प्रेम विवाह वास्तव की आभास
अडीच अक्षरांची दुनिया भलतीच न्यारी, एकमेकांचा जीव घेण्यासाठी आणि एकमेकांना जीव देण्यासाठी सदैव तत्पर असतात नर नारी ज्याला ते प्रेम म्हणतात, आयुष्यभर सोबत जगण्यासाठी यालाच ते प्रेम म्हणतात एकमेकांचे तोंड न पाहण्यासाठी. महामारी सुरु झाल्या नंतर अनेक वेळा आमचे बोलणे झाले. पण नेहमी इकडच्या-तिकडच्या गप्पा मारून फोन ठेवला जात असे; असा त्याने काळ फोन केला आणि बोलता बोलता त्याच्या मनातील गुप्त दडून राहिलेल्या भावनांना व्यक्त करावं असं त्याला वाटले. आणि हा माझा मित्र त्याने अनुभवलेले दुःख, त्याने केलेला संघर्ष सर्व काही मोकड्या मनाने सांगू लागला. महामारी सुरु होण्याच्या आधी त्याचे महाविद्यालयीन जीवन आनंदी होते. त्याच्या स्वप्नातील परी त्याच्या सोबत होती. त्यांनी देखील अनेकांसारखे कधी हि पूर्ण न होणारे अनेक स्वप्ने रंगवली होती. आणि महामारी सुरु झाली महाविद्यालय बंद झाले त्यांच्यातील संवाद दिवस गणिक कमी कमी होऊ लागला; त्याची परिमिती म्हणजे त्यांच्यातले सर्व प्रकारचे सम्बन्ध संपले. पण असे का घडले? याचे उत्तर त...