संकटात बुडलेली संस्कृति

गेल्या काही दिवसांपासून संस्कृतीच्या सोघोषीत दलालांनी बाजार मांडलाय; ते वाटेल त्या दराने आपली मूल्ये विकतात, जर कोणी खरेदीला नकार दिला तर त्यांच्यावर लादतात, विरोध केला तर दुसऱ्याला निरोपयोगी ठरवतात, म्हणजे एका उत्पादकाने दुसऱ्याच्या उत्पादनाची बदनामी करावी त्याप्रमाणे शेवटी देशी उद्योगाचे भावनिक शस्त्र वापरून विदेशी विचारणा आचरण दुय्य्म दर्जाचे ठरवतात; हे सर्व फक्त महिला खरेदीदारांची आहे पुरुषांची मात्र येथे नोंदणी केली जात नाही. उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री एका सरकारी कार्यक्रमात सहभागी झाले असताना त्यांनी महिलांबद्दल विधान केले. त्यांच्या या विधानात त्यांनी स्वतःचा एक अनुभव सांगितला ते एका विमानाने प्रवास करत असताना, त्यांच्या बाजूला एक महिला आपल्या मुलांना घेऊन बसली असताना तिने मुख्यमंत्र्यांच्या शब्दात फाटलेला जीन्स घातला होता. तो जीन्स फाटलेला नसून त्यांनी स्त्रियांनी घालावयाच्या पारंपरिक पोषक न घालता वेगळा पोषक परिधान केला होता. माननीय विद्यमान मुख्यमंत्र्यांना हे भारतीय संस्कृतीवरचे संकट वाटले त्यांच्या मते अशा प्रकारचे कपडे घालणाऱ्या माता आपल्या मुलावर चांगले संस्कार करू शकत नाही. या विधानावर अनेक स्तरातून टीका सुरु झाली. काहींनी राजकीय भूमिका म्हणून टीका केली; तर काहींनी त्यांच्या अशा प्रतिगामी विचारावर वैचारिक ताशेरे ओढले. काही हि असो या विचारधारेशी सहमत असणाऱ्यांसाठी काही प्रश्न विचारणे अत्यंत आवश्यक आहे.  

१ दुसऱ्याला असंस्कृत ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?

२ हे सर्व तथाकथित मूल्ये फक्त स्त्रियांनीच का जपायची?

३ पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे वागणे अमानवी आहे असे तुम्ही कोणत्या निकषावर ठरवता?

४ पारंपरिक पद्धतीने वागणाऱ्या सर्व आयांची मुले सुसंस्कारित आहेत असे तुम्हाला वाटते का?

५ पुरुष देखील पाश्चिमात्य पद्धतीचा पोषक परिधान करतात त्यावर तुमचे काय मत आहे?

६ दारू किव्हा तश्याप्रकारचे वेसने करणे भारतीय संस्कृतीच्या विरोधात असताना तुम्ही अशा लोकांना का टोकत नाही?

७ महिलांच्या व्येक्ती स्वातंत्र्यावर तुम्हाला काय वाटते?

अशा विचारधारेला समर्थन करणाऱ्या लोकांनी जगाच्या बदलत्या स्वरुपासोबत स्वतःला अद्यावत ठेवणे गरजेचे आहे. घराचे आर्थिक गणित सांभाळणारी महिला आज देशाचे आर्थिक गणित सांभाळते आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या या विधानाकडे भगतांना काही महत्वाचे घटक लक्षात घेण्यासारखे आहेत.  

१ संस्कृती म्हणजे काय ती कशी बदलते -

२ स्त्री आणि पुरुषात सांस्कृतिक भेद असू शकतो का?  

३ यातून पुरुषप्रधान संस्कृतीला खत पाणी घातले जाते का?  

४ भविष्यात आपल्याला कोणता टप्पा गाठायचा आहे.  

संस्कृती नेहमी पृथ्वी प्रमाणे संत गतीने फिरत असते; पाषाण युगात झाडाची साल गुंडाळून माणूस राहत असे आज देखील तो तोकडे कपडे घालतो आहे. फरक एवढाच त्याकाळी त्याच्या अज्ञानामुळे तो तसे वागत असे आज विज्ञानामुळे वागतोय. याच  बरोबर व्यक्तिपरत्वे संस्कृती भिन्न असू शकते. म्हणजे सर्वांच्या स्वातंत्र्याचा आदर करणे हे देखील एक संस्कृती आहे. दुसऱ्याला असांस्कृत म्हणणाऱ्यांची देखील एक संस्कृती आहे. पण जी मूल्ये इतरांचा आदर करतात स्त्री पुरुष यांच्यात समानता प्रस्तापित करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या मुल्ल्यांना संस्कृती म्हणून सर्व समाज स्वीकारतो काही नाकारतात त्यांच्या विचाराच्या कक्षा संकुचित असतात त्यांच्यामते स्त्रियांनी आज देखील त्यांच्या शेकडो वर्षांपासून निश्चित केलेल्या क्षेत्रातपुरते मर्यादित राहावे; पण हे आदर्श असू शकत नाही शेवटी प्रत्येकाने आपल्या इच्छेनुसार वागावे फक्त नैतिकतेची रेषा आखताना आपल्याला दुसऱ्याला नाव ठेवत असताना कोणत्या गोष्टी खटकतात याचे भान ठेवावे आणि आपली चौकट आखावी. स्त्री आणि पुरुष हे सर्व समाजाचे दोन खांब आहेत नाही तर एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे वाहत जाणाऱ्या प्रवाहाची दिशा ठरवणारे नदीचे दोन काठ आहेत शेवटी दोघांमध्ये लैंगिक भेद आहे हे उघड असताना त्यांच्यातील तफावत या समाजाने सर्व क्षेत्रात वाढवली आहे; तिचे आणि त्याचे  कामे वाटून दिली आहेत तसेच दोघांची कर्तव्य निश्चित केली आहेत पण या सर्व गोष्टी एका काळात सुसंगत असतील हि पण आजच्या संदर्भात विचार केल्यास आपल्या प्रगतीसाठी घातक आहे. स्त्री आणि पुरुषांची संस्कृती वेगळी नक्कीच आहे त्यांचा स्वभाव तिचा स्वभाव, त्यांच्या गरजा, तिच्या गरजा, त्यांचे शरीर तिचे शरीर हे सगळे भिन्न असताना आज देखील मुलीचे लग्न झाले कि तिला नवऱ्याचे आडनाव लावावे लागते हा सामाजिक रीतिरिवाज आहे; ती त्याच्या घरी राहायला जाते हि आपली परम्परा आहे. यातूनच खरा दोघांच्या संस्कृतीतील वेगळेपण जाणवतो तो अगदी तिच्या स्वातंत्र्याच्या हक्कपर्यंत जाऊन पोहचतो; आणि तिने स्वतःला त्याच्या चरणी समर्पित करावे हि स्त्री संस्कृती तिच्या अस्तित्वासाठी घातक ठरते. म्हणून दोघांच्या आचार विचारात फरक असला तरी चालेल पण तुमची संस्कृती जर तिचा समतुल्य दर्जा नाकारत असेल तर हा भेद नाहीसा झाला पाहिजे. या अशा मानसिकतेतून पुरुषप्रधान संस्कृतीला खत पाणी घातले जाते; तिला नेहमी दुय्य्म दर्जा दिला जातो. तिचा छळ केला जातो हे सर्व ती मुक्तपणे सहन करते; कारण तिच्यावर आपण तेच बिंबवले असते. यामुळे समाजाचा सर्वनगीन विकास होऊ शकत नाही; याचा अर्थ स्त्री प्रधान संस्कृती असावी असा नाही तर दोघांनी एकमेकांच्या गरजा लक्षात घेऊन घराचे निर्णय घेतले पाहिजेत. घरातील सर्व कामे केली पाहिजे आणि जर तिला तिच्या नवऱ्यापासून त्रास होत असेल तर त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवण्याचे साहस तिच्यात निर्माण होणे हि काळाची गरज आहे. आज अनेक मुलींना तिच्या कपड्यावरून टोकले जाते, तिच्या केसांवरून नावे ठेवली जातात, या आपल्या विचारसरणीत बदल होणे गरजेचे आहे; ज्यादिवशी इथला प्रत्येक माणूस नैतिकतेच्या  चौकटीत राहून आपल्या सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचा उपभोग घेणार आणि तो दुसऱ्याच्या या हक्काचा मनापासून सन्मान करणार ती सवर्ण सकाळ इथल्या आदर्श संस्कृतीचा दिवस घेऊन येणार. यासाठी सर्व सुसंस्कृत माणसांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.  

फोटो - साभार गूगल

    •  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा