महिला अत्याचारास मुभा

स्त्री-पुरुष भिन्न लिंगी आहेत एवढा नैसर्गिक फरक सर्वच जाणतात पण त्यांच्यातील एक शोषक आणि दुसरा सोशीत आहे हे तुम्हाला माहिती आहे का? 

तुम्ही म्हणाल आजच्या युगात तक्रार करणाऱ्या महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न शासन करीत असताना जर कोणी आवाज उठवत नसेल अथवा पोलिसात धाव घेत नसेल तर त्याला ती व्यक्ती स्वतः जवाबदार आहे दुसऱ्याला दोष देता येणार नाही. 

तुम्ही विचार करा जर अत्याचार करणाऱ्याला सर्व गुन्हे माप केले तर? 

हे सर्व स्वप्न रंजन तुमच्यासमोर मांडत नाही तर आपल्या देशात खर्च काही लोकांना महिलांवर अत्याचार करण्याचे स्वतंत्र इथल्या व्यवस्थेने दिले आहे. कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही म्हणून पुढील काही प्रश्नांची उत्तरे द्या. 

तशी हि यादी फार 

मोठी करता आली असती पण वास्तव तुमच्या ध्यानात आणून देण्यासाठी काही मोजके प्रश्न विचारतो. 

हे आज विचारण्याचे कारण पंजाबचे नवनीयुक्त मुख्यमंत्री चरणजित सिंह चानी  यांच्यावर एका I A S दर्जाच्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्याने me-to अंतर्गत आरोप केले हि घटना घडून ३ वर्षे उलटले असली तरी त्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यामुळे विरोधी पक्षाने आरोपाची राळ उठवली. 

 

१ महिलांविषयी आक्षेपार्य वक्तव्य करणाऱ्यावर स्वतः दखल घेऊन आज पर्यंत कोणत्या राजकीय पक्षाने स्वपक्षातील नेत्यानवर कार्यवाही केली? 

२ सत्ता धरी पक्षाच्या लोकांना अदृश्यरित्या महिला आयोग स्वरक्षण का देतो? 

३ राजकीय वलय असणाऱ्या व्यक्तीने अत्याचार केल्यास त्याविरोधात समाज पेटून का उठत नाही? 

४ काही राजकीय लोक महिलांबाबत बोलताना जाणीवपूर्वक जीभ घसरवतात त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी कोणी का धजावत नाही? 

५ महिला अत्याचार करणारा आरोपी ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाच्या महिला कार्यकर्त्या गप्प का बसतात? 

या सर्व प्रश्नांच्या मुळाशी उत्तर शोधायला गेलात तर मूल्यांपेक्षा व्यक्तीशी असणारी निष्ठा दिसेल. 

समाजात महिलांना समानतेचा दर्जा मिळावा म्हणून सर्व राजकीय लोक त्यांच्यापरीने प्रयत्न करण्याचे नाटक करून जनतेची फसवणूक करतात त्यांच्या हाताला अंतिमतः काही लागत नाही. 

ताजे प्रकरण चर्चेच्या केंद्र स्थानी ठेवत असताना सुरुवातीला थोडक्यात समजून घेऊ. 

विद्यमान मुख्यमंत्री आधी पंजाब राज्यात कॅबिनेट मंत्री होते नंतर त्यांना मुख्यमंत्री पदी बढती मिळाली. 

२०१८ साली वर नमूद केल्याप्रमाणे एका  महिला प्रशासकीय अधिकाऱ्याने मंत्री फोनवर अश्लील संदेश पाठवतात म्हणून त्याकाळात प्रशिद्धीच्या झोतात असणाऱ्या ME-TO या चळवळीचा भाग बनून तिच्याबरोबर झालेल्या दुष्कृत्याला जगासमोर आणले त्यानंतर तत्कालीन पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी संबंधित महिलेची माफी मागायला सांगितली. 

त्यानंतर मंत्र्यांनी त्यांची क्षमा माघून कामाला सुरुवात केली पण महिलेने लेखी तक्रार न दिल्यामुळे पोलिसांनी कार्यवाही केली नाही. 

 

पण महिला आयोग स्वतंत्र चौकशी करणार आहे. 

एवढे दिवस दडून राहिलेल्या या प्रकरणाने आता चांगलाच जोर पकडला आहे. 

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून चरणजित सिंह चानी   यांच्यावर विरोधी पक्ष शाब्दिक हल्ले करत आहे. 

पण यापेक्षा गंभीर अपराध करणार्यांना केंद्रातील सत्ताधीश पक्ष अभय का देत आहे? 

कारण वरून सर्व राजकीय पक्षाचे मुखवटे वेगवेगळे दिसत असले तरी त्यांच्या मनातील महिलांविषयीचा दुय्य्म दर्जा आणि त्यांच्या वागण्यातील दिखाऊ वृत्ती सर्व पक्षात सारखीच आहे. 

आज आपण अनेक राजकीय पक्षांना महिलांची बाजू घेताना पाहिले असेल पण हेच महिला सक्षमीकरणाचे पुरस्कर्ते ज्यावेळी आपल्या राजकीय सहकार्यावर आरोप झाला कि त्या महिलेला बदनाम का करतात? 

गेल्या काही दिवसांपूर्वी विधानपरिषेदेच्या विरोधी पक्ष नेत्यांनी जाहीर कार्यक्रमात महिलांबद्दल आक्षेपार्य वक्तव्य केले. त्या आधी एका मंत्र्यांचा राजिनामा घेण्यासाठी एका मुलीची आत्महत्या निमित्य ठरली त्यावेळी देखील सरकार पक्षाकडून मंत्र्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न झाला. एका मंत्र्यांचा राजिनामा बाहेर येत नाही ती पिढीता न्याय मिळावा म्हणून आटोकाट प्रयत्न करत असली तरी तिच्यावर खोटे गुन्हे दाखल करून तिलाच तुरुंगात डांबून ठेवले. 

एका आमदाराने मुलींना पळून नेण्यासाठी मी तुम्हाला मदत करीन असे मुक्ताफळं उधळली तर एकाने हद्दच केली त्याने थेट सैनिकांच्या पत्नीला मुले कशी होतात? असा जाहीर प्रश्न विचारला. आता हे सर्व फ्रेमच्या बाहेर गेले आहेत त्यामुळे स्वतःला निर्दोष समजून हीच माणसे महिला अधिकाराची भाषा करतात पण त्यांनी स्वतःच्या कृत्यांबद्दल सुरुवातीला जाहीर माफी मागण्याचे धाडस करावे. 

हि विकृत मानसिकता देशातील सर्व राज्यातील नेत्यांमध्ये आढळते. 

 

गल्लीपासून दिल्लीपर्यंत याचे उदाहरणे सापडतील  त्यामुळे एकाला झाका आणि दुसऱ्याला काढा अशी अवस्था आहे. 

यात जर आमूलाग्र बदल घडवून आणायचा असेल तर वाचाळवीर नेत्याला त्याच पक्षाच्या महिलांनी नारी शक्तीचा परिचय करून द्यावा. 

जोवर या दानवांवर नियंत्रण घातले जात नाही तोवर हा रोग सर्वत्र पसरत जाईल म्हणून तातडीचे पाउले उचलायला हवी. 

जिथे नारींचा सन्मान असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो. 

केवळ घोषणा देऊन स्त्री-पुरुष समानता नांदत नाही तर तशी सामाजिक मानसिकता तयार करावी लागते;  म्हणून या नापीक डोक्यांवर संस्काराचा नागर फिरवून समतेचे बीज पेरा त्यातून सामाजिक एकतेचे वृक्ष उगवेल हा विश्वास बाळगायला हरकत नाही. 

 फोटो - साभार गूगल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा