प्रेमाची किंमत

सर्व विद्यार्थ्यांसमोर एखाद्या मुलीने तिच्याशी आधीच्यापासून प्रेम संबंध असणाऱ्या मुलाला लग्नाची मागणी घातली यात काही अश्लील असण्याचे कारण नाही . तिने गुलाबाचे फुल दिले आणि त्याने तिला मिठीत घेतले यात काही आक्षेपार्य वाटत नाही ; मग हे जर आपण स्वीकारणार नसू तर त्यांना जे पुस्तकात शिकवले जाणारे स्वातंत्र्य प्रत्येक्षात कोणत्या प्रकारे अनुभवता येणार ? विद्यापीठात किव्हा सार्वजनिक ठिकाणी चाले करणे किव्हा विभत्स व्यवहार करणे निश्चित चुकीचे आहे . पण त्यांनी असे काही केले नाही हि घटना तिथली असली तरी आपल्या देशातील हिंदू विश्वविद्यालय वाराणसी आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठात देखील मुलींवर अशेच बंधने घातली जातात . त्यांना त्यांच्या हक्काचे स्वातंत्र्य दिले जात नाही . तरी देखील एका नैतिकतेच्या चौकटीत राहून तरुण प्रेमींनी वागावे त्याचबरोबर स्वतःला अतिशय जखडुन ठेवू नये मुक्तपणे वागावे फक्त जे इतरांचे वागणे आपल्याला आक्षेपार्य वाटते तसे आपण वागू नये . आज मोठ्या प्रमाणात प्रेम विवाह होत असले तरी समाजात तेवढी स्वीकृती मिळाली नाही. त्यांना विरोधाचा सामना करावा लागतो कारण आपल्या समाजाने बदलत्या काळानुसार भौतिक बदल स्वीकारले असले तरी वैचारिक पतडीवर आम्ही मागासलेले आहोत हेच चित्र सर्वत्र दिसते . म्हणून आता कासवाच्या गतीने पुढे सरकणारा हा समाज एक दिवस नक्की मान्यता देणार हा विश्वास ठेवून आपण ठरवलेल्या जोडीदाराशी लग्न गाठ बांधावी . कारण हा समाज ज्यामहापुरुषांचा उदो उदो करतो त्यांचे आत्मचरित्र्य वाचत नाही आपल्या देशाचा विचार केला तर अगदी चंद्रगुप्त मौर्यापासून प्रेम विवाह होत आले आहेत महाराजा रणजित सिंह यांनी देखील प्रेम विवाह केला राजकीय क्षेत्रात अनेकांनी प्रेम विवाह केला इंदिरा गांधी यातीलच एक उदाहरण आहे . या प्रेम विवाहाला नाकारणाऱ्या लोकांचे मत असते अशी जोडपी आयुष्य भर एकत्र राहू शकत नाही ते आपल्या कुटुंबाची काळजी करत नाहीत . त्यांना आमटे दाम्पत्य आणि बंग दाम्पत्य यांचा आदर्श दाखवा मग त्यांचे डोळे उघडतील असे प्रेम विवाह होणे काळाची गरज आहे . कारण सामाजिक स्थिरता एकोपा बळकट करतात याद्वारे जाती व्यवस्था नष्ट पावते . हे सर्व प्रेमी जोडप्यांच्या बाजूने असले तरी त्यांच्यासमोर अनेक भावनिक सामाजिक बाबी हिमाल्यासारख्या उभय राहतात सुरुवातीला कुटुंबापासून विरोध होतो त्यानंतर समाजात उलटसुलट चर्चा सुरु होते . काही नतद्रष्ट हिंसाचार करतात अनेकांची हत्या करतात . मग सुरुवातीला आपल्या जीवितास धोका असेल तर पोलिसात तशी तक्रार देऊन स्वरक्षणाची मागणी करावी ; हे असे स्वरक्षण सर्वाना मिळणारच असे नाही म्हणून स्वतः सावध . राहावे समाजातील काही नतद्रष्टानी जर वाकड्या नजरेने पाहिले तर कायद्याचा बडगा उगारायला कचरू नये ; सन्मानाने जगण्याचा अधिकार तुम्हाला घटनेने मिळाला आहे त्याच्यावर जर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न करत असेल तर न्यायालयाचे दार थोटवणे निडर असण्याचे लक्षण आहे . सर्वात मोठा विरोध असतो कुटुंबाकडून इथे मात्र कायदा पुढे करू नये ; कारण आपल्या आई वडिलांपेक्षा जगात आपली काळजी करणारे कोणी नसते . त्यांच्यासारखे निस्वार्थी प्रेम करणारे कोणी नसते म्हणून शांतपणे त्यांना आपली बाजू पटवून द्यावी ; तरी देखील त्यांचे मत नाही तर प्रेम विवाह करून घरी परत यावे . आई वडिलांच्या पायावर डोके ठेवून त्यांना पुन्हा विनवणी करावी त्यांनी स्वीकारले नाही तर स्वतंत्रपणे संसार थाटात असताना आपल्या कुटुंबीयांविषयी द्वेष भाव बाळगू नये . एक दिवस ते तुमचा स्वीकार नक्की करतील
आली तिने गुलाब  दिला ,  त्याने  तिला मिठी मारली  मग विद्यापीठातून  हकालपट्टी झाली ; आणि सुरु झाला मूल्यांचा बाजार कोणी इकडून तर कोणी तिकडून आपल्या अकलेचे  तारे तोडू लागले . 
हि घटना आहे लाहोर विद्यापीठातील एका प्रेमी युगलाने व्यक्त केलेल्या प्रेमाची ; आणि त्यानंतर  उठलेल्या  वादळाची . त्यांनी अशाप्रकारे प्रेम व्यक्त करून लग्नाची मागणी केली तिथे बाकी विद्यार्थी होते असा तर्क देऊन विद्यापीठ प्रशासनाने आपल्या निर्णयाचे समर्थन केले . तर व्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देऊन विद्यापीठाच्या निर्णयावर टीका केली जाते आहे . विद्यापीठातून काढून टाकल्यावर दोघांनी हि आपल्या कृत्याचे  समर्थन केले आहे . मग पाडगावकर म्हणतात ना, “त्याने प्रेम केले किव्हा तिने प्रेम केले मला  सांगा  तुमचे काय गेले “ त्यांना विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे आमच्या कट्टरपंथी विचारधारेला आव्हान मिळाले जिथे विद्यापीठात विद्यार्थिनींचे शोषण केले जाते . तिथे केवळ प्रेम व्यक्त केले म्हणून अशाप्रकारे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आणण्याचा अकरस्थळी निर्णय घेतला जातो . म्हणजे केवळ कट्टरपंथी विचारधारेला खत पाणी घालण्याचे काम या विद्यापीठाकडून केले जाते जिथे विद्यार्थी हा जगाचा जवाबदार नागरिक घडवणे अपेक्षित असते त्या विद्या मंदिरात प्रेम व्यक्त केले जाऊ शकत नसेल तर याला विद्यापीठ म्हणायचे तरी का? 
जर हा पाकिस्थान नावाचा देश इस्लामिक मूल्यांवर चालत असेल तर त्यांनी पैगम्बराचे अनुकरण करण्यापासून आपल्या देशातल्या विद्यार्थाना का रोखले ? पैगम्बरनी प्रेम विवाह केला होता त्यांची प्रेम कहाणी वाचण्यासाठी  पैगंबरची प्रेम कहाणी  https://www.premsparsh.com/2021/02/blog-post_34.html  इथे क्लिक करा या घटनेकडे आपण तीन दृष्टिकोनातून पाहू 
१  विद्यापीठातील या प्रेमी युगलाचे वर्तन योग्य होते का?
२ २१ व्य शतकात देखील समाजाने प्रेम विवाह स्वीकारला का नाही? 
३ अशा कट्टरपंथी लोकांचा तरुण प्रेमींनी कसा  मुकाबला करावा 
सर्व विद्यार्थ्यांसमोर एखाद्या मुलीने तिच्याशी आधीच्यापासून प्रेम संबंध असणाऱ्या मुलाला लग्नाची मागणी घातली यात काही अश्लील असण्याचे कारण नाही . तिने गुलाबाचे फुल दिले आणि त्याने तिला मिठीत घेतले यात काही आक्षेपार्य वाटत नाही ; मग हे जर आपण स्वीकारणार नसू तर त्यांना जे पुस्तकात शिकवले जाणारे स्वातंत्र्य प्रत्येक्षात कोणत्या प्रकारे अनुभवता येणार ? विद्यापीठात किव्हा सार्वजनिक ठिकाणी चाले करणे किव्हा विभत्स व्यवहार करणे निश्चित चुकीचे आहे . पण त्यांनी असे काही केले नाही हि घटना तिथली असली तरी आपल्या देशातील हिंदू विश्वविद्यालय वाराणसी आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठात देखील मुलींवर अशेच बंधने  घातली जातात .  त्यांना त्यांच्या हक्काचे स्वातंत्र्य दिले जात नाही . तरी देखील एका नैतिकतेच्या चौकटीत राहून तरुण प्रेमींनी वागावे त्याचबरोबर स्वतःला अतिशय  जखडुन ठेवू नये मुक्तपणे वागावे फक्त जे इतरांचे वागणे आपल्याला आक्षेपार्य वाटते तसे आपण वागू नये . आज मोठ्या प्रमाणात प्रेम विवाह होत असले तरी समाजात  तेवढी स्वीकृती मिळाली नाही.  त्यांना विरोधाचा सामना करावा लागतो कारण आपल्या समाजाने बदलत्या काळानुसार भौतिक बदल  स्वीकारले  असले  तरी वैचारिक पतडीवर आम्ही मागासलेले आहोत हेच चित्र सर्वत्र दिसते . म्हणून आता कासवाच्या गतीने पुढे सरकणारा हा समाज एक दिवस नक्की मान्यता देणार हा विश्वास ठेवून आपण ठरवलेल्या जोडीदाराशी लग्न गाठ बांधावी . कारण हा समाज ज्यामहापुरुषांचा उदो उदो करतो त्यांचे आत्मचरित्र्य वाचत नाही आपल्या देशाचा विचार केला तर अगदी चंद्रगुप्त मौर्यापासून प्रेम विवाह होत आले आहेत महाराजा रणजित सिंह यांनी देखील प्रेम विवाह केला राजकीय क्षेत्रात अनेकांनी प्रेम विवाह केला इंदिरा गांधी यातीलच एक उदाहरण आहे . या प्रेम विवाहाला नाकारणाऱ्या लोकांचे मत असते अशी जोडपी आयुष्य भर एकत्र राहू शकत नाही ते आपल्या कुटुंबाची काळजी करत नाहीत . त्यांना आमटे दाम्पत्य आणि बंग दाम्पत्य यांचा आदर्श दाखवा मग त्यांचे डोळे उघडतील असे प्रेम विवाह होणे  काळाची गरज आहे . कारण सामाजिक स्थिरता एकोपा बळकट करतात याद्वारे जाती व्यवस्था नष्ट पावते . हे सर्व प्रेमी जोडप्यांच्या बाजूने असले तरी त्यांच्यासमोर अनेक भावनिक सामाजिक बाबी हिमाल्यासारख्या उभय राहतात सुरुवातीला कुटुंबापासून विरोध होतो त्यानंतर समाजात उलटसुलट चर्चा सुरु होते . काही नतद्रष्ट हिंसाचार करतात अनेकांची हत्या करतात . मग सुरुवातीला आपल्या जीवितास धोका असेल तर पोलिसात तशी तक्रार देऊन स्वरक्षणाची मागणी करावी ; हे असे स्वरक्षण सर्वाना मिळणारच असे नाही म्हणून स्वतः सावध . राहावे समाजातील काही नतद्रष्टानी जर वाकड्या नजरेने पाहिले तर कायद्याचा बडगा उगारायला कचरू नये ; सन्मानाने जगण्याचा अधिकार तुम्हाला घटनेने मिळाला आहे त्याच्यावर जर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न करत असेल तर न्यायालयाचे दार थोटवणे निडर असण्याचे लक्षण आहे . सर्वात मोठा विरोध असतो कुटुंबाकडून इथे मात्र कायदा पुढे करू नये ; कारण आपल्या आई वडिलांपेक्षा जगात आपली काळजी करणारे कोणी नसते . त्यांच्यासारखे निस्वार्थी प्रेम करणारे कोणी नसते म्हणून शांतपणे त्यांना आपली बाजू पटवून द्यावी ; तरी देखील त्यांचे मत  नाही तर प्रेम विवाह करून घरी परत यावे . आई वडिलांच्या पायावर डोके ठेवून त्यांना पुन्हा विनवणी करावी त्यांनी स्वीकारले नाही तर स्वतंत्रपणे संसार थाटात           असताना आपल्या कुटुंबीयांविषयी द्वेष भाव बाळगू नये . एक दिवस ते तुमचा स्वीकार नक्की करतील 
  फोटो - साभार गूगल
 
  • ती 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा