पितृ सत्ताक व्यवस्थेला सुरुंग लावणारी महिला कमला बसीम

हजारो वर्षांपासून रुजलेल्या पितृ सत्ताक समाज व्यवस्थेतील सर्व घटकांनी तिला मनापासून स्वीकारले आहे अगदी ज्या महिलांना त्यांचे या व्यवस्थेमुळे शोषण होत आहे याची जाणीव असताना त्यांनी या विरोधात बँड पुकारला नाही. 

असं म्हणणे चुकीचे ठरेल कारण या व्यवस्थेला केवळ लैंगिक भेद जवाबदार असला तरी तिने स्त्री-पुरुष अशी मानसिकता तयार केली त्यामुळे या  वास्तवाला बदलवण्यासाठी आता मन परिवर्तन करणे हा एकमेव रामबाण उपाय आहे हे हेरून एका स्त्रीने सम्पूर्ण समाजात मानवतावादी मूल्यांची पेरणी करण्याचा ध्यास घेतला होता. 

 

कारण त्यांनी २५/०९/२०२१ रोजी ७५ वर्षाच्या असताना जगाचा निरोप घेतला त्या कर्क रोगाचा सामना करीत होत्या. आता पर्यंत कमला बसीम यांच्या निधनाची बातमी आपण वाचली असेलच त्याचबरोबर त्यांच्या कार्याची जाणकारी मिळवली असणारच हे गृहीत धरून त्या माघे दडलेला अर्थ शोधण्याचा प्रयत्न आजच्या लेखात करू. 

त्या पूर्वी सामाजिक क्रांतीच्या जनक,  स्त्रीवादी साहित्यिक तसेच सक्रिय कार्यकर्त्या कमला बसीम यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 

स्वातंत्र्याच्या १ वर्ष आधी कमला आजीचा जन्म झाला त्यांच्या नशिबी सुदैवाने चांगले कुटुंब आले कदाचित त्याचाच त्यांच्या जडण-घडणीवर सकारात्मक परिणाम झाला सुरुवातीपासून त्यांनी एका तथाकथित मुलीसारखे जगायचे टाळले त्या सर्व खेळ मुलांसोबत खेळायच्या; त्यातूनच त्यांना स्त्री-पुरुषांमध्ये होणारा भेद किती निरर्थक आहे हे समजले असावे. त्या लहान असताना झाडावर देखील चढायच्या. 

त्यांचे असे वागणे पुरुष प्रधान संस्कृतीच्या थोबाडात मारलेली चपरख होती. त्यांच्या कुटूंबियांनी त्यांना नेहमी पाठिंबा दिला सुदैवाने त्यांचा नवरा देखील समानतेचे पालन करणारा आहे. 

 

त्यांच्या पाठिंब्याशिवाय कमला आजींना हा डोलारा मोठा करणे अशक्य होते. 

सुरुवातीला त्यांनी या मानसिकते विरोधातील युद्धाची तयारी केली आपल्या तार्किक शब्दांच्या फटकाऱ्याने अनेक मनुवादी मल्लाना त्यांनी चितपट केले. 

त्यांनी प्रदीर्घकाळ संयुक्त राष्ट्र संघासाठी काम करत असताना जगातील सर्व देशात विषमता औषधाला देखील उरू नये याचा प्रामाणिक प्रयत्न केला. 

पण त्यापूर्वी आदिवासी भागात त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली त्यांच्या निरीक्षणानुसार तिथली जनता भोळी आहे इतर लोक त्यांचे शोषण करतात त्यातदेखील पुरुषांपेक्षा स्त्रीयनचे जास्त शोषण होते. 

हीच बाब संपन्न कुटुंबात देखील निदर्शनास येते अगदी कमावत्या महिलांना देखील कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागते. 

दक्षिण आशियातील ८ देशात त्यांनी नारीवादाची तुतारी फुंकली त्यासाठी भारत पाकिस्थान असा भेदभाव केला नाही. 

या प्रवासात त्यांना अनेक संकटाना तोंड द्यावे लागले पण त्यांनी या संकटाना घाबरून आपली चळवळ माघे घेतली नाही. 

त्यांनी स्त्री लिंग आणि पुरुष लिंग हा केवळ शारिरीक भेद लक्षात घेऊन आपल्या कामाची आखणी केळींनाही;  तर स्त्री मानसिकता आणि पुरुषी मानसिकता असा खोल विचार केला. 

त्यांनी जिद्दीने शिक्षण पूर्ण केले त्यानंतर पदवीउत्तरपदवी मिळवली आणि त्यादरम्यान त्यांना गुन्हेगारी विश्वाचा परिचय झाला. 

 

एकीकडे रस्त्यावर अथवा अंधारात अत्याचार करणारे नराधम पोलिसांनी अटक केले पण ज्यांना घरगुती हिंसाचाराला सामोरे जावे लागते त्यांनी काय करावे? 

कमला आजी म्हणतात, ‘मुलीमुलांपेक्षा कुठे हि कमी पडत नाही. त्यांनी संकटाना संधीत परिवर्तित केले पाहिजे’ 

आपल्या देशात वाढत्या अत्याचाराला कौटुंबिक हिंसाचाराला पितृ सत्ताक पद्धती जवाबदार आहे. 

पितृ सत्ताक पद्धती केवळ स्त्रियांवरच अत्याचार करत नाही तर ती व्यवस्था पुरुषांसाठी देखील जाचक  आहे. 

त्या सांगतात ‘जिथे शक्ती असते तिथे अवलंबुन लोकांना दुय्य्म समजण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो; आपल्या देशात बहुतांशी घरात कमावते पुरुष असल्यामुळे स्त्रियांवर अत्याचार होतात.’ 

त्यांचे हे विधान आपल्या कटू वास्तवाचे दर्शन घडवणारे आहे. आपल्या देशात शेतकरी आत्महत्या होतात त्याला गरिबी जेवढी कारणीभूत आहे त्यापेक्षा पितृसत्ताक पद्धती अधिक जवाबदार आहे. 

 

आपल्या विधानाला वजन प्राप्त करून देण्यासाठी त्या प्रश्न विचारतात 

गरिबी हे केवळ एकच शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारण असेल तर पुरुष शेतकरी आत्महत्या करतात मग महिला शेतकरी आत्महत्या का करत नाहीत? 

याचे उत्तर त्या स्वतःच देतात त्यांच्या मांडणीनुसार ‘पुरुषांना रडण्याचे स्वतंत्र नसते त्यांना मनातील भावना व्यक्त करता येत नाही म्हणून ते टोकाचे पाऊल उचलतात पण स्त्रियांची स्थिती मात्र पूर्ण विरुद्ध असते. त्या व्यक्त होऊन मन साफ करतात तसेच घरातील करता पुरुष असल्यामुळे आपण इतरांच्या तुलनेत कमी भरलो तर  होईल या भीतीने ते आत्महत्या करतात थोडक्यात काय तर पितृ सत्ताक पद्धती त्यांना सम्पवते.’ 

अकोला जिल्ह्यात एका स्त्रीने घरातील सर्व पुरुषांनी आत्महत्या केल्यावर यशस्वी रित्या शेती करून दाखवली. 

आत्महत्या ग्रस्त पत्नी ते 29 एकर शेतीची मालकीण 

 

बलात्काराच्या घटनांमुळे त्या फार व्यतीत झालेल्या दिसत होत्या त्यांच्या मते सर्व पिढीत महिलांना त्यांची इज्जत गेली असे आपण म्हणतो; पण त्यांची अब्रू युनी मार्गात कोणी ठेवली? 

जर एखादा वासनांध पुरुष महिलेवर अत्याचार करीत असेल तर खऱ्या अर्थाने त्याची इज्जत जाते. 

या आपल्या तार्किक युक्तिवादातून अंतिमतः त्यांना मानवतावादी समाज निर्माण करायचा आहे म्हणून आता आपण वर्चस्ववादी पुरुष प्रधान संस्कृतीला दूर सुरू आणि समानतेच्या तत्वावर आधारलेल्या मानवतावादी संस्कृतीचा स्वीकार करू. 


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा