दोन्हींचा उत्तम मेळ साधून महाराजांनी स्वराज्य नावाची इमारत निर्माण केली. परकीयांशी लढता लढता स्वकियांशी लढा दिला. आणि सहा जून सोळाशे 74 रोजी हिंदवी स्वराज्याच्या स्वामीचा राज्यभिषेक झाला. त्याचबरोबर धाकले धनी छत्रपती संभाजीराजे युवराज झाले. आजच्याच दिवशी अर्थात 14 मे सोळाशे 57 रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा पुरंदर गडावर जन्म झाला. त्यांच्या जयंती दिनी अजिंक्य योद्याच्या स्मृतीस अभिवादन.
वयाच्या दोन वर्षाचे असतानाच मातृछत्र हरवले; राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं आणि आता संभाजी महाराजांना आकार देण्याची जबाबदारी त्यांच्याच मनगटांनी पार पाडावी असे जणू नियतीने लिहूनच ठेवले होते. बालपणापासूनच कुशाग्रबुद्धी आणि सुदृढ शरीरयष्टी लाभलेल्या बालराजांनी आपल्या कर्तृत्वाने आणि अनेकांना अवाक केले. वयाच्या नवव्या वर्षी महाराजांसोबत आग्रा भेटीला गेले औरंगजेबाने कुटील डाव रचून महाराजांना कैदेत ठेवले. अशा मृत्यू समोर दिसणाऱ्या प्रसंगी बाल राजे हतबल झाले नाहीत; खचले नाहीत; शत्रूसमोर झुकले नाहीत. त्यांनी महाराजांना आधार दिला. नजर कैदेतून बाहेर पडण्याची योजना आखली. आणि आपल्या वडिलांसोबत बाहेर पडले. दरम्यान मथुरेला महाराजांनी त्यांना एकटे सोडले. आणि महाराज एकटे स्वराज्यात निघाले त्याच बरोबर बाल राजांचा मृत्यू झाला अशी अफवा महाराजांनी सगळीकडे पसरवली; आणि याचाच फायदा घेऊन बाल राजे सुरक्षित स्वराज्यात आले. वयाच्या नवव्या वर्षी मिळालेल्या शिकवणीतून त्यांना आपल्या जगण्याचे प्रयोजन उमगले. वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत संभाजी महाराजांनी 'बुधभूषण' हा संस्कृत ग्रंथ, तर 'नायिकाभेद', 'नखशीख' आणि 'सातसतक' हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले. ... त्यांचे संकृत दानपत्र प्रसिद्ध आहे,ब्रज भाषेतील सातसतक,नखशिख,नायिकाभेद हे ग्रंथ उपलब्ध आहेत.त्यांना जवळ जवळ 14 भाषा बोलता येत होत्या. प्रचंड मेहनतीतून समशेर फिरवण्याची कला अवगत केली. अनेकदा मानहानीला सामोरे जावे लागले. पण स्वराज्यनिष्ठा तीळमात्रही कमी होऊ दिली नाही. छत्रपती शिवाजीमहाराजांचे 3 एप्रिल सोळाशे 80 रोजी दुर्दैवी निधन झाले;
त्यावेळी संभाजीराजे पन्हाळा गडावर होते. अनेक दिवस संभाजी राजांना बातमी दिली गेली नाही; त्याच काळात राजाराम महाराजांना गादीवर बसून स्वराज्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेण्याचा काहींनी कट रचला; पण तो यशस्वी रित्या हंबीरराव मोहिते यांनी उधळून लावला. आणि 16 जानेवारी सोळाशे 81 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र स्वराज्याचे वारसदार युवराज छत्रपती संभाजीराजे सिंहासनावर आरूढ झाले. आणि त्यांच्या खांद्यावर स्वराज्याची धुरा आली; कवी कलशाच्या सोबतीने त्यांनी गनिमी कावा युद्धनीतीचा वापर सुरू ठेवला. मोगलांना सळो की पळो केलं गोव्यात जाऊन पोर्तुगीजांना असा धडा शिकवला की परत त्यांना मान वर करता आली नाही. आपल्या आयुष्यात त्यांनी कायम शत्रूला पराभूत केले. जगाच्या इतिहासात एकदाही तह न करणारा युद्धात अजिंक्य असणारा एकही पराभव नशिबी न आलेला योद्धा म्हणून हिंदवी स्वराज्याचे छत्रपती संभाजी राजे भोसले म्हणजेच आपल्या शम्भू राजाचा उल्लेख गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये करण्यात आला आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे पण म्हणतात ना ‘घर का भेदी लंका धय ‘ याच उक्तीप्रमाणे वतनदारी नाकारल्यामुळे मेहुणा गणोजी शिर्के यांनी महाराज संगमनेरला असताना गुप्त माहिती मुघलांना दिली. आणि तिथेच घात झाला; राजे पकडले गेले. पण फक्त त्यांचे शरीर मुघलांच्या कैदेत सापडले; त्यांच्या मनावर ताबा मोगलांना कधीच मिळवता आला नाही. औरंगजेबाच्या छावणीत महाराजांना नेण्यात आले; राजे त्याच्यासमोर झुकले नाहीत. औरंगजेबाच्या डोळ्यात डोळा घालून राजे बोलले त्यांना कैदेतून मुक्त करण्यासाठी अनेक आमिषे देण्यात आली धर्मांतर करा; स्वराज्याची सर्व मालमत्ता आमच्या हवाली करा; पण स्वराज्याच्या स्वामीने स्वतःच्या जीव वाचवण्यासाठी स्वराज्याचा बळी कधीच दिला नाही. औरंगजेबाने अतोनात छळ केला; सखल दंडाने उंटाला बांधून मिरवणूक काढली; राज्याच्या डोक्यावरचे मुकुट उतरवले राज्याचा पोषक उतरवला आणि संपूर्ण मुसलमानी पोषक चढवला लोक त्यांच्या वेदना आपल्या डोळ्यांनी पाहून हातावर हात देऊन गप्प बसली होती. कारण बादशहाने आपल्या हस्तकांद्वारे राज्याला वाचवण्याचे सर्व प्रयत्न मोडून काढण्यासाठी तयारी केली होती. कोणी येऊन राज्याच्या अंगावर थुंकून जायचे तर कोणी त्यांच्या शरीरावर तलवारीने रेषा उमटवाईचे रक्ताची धार लागायची असा छेल सुरूच होता गरम सळ्यांनी डोळे काढले; झीब् कापली; नखे उपटली शरीराचे लचके तोडले. चाळीस दिवस सह्याद्रीच्या कुशीत घडलेला हा राजा झुकला नाही हाडांचा सापळा मात्र तसाच स्वाभिमानाने ताठ उभा होता अगदी राजा सारखा. शत्रुच्या प्रत्येक कुटिल डावाला उत्तर देत लढत होता; शस्त्र हाती नसलेला योद्धा सर्व शेस्त्राणि सुसज्ज असलेल्या शत्रू समोर सुद्धा अजिंक्य होता. शेवटी गुढीपाडव्याच्या दिवशी दिनांक 11 मार्च सोळाशे 89 महाराजांची गर्दन उतरवण्याचा आदेश औरंगजेबाने दिला; पण मृत्यूनंतर सुद्धा माझ्या राजाचे मस्तक त्याच्या पायावर झुकले नाही. भीमा नदीच्या काठावर गुडी उभारून ते मस्तक स्वराज्याचे प्रतीक म्हणून विजयी मुद्रेत विश्रांती घेत होते. ते मस्तक सांगत होतं स्वाभिमानाने मरावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवले जगावे आणि कसे संभाजीराजांनी शिकवलं स्वराज्यासाठी कसे मरावे.
- दुर्दैवानं आजच्या काळात देखील छत्रपती संभाजीराजे रंगेल होते आणि रगेल होते. याच शब्दात याच मातीत माझ्या राज्याचा अपमान केला जातो; आमच्या राज्याने आयुष्यात कधीच कुठल्याच मादक पदार्थाचे सेवन केले नाही; आज त्यात संभाजी राजांच्या नावाने विडी विकली जाते. हि अवकळा आली आमच्या महापुरुषांच्या डोक्यावर घेऊन नाचण्याची वृत्तीमुळे हा मराठी स्वराज्याचा स्वाभिमान जर टिकवायचा असेल आणि कर्तृत्वाच्या गडाला असल्यापासून वाचवायचं असेल इथली तटबंदी कायम ठेवायची असेल तर आता इतिहासाच्या पुस्तकात डोकावलं पाहिजे; आणि महापुरुषांना डोक्यात शिरवले पाहिजे. यासाठी तरुणांनी आमची मुल्ले जोपासण्यासाठी एकत्र येऊन संभाजी राजांचा होणारा अपमान थांबवला पाहिजे. आणि त्यांच्या जगण्यातली बलोपासना आणि ज्ञानसाधना ही दोन्ही तत्वे आमच्या आयुष्यात उतरवणे क्रमप्राप्त आहे. ज्या दिवशी सगळीकडे हीच सदाचारी चारित्र्यसंपन्न बलवान आणि ज्ञानयोगी तरुण जन्माला
येतील त्या दिवशी छत्रपती संभावजी राजांचा छत्रतपती शिवाजी महावराजांचा खरा वाहरसा आपण चालवतोप असे संगता
☝
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा