द्वेष कि प्रेम काय म्हणावे याला?

हे जीवन सुंदर आहे अशे आपण सर्वत्र ऐकत आले आहोत पण हि सुंदरता कशात शोधावी हे जाच्या त्याच्या विवेकावर अवलंबून असते. 

 मानवी आयुष्याच्या ययशाचे गमक शोधायचे झाल्यास त्यासाठी तुमच्या जीवनाचा स्तर कोणता आहे हे सुरुवातीला ठरवले पाहिजे. 

हे सर्व तत्वज्ञान एकीकडे ठेऊन आपण काही गृहीतके स्वीकारली आहेत त्यापैकी एक आई-वडिलांचे प्रेम. 

पण तुम्हाला जर विचारले जन्म दात्या आई-वडीलानी आपल्या मुलीची हत्या केली याच्यावर तुमचा विश्वास बसणार का? 

याचे उत्तर काही असो आज आपण ज्या घटने संदर्भात चर्चा करणार आहोत हि सत्य घटना आहे. 

आयुष्यात प्रेम करणे हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे त्याला अपवाद नाहीत फक्त दृश्य-अदृश्य हा नाम मात्र फरक दिसतो. 

 

काही उघड रित्या प्रेम व्यक्त करतात तर काही आपल्या भावना दाबून ठेवतात कारण आपल्यावर झालेले सामाजिक संस्कार हे सर्व ठरवत असतात.  

मग प्रेमावर कविता करणारे कवी समाजात लोक प्रियतेच्या शिखरावर चढतात आणि प्रत्येक्ष प्रेम भाव जगणारे द्वेषाच्या टोकावर असतात. 

याची प्रचीती देणारी घटना घडली देशाच्या राजधानीत ज्याने पोलीस देखील चक्रावले कदाचित चित्रपट निर्मात्याला नसूचनारी कल्पना या समाज कंटकांनी वास्तवात उतरवली. 

उत्तर प्रदेशातील एका प्रेमी युगुलाने विवाह करायचे ठरवले पण त्याला कुटुंबीयांचा तीव्र विरोध असल्यामुळे उभयतांच्या जीवाला धोका निर्माण झाला म्हणून त्यांनी घरातून पळून जाऊन देशाच्या राजधानीत आश्रय घेतला. 

काही दिवसातच त्यांचे अपहरण करून मध्य प्रदेशात नेले तिथे दोघांची हत्या केली; आणि प्रियसीचा मृत देह मध्य प्रदेशातील जंगलात फेकला व प्रियकराचा मृत देह राजस्थानच्या जन्गलात फेकला. 

 

पोलिसांना जेव्हा या घटनेचा सूत्रधार सापडला त्यावेळी ते देखील चक्रावले; कारण हे हत्या मुलीच्या नातेवाईकांनी घडवून  आणली. 

प्रियसी अल्पवयीन होती तर प्रियकर १८ वर्षापेक्षा मोठा होता. 

हि बातमी सकाळ वर्तमानपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीने प्रकाशित केली. 

 जीवावर उठणारे हे पहिले जोडपे नाही.  तर आपल्या प्रेमासाठी असंख्य लोकांनी मरण पत्करले ते या झुंडींसमोर झुकले नाहीत पण खंत एवढीच आहे अद्याप आपण अशा घटना रोखण्यात यशस्वी झालो नाही. 

वरील घटनेचा विचार केल्यास त्यांचे वय लग्न करण्या योग्य  नसल्य्यामुळे त्यांच्यासाठी  खुला नव्हता म्हणून त्यांचे नाते लिव्ह अँड रिलेशनशीप या प्रकारचे होते. 

याला सर्वउच्च न्यायालयाची मान्यता आहे; तरी देखील पंजाब हरयाणा  उच्च न्यायालयाने एका लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या जोडप्याला स्वरक्षण नाकारले. 

त्यासाठी न्यायालयाने कोणते तर्क  दिले? 

नेमके हे प्रकरण काय  आहे? 

वाचण्यासाठी-- लिव इन रिलेशनशिपची नेमकी चौकट कोणती? 


आपल्या देशात प्रेम विवाह केल्यामुळे अथवा घरातून पळून गेल्यामुळे तथाकथित प्रतिष्ठेसाठी होण्याऱ्या घटना नियमित स्वरूपात घडत असतात; नावे बदलतात, स्थळ बदलतात , कारणे वेगवेगळी असतात पण हेतू सर्वांचा एकच असतो. 

प्रेमात पडणाऱ्या पोटच्या लेकराला थेट सम्पवायचे हि मानसिकता सर्व वर्गात असल्याचे निदर्शनात येते काही तर केवळ संशयावरून मुलींना सम्पवतात. 

पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात देखील काही महिन्यांपूर्वी एका वडिलांनी आपली मुलगी एका अनोळखी मुलाबरोबर बोलते म्हणून दोनी हि मुलींना ट्रक खाली चिरडून ठार केले. 

पहिले मुलींची हत्या; नंतर आत्महत्या हा बाप नेमका आहे तरी कोण?

 

हे वास्तव लक्षात घेतल्यावर   मुलींनी जगायचे तरी कसं? 

याचे उत्तर शोधणे कठीण आहे कारण एकीकडे  तुमचे प्रेम आणि स्वातंत्र्य तर दुसरीकडे गुलामी नाही तर मृत्तिव ठरलाआहे.  

तरी या सर्वाना न जुमानता प्रेम विवाह करायचा असेल तर काय करावे? 

प्रत्येक सुखी संसारासाठी काही मूलभूत गोष्टी आवश्यक असतात उदाहरणार्थ तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असायला पाहिजे, राहण्यासाठी सुरक्षित निवारा असणे अत्यावश्यक आहे, कठीण काळात आधार देणारे मित्र मंडळी असावी, परस्परांच्या स्वभावाचे आकलन असणे जरुरी आहे यातून तुमची दिशा स्पष्ट होईल आणि हा संसार रथ वेगाने मार्गक्रमण करणार. 

 

प्रेम विवाह अंतर जातीय अथवा अंतर धर्मीय असो कदाचित जाती अंतर्गत जरी तुम्ही प्रेम विवाह करायचा ठरवले तरी त्याला विरोध होणार मग त्या विरोधाला घाबरून माघे हटायचे कि त्याला सडेतोड उत्तर द्यायचे हे तुम्ही ठरवा. 

तुमच्या नात्यात अनेक क्लिष्ट आवाहने  असतात नात्यातील गुंतागुंतीचे सम्बन्ध कसे सुरळीत करायचे? असे प्रश्न निर्माण होतात अशा वेळी प्रेम स्पर्श या ब्लॉगद्वारे प्रकाशित होणारे लेख वाचून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा कदाचित आम्ही एखाद्या समस्येवर उपाय सुचवला नसेल तर तसे कळवा आम्ही तुमच्यासाठी नक्की उत्तर शोधू. 

बऱ्याच लोकांना आपले कुटुंब प्रिय असते तसेच त्यांचा विरोध असताना प्रेम विवाह देखील करायचा असतो मग अशा वेळी कोणता पर्याय निवडावा?  

एकीकडे तुमची गर्ल फ्रेंड तर 

दुसरीकडे आई-बाबा या कात्रीतून कसे बाहेर पडावे? 

आई-वडील कि गर्ल फ्रेंड निवड कोणत्या वेळी कशाप्रकारे करावी? 


आयुष्याचा प्रवास हा काटेरी वाटेने करायचा असतो त्यामुळे तुमच्या जीवनात येणाऱ्या संकटांशी २ हात करण्यासाठी कायम तयार राहा नाही तर तुमचा पराभव निश्चित आहे. 

कुटुंब , समाज  सर्व घटक तुमच्या विषयी मत बनवतात ते त्यांच्यावर झालेल्या संस्कारातून पुराणमतवादी असणारा हा समाज प्रेम विवाहाची आदर्श संकल्पना स्वीकारायला अद्याप तयार नसला तरी तुम्ही प्रेमापेक्षा द्वेषाला सरस ठरू देऊ नका कदाचित तुमच्या समोर आज अनेक आवाहने असली तरी त्याला सामोरे गेल्याने पुढच्या पिढ्या तुमच्यापासून प्रेरणा घेऊन सामाजिक मानसिकता बदलवण्यात यशस्वी होतील. 

फोटो - pixabay aap


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विवाहाचं खरं वय

धर्माच्या भिंती मोडतात तेव्हा

शेवटि तिचे ही लग्न झालेच