प्रेम विवाहणे पेटवली दंगल

आता जगायचे कि मरायचे हे जाचे त्याने ठरवायचे? कारण राजधानी असणारे दिल्ली शहर कट्टरपंथीयांनी रक्ताची होळी खेळण्यासाठी निवडले आहे. आज त्यांनी रंगीत तालीम करून दाखवली; आणि त्या गल्लीला निम लष्कराने स्वरक्षण दिले आहे. एकाच गल्लीत राहणारे ख़ुशी आणि सुमित हे दोन भिन्न धर्मीय प्रेमी सुमित हिंदू तर ख़ुशी मुस्लिम त्यांच्या प्रेमाचे रूपांतरण लग्नात झाले; आणि २०/०३/२०२१ रोजी त्यांनी लग्नाचा बार उडवला. त्यानंतर सर्वत्र चर्चाना उदान आले; आणि  मुलीच्या धर्माचे लोक सोघशीत धर्म रक्षक रस्त्यावर उतरले. आणि त्यांनी दिसेलतेतोडायला फोडायला सुरुवात केली. आणि यांच्या लग्नाचा विरोध केला. आता" खून से होळी खेळेनगे" म्हणून निघून गेले त्यामुळे सर्वत्र दहशद पसरली असून आता दिल्ली पोलीस आणि निम लष्करी दलाने स्वरक्षणाची धुरा सांबाळली आहे. पण काही महत्वाचे प्रश्न इथल्या व्यवस्थेला आणि समाजाला विचारावे लागणार आणि त्याचबरोबर चिरफाड करावी लागेल आपण स्वीकारलेल्या तथाकथित मूल्यांची जे आम्हाला पुरोगामी विचारांपासून कोसो दूर ढकलतात" आणि चुराडा करतात आमच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा; शोधावा लागणार तो राक्षस जो घास घेतो आमच्या प्रेमाचा.  

१ एखादी मुलगी दुसऱ्या धर्मातील मुलाशी लग्न करते यात काय घातक आहे?

२ धर्माच्या नावाने व्यक्तीच्या अधिकाराचे हनन करण्याचा अनैतिक अधिकार कोणत्या धर्म ग्रंथाने दिला?  

३ हा देश संविधानाच्या आधारे चालत असताना धार्मिक कट्टरपंथी नेमके कशासाठी हे उद्योग करतात.

४ धर्माचे लेबल लावून झुंडीने हिंसा करण्यासाठी कोण प्रोतसाहित करतोय?

५ गुप्तचर यंत्रणा अशा धोक्यांची माहिती आधी देत असून घटना घडण्यापूर्वी रोखण्यास यंत्रणा अपयशी का ठरते?

  अशा घटना घडू नये म्हणून सरकारने कोणत्या उपाययोजना आखल्या आहेत?

 अशा जोडप्यानं सुरक्षेची हमी देण्यासाठी वेगळी तरतूद केलीआहे का?

 शेवटी मोठे मनकरून हा प्रतिगामी समाज कधी बदलणार आहे.

अनेक वर्षांपासून आपल्या देशात धार्मिक दंगली उसळल्या आहेत ते केवळ आपले वर्चस्व प्रस्तापित करण्यासाठी याचबरोबर आपण कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवून देण्यासाठी दुसऱ्या धर्मातील मुलीशी लग्न करण्याची एक प्रथा सुरु झाली आहे पण दुसऱ्या धर्मातील मुलीने आपल्या धर्मातील मुलाशी लग्न करावे हि मानसिकता असणाऱ्या या वृत्तीत उदारता नक्कीच नाही. कारण आपल्या धर्मातील मुलीने दुसऱ्या धर्माच्या मुलाशी लग्न करणे म्हणजे त्यांना तो धर्माचा अवमान वाटतो त्यासाठी ते कोणत्या हि थराला जाण्यासाठी तयार असतात. प्रसंगी मारण्याची अथवा मरण्याची त्यांना मुळीच पर्वा नसते त्यासाठी सदैव तत्पर असतात. पण या तरुणांचा बोलवता धनी वेगळा असतो तो कधीच बाहेर येण्याचे धाडस करत नाही. आणि या माथेफेरू तरुणांना वापरून घेतो यातच चुराडा होतो अनेकांच्या आयुष्याचा; आणि स्वप्ने दुलईत मिळतात सुंदर आयुष्याचे. प्रेम विवाह म्हणजे यांच्यासाठी धार्मिक संकट असते. त्यांच्यामते प्रेम करणे हा फार मोठा सामाजिक अपराध आहे. आणि हि वृत्ती जर सर्वत्र पसरली तर एक दिवस आपला धर्म नष्ट पावणार या लोकांना मानवतेच्या धर्माचा साफ विसर पडला आहे. त्यामुळे आता सामाजिक प्रबोधनाबरोबर प्रत्येक्ष कृतीला सुरुवात केली पाहिजे; आणि अशा प्रेमी युगुलांना सामाजिक सुरक्षा दिली पाहिजे. जर यात आपण कमी पडलो तर हा समाज पूर्वीप्रमाणे बंदिस्त अवस्थेत राहणार या साचे बंद सामाजिक व्यवस्थेत क्रांती घडून आणायची असेल तर प्रेम विवाह होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय जाती धर्माच्या भिंती तुटणार नाहीत आणि आपण खर्यार्थाने प्रगती साधणार नाही. या प्रवासात अनेक आव्हाने आहेत समाज कंटकांचे दहशडी वर्तन आडवे येणार ते देखील भेदायचए आहे यासाठी एकत्र येऊन एक लढा उभारावा लागेल. शेवटी जे स्वातंत्र्य आपल्याला घटनेने दिले ते जर कुणी हिरावून घेत असेल तर त्यासाठी लढणे आपले आद्यकर्तव्य आहे. पण यासाठी अहिंसक मार्गाचा अवलंब करावा हिंसक वृत्तीला अहिंसेने टक्कर देणे धाडसाचे आहे. त्यासाठी सहनशीलतेची परीक्षा द्यावी लागणार पण एक दिवस अहिंसेचा विजय होणार याची खात्री आहे. म्हणून आता तयारी करायला हवी उद्या कोणत्या हि सुमितच्या खुशीत हिंसेचा प्रवेश टाळण्यासाठी 

फोटो - साभार गूगल

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा