हत्यारी लेक

स्वामीतीनी जगाचा आई विना भिकारी असे सत्य पचवायला फार जड जाते. कारण या सत्याला अपवादात्मक अनेक घटना आपल्या अवती भवती घडतात; अशीच एक काळजाला चटका लावणारी घटना अकोला शहरात घडली. आणि त्याचे सत्य २ दिवसांपूर्वी बाहेर पदले एका तरुणीने संपत्तीच्या वादातून आपल्या आईचा खून केला; सुरुवातीला याच मुलीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि मग पोलिसांचे चक्र फिरल्यावर तिने सत्य कथन केले. तिने सांगितले, " आमच्यात संपत्ती वाटपावरून अनेक दिवसांपासून वाद आहेत घटना घडली त्याच दिवशी आमच्यात जोराचे भांडण झाले त्यात मी माझ्या आईचे डोके दगडावर आपटले आणि हि घटना घडली" हि बातमी जुनी झाली असल्यामुळे कदाचित तुम्ही वाचली असेल; हि पण महत्वाचे आहे ज्यांनी जन्म दिला, लाडात वाढवले, तळहाताच्या फोलासारखे जपले, शिकवून शाहने केले. त्याच जन्मदात्यांच्या हत्या करताना यांचे काळीज तर्कापत नसेल का?

मग आज आम्ही कोणत्या जगात जगत आहोत जिथे संपत्तीच्यावादातून अशे पाऊल उचलतो यासाठी बदलती जीवन शैली जवाबदार आहे कि, वाढलेली स्पर्धा, आणि त्यातून आलेले नैराश्य, भावंडात वाढलेला परस्परांबद्दलचा द्वेष, या सर्व घटकातून विचार केल्यास काही गोष्टी स्पष्ट होतात.  

आज आपण संक्रमित अवस्थेत राहत आहोत तथाकथित प्रतिष्ठित लोकांचे आई-वडील वृद्धाश्रमात आपला निवारा शोधतात कारण त्यांच्यावर ती वेळ येते. अनेकांच्या ४ भिंतींच्या खोपट्यात आई बाबा असतात पण त्यांना घरपण अनुभवता येत नाही. तुम्हाला यातले काही कळत नाही तुम्ही गप्प बसा अशे दरडावून बजावले कि त्यांचे घरातले अस्तित्व संपून जाते. मग केवळ देह ठेवायला हवी असणारी जागा त्यांच्यासाठी तिथे उरते आणि सुरु होतो त्याचा राग, थोड्या थोड्या गोष्टींवर त्यांना घरातल्या मालकीणबाई टोचून बोलतात, त्यांचा प्रत्येक शब्द जो त्यांना टोचून बोळलेला असतो त्यांच्या काळजात घुसणार एक बाण असतो. हे सर्व झाले आजच्या स्वार्थी आणि आत्मकेंद्री जीवनशैलीमुळे. यातून आजी आजोबा नातवंडांना खेळवत असल्याचे सुंदर चित्र पुसले जाते; आणि संस्कारांची देवाण घेवाण थांबते मग याची दुसरी बाजू तेवढीच भयावह आहे. आज पोटाची खडगी भरण्यासाठी अहोरात्र कष्ट करावे लागतात अनेकांना आपल्या हयातीत शहरात स्वतःचे घर घेणे जमत नाही; अशा परिस्थिती त्यांच्यासमोर अनेक आव्हाने असतात जसे त्यांना आई वडिलांनी शिकवले मोठे केले तसेच त्यांना देखील आपल्या मुलांना मोठे करायचे असते. उतारवयात औषध  उपचार खर्च वाढतो त्याचबरोबर शहरात राहण्यासाठी जागा कमी असते अशा तणावाच्या जगण्यात दोन पिढ्यांमधले अंतर स्पष्टपणे जाणवते त्यांच्यात नेहमी खटके उडतात. आज महामारी आल्यामुळे अनेकांचे रोजगार गेले; तसेच या आधी देखील बेरोजगारी मोठ्याप्रमाणात होती. यातून तरुण पिढीसमोर एकत्र कुटुंबात राहून प्रगती साधण्याचे मार्ग संपले होते; त्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशा परिस्थितीत जास्त महत्वाचे वाटत असावे यात जर वडिलपपार्जित संपत्ती असेल आणि त्याची समाधानकारक पद्धतीने वाटणी झाली नसेल तर या सर्व गोष्टीतून आलेल्या नैराश्यात बधून असा अमानवी निर्णय युवा पिढी घेत असावी. आज सर्वत्र स्पर्धा आहे अगदी लहान बाळापासून केस पांढरे झालेल्या वृद्धापर्यंत जेवढी स्पर्धा जगासोबत असते त्यापेक्षा जास्त टोकाची स्पर्धा आपल्या स्वकीयांबरोबर असते. हे सर्वात घातक आहे जे दोन भाऊ बहिणी एकत्र खेळतात जेवतात झोपतात म्हणजे एकमेकांशिवाय राहू शकत नाही; पण हेच भावंडे एका टप्प्यावर एकमेकांचे तोंड पाहणे अशुभ समजतात. मग लहानपणातला स्नेहानुबंध कुठे गळून पडतो? या प्रश्नातच खरी उत्तर दडले आहे त्याचे गुड आहे. दोघांमधला स्पर्धेत आपले बिऱ्हाड वेगळे केले कि मग आई वडिलांची देखील वाटणी होते. नाही तर त्यांचे वार लावले जातात धाकट्याला वाटते त्यांनी थोरल्याशी बोलू नये थोरल्याला वाटते त्यांनी धाकट्याशी बोलू नये पण आई वडिलांसाठी दोघे सारखे असतात. त्यांच्यापैकी जो अधिक हलाकीचे जीवन जगत असेल त्याचा त्यांना अधिक कळवळा येतो त्याच्या हिताची अधिक ओढ असते; आपल्याकडे असेल त्यातले पसाभर अधिक अशा मुलाला देण्याची त्यांची इच्छा असते. पण द्वेष भरलेले डोके हि नाजूक भावना समजू शकत नाहीत; मग त्याला माझ्यापेक्षा अधिक वाटा मिळाला म्हणून ते आई वडिलांशी वाद घालतात आणि त्यातून अशी घटना घडते. ज्यांना जन्म दिला तेच यमदूत म्हणून उभे राहतात हे चित्र फार भयानक आहे. मग आम्ही का जगतो? याचा विसर पडतो आहे म्हणून हि सावरण्याची वेळ आहे. तुमच्या आयुष्यात कितीही संकटे असतील तर त्यातून बाहेर निघण्यासाठी आई वडील धीर देतात मग आपण जर हा दोर तोडून टाकला तर परतण्याचे सर्व मार्ग संपतील आणि उड्या आपली देखील यापेक्षा वाईट स्थिती होणार हि काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. आज पंढरीचा पांडुरंग विटेवर उभा आहे कारण त्याला भक्त पुंडलिकाला भेटायचं आहे. पण पुंडलिकाची सेवा अद्याप संपली नाही म्हणून विठ्ठल वाट पाहतोय. म्हणून त्यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाचा वापर आपली प्रतिमा उजळण्यासाठी करण्यापेक्षा त्यांना जिवंत असताना आनंद द्या त्यातच त्यांना स्वर्गातील कल्पित सुखापेक्षा अधिक सुख मिळेल.  "

फोटो - साभार गूगल

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा