नारी शक्तीहीन झाली आहे का

देशातील पहिली मुलींची शाळा महाराष्ट्रात सुरु झाली, या महाराष्ट्रातील मुलगी पहिली महिला dr. झाली, याच मराठी मातीची लेक पहिली महिला राष्ट्रपती झाली असे कितीतरी मैलाचे दगड मराठी मुलींनी आपल्या स्पर्शाने पावन केले. 

पण आज तिच्या माहेरच्या हक्काच्या जन्म भूमीत तिचे लचके तोडले जातात, प्रेमाच्या जाळ्यात फसवून मदमाशयानी तोडावे तसं तिच्या शरीराची चाळणी होत आहे तरी देखील हा शिवरायांचा मावळा गप्प बसतो याचंच आश्चर्य वाटते. 

 

गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या बातम्या सातत्याने येत आहेत एक प्रकरण शांत झाले कि दुसरे त्याची जागा घेते मनात एवढाच प्रश्न आहे हे असं किती दिवस चालणार? 

पुण्यापासून सुरु झालेल्या या सत्राणें आज कळस गाठलाय डोंबवलीतील १५ वर्षाच्या मुलीवर ३० विकृतांनी नियमित केलेला अत्याचार;  त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात एका महिलेचा झालेला विनयभंग संताप आणणारे आहे. 

एवढ्या घटना घडत असताना आपण हे सर्व का थांबवू शकत  नाही? 

या नराधमांना कोण अभय देतो?  

या प्रश्नांचे उत्तरे शोधून सापडणार नाहीत. 

एकंदरीत महिला सुरक्षेसाठी उठणारा आवाज आणि सोईस्कर केले जाणारे दुर्लक्ष यावरून महिलांवर होणारे अत्याचार नियोजित आहेत का? 

हा प्रश्न विचारावा लागतो त्यासाठी काही विश्वसनीय घटनाक्रम देखील आहेत. 

महिलांवर ठरवून अत्याचार केले जातात 


महिला अत्याचाराच्या सर्वच घटना संताप आणणाऱ्या असतात पण त्यापैकी काही घटनांना महिलांचे स्वतःकडे होणारे दुर्लक्ष जवाबदार आहे. 

बऱ्याच घटना उघडकीस येऊ नये म्हणून महिलाच महिलांवर दबाव आणतात त्यामुले महिलांवर अत्याचार करण्यासाठी काही महिला वासनांध पुरुषांना प्रोत्साहित करतात का? 

हि शंका घेण्यास वाव आहे. 

१५ वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराला लवकर वाचा फोडणे तिला शक्य झाले नाही गेल्या ८-९ महिन्यांपासून ती हे सर्व सहन करीत आहे. तिच्या या अगदीकतेचा फायदा घेऊन अनेकांनी निर्धास्त होऊन उपभोग घेतला अखेरीस तिने पोलिसात तक्रार करून स्वतःची या जाचातून सुटका करून घेतली. 

सुरुवातीला तिच्या प्रियकराबरोबर तिने शारिरीक सम्बन्ध ठेवले त्याने त्याचे चित्रीकरण करून तिला त्रास द्यायला सुरु केले त्याच चित्रफितीच्या वापर इतरांनी तिला उपभोगण्यासाठी केला; शेवटी आपली बदनामी होऊ नये म्हणून ती आज पर्यंत याबाबत काही बोलली नाही. 

प्रेमात पडल्याची हि शिक्षा आहे का? 

प्रेम आणि आकर्षण यातील फरक समजण्याचे वय असेल तरच प्रेमात पडा.  लैंगिक सम्बन्ध ठेवताना चित्रीकरणाला अनुमती देऊ नका, तसेच तो चोरून चित्रीकरण करणार नाही याची काळजी घ्या. 

हि पहिली घटना नाही अशा असंख्य मुली एका चुकीमुळे स्वतःच्या शरीरावरची मालकी हरवून बसल्या. एक प्रातिनिधिक उदाहरण-- 

फसवे प्रेम

 

म्हणून वेळीच सावधआणि बाळगा एकवेळ बदनामी झाली तरी चालेल पण असा जाच सहन करू नका. तुमचे असे खाजगी व्हिडीओ अथवा फोटो कोणी प्रकाशित करत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे म्हणून निर्भय होऊन तक्रार करा घाबरून जाऊ नका. 

अशा सर्व गोष्टी घरी माहिती होऊ नये म्हणून तुम्ही गप्प बसता पण त्यासाठी जर तुमचे आयुष्य उधवस्त होत असेल तर ते तुम्हाला मान्य आहे का? 

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार नाही म्हणून ते सत्ताधारी पक्षाला कायम धारेवर धरतात विरोधी पक्षाचे ते कामच आहे; महिला अत्याचारावर त्यांनी शासनाला सदो कि पडो करून सोडले त्यासाठी त्यांचे अभिनंदन पण दिव्या खालचा अंधार त्यांना कडी दिसणार? 

भारतीय जनता पक्षाच्या एका नगर सेविकेच्या कार्यालयात एका महिलेचा विनयभंग झाला त्याची तिने नगर सेविकेपासून आमदार, खाजदार पर्यंत तक्रार केली पण कोणी दखल घेतली नाही. तिने पोलिसात जाऊ नये म्हणून नगर सेविकेने पिढीतेला मारहाण केल्याचा तिने आरोप केला आहे. 

खंत याचीच वाटते महिला सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून तत्पर असणारा भा. ज. प. चाकर शब्द काढायला तयार नाही. 

मग विरोधी पक्षाचे  सरकार असणाऱ्या राज्यात याना फक्त महिला अत्याचाराचे राजकारण करायचे आहे का? एखाद्या महिलेवर असा गंभीर प्रसंग ओढवला असेल तर सर्वानी तिला धीर दिला पाहिजे पण केवळ आपल्या पक्षाची प्रतिष्ठा जोपासण्यासाठी एक महिलाच पिढीत महिलेचे खच्चीकरण करत असेल तर हा अत्यंत गम्भीर अपराध आहे. 

संबंधित पक्षाच्या महिला आघाडीला समस्त स्त्री वर्गाला जाब द्यावा लागेल तुमची निष्ठा महिलांशी कि राजकीय पक्षाशी? 

महिलांनी राजकारण करावे कारण त्यांच्या सहभागाशिवाय हे क्षेत्र समृद्ध होऊ शकत नाही पण तुमचे राजकीय भविष्य घडवण्यासाठी जर राजकीय नेता अथवा त्याच्या नावाचा वापर करून एखादा चमचा गैर फायदा घेत असेल तर त्याला तुरुंगात पाठवणे तुमच्यातील सजग राजकीय कार्यकर्तीचे लक्षण आहे. 

 

जर तुम्ही स्वतःला न्याय देऊ शकत नसणार तर इतरांना कशावरून न्याय देणार? 

विनयभंगापासून तर घृणास्पद अत्याचारापर्यंत महिलांसोबत होणारे गैरवर्तन थांबवणे हि सर्वांची जवाबदारी आहे ती पूर्ण करत असताना केवळ मानवता धर्माचे पालन करा नातेवाईक, राजकीय मित्र मंडळी, परिचित व्यक्ती असा भेद न करता सर्वाना कायद्याच्या कचाट्यात अडकवणे आपले आद्य कर्तव्य आहे. 

महिला अत्याचाराचे राजकारण करणाऱ्या ढोंगी लोकांना जवळ फिरकू देऊ नका ते केवळ तुमचा वावर करतात. 

हे सर्व घटना घडल्यावर.  पण अशा घटनाच घडू नये म्हणून काही योजना आपल्याला नक्कीच आखता येतील त्यासाठी-- 

फक्त एवढं करा बलात्कार कायमचे बंद होतील 


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा