धर्म की अधर्म

भारतीय संस्कृतीने जगाला सहिष्णुतेचा संदेश दिला; प्राचीन काळापासून धर्म निरपेक्षतेची वागणूक दिली; आज देखील इथे हिंदूंच्या सणात मुस्लिम सहभागी होतात तर मुस्लिमाच्या सणांमध्ये हिंदू सहभागी होतात. आपापल्या धर्माचे पालन करत असताना दुसऱ्या धर्माचा सन्मान करणे हे आपल्यातल्या विविधतेत एकटा आणणारे आहे. पण आज या सर्व गोष्टींचा विसर इथल्या दोन्ही धर्मातील कट्टरपंथियांना झाला आहे कारण इथे दररोज धार्मिक भेदावर हिंसा होते आहे. याचा  कळस  गाठला गाजियाबाद शहरातील एका मंदिरात घडलेल्या घटनेने; १२ ०३ २०२१ रोजी १४ वर्षाचा मुसलमान धर्माचा मुलगा एका हिंदू मंदिरात पाणी प्यायला गेला असताना त्याला मारहाण झाली. त्याची चित्रफीत तयार करून समाजमाध्यमवर पसरवली गेली नंतर जागतिक प्रसारमाध्यमाने हि बातमी उचलून धरली आणि सर्वत्र या विषयावर चर्चा सुरु झाली. एका खाजगी वाहिनीच्या पत्रकारांनी त्या मंदिराची पहाणी केली तर तिथे एक मुख्यद्वारावर फलक होता त्यावर लिहिले होते हे" मंदिर हिंदूंचे पवित्र मंदिर आहे त्यामुळे मुसलमानांना इथे प्रवेश बंदी आहे" मुळात एखाद्या धार्मिक स्थळावर दुसऱ्या धर्माच्या लोकांना प्रवेश नाकारणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. माय- बाप सरकार आता धर्म सत्तेच्या आधारे राज्यकारभार करत असल्यामुळे त्यांच्यासाठी धार्मिक स्थळ धार्मिक ग्रंथ सर्वोच्च स्थानी आहेत आणि संविधान दुय्य्म दर्जाचे आहे; म्हणून अशा धर्मांध लोकांवर अंकुश राहिला नाही. त्यामुळे त्यांची अशी हिम्मत होते या दारावर लावलेल्या फलकांची चौकशी केली असता एका सेवकाने दिलेली माहिती या कट्टरपंथी मानसिकतेचे दर्शन करून देणारी होती, " त्यांच्यामते मुसलमान लोक दिवसा लहान लहान मुलांना मंदिरात पाठवून माहिती गोळा करतात आणि रात्री चोरी करतात तशेच हे लोक मंदिरात येऊन स्त्रियांची छळ काडटात. हा १४ वर्षाचा मुलगा या हेतूनेच आला होता" असे त्यांनी सांगितले मग काही प्रश्न इथे उपस्थित होतात ज्याची उत्तरे मंदिर प्रशासन आणि उत्तरप्रदेश सरकारनी देणे अपेक्षित आहे.  

१ अशाप्रकारचे फलक लावण्यापूर्वी मंदिर प्रशासनाने अनुमती घेतली होती का?

२ धर्माच्या नावाने दहशद निर्माण करणाऱ्या गुंडांवर कुणाचा वरदहस्त आहे?

३ एखाद्याला मंदिरात नेऊन मारहाण करून चित्रफीत समाजमाध्यमवर प्रसारित करण्याचा हेतू तरी कोणता?

४ जर अशा दिवस ढवळ्या चोरीच्या घटना घडत असतील तर सीसीटीव्ही कॅमेरे का लावण्यात नाही आले?

५ फक्त मुस्लिमाना प्रवेश बंदी करून सर्व चोऱ्यांचे आरोप केवळ धर्माच्या आधारे मुसलमानांवर लावता येतील का?

६ मुस्लिम व्यक्तीने हिंदू मंदिरात जाऊन पाणी प्यायले हा कोणत्या धार्मिक ग्रंथानुसार गुन्हा आहे? 

७ अशाप्रकारची चित्रफीत समाजमाध्यमवर प्रसारित करून तुम्हाला देशातले धार्मिक वातावरण बिघडवायचे आहे  का?

८ हिंदूंच्या कोणत्या देवाने किव्हा धर्म ग्रंथात मुस्लिम द्वेष करायला सांगितले?

९ रामाने शबरीची उष्टे बोरे खाल्ली हे थोटांग आहे का? जर नसेल तर तुम्हाला सर्व मानव समान आहेत हा बोध यापासून मिळत नाही का?

१० तुमच्यामते हा देश संविधानाच्या आधारे चालायला हवा कि धर्म ग्रंथाद्वारे?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जर मिळाली तर त्यांच्या म्हणजे दोनीही धर्मांच्या कट्टरतावादी  लोकांच्या कथनी आणि करणीतील फरक लक्षात येणार. या देशाच्या विकासात सर्वाधिक बाधा धर्मानी आणली; कारण वेळोवेळी इथे धार्मिक दंगली घडत आल्या आहेत. अगदी राम मंदिरापासून ते गावातल्या मिरवणुकी पर्यंत मग एकीकडे हातात हात घेऊन चालणारे दोनी धर्माचे पाईक असणारे भारतीय नागरिक आणि दुसरीकडे धार्मिक द्वेष असणारे तथाकथित धर्म रक्षक हे चित्र अंतर विरोधाभास दाखवते. म्हणून आता सर्व समाजाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. जगाच्या इतिहासात कोणत्या हि कट्टरपंथीयांनी सर्वांगीण प्रगती केली नाही. त्यामुळे धर्म हा अफूची गोळी आहे असे म्हणाऱ्या मार्क्सचे विधान खरे ठरताना दिसते; त्याला जर खोटे ठरवायचे असेल तर आपल्यातल्या धार्मिक जाणीव काळानुसार अद्ययावत करायला पाहिजे. आणि सर्व धर्मानी मानवतेच्या धर्माला सर्वोच्च स्थान दिले आहे म्हणून मानवतेच्या धर्माचे पालन केले पाहिजे. आपल्याकडे समाजातील एका घटकाने मंदिरात प्रवेश केला; तर देव कोपतो मंदिर अपवित्र होते असा काहींचा समज होता. पण dr. बाबासाहेब आंबेटकरांनी मंदिर सत्याग्रह करून या वर्गाला मंदिरात प्रवेश मिळवून दिला त्यापासून एका देखील देवाने कुठलेच काही वाकडे केले नाही. मग हि जशी समजूत त्याकाळी दूर झाली तशीच आता आपण स्वयंप्रेरणेने जर पुरोगामी पाऊले उचलली तर नक्कीच आपण मानवतेचा झेंडा रोवून राष्ट्र धर्म बळकट करू. आणि राष्ट्र संतांच्या शब्दात सांगायचे झाले तर [ नंदोत सुखे गरीब अमीर एक मतांनि, मग हिंदू असो ख्रिश्चन  वा हो इस्लामी ] म्हणजे हा भारत बलशाली करायचा असेल तर आमच्यातील भेदाभेद संपायला हवा त्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. आपल्या संविधानाने धर्म निरपेक्षतेचे तत्व स्वीकारले म्हणजे तुम्हाला नास्तिक आणि अधार्मिक व्हायला सांगितले नसून आपल्या धर्माचे पालन करत असताना दुसऱ्या धर्माचा सन्मान करावा; राष्ट्राचा कुठला हि अधिकृत धर्म नसेल हि स्पष्ट भूमिका असताना धर्माच्या आधारे देशाचा राज्यकारभार चालावा हि इच्छा बाळगणाऱ्यांची मनोकामना कोणताच देव कधी हि पूर्ण करणार नाही. आपण रुग्णालयात रक्त घेताना हे कोणत्या धर्माच्या माणसाचे आहे हे पाहत नाही; आणि एखाद्या हिंदूने मुसलमानांचे रक्त घेतले तर त्याला बाधा होत नाही. मग त्याच्याशी जवळीक ठेवल्याने नेमका कोणता फरक पडतो? जगत गुरु तुकाराम महाराजांनी अल्लावर अभंग रचना केली; नामदेवांनी भागवत धर्माचा प्रचार पंजाब प्रांतापर्यंत केला शिखांच्या धर्म ग्रंथात नामदेवांच्या रचना आहेत. अनेकांनी अंतर धर्मीय विवाह केले त्यांच्या आयुष्याचे वाटोळे झाले नाही. अशे किती तरी उदाहरणे देऊन सर्व धर्माचे मानवतावादी धर्म प्रस्थापित करणे हाच एक उदात्त हेतू आहे. आणि अनेकांनी तथाकथित धर्माच्या भिंती ओलांडल्या पण त्याच्या केसाला देखील धक्का लागला नाही शेवटी आपण जर आपल्या वैचारिक कक्षा रुंदावल्या तर निश्चित कोणत्या हि मंदिरात मशीदीत कोणी हि केव्हा हि पाणी पिऊ शकणार. साने गुरुजींच्या शब्दात 

[ प्रभूची लेकरे सारी, 

तयाला सर्व हि प्यारी,

  • कुणाना तुच्छ लेखावे, समस्त बंधू मानावेमी जगाला प्रेम अर्पावे ] 

फोटो - साभार गूगल

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा