खुदाने त्याचे हात घेतले; ती त्याचे हात झाली.

विवाह आयुष्याचा जोडीदार निश्चित केल्याचा सोहळा याद्वारे आयुष्याचे सुंदर स्वप्ने रंगवण्याची सर्वांची इच्छा असते आई वडिलांना वाटते आपल्या लेकीचे सासर आनंदी असावे श्रीमंत असावे तर मुलाच्या आई वडिलांची इच्छा असते आपली सून एक आदर्श पत्नी असावी तिने या घराला घरपण द्यावे अशा अनेकांच्या अनेक इच्छानी हा विवाह सोहळा घडून येत असतो सर्व साधारण सर्वत्र जोडून केलेले विवाह घडत असतात म्हणजे सर्वसंमतीने जोडले जातात त्याचबरोबर स्वतःचा जोडीदार स्वतःच्या मर्जीने निवडण्याची स्वातंत्र्य वृत्ती दिवसागणिक वाढत आहे अर्थात या पैकी बहुतांश प्रेम विवाह असतात पण आता प्रेम हे व्यक्तीवर केले जात नसून त्याच्या पद प्रतिष्ठा पैसा या त्रिकोणावर केले जाते मग गरीब श्रीमंत हि दुरी प्रकर्षाने जाणवते आणि जर कोणी प्रेम जिवंत ठेवण्यासाठी हे आधुनिक निकष पाळले नाहीत तर अशा विवाहांना विरोध होणारच हे जणू आपले सामाजिक कर्तव्य आहे या अविर्भावात सर्वजन वावरत असतात 

खरे प्रेम त्यावेळी जिवंत असते जिथे सर्वांच्या विरोधाला झुगारून प्रेम विजयी होते. पाकिस्थानातील लाहोर शहरातील अशीच एक प्रेम कहाणी किंबहुना या प्रेमी युगुलांची आयुष्यगाथा सर्वाना धडा शिकवणारी आहे दोन देखणे भिन्न लिंगी तरुण एक मेकांना भेटले आणि सुरु झाला कधी हि न थांबणारा बिकट वाट असलेला प्रवास एक मेकाच्या हृदयाच्या तारा जुडल्या आणि आना भक्त घेतल्या मग त्यांचे आयुष्य सर्व सामान्य होते आई वडिलांनी दोघांच्या लग्नाला मान्यता दिली मग सोबत फिरणे मस्ती धमाल करणे सर्व सुरु झाले अचानक दुधात खडा पडावा असा अपघात घडला दौत सिद्धीकी या सणाच्या प्रियकराला विजेचा तीव्र झटका बसला आणि त्यातून तो वाचला पण कायम

चे अपंगत्व घेऊन त्याने दोन हात आणि एक पाय गमावला तो वाचला असला तरी मृत्तिव यातना घेऊन जगू लागला त्याच्या वाचण्याची जगण्याची कहाणी अंगावर थरकाप उठवणारी आहे तो रुग्णालयात असताना शुद्धीवर नव्हता डॉक्तरांनी त्याच्या विषयी शंका उपस्थित केली त्यांच्या अंदाजानुसार हा काही थोड्या दिवसाचा सोबती आहे पण     अचानक सण रुग्णालयात आली त्याच्या कानात म्हणाली मी तुला सोडून जाणार नाही हे ऐकताच तो शुद्धीवर आला मग उपचारानंतर घरी आल्यावर तिने त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली आणि अशा        

मुलाशी लग्न करायला तिच्या वडिलांनी नकार दिला ती आपल्या निश्चयावर ठाम राहिली त्याने देखील तिला वडिलांच्या सल्ल्यावर विचार कर तुझे आयुष्य बरबाद करू नको असा सल्ला दिला पण ती म्हणाली खुदाने तुझे हात घेतले मी कदाचित तुझ्या हाताच्या रूपात आहे असे समज तो आतून गहिवरला आता त्या दोघांचे लग्न झाले आहे ती त्याच्या सर्व गरजा पूर्ण करते अगदी प्रत विधी पासून सर्व तिला या निर्णयाबद्दल     विचारले असताना ती म्हणाली कदाचित अशी दुर्घटना माझ्यासोबत झाली असती आणि त्यांनी लग्नाला नकार दिला असता तर मला आवडले नसते मग मी असे करणे म्हणजे आमच्या प्रीतीच्या नात्यावर पाणी फिरवल्यासारखे होणार. 

खरोखर असा उदार दृष्टिकोन सर्व जोडप्यांमध्ये असतो का. 

दुर्दैवाने नाही असे उत्तर द्यावे लागणार आज स्वार्थी लोक व्यक्तिवादाने प्रेरित होऊन प्रेम करतात पण देण्याची अर्थात प्रेम देण्याची भावना त्यांच्यात नसते याला काही अपवाद नक्की आहेत मग प्रेम करणारे हे जोडपे एकमेकांपासून ओरबाडण्याचा आटोकाट प्रयत्न करतात त्यांच्यासाठी मी पण सर्वांत मोठे असते त्याग करण्याची वृत्ती त्यांच्या ठायी नसते प्रश्न आहे दिव्यांग व्यक्तीचा नोकरी व्यवसाय करणाऱ्या दिव्यांग व्यक्तीशी लग्न करायला अनेक मुली तयार असतात पण जसे इतर मुलामुलींचे नाते महाविद्यालयीन जीवनात बहरते तसे नाते आपले देखील असावे हि दिव्यांग व्यक्तीची देखील भावना असते पण धडधाकट तरुण तरुणी त्यांची हि भावना समजू शकत नाहीत एक दिव्यांग आणि एक सामान्य असे दोघांचे महाविद्यालयीन जीवनात प्रेम सुरु होऊन अगदी विवाह पर्यंत पोहचले अशा कहाण्या शोधून सापडत नाहीत म्हणून आपल्या पतीवर आलेल्या संकटात धावून जाणारी पत्नी सर्वत्र दिसत असली तरी प्रियकर किव्हा प्रियसी साठी त्याग करणारी प्रेमी फार कमी आहेत सणा दाऊदला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते तिची फक्त एवढीच मागणी आहे शासनाने त्याला कृत्रिम हात व पाय बसून द्यावे जेणे करून तो तिच्या आजूबाजूला फिरू शकणार शासन देणार कि नाही माहिती नाही पण इ त्याच्यासाठी हात पाय झाली आपल्या अस्तित्वाने तिने जगाला निर्मळ प्रेम कसे असावे हे दाखवून दिले हि दातृत्वाची भावना सर्वांमध्ये वृद्धिंगत व्हावी एवढीच अपेक्षा एखादी व्यक्ती शारिरीक दृष्ट्या अपंग असू शकते पण त्या व्यक्तीचे मन कधीच तुटलेले नसते त्या हृदयात तीच जागा असते दुसऱ्या हृदयासाठी जेवढी इतरांच्या हृदयात असते म्हणून काळजाशी नाते जोडायला शिका ते जर जुडले तर त्या स्नेहाच्या धाग्याला कोणी कापू शकणार नाही म्हणून प्रेम करण्या पेक्षा ते द्यायला शिका 

फोटो - साभार गूगल

 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा