हरवलेल्या बालपणाला जवाबदार कोण?

जागतिकीकरणानंतर आपल्या देशात प्रचंड आर्थिक दरी निर्माण झाली त्याचा परिणाम समाजातील सर्व घटकांवर दिसतो. 

एकीकडे कुपोषणाने बाळ मृत्तिव होतात तर दुसरीकडे लठ्ठपणा, अभ्यासाचा ताण, वाढता स्क्रीन टाइम  या समस्यांनी सम्पन्न कुटुंबातील बालके ग्रसित आहेत. 

महामारी सुरु झाल्यापासून ऑनलाईन शिक्षण प्रणाली सर्वानी स्वीकारली त्यामुळे मुलांच्या आयुष्यावर अनेकदुर्गामी परिणाम झाले त्यांचा भावनिक विकास खुंटला,  समाजिकरण मंदावले, चिडचिडेपणा वाढला, अनेक आजार सुरु झाले यावर भरीसभर पालकांचा दबाव आणि अवास्तव अपेक्षांचे ओझे याने बालकांचे क्मर्डे मोडले आहे. 

आता अनेक आई-वडिलांना असे वाटते त्यांच्या मुलाने-मुलीने अगदी आईच्या उदरातूनच सर्व ज्ञान घेऊन यावे आणि जन्म झाल्याबरोबर आपल्या नावावर रेकॉर्ड नोंदवावे पण काय करतील बिचारे त्यांना देखील माहिती आहे कि हे अशक्य आहे. 

 

या त्यांच्या अपेक्षा मुलांवर लादून त्यांच्यातील स्पर्धेला अगदी काही महिन्याच्या आयुष्यात सुरुवात होते आणि निरागसतेचे बालपण दुर्दैवाने या मुलांच्या वाट्याला येत नाही. 

वयाचे ३ वर्ष पूर्ण होण्याआधी या मुलांना दप्तराचे ओझे सांभाळावे लागते त्यावर कमी म्हणून कि काय शाळा सुटल्यावरचे खाजगी शिकवणी वर्ग या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेची परीक्षा घेण्यास आसुसलेले असतात परिणामी मुले कृत्रिम मानवासारखे वागू लागतात त्यांची वाढ अनैसर्गिक रित्या होते. 

याला पालक, शिक्षक, पर्यायाने आपण सर्व जवाबदार आहोत; पालकांच्या वाढत्या अपेक्षा, वडिलांची दहशद, स्पर्धेचाताण, मनाचा कोंडमारा यातूनच या व्यवस्थेला विचारावे लागते, 

हरवलेल्या बालपणाला जवाबदार कोण? 

मातीत खेळणारी मुले माती पासून दुरावली, त्यातूनच व्यक्तिवादी पिढी जन्माला अली. 

आज एकत्र कुटुंब पद्धती संपत आहे त्यामुळे मुलांवर होणाऱ्या कौटुंबिक संस्कारांची जागा आता इंटरनेटने व्यापली आहे अजाणतेपणी मुलांसमोर अनियंत्रित विश्व उभे झाले आहे एखाद्याला अपरिचित जंगलात सोडावे आणि त्या जंगलात जी व्यक्तीची अवस्था होईल ती अवस्था या मुलांची होत आहे त्यांना हे सर्व उपकरणे हाताळता येतात पण त्याचा उपयोग कशासाठी करावा? याची जाण त्यांच्याकडे नसते त्यामुळे या जंगलात भयभीत प्राण्यांसारखे हि मुले भरकटतात परिणामी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दुरावतात. 

या  बदलत्या युगात स्पर्धेत टिकून राहत असताना मुलांचा सर्वनगीन विकास कसा साधता येईल? 

आज इंटरनेटमुळे ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांमधील विषमता काही प्रमाणात कमी झाली असली तरी ती ठळकपणे नजरेस पडते. 

 

त्यामुले मुलांनी जगाशी स्पर्धा करावी म्हणून त्यांना सर्व सुविधा देणे गरजेचे आहेच पण त्याचबरोबर त्यांची नैसर्गिक वाढ कशी होईल? याकडे लक्ष देणे तितकेच आवश्यक आहे. 

यासाठी घरातील सर्व सदस्यांनी दैनिक वेळापत्रक ठरवून घ्यावे आणि ते अमलात आणावे- 

त्यातील काही मुख्य केंद्र बिंदू-- 

१ विद्युत उपकरण वापरण्याची निश्चित वेळ- दिवसातून काही ठराविक वेळ सर्वानी मोबाईल, दूरदर्शन, लॅपटॉप इत्यादी उपकरणे हाताळावी त्याचबरोबर काही वेळ अजिबात या उपकरणाला हात लावू नये उदाहरणार्थ जेवण करताना, नाश्ता करताना त्याचबरोबर घरातील लहान मुलांचे ऑनलाईन वर्ग सुरु असतील तर त्यांचे तास संपल्यावर त्यांना मन लागेल अशी दुसरे कामे सांगावी  जनेकरून ते या डिव्हाईसकडे खेचली जाणार नाहीत. 

 

२ मुलांसोबत कार्यक्षम वेळ घालवा- मुले असामाजिक तत्वांकडे आकर्षित होण्यासाठी अप्रत्यक्षरित्या त्यांचे पालक कारणीभूत आहेत त्यांचे मुलांकडे होणारे दुर्लक्ष याला जवाबदार धरता येईल म्हणून आपली मुलांप्रती असणारी जवाबदारी आई-वडिलांनी पूर्ण करावी त्यासाठी त्यांना हे करू नको, ते करू नको, हे पाहू नको, ते खाऊ नको, इकडे लक्ष देऊ नको अशे आदेश देण्यापेक्षा त्यांनी काय करावे हे त्यांना सांगून मैत्री प्रस्तापित करा   आणि त्यांना वेळ द्या या वेळेत फिरायला जा एकत्र खेळा त्यांच्याबरोबर गप्पा मारा याचा निश्चित मुलांवर सकारात्मक परिणाम होईल. 

३ तुलना टाळा- जगातील प्रत्येक व्यक्ती अद्वितीय असतो त्याच्यासारखा दुसरा कोणीच नसतो मग २ समवयीन मुलांमध्ये तुलना कशासाठी? 

या तुलनेतून दोघांमध्ये मत्सर निर्माण होतो त्यामुळे दुसऱ्याला पराजित करण्याची भावना बळावते मी हरलो तरी चालेल पण तो जिंकता कामानये  हा विचार त्यांच्या व्यक्तिमत्वात खोलवर घर करून बसतो. 

हे टाळण्यासाठी प्रत्येकातील वेगळेपण लक्षात घेऊन त्यांना त्यांच्या पद्धतीने वाढू द्या एका निश्चित साच्यातून सर्वानी बाहेर पडावे  हा अट्टहास बाळगून चालणार नाही जसे प्रत्येक फुल स्वतंत्र रित्या फुलते तसे प्रत्येकाला त्याच्या नैसर्गिक गुणवत्तेला वाव मिळवून देण्यासाठी प्रोत्साहित करा. 

४ मुल्याधीष्टीत संस्कार- मुले smart झाली आहेत ते असं का? विचारतात कारण ते चिकित्सक आहेत. 

कदाचित या चिकित्सक वृत्तीमुळे हाडाचे शिक्षक कलाम सर जगातील पहिला शास्त्रद्न्य बालकांमध्ये शोधत असतील. 

आपल्या समाजात परम्परेने चालत आलेल्या रूढी प्रश्न न विचारता आपण स्वीकारत आलो आहोत 

त्यामुळे अर्थाचा अनर्थ होत आहे. 

म्हणून मुलांना वैज्ञानिक कसोट्यांवर सिद्ध होईल अशाच परंपरा सांगा त्यांच्या मनात स्त्री-पुरुष हा लैंगिक भेद पेरू नका त्याचबरोबर चांगला माणूस होण्यासाठी आवश्यक-  विनम्रता,  ज्येष्ठ व्यक्तींबद्दल आदर,  वाणीचा सद उपयोग,  मदतीची भावना,  शेजार धर्म यांसारख्या आवश्यक मुल्ल्याना स्थान असावे. 

५ लहान मुलांची काळजी घ्या- जगातील  अपवाद वगळता सर्वच माता-पिता आपल्या लेकरांची काळजी घेतात मग आता नवीन कोणती काळजी घ्यायची? 

आपल्याला सर्वच काही झटपट पाहिजे असते अगदी खाण्याच्या पदार्थांपासून परीक्षेतील गुणांपर्यंत पण हे फार घातक आहे याचा आपल्याला विसर पडतो. 

मॅगी सारखे  त्वरित खाण्यासाठी तयार होणारे पदार्थ टाळा त्याऐवजी  कोम आलेल्या कडधान्याच्या ऊसडीला प्राधान्य द्या, चॉकलेट सारख्या तत्सम पदार्थाना वगळून घरी बनवलेल्या चटकदार पदार्थांचा आहारात समावेश करा, वजन अथवा उंची वाढवण्यासाठी प्रोटीनसारखे घटक टाळून शारिरीक कसरती करायची त्यांना सवय लावा, आठवड्यातून एक वेळ धार्मिक स्थळाला भेट द्या यामुळे तुमच्यातील अहंकार दूर जातो. त्यासोबतच शाळेत कमी वेळेत अब्यास करून परीक्षेत जास्त गुण मिळवण्यासाठी मिळणाऱ्या नोट्स न वापरता पूर्ण पुस्तक अब्यासण्याची सवय लावा त्याने त्यांचे ज्ञान वाढेल. 

या सर्व बाबींवर लक्ष देऊन स्पर्धेच्या युगात टिकून राहत असताना मुलांची नैसर्गिक वाढ होईल आणि त्यांना रुची असणाऱ्या क्षेत्रात भविष्य घडवण्यास मदत होईल. 



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा